नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी याहू चॅट रूम नावाचं एक अ‍ॅप्लिकेशन होतं याहूवर. चाट रूममधे कितीही नव्या रूम विषयाप्रमाणे बनवता यायच्या. त्या विषयावर त्या त्या रूममधे गप्पा मारता यायच्या. इग्नोर ही सुविधाही होती आणि ब्लॉक आयडी नावाचीही. त्या चॅट अ‍ॅप्लिकेशनमुळे लिहीता यायचं, बोलता यायचं, ऐकताही यायचं. तसच एखाद्या आयडीशी वैयक्तिक संभाषणही करता यायचं. अशी सुविधा आता कुठेच पाहता येत नाही. जे संस्थळ अशी सुविधा देईल तिकडे ट्रॅफिक जाम होईल यात शंका नाही.

<प्रतिक्रिया पाहण्यासाठी दरवेळी शेवटचे पान पाहावे लागते. त्या ऐवजी शेवटचे पान हे पहिले पान असले तर नवीन अपडेट काय आहेत ते पाहता येतील.>
ही सोय आताही आहेच की. एखाद्या धाग्याच्या नावापुढे एकूण प्रतिसाद संख्या आणि त्याखाली नवीन प्रतिसादांची संख्या दिसते. धाग्याच्या नावावर क्लिक न करता नवीन प्रतिसाद संख्येवर क्लिक केले की आपल्या मागल्या भेटीनंतर किती भर पडली नेमके तेवढे प्रतिसाद दिसतात.
तसेच प्रतिसाद संपादित केला (बदलला गेला) असेल तर तोही दिसतो.

limbutimbu, मी ऐकलंय की सरकारने च्याटरूमांवर बंदी आणली. अतिरेकी आपापसात संभाषण करायचे म्हणे! Uhoh
आ.न.,
-गा.पै.

गापै, त्याबद्दल काही कल्पना नाही, पण तशी काही बन्दी नसावी.
अन नन्तर याहू च्याट आमच्याइथे ब्यान झाल्याने २००२ नन्तर तिकडे फिरकता आलेच नाही.

एमेस ऑफिस एक्स्प्लोर करताना किन्वा आऊटलुक च्या इन्बॉक्स मधिल सब डिरेक्टर्‍या ज्यापद्द्धतिने एकाखाली एक दिसत जातिल तसे धागे दिसायचे, अन त्यातील आयडि-पोस्टचा काही भाग असेही दिसायचे, १/३/७ दिवसाचे सर्चची सुविधा होती, त्यामुळे कोणत्या धाग्यावर कोण वावरतय ते एका नजरेत समजायचे. एखाद्या आयडीला फॉलो करता यायचे. नको असलेले कविता/गझल वगिअरे प्रकार मिनिमाईज करुन ठेवता यायचे. ट्री व्ह्यू म्हण्जे बेस्ट होता.
मायक्रोसॉफ्ट अजुनही ट्रीव्ह्यू वापरते, आमच्या ह्यान्नाच काय झाले बन्द करायला काय की Wink

गेल्या काही दिवसांत प्रशासनाने काही बदल केलेले दिसताहेत.
विचारपूस आली तर कोणत्याही पानावरील माझे सदस्यत्वच्या खाली तसे दिसतेय.
धन्यवाद प्रशासक, वेबमास्टर.

खर तर माझे सदस्यत्वात यायला हवी...... (१) अशी कारण बहुतेक सारेच जण "नविन लेखन" या पानावर असतात..

आणि विचारपुस आली तरी नविन लेखन पानावर असल्यावर दिसत नाही आणि तो केलेला बदल वाया जातो..

मुख्य पानावर कोणीच नसते.......मग तिथे नोटीफिकेशन देउन काय उपयोग ??????

@भरत मयेकर
तुम्हाला विचारपूस आल्याची सोय मायबोलीचे मुखपृष्ट सोडून कुठे दिसते आहे. ही सोय सगळीकडे द्यायची इच्छा असूनही मुद्दाम दिली नाही , एकाच पानावर दिली आहे. काही तांत्रीक अडचणीमुळे ही सोय सगळ्या पानावर दिली तर सर्वरवर खूप ताण येतो म्हणून ती इतरत्र काढून टाकावी लागली आहे. याच कारणामुळे नवीन लेखन पानावर दिली नाही.

