बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी !
गीट्स ढोकळा
काकडी-पोहे
मुग-भजी/मुग-भजी चाट
मीनी थालीपिठ
समोसा-चाट
शेव-पुरी
कटलेट
कॉर्न-वडे
कॉर्न-चाट्/भेळ
ब्रेड-रोल

दोन्ही नाही! काकडी कोचवुन्/बारिक चिरुन त्याला मीठ/चविला साखर लावुन ठेवायचे सुटलेल्या पाण्यात( पातळ) पोहे भिजवायचे कोरडे वाटले तर थोडे ताक्/दही घालायचे वरुन मिरची/कढिपत्ता चरचरीत फोडणि घालायची. खायला देताना कोथिबिर आणि ओले खोबरे ,बारिक शेव टाकायची मस्त लागतात.

ओह ओके. धन्स.
आता दडपे पोहे, मूगबटाटापुदिना टिक्की - माझ्या टो चटणी बरोबर
असे फिक्स केले आहे. डोके चालवायला मदत केल्याबद्दल धन्स सगळ्यांना. Happy

मला आठवड्याचे प्लॅनर कराय्चे आहे. मी ठरव्तेय पण रोज रोज प्रोटीन्स खाल्लेच जातील असं काही नाहीये. प्लीज मदत करा.
माझी मुलगी अत्त १९ महीन्यांअची आहे. तिला आता स्वतःच्या हाताने भाजी-पोळी खाय्ची हुक्की आलीये तर मी फरसबी, भेंडी, बटाटा काचर्‍या कर्तेय जे ती हाताने उचलुन खाऊ शकते पण ती डाळ/ वरण खायला तयारच नस्ते तर त्याचे पराठे बनवून देतेय पण अजुन काय प्रोटीन्स वापरू शकते??
आठवड्याच्या प्लॅनरमध्ये काय काय किती किती असावं याबद्दल प्लीज मार्गदर्शन करा.
मी ब्रेकफास्ट आणि डिनरचाच प्लॅन करतेय कारण दिवसभर आम्ही तिघे बाहेर अस्तो आणि मी आणि नवरा रात्रीचंच लंचला नेतो.

दडपे पोहे, मूगबटाटापुदिना टिक्की - माझ्या टो चटणी बरोबर
हा मेनू हिट्ट ठरला. सगळे खुश. बाबा खुश >>> मस्तच.
मूगबटाटापुदिना टिक्की रेसिपी यो जा टा.

मनी,
तुम्ही व्हेज आहात का? नाहीतर चिकन, अंडी असे अनेक प्रोटीन्सचे ऑप्शन्स आहेत. व्हेज आहात असे मानून, पराठ्याच पीठ तयार वरणात (शिजलेली डाळ) भिजवू शकता. टोफू घालून पण भिजवता येते. पनीर पण चांगला पर्याय आहे मुलांसठी. पनीर पराठे, भाजी असं करता येईल.

धन्यवाद सानुली आणि वेका,
मी नॉन-व्हेज खाते पण वरण घालून पराठे कराय्ची कल्पना चांगली आहे.
मी एडमामे आणलेले ते नुस्तेच खाल्ल्ले गेले. जनरली जर आठवड्याचे वेळापत्रक बनवाय्चे आहे तर कसे बनवावे म्हणजे आठवड्यातुन ३ वेळा भाजी, १-२ वेळा कडधान्य अणि १-२ वेळा नॉन-व्हेज असं की अजुन काही अ‍ॅड करावं??

मनी हा प्रश्न बेत काय करावासाठी आता out of syllabus होतोय. कृपया मुलांचा आहारवाल्या धाग्यांमध्ये शोध किंवा नवा धागा सुरू कर Happy

अगं वेका, लहान मुलांसाठी नकोय फक्त.. Happy
रोजचाच बेत काय ठरवावा असं वाटलं म्हणून इथे विचारलं पण फक्त आठवड्यासाठीचा (Weekly Planner) आधीच ठरवायचा आहे. Happy
तसा काही धागा असेल तर शोधून बघते.
धन्यवाद

मेधा/शोनूचा आस्वपू धागा आहे ना? शोधला पाहीजे. जुन्या मायबोलीत होतं काहीतरी. Happy
मलाही पाहीजे खरंतर. सध्या मीही आस्वपू, बर्‍याचदा आस्व करत असते..

