Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26
किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राधा ही चावरी >>>>>>>>>>>>>>
राधा ही चावरी >>>>>>>>>>>>>> +१०००००
केदार आता डोक्यात जाऊन राहिला
केदार आता डोक्यात जाऊन राहिला बे!!!
>>आज सकाळला कमेंट्स आल्यात
>>आज सकाळला कमेंट्स आल्यात सौरभच्या अश्लिल वागण्याबद्दल
खरं की काय? ह्या शुक्रवारच्या लोकसत्ताच्या विवा पुरवणीत सौरभ आणि रियल लाईफमधल्या सौ. सौरभ दोघांचा फोटो आलाय.
आज सकाळला कमेंट्स आल्यात
आज सकाळला कमेंट्स आल्यात सौरभच्या अश्लिल वागण्याबद्दल>> काय केले सौरभने?
त्यात ती जाडी राधा आता
त्यात ती जाडी राधा आता एकापेक्षा एक अप्सरा आली मधे पण उजेड पाडायला येणार आहे बहुतेक.....प्रोमोज मधे ती दिसल्यासारखी वाटली.... >>>> अनिष्का +१००

सॉरी सॉरी. सौरभविषयीच्या
सॉरी सॉरी. सौरभविषयीच्या कमेंट्स सकाळ नव्हे तर मटाच्या ( पुणे वृत्तांत ) शनीवारच्या अंकात आल्यात. सौरभने किमान मेडीकल क्षेत्रातले शिक्षण घ्यायला हवे होते, किमान पीआरओ तरी झाला असते तरी बरे, राधा क्वचितच हॉस्पिटलमध्ये काम करतांना दिसते. राधाचे नवीन नामकरण संसार सावरी असे हवे आहे असे वाचकाला वाटते.
तसेही मराठीत एवढा भडक शृंगार कमीच दिसला. राधा सई ताम्हणकरशी स्पर्धा न करो म्हणजे झाले.:फिदी:
तसेही मराठीत एवढा भडक शृंगार
तसेही मराठीत एवढा भडक शृंगार कमीच दिसला>>>>>>>>>> एवढं काय दाखवलं?? म्हणजे हिंदीतल्या बडे अच्छे लगते है च्या त्या एपिसोडपेक्शाही भारी होतं की काय??? आम्हाला तर ते ही पचलं नव्हतं.
हिंदी मालिका पहात नसल्याने,
हिंदी मालिका पहात नसल्याने, तिथे काय घडते ते माहीत नाही, क्षमस्व.:फिदी:
हिंदी मालिका पहायला खरोखर वेळ नसतो आणी काढतही नाही. दिवसभर एकतर घरच्या लहान मुलांचे कार्टुन्स आणी साबा व साबु सारखेच त्याच त्याच मराठी दुख:भर्या दास्तान पहात असल्याने ( ते ही आलटुन पालटुन, मन लावुन, पारायणे करुन, सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्र ) हिंदी मालिका माझ्यासाठी बहोत दूर का पल्ला आहेत्.:खोखो:
काय दाखवलं हे न पाहताच निषेध
काय दाखवलं हे न पाहताच निषेध करणं योग्य नसल्याने सध्या मौन
हेच लिहीणार होते आधी. (चावरी,
हेच लिहीणार होते आधी. (चावरी, बावळी, हावरी, उतावीळ नवरी, कावरी ,न- आवरी )