वेबमास्तर.......सगळ्यापानांवर देउ नका हवे तर परंतु "नविन लेखन" या एकाच पानावर द्या....

९०% मायबोली याच पानावर असते ..... त्यामुळे विपु आली तरी कळत नाही.. Sad

मला तर आठवड्याने कधी कधी तर महिन्यानंतर कळते Sad

एकदाच विपू आली होती. ती कोणत्या पानावरून दिसली ते लक्षात नाही. आधी 'माझे सदस्यत्व; या पानावर गेल्याशिवाय दिसत नसे.

भरत, मी तुम्हाला एक विपू केली आहे.

कुठल्या पानावर दिसते ते तुम्ही वेबमास्तरांना त्यांच्या माहितीसाठी कळवू शकाल.

वेबमास्तर फक्त मुख्यपृष्ठावरून कळतेय नवी विपु आल्याचे. (नवीन लेखन, एखादा धागा या पानांवरून नाही.) धन्यवाद उल्हास. आता विपू वाचतो Happy

भरत, विपूत वाचण्यासारखं काहीच नाही.

तुम्ही वर लिहिलेला संदेश, वेबमास्टरना विपूद्वारेही पाठविलात तर तो त्यांच्या चटकन लक्षात येईल असे वाटते.

मराठीत लेखन करताना Autocorrect हा पर्याय असावा असे वाटते. नाहीतर केलेले लेखन शुद्ध आहे कि नाही हे तपासण्याची सोय असावी.

बरेचदा दुसऱ्या/पुढल्या पानांवर गेल्यावर मूळ लेख वाचणे हा उद्देश नसतो त्यामुळे त्या पानांवर गेल्यावर थेट त्या पानांवरील प्रतिक्रिया दिसू लागल्या तर फार सोयीचे होईल. विशेषतः चित्रपट प्रीमियरच्या (किंवा ज्यात खूप फोटो असतात अशा) धाग्यांवरील प्रतिक्रिया मोबाईलवरून स्क्रोल करत वाचणे फार त्रासाचे होते.

१. ज्या धाग्यांवर "प्रतिसादांचे" एकापेक्षा जास्त पाने आहेत, तेथे जेव्हा आपन "पुढे" किंवा त्या प्रतिसादाच्या पानाचा क्रमांक, जसे की, "२" वगैरे वर क्लिक करतो - "त्यानंतर" - जेव्हा नवे पान लोड होते, तेव्हा वाचकाच्या मॊनीटरवर तो धागा सुरुवाती पासुन दिसण्याएवजी, जर त्या "पुढच्या" प्रतिसादाच्या" पानावरील सुरिवातीच्या प्रतिसादापासुन दिसला तर जास्त सोयीचे असेल. यामधे नवीन पान, पुर्णच लोड करायचे आहे पण, मॊनिटर व्ह्यु त्या नविन पानावरचा पहिला प्रतिसाद असेल.

२. प्रतिसाद वाचताना, एखाद्या विशिष्ट युजरचे प्रतिसाद न दिसण्याची सोय करता येईल का? त्याचे फिल्टर युजरच्याच ब्राउजरवर कुकीस्वरुपात ठेउन, सर्वरवरचा ताण वाचवता येईल. राजकीय धाग्यांवरचे राडे बघता ही सोय केल्यास जे वाचक खरोखर मुद्द्याला धरुन चर्चा करत आहेत त्यांना याचा खुप फायदा होईल.
काही कारणास्तव हे शक्य नसल्यास, माझ्यापुरते फायरफॊक्स प्लगिन बनवुन माझ्यापुरती स्वच्छता करण्याची परवआनगी मिळु शकेल का?

हा प्रतिसाद दिला गेल्यानंतर जिज्ञासा यांचा प्रतिसाद वाचला.
प्रशासनाला विनंती की त्यांनी शक्य तितक्या लवकर, प्रतिसाद द्यावा.

Pages