नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्ध्ये केले बघ.. पण आंब्याचा रस?/पल्प दोन्हि न वापरता.. ओळख काय वापरले असेल ??

22.jpg

अरे मि .. मॅन्गो जाम वापरला आहे... मुलगा मॅन्गो जाम खात नव्हता.. मग काय त्याचा इथे उपयोग केला.. आनि आज जाम वापरुन शिरा पन केला.... लेकाला आणी त्याच्या पप्पाला दोघांना अजुन माहित नाहि आहे ... मि मॅन्गो जाम वापरले आहे ते.. Wink Wink :

सृष्टी फोटो जरा मोठा टाक की. इसेन्स वापरलाय का? मी संध्याकाळी डकवते फोटो किंवा उद्या सकाळी फ्रीजरला सेट करुन आलेय.

मुग्धटली, हे भन्नाट होतय मस्त. Happy
मँगो आईस्क्रीम झाले करुन दोन वेळा.
पहिल्यवेळी तर अगदी अर्धा कपाच्या प्रमाणात केले (कारण साय तेवढीच होती) नंतर दुसर्यावेळी साय कमी म्हणुन दुधाची पावडर जास्त घातली. आता टेंडर कोकोनट करेन Happy

आणि हो हँड मिक्सी वापरणे एकदम सोपे कारण ज्या पातेल्यात ग्राईंड केले तेच उचलुन फ्रिजर मधे ठेवले. त्यामुळे भांडे धुण्यासाठी कमीत कमी मेहेनत Wink

मोनाली, टेंडर कोकोनट ची आईक्स्क्रीम करताना ती मलई (नारळाच्या आतली) मिक्सीमधे आधी फिरवुन मग सगळे साहित्य मिसळणे अपेक्षित आहे ना? मी रविवारी करणार आहे. काही वेगळी मेथड असेल तर सांग प्लीजच.

हो मोनाली, मीपण एक भांड्यात सर्व जिन्नस एकत्र करून हँड मिक्सीने ग्राईंड केले आणि तेच भांडे उचलून सरळ फ्रीजमध्ये ठेवले.
त्यामुळे भांडे धुण्यासाठी कमीत कमी मेहेनत डोळा मारा>>>+१
आज आमच्याकडे मँगो आईस्क्रीमचा नंबर आहे कारण फणसाचं एका दमात सगळ्यांनी संपवलंय. फोटो काढण्याइतकंही उरू दिलं नाही.

शुभांगी, तसच कर पण मलई खूप नको फिरवुस मिक्सीमध्ये थोडीच फिरवुन घे. पेस्ट केली की मग खोबर्‍याचे तुकडे लागत नाहीत नॅचरल्ससारखे

सृष्टे कोपुच्या धाग्यावर इतक हाईप केलस म्हणुन इथे बघायला आले, तर काय नंबरी फोटो टाकलायस... आधीच लांबच बघायला ढापण लावावी लागतात आता जवळच्यासाठी पण लागणार... तुच सांग आता काय घातलस ते

टेंडर कोकोनट ची आईक्स्क्रीम करताना ती मलई (नारळाच्या आतली) मिक्सीमधे आधी फिरवुन >>>
पेस्ट केली की मग खोबर्‍याचे तुकडे लागत नाहीत नॅचरल्ससारखे>> +१ हेच लिहायला आलेले.

परवा आंबा आईस्क्रीम केलं. मस्त झालं.
पण काही तासापेक्षा जास्त ठेवलं तर अगदीच दगड झाला. खायच्या आधी बाहेर काढुन ठेवावं लागतंय. तुम्ही आईस्क्रीम केल्यावर नंतर फ्रीजरचे तापमान कमी करता का?

टेंडर कोकोनट ची आईक्स्क्रीम करताना ती मलई (नारळाच्या आतली) मिक्सीमधे आधी फिरवुन >>>
पेस्ट केली की मग खोबर्‍याचे तुकडे लागत नाहीत नॅचरल्ससारखे>> +१ हेच लिहायला आलेले. >>>>>>
सगळ्या मलईची पेस्ट करून न घेता थोडी मलई एकदम बारीक कापून घालावी

शलाका कस्ले टेम्टींग पीसेस दिसताहेत टेंडर कोकोनटचे... स्लर्प स्लर्प...
सृष्टी भन्नाट आयडिया... टेस्टमध्ये फरक पडतो का पण???

खूप दिवसांपासून करायचं होतं, आज केलंय. सेट होतंय. मी तर मिश्रणच अर्धा ग्लास प्यालो, शेक सारखा. तूफान चव आहे. नंतर फोटू देतोच Happy

भन्नाट चवीचं आईसक्रीम. अजून सेट होतंय थोडं पण न राहवून दोन स्कूप काढलेच मी. फाईव्ह स्टार रेसिपी मुग्धा, थँक्स अ करोड Happy

(अमूल, क्वालिटी, दिनशॉ, वाडीलाल इत्यादी कंपन्या डूख धरणार तुझ्यावर मुग्धा, आतापर्यंत त्यांचं रोजचं 'गिर्‍हाईक' होतो, आता बाहेरुन आईसक्रीम आणणे फक्त जास्त पाव्हणे वगैरे असतील तरच होणार ! )

natural ice cream1.jpg

अमेय क्युट आणि कलरफुल आईसक्रिम.

मुग्धे हिट झाली तुझी रेसिपी, मी पण करून बघेन आंब्याचे.

सृष्टी भन्नाट आयडिया... टेस्टमध्ये फरक पडतो का पण?? >> नाही.... मि आमरस करुन पन केलेले आहे..अजुन घरि समझले नाही.. म्हनजे समझ तु.... टेस्टमध्ये फरक पडत नाही...

माझ्याकडे मॅप्रोचा ऑरेंज क्रश आहे, तो वापरून हे आईसक्रिम छान होईल का?
दूध, मिल्क पावडर, अमूल क्रिम, साखर आणि चवीनुसार ऑरेंज क्रश एकत्र ब्लेंड करेन असं म्हणतेय.... करू ना तसंच?

..

ऑरेंज क्रश + दुध या कॉम्बिनेशन बद्दल शंका वाटतीये.
अमेय, मस्त जमून आलय आइस क्रीम!

आमच्याकडे तापमान ३ वगैरे आहे सध्या! त्यामुळे फोटो बघून घेते फक्त Sad

ऑरेंज क्रश + दुध या कॉम्बिनेशन बद्दल शंका वाटतीये. >> अरे हो माझ्या लक्षात नाहि आले.. मुग्धाने पन वरति
संत्र .. नको सांगितले आहे.. पण क्रश चालेल का ????

Pages