बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दहीबटाटाशेवपुरी >>>>>>>>>> साठी खुप खुप धन्यवाद.
दुपारीच केटररला फोन केलेला तेव्हाही तो हाच मेनू म्हणाला. फक्त चाट आयट्म तेव्हा लक्षात नाही आले.
45 लोकांसाठी 5,800/- रुपये. (आता चाट आयट्मचे extra होतील तेवढेच).

सासूला पोळ्या करायला पाठवल्यावर नक्की काय करण्याचा प्लॅन आहे तो...>>> प्लॅन काहिका असेना प्रत्यक्षात काय घडू शकेल / घडेल ? I am (and I am sure everybody) all for सासूला मखरात बसवणे, even song सासू माझा गुरू ... सासू कल्पतरू doesn't sound so bad, is it? Happy

मँगो कस्टर्ड <<< हे कुठे मिळतं सिंडे? की ते ब्राऊन अँड पोल्सन ची पावडर आणून घरी शिजवायचं कस्टर्ड म्हणते आहेस?

ओह!
मुकटा/मुटका म्हणजे सोवळ्याचा स्वयंपाक करताना नेसण्याचे वस्त्र असे काहीतरी डोक्यात होते.
शब्दार्थांच्या धाग्यावर विचारून पहातो..

मुटका म्हणजे उंचावरुन विहिरीत उडी मारण्याचा एक प्रकार - बहुतेक पण्यात आपटताना पाय मांडी घातलेल्या पोझ मधे असतात.
किंवा मग मेथीचे मुटके वगैरे असा प्रकार

माझ्याकडे गौरीच्या हळदी कुंकवाला किमान ४० लोकं येणार आहेत. सगळे जन लांबुन येणार आहेत. आणि त्यात शुक्रवार म्हणजे संध्याकाळीच येतील. तर त्यांच्यासाठी काय बेत करता येइल. इथे केटरिंगची व्यवस्था नाहीये. त्यामुळे मलाच सगळे करावे लागेल. त्यात सकाळी पूर्ण नैवेद्याचा स्वैपाक करुन करायचे आहे. मागच्या वर्षी छोले, पुरी आणि पुलाव असे केले होते. पण तेव्हा मदतीलाही बरेच लोक होते. आता मी एकटीच असेल.

पेरू, हा मेनू कसा वाटतो बघा..
-टोमॅटोचं सार / सोलकढी , आधल्या दिवशी करून ठेवून.
-भरपूर भाज्या, सढळ हातानं तूप घालून बिसीबेळेभात. वन डिश मील आहे. हात गुंतवून बसावं लागत नाही. डाळ्-तांदूळ्-भाज्या-मसाले घालून क्वांटिटीला भक्कम होतो.
-दह्यातली कुठलीही कोशिंबीर
-पापड
-डाळवडे/मुगभजी. हे आदल्या दिवशी करून ठेवले आणि खाण्यापूर्वी ओव्हनमधे गरम केले तरी चांगले लागतात.
-चटणी
-आंब्याचा शिरा.

गणपती साठी लेकीच्या मित्र मैत्रीणीं ना बोलवायचे आहे (वयोगट ३ ते५ ) :-)..त्यांच्या बरोबर त्यांच्या आया पण असतील

वरण, भाजी,पुलाव, छोले, फुलके, ज्वारीच्या छोट्या रोटी, गुलाबजाम, बटाटा भजी, गाजराची कोशींबीर ताक ह्याच्या जोडीला अजुन एक भाजी सुचवा प्लीज. लहान मुलांना आवडेल अशी.

पुलाव करते आहेस तर वरण कशाला करतेस? दहीकचुमर वगैरे कर.
छोले जरा मसालेदार करणार असशील तर गोडसर नवरतन कुर्मा, कोफ्ते करू शकशील.

नवरतन कुर्मा, कोफ्ते करू शकशील.>>>>बघते आवाक्यातली आहे का?

गणपतीच्या नैवेद्याला लागेलच ना वरण भात..
मंजुडी आदल्या दिवशी होणार आहे उबभा..पुर्‍या आहेत म्हणुन...

अगं पण एवढं सगळं ३ ते ५ मधली मुलं खाऊ शकणार आहेत का?
त्यांच्या आयांना पण म्हणावं, जास्त खाऊ नका जाड्या व्हाल Proud
मला वाटतंय छोले, फुलके, पुलाव, गुलाबजाम, गा. को., ब ची भ, एवढं पुष्कळ होईल.
हवं तर ब च्या भ बरोबर ओल्या नारळाची चटणी कर आणि गा. को. ऐवजी चक्क्यातली कोशिंबीर कर एखादी आणि वाटलं तर टोमॅटोचं सार... पुष्कळ पोटभरीचा मेनू होईल.

चक्क्यातली कोशिंबीर कर .ही कशी करायची ते पण सांगणे करावे...सध्या पहिलीत आहोत :-)..थोडी सौम्य भाजी हवीय कारण कुणी छोले खाल्ले नाहीतर्?..अल्पनाचे अम्रुतसरी छोले करणार आहे..तरी कुणी नाही खाल्ले तर बॅकअप म्हणुन्..भाजी हवी आहे..

कुर्मा कसा करायचा..एक सापडला ..तु कसा करतेस?

छोले शक्यतो सगळे खातातच. लहन मुलांनाही आवडतात, फक्त जास्त मसालेदार करू नकोस. छोल्यांबरोबर फुलके/रोटी पेक्षा भटुरे किंवा पुर्‍या जास्त चांगल्या लागतात Happy तेलकट नको असेल जास्त तर मग फुलके ठीक.
बटाटा नकोच्चे का?
एक सोप्पा बटाटारस्सा सांगू शकेन मी जास्त कटकट नसलेला आणि कांदा न लागणारा.

एक सोप्पा बटाटारस्सा सांगू शकेन मी जास्त कटकट नसलेला आणि कांदा न लागणारा.>>

सांग माझ काम खुप सोप्प होइल्..डोक्याचा भुंगा जाइल Happy

सायोची पनीर माखनीच >>> हि होती माझ्या पण डोक्यात्..पण एका मुलाला दुधाची अ‍ॅलर्जी आहे. :-(..म्हणुन नाही..

चक्क्यात मटार, श्रावणघेवडा, गाजर, स्वीट कॉर्न, लाल भोपळा, बटाटा - हे सर्व उकडून, किंचित साखर, मीठ, मिरपूड, कोथिंबीर घालून मस्त कोशिंबीर होते. चक्क्यास पर्याय म्हणून दही वापरता येते. फारच छान लागते ही कोशिंबीर.

माबोवरच झाशी स्टाईल बटाटा रस्सा किंवा डुबकीवाले आलू ची कृती आहे, तीही सोपी व रुचकर भाजी आहे.

पनीर भुर्जी/ स्वीट कॉर्न भुर्जी / सिमला मिर्ची - स्वीट कॉर्न - टोमॅटो भाजी - वरून किसलेलं चीज Proud / मटार-बटाटा भाजी अशा भाज्या मुलं आवडीने खातात.

Pages