Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पियुपरी, सगळंच कोरडं कोरडं
पियुपरी, सगळंच कोरडं कोरडं नाही होणार? एखादं सूप/ सार किंवा आईस्क्रीमऎवजी लस्सी/ मिल्कशेक/ कोल्डकॉफी? आणि स्नॆक्स मध्ये कोथिंबीर/अळू/ कोबीची वडी/ पापड+कांदा टोमॆटो+तिखट /कॉर्न चीज बॉल्स. पराठ्यासोबत चटणी नको का?
सगळंच कोरडं कोरडं ना
सगळंच कोरडं कोरडं ना होणार?
>> हो. म्हणुन आत्ता सोलकढी अॅड केलीये. (थँक्स.. लक्षात आणून दिल्याबद्दल) आणि बुंदी रायता ओलं आहे ना..
आईस्क्रीमऎवजी लस्सी/ मिल्कशेक/ कोल्डकॉफी?
>> नाही. आईसक्रीम कॅन्सल केलं तर आम्हाला केक आणु. कारण डोहाळतुलीला केक फार आवडतो. (आणि मलापण
)
स्नॆक्स मध्ये कोथिंबीर/अळू/ कोबीची वडी/ पापड+कांदा टोमॆटो+तिखट /कॉर्न चीज बॉल्स
>> वीकडे ला डोजे असल्यामुळे सगळे जेवायच्या वेळेलाच पोचतील.. सो स्नॅक्स नाही ठेवला.
सोलकढी स्टार्टर/ अॅपेटायझर म्हणुन ठेवणार आहोत.
एका तमिळ कूटुंबाला जेवायला
एका तमिळ कूटुंबाला जेवायला बोलवायचं आहे. त्यांना मराठी स्टाईलचं जेवण करायचं ठरवलंय.
मी मटकीची उसळ, मसालेभात, पापड, खेकडाभजी किंवा बटाटेवडे, पोळ्या, कोशिंबीर, लाल मिरचीचा ठेचा/लोणचं एवढं करणार आहे. वेळ मिळाला तर सुरळीच्या वड्या. भाजीमधे बाळबटाटे किंवा कुर्मा भाजी. शिवाय दोन्ही मुलांसाठी तमिळ रस्सम भातदेखील करणार आहे- ऑन द सेफर साईड म्हणून.
गोडामधे काय योग्य वाटेल? आधी करून ठेवता येण्यासारखा गोडाचा पदार्थ असेल तर बरे. खीर, बासुंदी, श्रीखंड नकोय. एकंदरीत मेनू कसा वाटतोय?
मटकी, बटाटे (व), बटाटे (भा),
मटकी, बटाटे (व), बटाटे (भा), बेसन, ठेचा...... कुटुंबाचं काही खरं नाही.
गोडाला आंब्याचा शिरा. डीजेच्या आईची कृती आहे.
मराठी स्टाइलचं जेवण करायचं तर
मराठी स्टाइलचं जेवण करायचं तर कुर्मा नको. बटाटेवडे केले तर अर्थातच बाळबटाटे नकोत. भजी/वडे आणि शिवाय सुरळीच्या वड्या म्हणजे खूप होईल. त्यापेक्षा उसळीच्या जोडीला बटाट्याची भाजी आणि अळुवड्या हे कॉम्बो छान आहे - मराठी आहे आणि एक पालेभाजीही अॅड होईल. कोशिंबीर काकडीचीच. दुधी हलवा वगैरे आधी करून ठेवण्यासारखा मराठी स्टाइल पदार्थ आहे.
मृण्मयी, आंबा इथे आता मिळणार
मृण्मयी, आंबा इथे आता मिळणार नाही. पल्प घालून तो शिरा डीझास्टर करून झालाय माझा.
स्वाती, अळूची पाने इथे मिळत नाहीत
कोथिंबीर पण भरपूर मिळत नाही म्हणून कोथिंबीर वडी कॅन्सल केली. जिला जेवायला यायचंय तिला भात-पोळी नको म्हणे. भरपूर स्नॅक्स आयटम कर म्हणाली. मदतीला तीच येणारे!!!
शूम्पी, फिरनी मागच्याच महिन्यात करून दिली होती तिलाच.