खिमा पाव खरं तर all in one dish आहे हे मा वै म. पण तरी आणखी काही डावी बाजु वाढवायची असल्यास काय करावं ?

धनसाक बरोबर करतात तसा कचुमर करता येईल, भरपूर कांदा, थोडासा टॉमेटो, हिरवी मिरची तिखट सोसवेल तितकी, बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स, मीठ , अन घट्ट दही.

तिखट, मसालेदार खाणं सोसवणार नाही असं कोणी असेल तर दही भात पण करता येईल .

मनी,
मी असं करते प्लानिंग
दर आठवड्याला एक तरी कडधान्य - बिरडं ; उसळ ( गोडा मसाला / कोल्हापुरी मसाल/ दगडू तेली मसाला घालून) ; छोले / राजमा / मेक्सिकन पद्धतीने ब्लॅक बीन्स असं आलटून पालटून .

एक पालेभाजी अन एक पालेभाजी पराठा किंवा वरण यात मिक्स करुन - मेथी /पालक/ शेपू/ अंबाडी / चार्ड बॉक चॉय/ सरसों / लाल माठ / मायाळु / अरुगुला यातलं मिळेल ते .

या शिवाय दोन -तीन इतर भाज्या आणि एक चिकन, मट्ण किंवा श्रिम्प करी .
कधी कधी फिश फ्राय

शिवाय रोजच्या जेवणात कच्च्या भाज्यांची कोशिंबीर किंवा सॅलड

पुढच्या आठवड्यात लेकाला शाळेत न्यूट्रीशियस डबा बनवायचा आहे. गॅसशिवाय करता येणारा एखादा सोपा पदार्थ सुचवा प्लीज.(. सँडविच. शिवाय)

दाण्याच्या कुटाचा (गूळ / साखर, तूप घालून) लाडू.

स्प्राऊट चाट (मोड आलेले हिरवे मूग, स्वीट कॉर्न, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, सैंधव, लिंबाचा रस, चाट मसाला - हवी असल्यास थोडी मिरपूड)

ड्राय फ्रूट रोल

अरे देवा. खरेच की. नाचणीची पुरी आनी पा़लक शेव असेल तर?

मग फ्रूट चाट बेस्ट.

मला उद्या पुन्नीला न्युट्रिशिअस डबा द्यायचा आहे. कॉर्न सलाड. तर कॉर्न आणले आहे ते उकडून घ्यायचे. आणि एका डब्यात द्यायचे. व मीठ, तिखट, चाट मसाला हे मिक्स करून एका छोट्या डब्यात द्यायचे वेगळे असे केलेतर चालेल का? तिच्या वर्गात एक मुलगा आणतो. अजून काही वेगळी मेथड आहे का? कॉर्न सलाडची?

फ्रुट चाट, सलाड्स(मेयोनीज, लिंबु, दही यातलं कोणतंही ड्रेसिंग करता येईल.) कच्च्या भाज्या किंवा थोड्याश्या वाफवलेल्या भाज्या घालून किंवा भाज्या+ फळं असं आवडीप्रमाणे काहीही घालून करता येईल.

हो मामी असंच करायचं. यामध्ये लिंबुरस घालायचा राहिला. आम्ही कधीकधी खोवलेला ओला नारळ पण घालतो कॉर्न सलाड मध्ये.

कॉर्न सॅलडमध्ये आवडत असल्यास चेरी टोमॅटोज, बारीक चिरलेली सिमला मिरची, कोथिंबीर असे घालूनही देता येईल. चाट मसाल्याची टेस्ट नको असेल तर मिक्स हर्ब्ज हा पर्यायही छान आहे. त्याचे सॅशे असतील तर ते सॅशे सोबत देता येतील.

Pages