बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोळ्या/पुर्‍यांसाठी बाई बघा शक्यतो किंवा सासूला द्या ते काम. बरी किचन मध्ये राहिल. आणि तुम्ही खेळा सगळ्या> गंमतीतही हे ठिक नाही वाटलं. हसण्यासारखं तर नक्कीच नाही. बाकी चालू द्या तुमचं.

माझ्याकडे दहा जण जेवायला येणार आहेत. लहान मुलं कुणीच नाहीत. मी शेवपुरी, मिसळ पाव, दहीवडे असा बेत प्लॅन करते आहे. ह्याच्या जोडीला गोड काय करावं. आणी मेन्यू मधे पण अजून काही अ‍ॅड करावं का?

प्रॅडी, मँगो चीजकेक..... भयानक मस्त लागतो आणि भयानक सोपा... आज फओनवा करते आणि रेस्पि सांगते.

पोळ्या/पुर्‍यांसाठी बाई बघा शक्यतो किंवा सासूला द्या ते काम. बरी किचन मध्ये राहिल. आणि तुम्ही खेळा सगळ्या.>>> Uhoh सीरीयसली?

आर्च +१

प्रज्ञा, फ्रुट कस्टर्ड /फ्रुट्स आणि व्हीप्ड क्रीम एकत्र करून/ कुल्फी / मॅंगो पाय / लेमन तिरामिसू / इथे ती केशर पिस्ता आईसक्रीम रेसिपी आहे तो पण ऑप्शन चांगलाय.

मला बिल्वा आणी चिवाच्या आयड्या आवडल्या. चिवाचा मँगो चीजकेक मी खाल्लेला आहे. सही लागतो.

माझा लास्ट ऑप्शन मँगो पायच आहे. पण मला वेगळं काही करता आलं तर आयडियाज हव्या होत्या. लेमन तिरामिसू ट्राय करता येईल.फ्रीजर सेक्शन मधे क्रीम व्हिप मिळतं त्यात मँगो पल्प घालून फ्रूट सॅलेड चांगलं लागेल का? मी व्हॅनिला आईसक्रीम मधे मँगो पल्प घालून केलेलं फ्रूट सॅलेड खाल्लंय. क्रीम व्हिप नाही ट्राय केलं कधी. कुणी केलंय का ट्राय? अजून एक सुचतंय ते म्हणजे पाईनॅपल अपसाईड डाऊन केक विथ व्हॅनिला आईसक्रीम.

प्रज्ञा चाट पार्टी आहे अस मेनु वरुन वाटतय. फालुदा किंवा कोणतही इंडियन फ्लेव्हरच आईसक्रीम चांगल वाटेल अशा मेनु बरोबर.
नाहीतर तुला आवडेल त्या फ्लेव्हरच trifle bowl.

रचु ही खालची लिंक आय.ई. मधे पहा. जुन्या मायबोलीतली मँगो पायची लिंक आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93090.html?1174602241

सीमा एखादी ट्राईड अँड टेस्टेड ट्रफलची रेसिपी असेल तर देना प्लीज.

पोळ्या/पुर्‍यांसाठी बाई बघा शक्यतो किंवा सासूला द्या ते काम. बरी किचन मध्ये राहिल. आणि तुम्ही खेळा सगळ्या>>> गंमतीतही हे ठिक नाही वाटलं>>> If I am not wrong this is the tradition. वशेळ्या मंगळागौर पूजतात आणि मुकट्याने जेवायच असतं. व्रत, जागरण आणि मुकट्याने जेवणे अस 'ताटावरन पाटावर असत' ह्या दिवशी; रांधा, वाढा, उष्टी काढा ही कामं सूनेनी (वशेळीनी) करायची नसतात. सासरच्या मंडळींनी सूनेसाठी करायचे असते. जर पुरातन पद्धतीनी सूनेनी मंगळागौर पूजायची तर सासूला पोळ्या करायला काय problem आहे? मंगळागौर नाही ना करत outsource मग एक दिवस केल सूनेसाठी रित म्हणून तर कुठे बिघड्ल? शिवाय त्यांनी पहिला 'मोलाच्या बाईचा' option दिलेला आहे. मला नाही वाटत त्यांना सासूचा अनादर करायचा असेल, भाषा चुकली असेल. बाकी चालू द्या Happy

प्रॅडी मी हेवी क्रीम आणि आंबा पल्प घालून करते फ्रुट सॅलड. मस्त लागतं.
चिवा चीजकेकची रेसिपी इथली माबोवरची ना?

माझ्याकडे २० मोठे आणि १० लहान असे सकाळी आणी १२ मोठे ६ लहान संध्याकाळी येणार आहेत.
मेनु सुचवा.सकाळी मराठी जेवण चालेल. संध्याकाळी ईड्ली सांबार करणार आहे. जर सर्वाना (सकाळ - संध्याकाळी) श्रीखंड (आम्रखंड) केले तर किती lb दही + आंब्याचा रस लागेल? तसेच टोमॅटोचे साराची सोप्पी कृती आहेका कोणाकडे?

शुक्रवारी आम्ही ६ मोठे आणि ३ मुलं जेवायला आहोत. बिल्वाने वर दिलेले फ्रुट सॅलड करेन, आता मेन मेनु सुचवा.
दुपारी २-२.३० तास वेळ आहे बनवायला. मिसळ करायचा विचार आहे. जोडीला काय करावे?

जर पुरातन पद्धतीनी सूनेनी मंगळागौर पूजायची तर सासूला पोळ्या करायला काय problem आहे?>>> अव्वा!! प्रॉब्लेम काहीच नाही हो राजसी, पण सासूलाही मंगळागौरीचे खेळ खेळायचे असतील तर ती कशी आणि कधी खेळणार? Happy

खुप खुप धन्यवाद सगळ्यांचे. मदत शक्यतोवर नसणार कोणाची.
आजच एका केटररला फोन करून बघते. आपल्या इथला पाव-भाजी, पुलाव इ. मेनू कसा वाटतो.
पोळ्या/पुर्‍यांसाठी बाई बघा शक्यतो किंवा सासूला द्या ते काम. बरी किचन मध्ये राहिल. आणि तुम्ही खेळा सगळ्या>>> गंमतीतही हे ठिक नाही वाटलं>>> आपण सगळे एकमेकांना मदत करतो ना, त्यांनी गंमतीत म्हटले वरील विधान.

सासूलाही मंगळागौरीचे खेळ खेळायचे असतील तर ती कशी आणि कधी खेळणार? स्मित>>> हा काय प्रश्न झाला, रात्रीचा फराळ/जेवण झाल्यावरच ना ... मंगळागौरीचे खेळ करणार्‍या बायकांचा प्रोग्राम झाला की ... मंगळागौरीचे खेळ तेव्हाच सगळ्याजणी खेळतील ना ..... तोपर्यंत पोळ्या/पुर्‍या झाल्या असतीलच करून Happy

हा काय प्रश्न झाला, रात्रीचा फराळ/जेवण झाल्यावरच ना ... >>> नाही ना... नीट वाचा बरं सासूला पोळ्या करायला पाठवल्यावर नक्की काय करण्याचा प्लॅन आहे तो...

पावभाजी + तवा पुलाव + दहीबटाटाशेवपुरी / पाणीपुरी/ चाट + स्वीटडिश असा मेनू ठीक वाटतोय का बघा!

Pages