गुलाब जामुन आयडीया चांगली आहे. पाकातले चिरोटे पण मस्त.
गुलाब जामुन. ओल्या नारळाची
गुलाब जामुन. ओल्या नारळाची करंजी. पाकातल्या पुर्या. मोदक.
tuzee varlD femasa firanee
tuzee varlD femasa firanee kara kee
why can't I type in marathi here? Have been having this issue for last week.
शूम्पे, तमिळ कुटुंबाला
शूम्पे, तमिळ कुटुंबाला तांदळाची खीर ते सुद्धा मराठी मेनुत ?
>> तिला भात-पोळी नको म्हणे.
>> तिला भात-पोळी नको म्हणे. भरपूर स्नॅक्स आयटम कर म्हणाली.
मग जेवणाचा घाट कशाला घालतेस? आणि रस्सम भात आणि शिवाय मसालेभात कशाला?
बटाटेवडे + चटणी, एक गोड पदार्थ, आणि रस्समबरोबर करशील त्यातल्याच पांढर्या भाताची दहीबुती असं कर. उत्साह/वेळ्/हौस असेल त्यामानाने यात कितीही आणि कोणतेही स्नॅक आयटम्स अॅड करता येतील. आणि इतकंच केलं तरी पोटभरीचं होईल.
siMDe, south chyaa lokaaMchee
siMDe, south chyaa lokaaMchee tanduLaachee kheer bekkaar asate. firanee khaallyavar tyaaMna kaLela kee kheer jashee asaavee?
mane dukhaavalee asalyaasa sorry!
तळण काढणारच असशील तर
तळण काढणारच असशील तर पालकाच्या पुर्या, चटणी, खमंग काकडी, बाळबटाट्याची भाजी असं काहीतरी? किंवा स्नॅक्स हवे असतील तर बटाटेवडे, चटणी, दडपे पोहे/कोळाचे पोहे, भाजणीची मिनीथालिपिठं, मुगाचा हलवा?
स्वाती, तिला भात्-पोळी नको.
स्वाती, तिला भात्-पोळी नको. पण पोरं-नवरा भातच खाणार आहेत!! त्यामुळेच रस्सम भात करणार आहे. मसालेभात झटपट होतो शिवाय ऑथेन्टिक मराठी वाटतो म्हणून ठेवलाय. पोळी वाटलं तर कॅन्सल करता येईल. बटाटेवडे नेहमीच्या साईझने न करता लग्नामधे वाढतात तसे टिल्ले करेन म्हणत होते.कींवा कांदाभजी करेन.
गावात पालक मिळत नाही.
खरंतर राजगिरा आणि अंबाडी सोडल्यास कुठलीच पालेभाजी मिळत नाही सहसा. त्यामुळे पालीभाजी मधे काहीच ठरवत नाहीये.
हायला! अंबाडी कर ना मग! सोबत
हायला! अंबाडी कर ना मग! सोबत भाकरी कर. अॅज ऑथेन्टिक अॅज इट गेट्स!
इथे सगळ्यांचे सजेशन्स आपल्या
इथे सगळ्यांचे सजेशन्स आपल्या स्वतःच्या आवडीचा मेन्यू असतो. मला इथे विचारणार्या सगळ्यांकडे जेवायला जावे असे वाटते मेन्यू वाचून.
प्रतिसादात जाउन मग मराठीत टाइप करता येतेय पण हे फार कतकटेचं आहे ब्वा...
स्वाती, झाला तो मेनू एकदा
स्वाती, झाला तो मेनू एकदा करून. अंबाडीची भाजी, भाकरी, जवसाची चटणी, पिठलं भात आणि गोडाला गुळाचा शिरा.
शूम्पी +१ अंबाडी खाऊन युगं
शूम्पी +१
अंबाडी खाऊन युगं लोटली
नंदिनी मटकि मिसळ करतो त्या
नंदिनी मटकि मिसळ करतो त्या प्रकारे करता येईल, म्हणजे बरोबर फरसाण- शेव, कांदा-टोमॅटो, पाव (वडापाव किंवा भजीपाव पण खाता येईल) ठेवुन मिसळिचा प्रकार मैत्रिणिसाठि एक अजुन स्नॅक आयटम होईल. साऊथवाल्यांना मिसळ खुप आवडते हा स्वानुभव. बरोबर मसालेभात आणि बाकिचे आयटम तु ठरवले आहेत ते -गोडामधे गाजराचा हलवा, दुधि भोपळ्याचा हलवा, गुलाबजामुन यापैकि आधि काहितरि करुन ठेवता येईल.
