बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वांग्याचे काप / खेकडा-भजी / मिनी बटाटेवडे / मूंग गोटे / मसाला पापड / पापड्या-कुरडया-मिरगुंडं (तळून) / कोबीचे भानोले / अळूवडी

धन्यवाद सगळ्यांना.

अश्विनीमामी , फिश खूप वेळ तळत बसावे लागतील .आणि या रविवारी फिश मिळतीलच असे नाही.

सामी,
सुरळीच्या वड्या, पाटवड्या ,शेंगोळे, असे करता येईल. Happy

नॉन व्हेज हवे असेल तर
उकडलेली अंडी सोलून , चार उभे तुकडे करायचे . तेल + बटर तापवून भरपूर कडीपत्ता घालायचा, त्यावर पातळ उभा चिरलेला कांदा मस्त कॅरमलाइझ होइस्तोवर परतायचा. धणे जिरे पूड, थोडा गरम मसाला, तिखट मीठ, मीठ घालून परतून मग हलक्या हाताने अंडी घालून परतायचे. सर्व्ह करताना कोथिंबीर, लिंबू, थोडा चाट मसाला शिंपडायचं वरतून.
अशाच प्रकारे कलेजी सुद्धा करता येईल. कांदा कॅरमेलाइझ झाला की त्यावर कलेजी शिजवायची- कलेजी ला थोडा कोल्हापुरी मसाला किंवा मालवणी मसाला पण घालू शकता.

उद्या लेकाची मैत्रीण येणार आहे जेवायला. शाकाहारी आणि इंडीयनच हवे आहे. ( हे नवे खूळ!)
जीरा राईस, वेज कोर्मा, काकडी कोशिंबीर, लच्छा पराठा बरोबर गोड म्हणून शीरा चालेल का? जोडीला कदाचित समोसे करीन.

Happy
छोले नाहितर राज्मा चालेल का नाहितर पनीर मखनी (सायोची रेसिपी)? आपला गाजर हलवा पंजाब्यांपेक्षा छान होतो Happy नाहितर शिर्‍याला "सूजी का हलवा" म्हणायचे. (अवांतर : माझ्या लहानपणी आमच्याकडे हिंदी भाषिक कुटुंब जेवायला आले होते, आईने शिरा केलेला गोडाला, त्यांना सारखा हलव्याचा आग्रह करत होती, मी बहिणीला म्हणाले "बघ! आई कशी त्यांना फसवते आहे .. साधा शिरा केलाय आणि हलवा घ्या म्हणून आग्रह चाललाय :))

जिलेबी, गुलाब जाम वगैरे केले असते पण कितपत खाईल याचा भरोसा नाही. फिरनी ची आयडीया छान वाटतेय. सध्या या पोरीच्या अंगात इंडीया शिरलाय. आधी ती सकाळ पासून स्वयंपाक शिकायला येते म्हणत होती. Proud तिला कसे बसे थोपवले.

विकतचं गोड चालणार असेल तर नानकचा मूग दाल हलवा छान असतो. मागच्या आठवड्यात मी घरी दूध आटवून त्यात हल्दीरामच्या रसमलई पॅटीज घातल्या होत्या. अगदी चविष्ट आणी कमी त्रासात रसमलई तयार.

स्वाती२, गुलाबजाम आवडतील. अभारतीयांचा माझा तरी याबाबतीत अनुभव खूप चांगला आहे.
सायोची मलई बर्फी पण हरकत नाही करायला. ती पण आवडते.

सगळ्या सजेशन्स साठी धन्यवाद. मोठी माणसे येणार असती तर प्रश्न नव्हता पण टीनएज मुली खाण्याच्या बाबतीत फार बेभरवशी. त्यामुळे गोडाचा घाट घालायला जीवावर येते. मुलीचा BF कट्टर मीट-पोटॅटो वाला असल्याने लंचला ही मुलगी एकटीच येणार आहे. त्यात गोड खाल्ले नाही तर मला संपवायला लागायचे. फिरनी किंवा शीरा थोड्या प्रमाणात करता येइल. तेव्हा त्यापैकी एक काहीतरी करेन.

मलाई कुल्फी विथ चॉकलेट सॉस आणि क्रश्ड टोस्टेड नट्स किंवा विथ रोझ /स्ट्रॉबेरी सिरप आणि वॉफल क्रिस्प्स..... कुल्फी उरली तरी फ्रिजमधे राहु शकते बरेच दिवस..

अमा Lol

शिकरणात वेलची, केशर, पिस्ता-बदामाचे काप घालुन इंडिअ बनाना पुडिंग/डेझर्ट म्हणुन सर्व्ह करा Wink

अमा, काल अगदी हेच (शिकरण) लिहावंसं वाटलेलं! पण त्या पाहुणीला ती बनाना स्मूदी वाटायची, म्हणून टंकता टंकता थांबले!! Lol

सत्यनारायणाचा गोडाचा साजूक तुपातला, केशर-काजू-बेदाणे घातलेला, हिरव्या द्रोणातला किंवा कर्दळीच्या पानातला शिरा....

अमा Lol
लेकाची गर्लफ्रेंड येणार असती तर इतके लाड नसते केले पण हे प्रकरण BFF कॅटेगरीतलं. अजून १० दिवसांनी दोघांचे मार्ग वेगळे होणार. त्यामुळे जरा कौतुक. फ्रीज मधे गेल्या आठवड्यात केलेली स्ट्रॉबेरी कुल्फी आहे पण मग 'माझ्या मैत्रीणीला लेफ्टोवर घातले' हे ऐकून घ्यावे लागले असते त्यामुळे शीरा केला शेवटी.
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.

नमस्कार!!
मी हा धागा गेले काही दिवस चाळते आहे.. पण माझा प्रश्न जरासा वेगळा आहे..
मला वाटते तो "बेत काय असावा" ह्या category मध्ये येईल ..
तर प्रश्न असा आहे कि - माझी कन्या पुढच्या महिन्यात वय वर्षे १ पूर्ण करत आहे..
अंदाजे ५० लोक्स असतील (लहान - मोठे धरुन).. मेन्यु काय असावा?
१. पूर्ण जेवण नको आहे, पण तरिही पोटभरीचे हवे आहे..
२. पाव्-भाजी, पुलाव इत्यादि कॉमन वाटते आहे, त्यामुळे ते कटाप
३. सगळ्यात IMP - घरी काहिच बनवायचे नाहीये, Order देण्याचा plan आहे
Please जरा हट्के मेन्यु सुचवाल का?
डोसा - उतप्पा वाल्या एकाला order देणार आहोत, सोबत आणखी काय काय add करता येइल?
sweet म्हणजे cake देता येईल..

हा प्रश्न इथे योग्य नसेल तर उडवेन (उगाचं नवीन धागा नाही उघडला).

पुण्यात आम्हाला घरी येऊन डोसा करणारे हवे आहेत, मानकर डोसा वाले कमीत कमी १०० चीचं ऑर्डर घेतात. आमचे २० जण होतायतं लहान मुलं धरून त्यामुळे १०० आकडा गाठणं जरा कठीण आहे. दुसरं कोणी ऑर्डर घेणारं कोणाला माहीत आहे का ?

Pages