नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंगल डोअर फ्रीज मध्ये डीप सेट कसं करायचं?? सोपी पाकृ आहे, प्रयत्न करेन.>>> रंगासेठ, फ्रीज सिंगल डोअर असला काय किंवा डबल डोअर जिथे बर्फ करायला पाणी भरु ट्रे ठेवतो ना तिथेच आईस्क्रिमच भांड ठेवायच.

आन्जलि>>>> अहो थँक्यु तर तुम्हाला म्हणायला हव.

एक रिक्वेस्ट.. एडिट करून दुधाचा आणी मिल्क पावडरचा ब्रँड पण अ‍ॅड करून टाक प्लीज.>>>>> वर्षु ताई नक्की करते एडिट. मला माहित नव्हत की दुध पावडरचे वेगवेगळे ब्रँड पण असतात मी समजत होते की फक्त nestle everyday milk powder हाच एक ब्रँड आहे.

मुग्धा, धन्स गो... टेंडर कोकोनट आवडता फ्लेवर आहे "इकडचा" Proud नॅचरल्स फॅमिली पॅक परवडत नाही... (अर्धाअधिक अस्मादिकांच्याच पोटात जातो वर नंतर डॉक्टरचं बील Happy ) हे बरंय!!!

नक्की करून बघेन आणि केल्यावर फोटू पण डकवेन!!!

कालच घरी करुन बघितल,
it was awesome, thanks a lot for such a wonderful and easy receipe.
सगळ्याना खुपच आवडल, मी त्यात readymade chocolate melt करुन त्याचा flavour दिला होता.

dreamgirl, नक्की करा हं??? स्वारी नक्कीच खूश होईल.... फोटु पण आठवणीने डकवा इथे.
सुमेधातै, मी घरच्या दुधावरची साय घालते. क्रीम नाही घालत, पण नणंदेने दाखवल होत तेव्हा तिने अमुलच क्रीम वापरल होत.

मुग्धा अहो जाहो नको फारच म्हातारं झाल्यासारखं वाटतं... (अगं चालेल रादर पळेल)! नक्की करणारे आणि फोटो जरूर टाकेन Happy

चालेल हं dreamgirl..... कस आहे ना इथे कोण किती मोठ आहे ते काहिच कळत नाहि, मग आपण डायरेक्ट एकेरीवर कस येणार ना? म्हणुन सुरुवात अहो जाहो ने करते मग कोणि म्हणाल की अहो जाहो नको करुस तर मग अग तुग/अरे तुरे म्हणते.

ही मुग्घा सगळ्यांनाच अहो जाहो करते Angry मला पण करते. जोपर्यंत अग करत नाही तोपर्यंत मी आईसक्रीम करणार नाही (हे बोलावणे आल्याशिवाय नाही अश्या टोनमधे वाचावे ) Wink

मी रविवारी करीन आणि बहुदा सिताफळ फ्लेवरचे Happy

मंजिरी मोड ऑन:
अहो(हे "अहो" सर्व मायबोलीकरांना उद्देशुन आहे शेवटचं) काय हे???? हे पहा खरच माझ चुकल. यापुढे नाही होणार अस. मला क्षमा करा. सॉरी!!!!!(कान वगैरे पकडुन) मी आता यापुढे कधीच कुठल्याच माबोकाराला अहो जाहो करणार नाही. खरच करणार नाही.
मंजिरी मोड ऑफः Proud

आता इथे कुणी स्वतःचा चिमा मोड ऑन करु नये म्हणजे मिळवलं
शुभांगी>>>>> आईस्क्रिम केलस की फोटो टाक पहिल इथे आणि मग खा. ती सुमेधा केव्हाची फोटोसाठी अडलीय.

घाबरत घाबरत पोस्ट टाकतेय... कारण फोटो नाहीये काढलेला Wink

शनीवारी रात्री केले आनी रविवारी खाल्ले मस्तच होते.. आणि नो कटकट Happy

गुब्बे मी १किलो पल्प आण्ला खास हे आईसक्रीम करायला.. आता नुसता पल्पपण छान लागतो हे कळल्यामुळे पुढचे आईसक्रीम होईपर्यंत संपेल बहुदा Proud

मला एक सांगा.. पल्प न घालता चॉकलेट / वॅनीला कराय्चे असत्र्तर क्रीम / मिल्क पावडरचे प्रमाण काय घ्यायह्चे Uhoh

mugdha, tu parat ekda ice creame Karun photo ka takat nahis ? mhanaje mag amhi kelele barobar zale ki nahi te pakke samajel na. bar sitafal gar vikat milu shakto ka :)?

me_mastani माहित नाही ग. ट्राय करून बघ आणि लिही इकडे
सुमेधा सिताफालाचा गर विकत नाही मिळत बहुतेक. सिताफालाचा गर बियांसकट चमच्याने काढून घेऊन अगदी स्लाईट मिक्सरमधून काढून घे बिया आणि गर वेगळे होतात.

मी केले हे आइस्क्रिम तर थोडासा बर्फ लागत होता. अमूल क्रीम, नेसले मिल्क पावडर, सिताफळाचा गर (माप्रो)) वापरलेले. काय चुकले असेल?

mI kela...kami ve; thevala tar barf lagat navhata...jast vel thevala tar lagat hota..
pan chava apratim Happy

Pages