बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रुट चाट चालेल.. खाकरा भेळ कशी बनवायची?
दाण्याचा कुटाचा लाडू त्याला वळता येणार नाही. (डबा मुलांना बनवायचाय).
पनीर मध्ये परतलेला कांदा, टोमॅटो, आलमि पेस्ट घालून +पोळी दिली आणि वर्गात रोल करायला सांगितला तर खूप साध, सोप वाटणार नाही ना? यावर इव्हॅल्यूएशन होणार आहे.

अमा,एक फु.स. फक्त सलाड जेवणार असेल तर त्यात काहीतरी प्रोटीन पण टाक नं. उकडलेले मूग्/चवळी/पनीर्/चीज क्युब्ज जे तिला आवडेल ते. Happy

धनश्री., तुम्ही << गॅसशिवाय करता येणारा एखादा सोपा पदार्थ सुचवा प्लीज.(. सँडविच. शिवाय) >> असं लिहिलं आहे, मग पनीर + परतलेला कांदा इत्यादी + पोळी वगैरे चालणार का डब्यासाठी? Happy

मुलांना हाताळायला सोपे म्हणजे मग फ्रूट चाट किंवा स्प्राऊट चाट / भेळ.

पफ पेस्ट्री शीट्स चे पॅटीस(बटाटे-मटारचं स्टफिंग), स्टोअरबॉट पाउंड केक बरोबर आणखी काय करावं?
आईच्या वाढदिवसा निमित्त. व्हेज ओन्ली.

मिल्कशेक कर की मग. आंबा किंवा फ्रोझन चिक्कू.
मला वाटलं पाउंड केक हवाच आहे म्हणून सोबत आइस्क्रीम म्हटलं.

किंवा पोटभरीचा बेत करायचा तर पॅटिसनंतर दहीबुत्ती वगैरे कर. आणि जराशाने केक.

मी एक आयडिया केली. ह्या धाग्यावरचं कोनतही एक रँडम पान उअघडून त्यावरचा मला टेम्टिंग वाटलेला आयटम करायचा Happy
वरच्या दोनात तवा पुलाव(आडोच्या रेसिपीने) ची अ‍ॅडिशन झालेली आहे!

स्वाती पाउंड केक हवाच आहे, वर लिहिलेले २ पदार्थ तिला आवडतात हे माहिती आहे म्हणून ते नक्कीच आहेत. बाकी मी माझ्या आइला फार ओळखत नाही असं वाटत असेल वरचं वाचून
डायबेटीस आहे तेव्हा शेक राहुदे. मस्त मठ्ठा करते. आता अजून एखादं रँडम पान उघडून काय सापडतं बघते.

शुम्प्स, मंडळ आभारी आहे... शाॅर्टकट बेत शोधत होते.. आज तवा पुलाव मारते..

खूप कलर्ड बेल पेपर्स आहेत, थड्या तव्यात ढकलेन, अजून सोपं काय करता येईल?

दुपारच्या डब्ब्यासाठी (३-४ जण) आणि रात्रीच्या जेवणासाठी (६ जण) स्पेशल मेन्यु (पुर्ण व्हेज) हवाय. एकावेळसाठी एखादी पनीरची डिश करता येईल. सध्या बाजारात जास्त भाज्या मिळत नाहीयेत. पत्ताकोबी किंवा घोसाळी, दुधी असल्याच भाज्या आहेत. गोडामध्ये बहूतेक गुलाबजाम करणार. रात्रीला आइसक्रिम असेल.

पूर्ण व्हेज म्हणजे मराठी पदार्थच हवेत असं काही आहे का?