>> अग गं टुनटुन
ती श्रुती मराठे माझ्या बेस्ट फ्रेंड्ची मैत्रीण .. म्हणुन एकदा प्रयत्न केला १० मिनीट बघायचा
या मालिकेत यशवंत-रंजना आणि
या मालिकेत यशवंत-रंजना आणि राधा-सौरभ सोडले तर सगळ्यांच्या काहितरी भानगडी आहेत.
राधाच्या बाबांचे अन सावत्र आईचे तिच्या आई वरून भांडण.
मार्कंडने आधिपासूनच सांगितले होते कि माझे तुझ्यावर प्रेम नाही तरी हि सीमा जबर्दस्ती त्याच्या गळ्यात पडली. तसेच त्याचे पण बाहेर लफडं चालू आहे.
केदार मितालीशी लग्न करणार म्हणतोय पण डोळा मात्र राधावर.
रिया रडून-ओरडून मानसला सांगते कि राधाचे आता लग्नपण झाले तर सोड तिचा नाद....तर तो 'तू माझी चांगली मैत्रिण आहे' असे राधाला सांगतोय. घुम्यासारखा चेहरा करून सतत राधाच्या गप्पा मारतो.
केसर तर महानच आहे ...राधाला सोडायचे नसेल तरी चालेल पण मला जवळ कर...अजून तिला राधाच्या 'अटी'बद्दल माहित नाही....ते कळले तर तिचा आत्मविश्वास बराच वाढेल.
@sonalisl, अगदी अगदी... मस्त
@sonalisl, अगदी अगदी... मस्त निरिक्षण.
इथल्या पोस्टी वाचून राहिबा ही
इथल्या पोस्टी वाचून राहिबा ही मालिका मराठीतली बोल्ड अॅण्ड ब्यूटी फूल असावी असं वाटतंय.
>>राधा सई ताम्हणकरशी स्पर्धा
>>राधा सई ताम्हणकरशी स्पर्धा न करो म्हणजे झाले
न करो?.... केली कधीच.... "प्रेमसुत्र" बघा
केदार दाखवतात तेव्हा ते काय
केदार दाखवतात तेव्हा ते काय बॅकग्राऊंड संगीत वाजते.....'कटकट..........कटकट'.....कि मला काहितरी चूकिचे ऐकू येते.
सोनाली, माझ्याही डोक्यात हेच
सोनाली, माझ्याही डोक्यात हेच विचार आलेत. मनोहर धर्माधिकार्याची सगळी पोरं वाया गेलीत. मर्कन्डच अस लफडं, रन्जुने पळुन जाउन लग्न केले, केदरने तर चक्क खुनच केला आणी सौरभने त्याच्यापेक्श्या जास्त वयाच्या राधाशी लग्न केले. बिचारे दादा :))
राधा ही कावरीबावरी सौरभची
राधा ही कावरीबावरी
सौरभची फुल्टू टपोरीगिरी
केदार लोकांचे खून करी
विवाहित रन्जू रहातेय माहेरी
दादा धर्माधिकारी विग सावरी
वहिनी निखालस चावरी
मार्कंड लट्टू राणी दिक्षितवरी
केशर सौरभवर लाईन मारी
मानसचं लक्ष राधावरी
बिचारा प्रेक्षक.....
टायगर बाम लावून डोके धरी
(No subject)
रन्जू सौरभला घरी बोलऊयात
रन्जू सौरभला घरी बोलऊयात म्हणाली तर सीमा तिला चक्क म्हणते की तुला आणी यशला परत चाळीत परत जायचा का? काहीही
स्वप्ना , रॉकिंग ....
स्वप्ना , रॉकिंग ....
बिचारा प्रेक्षक..... टायगर
बिचारा प्रेक्षक.....
टायगर बाम लावून डोके धरी>>
रन्जू सौरभला घरी बोलऊयात म्हणाली तर सीमा तिला चक्क म्हणते की तुला आणी यशला परत चाळीत परत जायचा का? काहीही>> ती सीमा सर्वांना धमक्या देते. तिलाच का कोणी हाकलत नाही? आणि मार्कंडला काय अधिकार वडलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा? दादांनी घर मुलांच्या नावावर तर केले नाही का? तसे असेल, तर त्यांच्यासारखे बावळट तेच... अशक्य अनाकलनीय सुरु आहे ही मालिका.
राधा ही कावरीबावरी सौरभची
राधा ही कावरीबावरी
सौरभची फुल्टू टपोरीगिरी
केदार लोकांचे खून करी
विवाहित रन्जू रहातेय माहेरी
दादा धर्माधिकारी विग सावरी
वहिनी निखालस चावरी
मार्कंड लट्टू राणी दिक्षितवरी
केशर सौरभवर लाईन मारी
मानसचं लक्ष राधावरी
बिचारा प्रेक्षक.....
टायगर बाम लावून डोके धरी>>>>>>>>>>>>>>>>>
सीमावहीनी अती
सीमावहीनी अती
@ स्वप्ना_राज काय मस्त सुचत
@ स्वप्ना_राज
काय मस्त सुचत तुम्हाला... सही
तिलाच का कोणी हाकलत नाही? >>
तिलाच का कोणी हाकलत नाही? >> दादा एकदा काढत होते घराबाहेर.....तेव्हा नाही जाणार म्हणून सांगितलन तिने.
स्वप्ना मस्त जमलंय..
स्वप्ना
मस्त जमलंय..
धन्स मंडळी >>रन्जू सौरभला
धन्स मंडळी
>>रन्जू सौरभला घरी बोलऊयात म्हणाली तर सीमा तिला चक्क म्हणते की तुला आणी यशला परत चाळीत परत जायचा का
आणि ती रंजू पण मूग गिळून गप्प बसली. तिने ठणकवायला पाहिजे होतं की अॅट लिस्ट मी माझ्या नवर्यासोबत जाईन, तुझ्यासारखं नाही. हायला, त्या रंजूच्या बापाचं घर आणि ही सीमावहिनी कोण लागून गेली आहे तिला बाहेर काढायला? तिच्या कानाखाली कोणीतरी जाळ काढायला हवा. माझ्या तर डोक्यात जाते ती.
तिच्या कानाखाली कोणीतरी जाळ
तिच्या कानाखाली कोणीतरी जाळ काढायला हवा. माझ्या तर डोक्यात जाते ती.>>>+१ आपले विचार कित्ती जुळतात
या बाबतीत अगदी सगळ्यांचे
या बाबतीत अगदी सगळ्यांचे विचार जुळतील

काल आमच्या समोर रहाणार्या काकू म्हणे प्रिया, तुला अशी सासू मिळाली तर काय करशील? त्यांना म्हणलं एक देईन कानाखाली ठेवून तिच्या...... बिचार्या काल पासून सदम्यात गेल्यात

त्यांचा मुलगा माझ्या पेक्षा लहान आहे ते आत्ता आठवलं ... म्हणून धडकी बसली की काय त्यांना
रिया त्या मार्कंड्चं जर
रिया
त्या मार्कंड्चं जर बाहेर प्रकरण आहे तर ही सीमावहिनी इतकी का तोर्यात राहतेय? की त्याचं प्रकरण कोणालाच माहित नाही?
Pages