Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राजक्ता_शिरीन, केटररला डोसा
प्राजक्ता_शिरीन, केटररला डोसा गाडी लावायला विचारू शकता. दुसरा पर्याय आहे, की जोगेश्वरीच्या बोळात जवळपास अनेक डोसागाडीवाले आहेत. त्यांना विचारू शकतेस. काही नावांसाठी विपू बघ.
प्राजक्ता, असे गाडीवाले जे
प्राजक्ता, असे गाडीवाले जे असतात ते इतक्या कमी लोकांची ऑर्डर घेण्यास फारसे उत्सुक नसतात. पण अनेक घरगुती केटरर्स (घरी येऊन स्वैपाक करणारे आचारी) असतात ते देखील असे डोसे करतात. पीठ तुम्ही तयार करून ठेवू शकता किंवा ते देखील घेऊन येतात. मला शक्य झालं तर मी १-२ जणांचे फोन नं ईमेल करेन तुम्हाला.
ओके, धन्यवाद अकु आणि बिल्वा.
ओके, धन्यवाद अकु आणि बिल्वा. आज जाऊन बघते
बाकी सगळे मेनु - पावभाजी, मिसळ, मसालेभात करून झालयं त्यामुळे हा पर्याय बघत होतो.
मला थोडी मदत हवी
मला थोडी मदत हवी होती.
आमच्याकडे साउथ इंडियन नवरा-बायको संध्याकाळी चहाला येणार आहेत.
मी रगडा पॅटीस ठरवते आहे.त्याच्याबरोबर अजून काही करता येईल का?
सोप्पं काही सुचत असेल तर सांगा प्लीज.मला लहान मुलगी आहे.तीचं तंत्र संभाळून करावं लागणार आहे.
त्यांच्याबरोबर त्यांचा दोन वर्षांचा मुलगा पण येईल.
अजून काही म्हणजे गोड पदार्थ
अजून काही म्हणजे गोड पदार्थ करायचा आहे की तिखट पदार्थ?
फ्रूट चाट करा मस्त! सोबत
फ्रूट चाट करा मस्त! सोबत मुलांना आवडतात तश्या बनाना चिप्स / बटाटा वेफर्स / सोया चिप्स / ओनियन रिंग्ज असे प्रकारही ठेवता येतील.
चाट नको असेल तर फ्रूट सॅलड!
गोडाचा शिरा हाही एक पर्याय आहे.
@सोनपालवी - छोला भटुरा ,
@सोनपालवी -
छोला भटुरा , गुलाब जाम , पुलाव आणी केक (वाढ्दिवस आहे म्हणून).
डोसा बनवीतांना वेटींग टाईम खुप जाईल. लोक कंटाळतात. शिवाय पोट्भरीचं नाही.
केटरींग वाला फक्त भटुरा गरम बनवतो. सो नो वेटींग टाईम .
बघा विचार करुन...
सोनपालवी, चायनीज फूडचा
सोनपालवी, चायनीज फूडचा पर्यायही आहे. व्हेज हाक्का नूडल्स, मंचुरियन, शेझवान / फ्राईड राईस, टोमॅटो सूप आणि सोबत सॅलडचा एखादा प्रकार. (स्वीट कॉर्न सॅलड, मिक्स ग्रीन सॅलड)
स्वीट म्हणून आईसक्रीम. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते.
दहीवडे, चाट आयटेम्स (दही बटाटा शेव पुरी टाईप्स), तवा पुलाव, मिक्स व्हेज, पुर्या, रायते, चटणी / लोणचे असा पर्यायही ठेवता येईल. सोबत गुलाबजाम / मूग हलवा / गाजर हलवा / दुधी हलवा / रबडी-जिलेबी / फ्रूट सॅलड स्वीट डिश म्हणून.
माझ्याकडे संध्याकाळी २
माझ्याकडे संध्याकाळी २ अमेरिकन मैत्रीणी येणार आहेत , जेवायला नाही पण स्नॅक्स मेनु (तिखट नसलेले ) सुचवा प्लीज
कसा मेन्यू हवा आहे? भारतीय /
कसा मेन्यू हवा आहे? भारतीय / परदेशी?