पत्ताकोबी वापरून कोबीचे पराठे (कोबी परतून बेसन किंवा मुगाची डाळ घालून केलेल्या सारणाचे स्टफ्ड पराठे पण मस्त लागतात), कोबीची भजी करता येतील. कोबी-पनीर रोल पण छान लागतात. कोबीची पचडी करता येईल. पालक मिळतोय तर पालकाची ताकातली भाजी, डाळ पालक, पालक पनीर, छोले पालक, पालक पुर्‍या, पालक पराठे, पालक राईस, पालक सूप करता येईल. दुधीचं रायतं करता येईल. दुधी हलवा करता येईल.

हुह्..... Wink

दुधी- कोफ्ता करी
पालक- पालक-मकई (मका मिळत असेल तर/ फ्रोझन)
कोबी- मराठी पद्धतीचा मसालेभात कोबी घालून / कोबीच्या वड्या - याची कृती आहे इथे माबोवर.

अल्पना, भाज्या जास्त मिळत नाहीयेत तर मग खालचे पर्याय कसे वाटत आहेत ते बघ :

दुधीची पीठ लावून/पेरून भाजी मस्त होते. डब्यासाठी छान. (भाजणीचे पीठ / बेसन / तांदूळ पीठ -ज्वारीचे पीठ वापरता येते.) किंवा कांद्याची पीठ पेरून भाजी. सफरचंदाचे लोणचे. (आआपा मध्येच आहे कृती), मिळतील त्या भाज्या वापरून पराठे.

जेवणाच्या पदार्थांत कढी/ टोमॅटो सार / सोलकढी किंवा कोणत्याही कडधान्याची उसळ,
झांशी स्पेशल बटाटा भाजी / डुबकीवाले आलू / आंबट बटाटा/ आलू-मटर,
जिरा राईस / पुलाव,
टो-कां कोशिंबीर / पचडी / दहीबुंदी
दाल तडका
दुधीच्या सालींची / दोडक्याच्या सालींची परतून चटणी

अमा, वेगळी कृती अशी खास काही नाहीये, नेहमीच्या पीठ पेरून भाजीची असते तशीच. दुधीच्या काचर्‍या चिरून किंवा किसून घेता येतो. फोडणीत तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट घालून दुधी वाफेवर शिजवून घ्यायचा, नंतर बेसन/भाजणी पीठ / ज्वारीचे-तांदळाचे पीठ, चवीप्रमाणे मीठ घालून भरपूर परतायचे, वाटल्यास किंचित तेल घालायचे, झाकण ठेवून वाफ आणायची.

अशीच काकडीचीही पीठ पेरून खमंग भाजी होते!

काकडीचीही पीठ पेरून खमंग भाजी होते > त्याला काकडीचा कोरडा/ कोरोडा म्हणतात विदर्भात. मस्तच लागतो तो. त्यात जरा टोमॅटो हवा मात्र आंबटपणाकरता... बाकी कृती सेम.

पीठ पेरलेल्या भाज्या मस्तच लागतात. पण दोन्ही जेवणासाठीचे पाहूणे मराठी स्वैपाक फारश्या आवडीने खात नाहीत. जाट क्राउड आहे, त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे पनीर वैगरेच. Happy

सकाळी डब्ब्याला पनीर जालफ्रेजी (बस्केच्या रेसिपीने), पत्ताकोबीची पचडी, दुधी हलवा, फुलके आणि कैरी-कांदा चटणी.
रात्री मशरुम मटर, पालकाची कोरडी भाजी, पुदिना रायता, सोया चंक्स चं स्टार्टर (सोया चंक उकळून त्याला मसाला लावून मॅरिनेट करून तळायचे), सुरळीच्या वड्या, मेथी पुलाव, फुलके आणि गुलाबजाम.

मटण रस्सा (कोल्हापुरी पद्ध्तीने) , तांदळाच्या भाकर्या, चिकन पुलाव, सोलकढी , कोशिंबीर २ प्रकारच्या , फ्रायम्स या पदार्थांबरोबर कोणता फरसाण आयटम/ स्टार्टर्स सूट होईल?
एकूण ३८ जणं आहेत आणि आदल्या दिवशी करून ठेवता आले तर उत्तम.

Pages