बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुलाबजामच करणार असाल तर काहि गुलाबजाम पाकात न घालता कोफ्ते म्हणुन वापरता येतील.
रसोइ मॅजिक चा Butter Paneer Masala वापरुन छान gravy बनते,पनीर आणि/वा गुलाब कोफ्ते या ग्रेवी मधे छान लागतात्.लहान मुलांना खुप आवडते हि भाजी.वेळ पण जास्त लागत नाही.

खरंतर मी माबो वरच ही कोफ्ते वाली आयडिया वाचली होती,
बर्‍याचदा गुलाब्जाम करताना मी जास्त करते, उरलेले फ्रीज्र मधे फ्रीज करते,
अचानक आलेल्या पाहुण्यां करता पटकन चांगली भाजी करायला किंवा sunday special साठि खुप कामि येते.( gits च्या Rabadi सोबत हि तवा स्वीट साठि वापरता येते).
(असेच भिजवलेले काजु गर तिखत्-हळद्-मीठ घातलेल्या पाण्यात अगदि मऊ होई पर्यंत शिजवुन(१.५ ते २ तास लागतात याला) फ्रिज करते,अंडाकरी केली तर शाकाहारि लोकांसाठि हे गर अंड्याएवजी वापरते.)

जर दुधाची अ‍ॅलर्जी म्हणून पनीर चीज बाद होत असतील तर गुजाचा खवा वा रायत्यातले चक्का दहीदेखील कसे चालेल?

माझ्याकडे नवर्‍याच्या ऑफीसातले पंचविसेक साउथिंडीयन लोकं येणार आहे डिनरसाठी एक पालक पनीर ठेवलाय रिच आणि सोप्प म्हणून पण त्यासोबत काय करावं?

माझा मेन्यु

चिप्स आणि डिप्स किंवा सिमला मिरचीची भजी
पालक पनीर
मलाइ कोफ्ता
मिक्स वेज पुलाव- मुलांकरता पण होईल
पोळ्या - त्यांना आपल्या मराठी पध्द्तीच्याच खायच्यात (हाय रे कर्मा, आधी विकत आणेन म्हटलेलं Sad )
रायता
आणि सीमाचं तिरामिसु ट्रायफल...सोप्पं वाटतंय म्हणून Happy

हा मेन्यु कसा वाटतोय??
मलाई कोफ्ता ऐवजी काही सोप्पा ऑप्शन काय असु शकतो जो पालक पनीरला सुट करेल?

बिट्टू, चवळी-वांगं-बटाटा बनवेन म्हणतेय..मटकी किंवा काळे वाटाणे नाहीयेत. पण हे कॉम्बो चांगलं लागेल/दिसेल कां?

बीन्स ची सुकी भाजी, गाजराचा कीस घातलेला फोडणीचा दहिभात, तळीव पापड मिरच्या इत्यादी, लोणचे, नक्की ठेवा दक्षिणी लोकांना आवडते.

दही भात बनवू शकेन. गाजर घालूनही छान दिसेल.
मुलांनाही होइल पण पालक पनिर सोबत कुठली भाजी करावी बरं?

जर दुधाची अ‍ॅलर्जी म्हणून पनीर चीज बाद होत असतील तर गुजाचा खवा वा रायत्यातले चक्का दहीदेखील कसे चालेल?
>>>

नाही चालणार्..त्याच्या साठी..सॅलॅड(फक्त चिरुन) ठेवणार्..आणि बाकिच्यांसाठी चक्का सॅ.. गुजा बरोबर अजुन काहितरी ठेवेन त्याच्या साठी..बहुतेक थोडे मापु

कोफ्ते करणार नाही..पण आयडिया छान आहे

मनी, चना मसाला / छोले / मटार उसळ / आख्ख्या मसुराची आमटी / उसळ किंवा मसूर-बटाटा.

भाजीच हवी असेल तर कांदा-बटाटा-फ्लॉवर-टोमॅटोचा रस्सा / फ्लॉवर-मटार-बटाटा यांचा नारळाचे वाटण घालून रस्सा/ भरली वांगी / नारळाच्या दुधातली भाजी / आलू-मटर / मिक्स व्हेजिटेबल -स्टर फ्राय.

वर्‍हाडी शेव भाजी / वांगी-बटाटा-गाजर-मटार-हरभरा वगैरे घालून भोगीला करतात तशी भाजी (ह्यात मेथीचे मुटके पण घालता येतील )/ कोणतीही उसळ / साधी उकडलेली बटाट्याची भाजी (पुरी भाजी वाली) काहीही करता येईल. ह्या सगळ्या भाज्या पटकन होतात. मिक्स भाजीला कापाकापी करावी लागेल मात्र.

अरुंधती आणि बुट्टू,
छान ऑप्शन्स सांगितलेत. छोलेच म्हणतोय नवरा आणि मी भोगीच्या भाजीचा विचार करतेय. बर्‍याच भाज्या कापून फ्रीज केलेल्या आहेत.

धन्यवाद.

पुपो, चवळीची उसळ, मसाले भात, मठ्ठा ह्या मेन्यू मध्ये अलका मावशी स्पेशल बाळ बटाट्यांची भाजी कशी वाटेल? पुपो बरोबर अजून कोणती भाजी चांगली वाटेल? मला टीपिकल प्रयोजन बटाटा भाजी नाही करायचीये.

चवळीची उसळ, मसालेभात आणि बाळबटाट्यांची भाजी, सगळं साधारण एकाच रंगाचं, एकमेकांच्या मसाल्यांचं नाही का वाटत? बटाट्याची भाजीच करायची तर फक्त हिरव्या मिर्च्या, कोथिंबीर, आलं, जिरं आणि लिंबाचा रस यांचं वाटण लावून किंवा बटाटा-पालक फ्राय भाजी?

श्रावणघेवडा-बटाटा / सिमला मिरची-बटाटा / परतलेल्या तोंडल्याच्या काचर्‍या / परतलेली भेंडी / गाजर-मटाराची परतलेली भाजी / फ्लॉवर-बटाटा हे कॉम्बोही चांगले लागेल.

बटाटाच पाहिजे का ? नाहीतर सीमाची लग्नातली वांग्याची भाजी पण एकदम मस्त होते . करायला सोपी आहे .

मृ, अकु, मेधा थँक्स. कोबी-बटाटा- मटार विथ भरपूर ओला नारळ अशी भाजी केली होती.

गणपतीच्या पूजेसाठी शिरा न्यायचा आहे. ४०-४५ लोक आहेत.थोडे मोदक ,खीर वगैरे आणेल अजून कोणितरी. तर मी रवा किती घेऊ?

इतकं गोड असताना लोकं शीरा वगैरे नाही खात. उगाच कष्ट पडतात. २ किलो खूप आहे. जाडा रवा फुलतोच.

(असे आपले माझे मत. बाकी तुमची मर्जी)

येळेकर, किती पटापट उत्तरे देतायत.
असा कॉन्फिडंस हवा.
सही आहे.

मी १० च्या वर माणसे असतील तर फक्त आउटसोर्सच करू शकते.
Wink

मी १० च्या वर माणसे असतील तर फक्त आउटसोर्सच करू शकते. साती, ३ जणांचे करताना कंटाळा येतो.बाकीचे काय करणार! ३ जणांचे प्रमाण इतके तर ४५ जणांचे किती? अशा हिशोबाने दिलेले उत्तर आहे.

Pages