नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या "गुलमोहर" वर क्लिक केल्या वर ७२ तासामधल्या लेखनाचे विभाग दिसतात. पण त्या पुर्विचे काहि वाचायचे असेल तर त्याचा विभाग कुठेच दिसत नाहि.
तर कॄपया वाचतानापण असे विभाग निवडायची, आणि त्या त्या विभागातले सगळे लिखाण वाचण्याची सोय द्यावी.
>>>>
सावली,
"गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन" असं जिथे लिहिलंय, त्याच्यावरच कथा | लेख | मागोवा | वगैरे लिहिलेले दुवे आहेत. त्यांच्यावर टिचकी मारली, तर विभागानुसार सर्वच्या सर्व लिखाण दिसेल. फक्त ७२ तासापुरते मर्यादित नाही. अर्थात, हे समजायला मला सुद्धा बराच वेळ लागला. तिथे वर जर "गुलमोहर- सर्व लेखन" असे लिहिले तर बरे होईल.

सानी उत्तरा बद्द्ल धन्यवाद. पण तुम्हि म्हणता तसे नाहिये.
फक्त कविता, फक्त लेख वाचायचे असतील तर तिथे लिंक आहेत पण खालि दिलेल्यापैकी जुन काहि वाचायच असेल तर काहि सोय नाहिए
# कादंबरी
# काहीच्या काही कविता
# बालकविता
# बालसाहित्य
# मराठी गझल
# ललित
# विडंबन
# विनोदी लेखन
त्यामुळे मी माझि वरची पोस्ट टाकलीय.

सावली,

आता वरचा submenu थोडा बदलून त्यात बालसाहित्य आणि कादंबरी विभाग टाकले आहेत. submenu मध्ये गुलमोहरातले मुख्य प्रकार दिलेले आहेत. त्याअंतर्गत असलेले सर्व उपप्रकार त्याच दुव्यावर पहायला मिळतील.

# कादंबरी - नवीन विभाग बनवला आहे
# काहीच्या काही कविता - कविता विभागात.
# बालकविता - बालसाहित्य विभागात पहा.
# बालसाहित्य - नवीन विभाग बनवला आहे
# मराठी गझल - कविता विभागात.
# ललित - लेख विभागात
# विडंबन - विनोदी लेखन विभागात.
# विनोदी लेखन - हा विभाग सुरुवातीपासून आहे.

admin,
तुम्ही केलेल्या बदलांबद्दल धन्यवाद!!!!
पण सर्व लेखन विभागातील प्रकारांना वेगळे नाव आणि ७२ तासांतील लेखनाला वेगळे असे का? नवीन लोकांना समजायला हे फार अवघड जाते. मी खुप नवीन सभासदांनी विचारलेले खुप वेळा वाचले आहे की बाकीचे लेखन कुठे वाचायला मिळेल म्हणून...मुळात गेल्या ७२ तासातील लेखन च्या वरचे दुवे सर्व लेखन कडे घेऊन जातात हेच खरंतर पटकन समजत नाही....

खालीलप्रमाणे बदल करता येतील का?

गुलमोहर
सर्व लेखन ( गेल्या ७२ तासातील लेखन)

* कथा (10)
* कविता (53)
* कादंबरी (5)
* काहीच्या काही कविता (4)
* प्रकाशचित्र (27)
* बालकविता (4)
* बालसाहित्य (2)
* मराठी गझल (20)
* मागोवा (1)
* ललित (17)
* लेख (12)
* विडंबन (3)
* विनोदी लेखन (4)

असं लिहून प्रकारांवर क्लिक केल्यावर सर्व लेखन कडे जाता यावे आणि कंसात क्लिक केल्यावर ७२ तासातल्या लेखनाकडे जाता यावे, असे काहीतरी करता येईल का?

अहो ते गोरेमाकड कुठे गायब झाले?
लिन्क उघडायला गेलो तर "थुत्तरफोड" उत्तर मिळते की ग्रुपचे सभासद नसाल वगैरे...... पण ग्रुप कोणता ते मात्र कळतच नाही (म्हणूनच ते उत्तर "थुत्तरफोड") Proud

जात/धर्म/पंथ/लिंग ह्यावर आधारित हिणकस वाद घालण्याविरुद्ध पॉलिसी तयार करता येईल का?>> तसं म्हणत असल्यास मायबोलिवरुन बरच काहि काढुन टाकावं लागेल. त्या परशुराम विद्यापिठाच्या बिबिवरिल व आरक्षण विरोधी मतावरिल सगळे लेख काढुन टाकावे. कारण त्या सगळ्या लेखांमुळे मी दुखावतोय.