पफ पेस्ट्री शीट मध्ये
पफ पेस्ट्री शीट मध्ये सामोश्याचं सारण घालून पॅटीस.
भजी, देसी सँड्विच.
भजी, देसी सँड्विच.
धन्यवाद शूम्पी, bittu
धन्यवाद शूम्पी, bittu
कमी स्पायसी बटाटेवडे, रगडा
कमी स्पायसी बटाटेवडे, रगडा पॅटीस, पावभाजी, आलू पराठे-बुंदी रायता आणि इडली-चटणी-सांबार हे माझ्याकडे आलेल्या अमेरिकन लोकांना आवडलं होतं. हे सगळं मी एकदम नव्हतं केलं, हे विविध वेळचे मेनु आहेत
माझ्या प्रोफेसरकडे बार्बेक्यू
माझ्या प्रोफेसरकडे बार्बेक्यू पार्टी आहे. तेवढं वगळता बाकी पॉटलक. सगळी जनता अमेरिकन आहे. ह्या सगळ्या प्रकारात जाईल असं काहीतरी मराठी पारंपारिक करुन घेऊन जावं असं डोक्यात आहे.
) असं काहीतरी बरं पडेल?
मालवणी फिश करी / बटाटा रस्सा- भात असं बरं वाटेल की सुरळीच्या वड्या वगैरे (थापायला जमल्या तर
अजून काही सुचवू शकलात तरी चालेल..
पुलाव - टोमॅटोचे सार / मटार
पुलाव - टोमॅटोचे सार / मटार उसळ - जिरा राईस / दही-भुत्ती / कढी - खिचडी / लेमनराईस
किंवा पाव-भाजी / वडा-पाव / भजी-पाव / मिसळ-पाव / उसळ-पाव ...
येणार्या जनतेबद्दल अजून काही
येणार्या जनतेबद्दल अजून काही माहिती नाही का? नसेल तर बटाटा रस्सा/दही-भुत्ती / कढी - खिचडी, सु वड्या नको.
फिश करी चालेल. बिर्याणी-पुलाव हा भात प्रकार चालेल. वडा पाव पळेल.
रसायन, सुरळीच्या वड्या
रसायन, सुरळीच्या वड्या पहीलूनच करणार असाल तर राहू द्या.
अगदी मराठीच पदार्थ न्यायचा बेत नसेल तर पालक-पनीर किंवा पनीर बटर मसाल्याबरोबर नान हे बार्बेक्यूमधले हमखास खपणारे आयटम्स आहेत. अशाच एका पार्टीत सायोच्या रेसिपीने केलेला तोंडली भात आणि काकडीची दह्यातली कोशिंबीर पण लोकांनी आवडून खाल्ली. एकदा दडपे पोहे करून नेले होते. ते चांगले झाले नसावे. अजीबात खपले नाही.
जे काय न्याल ते गरम राहील असं बघा. देशी-थंड कर्या बंडल लागतात.
@रसायनः बार्बेक्यू पार्टीत
@रसायनः बार्बेक्यू पार्टीत लेमन राईस खूप हिट्ट होतो.
कल्पु, अरुंधती, लोला -
कल्पु, अरुंधती, लोला - थांकू... लेमन राईसची कल्पना आवडली!
मृण्मयी- जे काय न्याल ते गरम राहील असं बघा >>> एकदम बरोबर. मावेची सोय आहे; त्यामुळे करी प्रकार चालावा पण वडा-पाव मावे मधे गरम करुन बहुदा मजा नाही येणार. पनीर बटर मसाला इथल्या प्रीतिच्या रेसिपीने हुकमी होतो त्यामुळे विचार करेन. प्रॅक्टिकल सुचनांबद्द्ल धन्यवाद!!
उद्या लिहीनच काय गंमत होते ते..
सगळ्यांना पुन्हा एकदा
सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद! लेमन राईस - सॅल्मन करी असं कॉम्बो नेलं पार्टीला. सगळ्यांना आवडलं- काही काहींनी २-३ वेळा घेऊनही खाल्लं..
माझ्याकडे २० मोठे आणि १० लहान
माझ्याकडे २० मोठे आणि १० लहान असे सकाळी आणी १२ मोठे ६ लहान संध्याकाळी येणार आहेत.
