Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26
किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राधाच्या dialogs चा लोचा
राधाच्या dialogs चा लोचा आहे..... +१ पर्वा ती सौरभला पिल्लु म्हणत होती...ते सगळे dialogs आई आणि एक लहान मुलगा असे वाटत होते.... नवरा बयको नक्किच वाटत नव्ह्ते....टुकार आहे सेरिअल....
क्युट - म्युट >>>>>>>>>
क्युट - म्युट >>>>>>>>>
पिल्लु>>>>>>>>
अनघा दातार+१ माझ्या ४
अनघा दातार+१
माझ्या ४ वर्षाच्या मुलाला ते दोघं आई आणि मुलगाच वाटतात
म्युट म्हन्जे? मी आत्ताच
म्युट म्हन्जे? मी आत्ताच गेल्या काही दिवसात पाहिली. त्यात पण रोज नाही बघत.
पिल्लू. I know.. तो सौरभ पिल्लू? तरी नशीब baby नाही म्हणत.
आणि त्याला सकाळी चिठ्ठी लिहून
आणि त्याला सकाळी चिठ्ठी लिहून ठेवली होती की "साबुदाण्याची खिचडी केली आहे. तुला आवडते ना?". त्यात टॉमॅटो घातलेला नसला म्हणजे मिळवलं. त्या हक्का न्यूडल्समध्ये टॉमॅटॉ घातलेला बघून चिनी खवळलेले दिसतात. बॉर्डरवर उचापती सुरु केल्या आहेत त्यांनी
त्यात टॉमॅटो घातलेला नसला
त्यात टॉमॅटो घातलेला नसला म्हणजे मिळवलं >> स्वप्ना
बॉर्डरवर उचापती सुरु केल्या
बॉर्डरवर उचापती सुरु केल्या आहेत त्यांनी <<< हाहाहा
पिल्लु वैगरे टु मच!
स्वत:चा खुनाच रेकॉर्डिग फोन मधे काढुदेण्या इतका केदार मुर्ख आहे? आणी सौरभ का त्याला प्रोटेक्ट करतो आहे?
आता तर कहरच झाला. सौरभनी
आता तर कहरच झाला. सौरभनी राधाच्या कानफटात मारली आणि आधी सीमावैनेही... नंतर सौरभ केसर कडे जाऊन बसला.....अरे, काय पण दाखवतायत आता.
राधा मालिकेच नाव सार्थ
राधा मालिकेच नाव सार्थ करतेय
सतत गोंधळलेलीच असते
ह्या मालिकेला 'A' असे
ह्या मालिकेला 'A' असे प्रमाणपत्र का देत नाहीत? काय ती केसर, तो सौरभ फर्स्ट्रेट होऊन येऊन बसलाय तर तिथे चाळे करत होती....
बकवास ... अगदि बकवास मालिका..
बकवास ... अगदि बकवास मालिका..
आज स्टार प्रवाहवर सनई चौघडे
आज स्टार प्रवाहवर सनई चौघडे होता त्यात होती ही बया राधा
पण काहिहि म्हणा अॅट दॅट टाईम शी लुक्ड सो sssssssss लुक्डी म्हणून सांगू आधी कित्तीवेळ मला हीच का ती असा प्रश्न सतावत होता पण मग कळले हीच ती ...!!
प्रश्न सतावत होता पण मग कळले
प्रश्न सतावत होता पण मग कळले हीच ती ...!!>>
आता मला हा प्रश्न सतावत आहे कि ती सुबोध भावे ची असिस्टंट आहे ती कोण आहे? तिला कुठेतरी पाहिलय.....मला सासू हवी मध्ये आहे का ती?
हो मला ही हाच प्रश्न पडला
हो मला ही हाच प्रश्न पडला होता स्वप्ना.
अगदी १० वर्षापुर्वीचा चित्रपट वाटतो तिचा.
ती साऊथला जायच्या आधीचा असेल
ती साऊथला जायच्या आधीचा असेल तो चित्रपट. तिकडच्या पिक्चरात नायिका खात्या पित्या घरच्या लागतात. आणि एकदा खात्या पित्या घरचं झालं की मग बारीक होणं कर्मकठिण.
आता मला हा प्रश्न सतावत आहे
आता मला हा प्रश्न सतावत आहे कि ती सुबोध भावे ची असिस्टंट आहे ती कोण आहे? तिला कुठेतरी पाहिलय.....मला सासू हवी मध्ये आहे का ती? >>> मला सासू हवी मधली अभिलाषा आहे ती...
राधा ही बावरी बघायचं बंद केलय
राधा ही बावरी बघायचं बंद केलय का सगळ्यानी?
काहीही ड्रामा चालला आहे. टू मच.
काहीही ड्रामा चालला आहे. टू
काहीही ड्रामा चालला आहे. टू मच.>>तेच काही बोलण्या-लिहिण्या पलिकडे गेलय....
बायको म्हणते सेट्ल झाल्याशिवाय जवळ यायचे नाही आणि आता वहिनी म्हणते सेट्ल झाल्याशिवाय बायकोचे तोंड बघायचे नाही...पार फजिती त्या सौरभची!
शिक्षणाचे महत्व राहिले बाजूला ....आता हा तिला डोळ्याला पट्टी बांधून भेटणार
सौरभ सीमाला म्हणाला ना की तू
सौरभ सीमाला म्हणाला ना की तू आमच्यावर जळतेस!, म्हणून सीमावैनीने असा पवित्रा घेतला असावा. कैकयी आणी आनंदी बाई( पेशवे) नंतर एवढी आक्रस्ताळी स्त्री इतिहासात हीच असेल्.:फिदी:
काल डॉ.राधा सौरभला धमकी देते
काल डॉ.राधा सौरभला धमकी देते की तू माझं नाही ऐकलंस तर मी श्वास नाही घेणार !!!! आणि खरंच घेत नाही बरं का ती !!! मग सौरभपण वचन देतो की मी तुझं तोंड नाही पाहणार... आणि राधा श्वास घेते बरं का ....