प्रतीसाद वाच्यावर पुन्हा वर जाण्या साठि खालि कुठेतरि TOP हवे वरती स्क्रांल करत जाण फारच कंटाळवाण होत प्लिज त्यासाठि काहि उपाय सुचवा

अरेच्च्या "गोर्‍या माकडाच्या..." बाफ खरंच बंद केला? कां दुसरीकडे हलवला? अरे असं करण्याची पुर्वसुचना जाउध्या, सभ्य माणसासारखं कारण तरी ध्या! नाहितरी वादग्रस्त पोस्ट उडवताच, पण यावेळी आख्खाच्या आख्खा बाफ? उत्तराची अपेक्षा ठेवावी का?

यानिमित्ताने, "युजर एक्स्पिरीयंस" सुलभ करण्याबाबत एक सुचना कराविशी वाटते. बाफ दुसर्‍या ग्रुपमध्ये हलवला असेल तर नविन ग्रुपची माहिती ('सामिल व्हा' बटन?) एरर पेजवर टाकलीत तर लोकांचे श्रम वाचतील. रीझनेबल?

लिन्क उघडायला गेलो तर "थुत्तरफोड" उत्तर मिळते की ग्रुपचे सभासद नसाल वगैरे...... पण ग्रुप कोणता ते मात्र कळतच नाही >> याबाबत काही करता येईल कां?

नवीन लेखनामधे पाहुन मी एक कविता वाचली. दुसरेदिवशी पाऊलखुणा मधुन पुन्हा त्या कवितेची लिंक टिचकली तेव्हा "गृपचे सभसद...." वगैरे मेसेज आला. पण कुठल्या गृपचे ते नाही कळलं, कारण कविता विभागात ती नाही.

राज - प्रशासकांना कारणं विचारायची असल्यास प्रशासकांच्या विपूमध्ये विचारा.

भ्रमर -
>>"गृपचे सभसद...." वगैरे मेसेज
हा मेसेज दोन कारणास्तव येऊ शकतो. बाफ नविन गृपमध्ये हलवला असेल किंवा अप्रकाशित केला असेल तर.
कवितेबाबत , ती अप्रकाशित केली असण्याची जास्त शक्यता आहे. ज्यांची कविता आहे त्यांना विचारू शकता.

>> राज - प्रशासकांना कारणं विचारायची असल्यास प्रशासकांच्या विपूमध्ये विचारा. <<
अच्छा म्हणजे इथे ("मायबोली सुधारक समिती") ते फिरकतच नाहीत. नसल्यास, इतर समिती सभासद "ईश्यु एस्कलेट" करतात कां? banghead.gif

फक्त त्यांच्या भिंतीवर लिहिलेल्या तक्रारी/सुचनांचाच विचार केला जातो? Happy

राज, उगाच वाकडे अर्थ काढून काहीच्या काही लिहू नका.
>>अरेच्च्या "गोर्‍या माकडाच्या..." बाफ खरंच बंद केला? कां दुसरीकडे हलवला? अरे असं करण्याची पुर्वसुचना जाउध्या, सभ्य माणसासारखं कारण तरी ध्या! नाहितरी वादग्रस्त पोस्ट उडवताच, पण यावेळी आख्खाच्या आख्खा बाफ? उत्तराची अपेक्षा ठेवावी का?

हे सर्व कुणाला उद्देशून लिहीलं आहे? प्रशासकांना ना? मग त्यासाठी विपू दिलेली आहेच की.
मी तसे सुचविले तर वाकडे अर्थ कशाला काढता आहात?

>> अच्छा म्हणजे इथे ("मायबोली सुधारक समिती") ते फिरकतच नाहीत.
तरी बरं याच पानावर प्रशासकांचे पोस्ट आहे. पण काहितरी लिहून राग काढण्याचा प्रयत्न दिसतो तुमचा.

>>>लिन्क उघडायला गेलो तर "थुत्तरफोड" उत्तर मिळते की ग्रुपचे सभासद नसाल वगैरे...... पण ग्रुप कोणता ते मात्र कळतच नाही >> याबाबत काही करता येईल कां? >>>> हो, याबद्दल काहीतरी कराच. नाहीतर निष्कारण गृप कोणता हे शोधण्यातच वेळ वाया जातो.