मेनु सुचवा.सकाळी मराठी जेवण चालेल. संध्याकाळी ईड्ली सांबार करणार आहे. जर सर्वाना (सकाळ - संध्याकाळी) श्रीखंड (आम्रखंड) केले तर किती lb दही + आंब्याचा रस लागेल? तसेच टोमॅटोचे साराची सोप्पी कृती आहेका कोणाकडे?
मला मंगळागौरी साठी 40 जणांना
मला मंगळागौरी साठी 40 जणांना बोलवायचे आहे,तर मी पूर्ण जेवण ठेवू की पावभाजी, पुलाव इ. मेनू ठेवू प्लीज मार्गदर्शन करा ना
मदतीला कुणी आहे का? की कुणी
मदतीला कुणी आहे का? की कुणी वेळेवर मदत करायला ये॑ऊ शकेल? की बाईंना / पंडीतला सांगणार? असं असेल अन ईच्छा असेल तर पूर्ण जेवण. नायतर बाकीचं... हाकानाका...
तुमचं स्वतः च मत पहा ना!
मंगळा गौरीचा एक मेन्यू असतो
मंगळा गौरीचा एक मेन्यू असतो बहुतेक. उपास सोडायचा, रात्रीचा आणि दुसृया दिवशीचा. जागरणासाठी आवश्यक म्हणून कॉफी ही देतात. व्हेज मराठी जेवण बेस्ट. पोळ्या/पुर्यांसाठी बाई बघा शक्यतो किंवा सासूला द्या ते काम. बरी किचन मध्ये राहिल. आणि तुम्ही खेळा सगळ्या. केटर करून घेतले तर ताण कमी पडेल.
मला मंगळागौरी साठी 40 जणांना
मला मंगळागौरी साठी 40 जणांना बोलवायचे आहे,तर मी पूर्ण जेवण ठेवू की पावभाजी, पुलाव इ. मेनू ठेवू प्लीज मार्गदर्शन करा ना >> तुमच्यापाशी मनुष्यबळ किती आहे त्यावरून ठरवा. बाहेरच ऑर्डर देणार असाल तर तुमच्या आवडीनुसार मेनू ठरवा. घरी करणार असाल तर करायला सोपा व सुटसुटीत मेनू ठेवा.
मंगळागौरीला साधरणपणे
मंगळागौरीला साधरणपणे पुरणपोळी, मुगाच्या डाळीची खिचडी, मोडवलेल्या मटकीची उसळ असा बेत असतो. पुपो करून देणारं कोणी असेल आसपास तर बघा. बाकी करून ठेवण्यासारखं आहे. यासोबत एखादी कोशिंबीर, चटणी आणि तळण करायचं की झालच.
मंगौचा टिपीकल मेनू: सढळ
मंगौचा टिपीकल मेनू: सढळ हस्ते साजूक तूप घातलेली सरसरीत मुगडाळ खिचडी, पापड, चटणी कोशिंबीर, मटकीची उसळ गर्रम पाहिजे पण, पोळी /पुरी, श्री/आम्र खंड/ गुलाबजाम, भाजणीचे वडे ,शुभ्र घट्ट दही.
काही जण श्रावण म्हणून पुपो ही करतात मग इतर पदार्थही वेगळे असतात. 40 लोकांना वरचा मेनू सोपा वाटतो.
हा मेनू तसाही छान राहीलः ग र
हा मेनू तसाही छान राहीलः
ग र म मटकीची उसळ +/- फ्लावरची पिवळी भाजी किंवा उकडलेल्या बटाट्याची भाजी...
वाफाळती मुगडाळ खिचडी + साजूक तूप
भाजणीचे वडे + दही
पु.पो.
पापड
चटणी
कोशिंबीर/ ख. का. पण चालेल
पुर्या वा फुलके
पोळ्या/पुर्यांसाठी बाई बघा
पोळ्या/पुर्यांसाठी बाई बघा शक्यतो किंवा सासूला द्या ते काम. बरी किचन मध्ये राहिल. आणि तुम्ही खेळा सगळ्या>>>>>>>>>>

Pages