अरे प्रेक्षकांना बावळट्ट्ट्ट्ट्ट समजतात का ही लोकं ??? मनुष्यप्राणी स्वतःहून आपला श्वास अश्या प्रकारे कोंडून ठेवू शकत नाही हे समान्य 'वि'ज्ञान डॉ.राधाला नसावं ??? म्हटलं छान... राधाबाई आता श्वास नाही घेणार म्हणजे, बोटांच्या चिमटीत नाक पकडून बसणार...तर नाही... अस्स्स्साच श्वास कोंडला... !!!
असो.. नंतर म्हटलं चला चेहरा पाहणार नाही अशी शपथ घेतलीय... पण बुरखा घालून या कायद्यातली पळवाट काढता येईल की.... आणि अहो आश्चर्यम् !!! .. पुढच्या भागात असं दाखवून खरंच सौरभ बुरख्यात दिसला !!!!! ___/\___
श्वास अग आई ग्ग्ग्ग्!
श्वास

अग आई ग्ग्ग्ग्!
नाकाने श्वास रोखला होता आणि
नाकाने श्वास रोखला होता आणि तोंड उघड टाकल होतं
कीव येतीय दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीची!
काल डॉ.राधा सौरभला धमकी देते
काल डॉ.राधा सौरभला धमकी देते की तू माझं नाही ऐकलंस तर मी श्वास नाही घेणार !!!! आणि खरंच घेत नाही बरं का ती >>>>>>>>>>>>>>> तू माझं नाही ऐकलंस तर मी जेवणार नाही ...असं तरी म्हणायला हवं होतं....जरा बारीक तरी झाली असती.......
<अरे प्रेक्षकांना
<अरे प्रेक्षकांना बावळट्ट्ट्ट्ट्ट समजतात का ही लोकं ???<> नाही का?
<अरे प्रेक्षकांना
<अरे प्रेक्षकांना बावळट्ट्ट्ट्ट्ट समजतात का ही लोकं ???<> नाही का?>>>
खरंतर लिहायचं चुकलं...
'प्रेक्षकांना बावळट्ट्ट्ट्ट्ट समजतात का ही लोकं???' असं न लिहिता ....
' प्रेक्षकांना किती बावळट्ट्ट्ट्ट्ट समजतात ही लोकं !!!' असं लिहायला हवं होतं
मग आता काय सौरभ गांधारीसारखा
मग आता काय सौरभ गांधारीसारखा डोळ्याला पट्टी बांधून फिरणार का? काय रे देवा!
सीमा दोन्ही बाजूनी
सीमा दोन्ही बाजूनी बोलते....आधी म्हणत होती कि ते दोघ एकत्र आहेत आणि आपल्या पेक्षा (घरातल्या नमुन्यांपासून ) लांब आहेत म्हणूनच बर आहे....कारण सतत राधा समोर असती तर केदार बरा नाही होऊ शकणार. आणि आता सौरभ राधावर जेलस होऊन का होईना पण करियरकडे लक्ष देईल...
नंतर सौरभला म्हणाली राधापासून दूर राहा....कारण तिच्या प्रेमामुळे त्याच करियर नीट घडणार नाही...
सीमा येडी आहे रावं....
ती डबल ढोलकी आहेच....पण तिला
ती डबल ढोलकी आहेच....पण तिला फक्त राधा आणि सौरभला एकत्र बघायचे नाही. त्यासाठी ती काहिही करते.
आधि तिला केदारसाठी राधा आवडलेलीच नसते पण राधा-सौरभ प्रेमात पडले हे तिला जाणवते तेव्हा ती लगेच केदार अन राधाचे लग्न जुळवण्याचा आटापिटा करते. त्या केदारचे डोके फिरलेय त्याचे तिला काहिही पडलेले नसते. ऊलट त्याला बरे करायला राधाच हवी हे कारण तिला मिळते.
लग्नाच्या दिवशी तिला कळते कि सौरभची मैत्रिण कोण ती? (नाव विसरले) ती केदार पासून गरोदर आहे, केदार नाटक करतोय पण त्याला एकदाही रागवत नाही. सौरभ राधाला जो कोणी मदत करेल त्याच्या कानाखाली देत सुटते. सगळ्यांच्या भल्यासाठी घरच्या कार्यक्रमात, लोकांसमोर, कधीही वेळ मिळेल तेव्हा हि तमाशा करते.
एक मात्र आहे कि सीमा घरकाम करते, काही कार्यक्रम असेल तर त्याची तयारी करते, स्वयंपाक करते तेव्हा आणि तेव्हाच रंजना म्हणते कि सीमा कित्ती करतेस तू सगळ्यांसाठी!!! ............घरकामाला बाई लावली तर धर्माधिका-यांचे सगळे प्रॉब्लेम्स सुटतील आणि घर पुन्हा आनंदी नव्हे हॅप्पी होईल असे वाटते.
सोनली, खरय....
सोनली, खरय....
सोनाली बरोबर ओळखलस तु सीमाला
सोनाली बरोबर ओळखलस तु सीमाला :))
केदार नाटक करतोय पण त्याला एकदाही रागवत नाही<<< अगदी खुन सुध्धा कवर-उप केला जातोय. काहीही. तो सदानंद ही त्याला सांगतो की जर तु पैसे दिलेनाहीस तर केदारचं सगळ्यांना कळेल, सगळ्यांना त्रास होईल ई. आणी ह्याला तुच जबाबदार असशील. केदारने खुन केला हे त्याचे कारण नसेल का?
Pages