चित्रपट बाफ वर मला "हे लेखन आवडलेले मायबोलीकर" असे दिसले.

माझ्यामते ही संख्या "५" ही किंवा कुठल्याही बाफवरची ३, २, १५ ही फसवी किंवा दिशाभूल करणारी आहे. कारण एका मायबोलीकराने निवडक १० मध्ये नोंदवले तर तिथे ही संख्या वाढत जाईल किंवा उलट, पण असेही असू शकते की मला १० पेक्षा जास्त बाफ खूप जास्ती आवडले आहेत, पण आत्ता उपलब्ध नसलेल्या सोयीमुळे (तांत्रीक अडचण किंवा पॉलिसी अडचण ?? ) मला फक्त १०च ठेवता येतील म्हणजे थोडी फसवीच. सध्या असलेली निवडक दहा ही पद्धत दहासाठी सोयीची आहे, कारण विविध कालात विविध विषयांवरचे लेख आवडू शकतात, पण हेच त्या पद्धतीचे लिमिटेशन वा लंगडी बाजू आहे.

तसेच अनेक बाफ केवळ रोजचे बाफ म्हणून लोकांनी निवडक दहात ठेवले आहेत व आवडलेले साहित्य, एखादी कविता, लेख आवडून पण बहुत करुन एकदाच वाचक वाचतो त्यामुळे निवडक १० सतत बदलत राहणार, पण रेटिंग प्रक्रिया ठेवली तर लेखाचे मुल्यमापण होईलच पण निवडक १० हे वेगळे प्रकरणही ठेवता येईल.
मागे कधी तरी मी ते * पाहिले होते. जर लेखण आवडले तर तेवढे * मिळत जावेत. ५ किंवा १० * ठेवून त्यावरुन हे लेखण किती जणांना (रेटिंग) आवडले हे लगेच लक्षात येऊ शकते. विरोधी मताचे फारतर १ स्टार देतील, पण पद्धत लोकशाही असेल. आणि निवडक १० च लेखांची आवड करायची नसल्यामुळे प्रत्येक लेखणावर जर वाचकाला वाटले तर तो मतदान करु शकतो. म्हणजे अर्मयाद लेखण त्यात आले. ही पद्धत सोयीची ठरावी, अन्यथा "हे लेखन आवडलेले मायबोलीकर" असे मायबोली प्रशासन मांडू पाहत आहे त्याला अर्थ उरणार नाही. फार तर त्याला " निवडक दहा मध्ये नोंदनी करणारे मायबोलीकर" असे म्हणू शकतो. किंवा तसेच म्हणावे. Happy

थोडक्यात मला १० पुस्तके आवडतात, त्यांना मी निवडक दहात स्थान दिले, पण ११ ते २१ ही पुस्तकं पण आवडतात, त्यांना मला ४ स्टार असे मुल्यमापण करता यावे.

<<पण रेटिंग प्रक्रिया ठेवली तर लेखाचे मुल्यमापण होईलच पण निवडक १० हे वेगळे प्रकरणही ठेवता येईल.>>
अनुमोदन
अगदि हेच सांगायला मी इथे आले होते. मला वाटत काहि काहि ठिकाणि रेटींग दिसत मायबोलीवर, पण सगळीकडे दिसत नाहि. रेटिंग असेल तर प्रतिक्रिया द्यायला वेळ नसेल तरिहि लोक किमान रेटिगच्या तार्‍यावर क्लिक करु शकतात.
याच्बरोबर किती वाचकांनि लेख वाचला याचा आकडा पण दाखवला तर चांगल होईल अस वाटत.

हो आस्चिग म्हणतो तसे डब्बे हवेत कारण विपू लिहितांना भाषा टॉगल करता येत नाही. सगळे मराठीतच लिहावे लागते.

रेटींगसाठी निवडक १० पेक्षा फक्त आवडले / नाही एवढेच हवे. जितके जास्त मायबोलीकर आवडले क्लिक करतील तितके त्या लेखाचे रेटींग. युट्युब ने त्यातले ५ स्टार रेटींग काढुन थम्स अप नि थम्स डाऊन एवढेच ठेवले आहेत. एकाने किती लेखांना रेटींग द्यायचे त्यावर बंधन असू नये.