हा मेन्यू पहा बरं: कुठलाही
हा मेन्यू पहा बरं:
कुठलाही हलवा, गु. जा. किंवा गारेग्गार आईसक्रीम + गुजा / हलवा
पुर्या / पराठे + भाजी + पातळसर चटणी
दहीभात (मराठी वाला पण मिरची घातलेला)
नंदिनी, सध्या माबोवर हिट्ट
नंदिनी, सध्या माबोवर हिट्ट होत असलेलं सीताफळ आइसक्रीम कर की.
योगेश कुळकर्णी आभार्स..
योगेश कुळकर्णी आभार्स..
तामिळ लोक आहेत ना? बटाटे वडे
तामिळ लोक आहेत ना? बटाटे वडे नको. बटाट्याची पिवळी भाजी पण नको. त्यांना आवडत नाही.

मिरची भजी करा. फार कष्टाची खुम्खुमी असेल तर आप्पे.
सुरळीच्या वड्या अजिब्बात नको. त्यांना त्याच महत्व कळत नाही.
गरम चपाती आणि टोमॅटो+कांदा+काकडी आणि त्यात मुग डाळ घालून कोशिंबीर. हे दोन्ही मस्ट आहे.
छोले / बीटची फक्त मिरची घालून भाजी/ बीन्सची मिरची,ओल खोबर घालून भाजी/ तोंडलीची उडिद डाळ आणि लाल मिरचीची फोडणी टाकून भाजी . काहीही चालेल.
स्वीट म्हणून गुलाबजाम /फ्रुट सॅलड . पुरण पोळी आवडते. ओल्या नारळाच्या करंज्या आवडतात. नारळी भात सुद्धा खुप आवडतो.
माझ्या अनुभवानुसार , तामिळ लोकांना गोडा मसाला आवडत नाही. त्यामुळ मसाले भात किंवा मराठी मसाला घालून भाज्या मी तरी करणार नाही.
वरील सर्व पाच वर्ष साउथ इंडियन असंख्य मैत्रिणीच्यात राहून आलेले अनुभव आहेत. (वरील पदार्थांमधले काही पदार्थ मराठी नसले तरी "Some how they blend nicely."
त्यांना त्याच महत्व कळत
त्यांना त्याच महत्व कळत नाही.>>>
सुरळीच्या वड्या अजिब्बात नको.
सुरळीच्या वड्या अजिब्बात नको. त्यांना त्याच महत्व कळत नाही. अ ओ, आता काय करायचं>>>

तामिळ लोकांना गोडा मसाला आवडत
तामिळ लोकांना गोडा मसाला आवडत नाही.>>> माझा अनुभव उलटा आहे. विशेषतः उसळी वगैरे आवडीने खातात साउथ/ नॉर्थ इंडियन्स.
ऑफिसमध्ये Fall harvest season
ऑफिसमध्ये Fall harvest season साठी पॉटलक आहे. काय पदार्थ नेता येईल ? ऑफिसमेध्ये ९५% टक्के जनता अमेरिकन आहे.
उरलेले ३% चायनिज तर २% भारतिय आहेत. मूख्य पदार्थ , उपपदार्थ, गोड असे गट आहेत. आधी करुन ठेवता येईल असा पदार्थ सुचवा.
तुम्हाला भारतीय पदार्थ
तुम्हाला भारतीय पदार्थ न्यायचा आहे का?
भोपळ्याचे घारगे नेऊ शकता.
पुलाव, भजी, फ्रूट सॅलड ?
पुलाव, भजी, फ्रूट सॅलड ?
अकु, फॉल हार्वेस्टसाठी बहुधा
अकु, फॉल हार्वेस्टसाठी बहुधा तेव्हा येणारे लाल भोपळे, सफरचंद इ.चे पदार्थ करतात.
भोपळ्याचे घारगे जमेल असे
भोपळ्याचे घारगे जमेल असे वाटते आहे. आभार स्वाती_आंबोळे.
Pages