अजून एक सूचना: पुढच्या पानावर जायचा नंबर क्लिक केला की पुन्हा तो लेख दिसतो. फोटो वगैरे असले तर प्रचंड स्क्रोल करावे लागते. त्याऐवजी पेज नेव्हिगेशन करताना त्या त्या पानवरील पहिल्या प्रतिसादाचा HTML Marker टाकता येईल का? फक्त पहिले पान मूळ ले़खापासून दिसायला हवे.

दर रवीवारी, नुकत्याच संपलेल्या आठवड्यात जास्तीत जास्त पोस्ट्स टाकलेल्या माबो करांचे आय डी व किती पोस्त्स हे कुठे दाखवता येईल का? खरे तर, वाहता बा फ उघडावा यासाठी.

मागे कुणितरी कुणि किती पोस्ट्स टाकल्या त्याचे आकडे दिले होते, त्या आय डी ला विचारून पहा, मदत करतील का.

आहारशास्त्र आणि पाककृती विभागात नविन पाककृती लिहीताना तिथे "मजकुरात image किंवा link द्या' हा ऑप्शन उपलब्ध नसल्याने पाककृतीचा अथवा जिनसांचा फोटो टाकण्याची सोय नाही. मग फोटो टाकायचा असल्यास अन्य विभागातली एखादी विन्डो उघडून तिथे इमेज टाकून ते टेक्स्ट इथे कॉपी पेस्ट करावे लागते. ह्याबाबत विचार व्हावा ही विनंती.

इथे निवडक दहा आहे इथे तरिही -
जर रेसिपी साठी "माझ पाकृ. संकलन" असा काहिसा ऑप्शन असेल तर बर होईल.
म्हणजे आपल्याला आवडलेल्या सगळ्या रेसिपीज यात टाकुन ठेवता येतील आणि करायच्या वेळि लगेच सापडतील. एकावेळी बर्‍याच रेसिपी एकत्र सापडल्याने वापरणे सोपे जाईल.

मायबोली वर गुलमोहोर मधे कविता /लेख टाकायला प्रत्येक दिवसाचा कोटा ठरवल्यास बर होईल.
म्हणजे एका आयडिला एका दिवशी एक कविता आणी एक लेख टाकता येईल. वगैरे अस काहीतरी.
त्यामुळे संख्या जरा मर्यादित राहुन, कलाकृतीची क्वालिटी चांगली होण्याची शक्यता जास्त वाढेल.

मायबोलीवरील आवडलेले साहित्य शेअर करण्यासाठी सोय देता येईल का? म्हणजे जसे आपण एखादी बातमी 'शेअर धिस' क्लीक करुन पुढे फेसबुक, ट्विटर्, मायस्पेस, ब्लॉगर, वर्डप्रेस इ ऑप्शन्समधून हवे ते निवडून शेअर करतो तसं मायबोलीच्या साहित्याबद्दल करता आलं तर उत्तम.sharethis.jpg

माझ्या दोन विनंत्या आहेत. कानोकानी हा विभाग हितगुजमध्ये समाविष्ट व्हावा. गुलमोहरात तो वापरून स्वतःच्या वाचनखुणा ठेवता याव्यात, पाकृ विभागात पाककृती. या वाचनखुणा इतरांना देखील बघता येतील, असे केले तर आणखीनच उत्तम !

दुसरे म्हणजे पाउलखुणामध्ये लेखन टॅब जो आहे, त्यात थोडे लेखनही दिसते, ते बदलून फक्त लिंक करता येईल का? लिंकवर क्लिक केले तर खाली थोडे लेखन व पुढे वाचा अशी लिंक दिसेल.

काही काही धाग्यांवर, मुळ लेखकाने/ लेखिकेने कोणत्या पानावर काय आहे हे नीट लिहिले आहे. ( उदा: गर्भारपण आणि बाळंतपण ) , पण थेट त्या पानावर जायची सोय नाही. मला जर ४४ पानावर जायचे असेल तर १२, मुग १५, मुग २० असं बरेच वेळा click करून जावं लागतं. थेट "क्श" पानावर जायची सोय ऊपलब्ध करून देता येईल काय?

नंद्या
<कानोकानी हा विभाग हितगुजमध्ये समाविष्ट व्हावा.गुलमोहरात तो वापरून स्वतःच्या वाचनखुणा ठेवता याव्यात, पाकृ विभागात पाककृती.> हां हे पण चांगल आहे. माझ्या वरच्या "जर रेसिपी साठी "माझ पाकृ. संकलन" असा काहिसा ऑप्शन असेल तर बर होईल." साठी तु म्हणतोस तो ऑप्शनही चांगला आहे.

Pages