राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे लोक्स, "राधा ही बावरी, गाशा गुंडाळून चालली" का? १५ जुलैपासून नवी मालिका येतेय असं दिसतंय. होणार सून मी त्या घरची. चिवित्र जाहिरात येतेय त्याची. का मसाह संपणार? मग तिच्या जागी राधा आणि राधाच्या जागी नवी सिरियल असा खो खो आहे?

>>एव्हढी मठ्ठ मुलगी मी तरी पाहिलेली नाही.
मी चुकून एवढी 'लठ्ठ' असं वाचलं... ही ही ही.
आणि 'उपग्रह वाहिनी'ही चुकून 'उपद्रव वाहिनी' असं वाचलं.....

राधा ७:३० ल असते.......
८ वाजता .. झोका असते... ऊन्च माझा झोका संपेल बहुतेक......

ओह हा. बरोबर.

काल राधा बावरी मध्ये हक्का नूडल्समध्ये टॉमॅटो घातलेले पाहून मी खल्लास! आहे काय हे. उद्या वांगी, सुरण आणि भोपळा घालाल. त्या सौरभने खुशाल राधाच्या पर्समधून पैसे काढून बाहेरून जेवण आणणार्‍या माणसाला दिले. ते तर जेवलाच. मग हक्का नूडल्स पण खाल्ल्या. मला तर वाटत होतं आता हाजमोलाची किंवा इनोची अ‍ॅड करायची आहे म्हणून असा प्रसंग घातला का क्कॉय Proud

मी चुकून एवढी 'लठ्ठ' असं वाचलं... ही ही ही.
आणि 'उपग्रह वाहिनी'ही चुकून 'उपद्रव वाहिनी' असं वाचलं....>>>>>> Proud

मला तर वाटत होतं आता हाजमोलाची किंवा इनोची अ‍ॅड करायची आहे म्हणून असा प्रसंग घातला का क्कॉय >>>> Proud

३५ प्रतिसाद! म्हणजे धागा वहायचा बंद झाला म्हणायचा. Happy

मला तर वाटत होतं आता हाजमोलाची किंवा इनोची अ‍ॅड करायची आहे म्हणून असा प्रसंग घातला का क्कॉय >>> Lol

हा सौरभ मनातून जास्तच उतरायला लागलाय. किती बालीश आणि आत्मकेंद्रीतपणा तो! मित्रांबरोबर जेवायला बसला तर राधाला साधं बोलवावंसंही वाटलं नाही त्याला. बरं ते सगळं हादडल्यावर हक्का नुडल्स तरी चवीपुरते खाऊन उरलेले उपाशी राधाला भरवायचे, तर एखादा घास तेवढा देत होता नावाला! त्याचे मित्रपण महानच... घर लावायला मदत केली तर हे असं उट्टं काढायचं का? रात्री-अपरात्री आगंतुकासारखं येऊन धिंगाणा? Angry

राधा आता सौरभला... मित्र असे वेळीअवेळी यायला नको असे सांगेल आणि ते सौरभला आवडणार नाही. भांडणाला आता कारण मिळेल.

कोणाला तो सीन पाहुन साथिया सिनेमा आठवला का? -> साथिया मधलाच तर प्लॉट वाटतो आहे... फक्त घराची पार्श्वभूमी थोडीशी वेगळी आहे...

अरे ह्या केदार ने खरच खून केला की परत कोणाच तरी स्वप्नच आहे?>>>काय माहित? पण स्वप्न नसावं असा माझा अंदाज आहे.

तरीच म्हंटल हा केदार इतका सुधारला कस्सा?
तो आवरुन घरातन बाहेर पडतानाच त्याच्या चेहर्‍यावर एक खुनशी हास्य आले होते

केदारला गाडी ढकलून देताना बघणारा कोण असेल?
अ) मार्कंड
ब) सौरभ
क) सुनील बर्वे
ड) इंस्पेक्टर

अरे ती राधा असलं मराठी का बोलते? घरातले सगळे "हॅपी नाहीत, तुम्ही हॅपी....आम्ही हॅपी......." अरे काय चाल्लय? आपण जरी काही ईंग्रजी शब्द वापरत असलो, तरी "हॅपी" फारच विचित्र वाटतंय ऐकायला.
आणखी एक...परवा म्हणाली, "माझं आणि सौरभचं लग्न झालंय हे वास्तव्य आहे" ??
'वास्तव' पाहिजे ना?

कालचा टॉवेल मधला बाथरूम सीन ............अरे बापरे ! आमच्या घरातल्यानी लगेच चॅनेल बदलायला लावला .... मराठी सिरियल इतक्या निर्लज्ज झाल्या आहेत का?

आणि तो सौरभ बघावत नाही टॉवेल मध्ये.....ते निराळच !!!!!

ती केसर प्रचंड डोक्यात गेली काल. सौरभच्या घरात येऊन त्यालाच बोलत होती. शी! कसल्या नजरेने बघत होती त्याच्याकडे - खाऊ का गिळू म्हणून. पीडा गेली होती ना युएसला. परत का आली? तो बाथरुमचा सीन कैच्या कै च होता.

तो बाथरुमचा सीन कैच्या कै च होता.>>>>>>>>आणि या सीनचा कर्ता करविता एक अर्धवट (वयातला) मुलगा. आणि बघायला चाळ/कॉलनी जमलेली. काय उद्योग नाहीत लोकांना?

तो बाथरुमचा सीन कैच्या कै च होता.>>>>>>>>आणि या सीनचा कर्ता करविता एक अर्धवट (वयातला) मुलगा. आणि बघायला चाळ/कॉलनी जमलेली. काय उद्योग नाहीत लोकांना?>>> त्यावर त्याचे बोलणे....कि नवरा-बायको आहेत ते ....ज्यांच्या मनात पाप तेच बडबडणार ..आता काय म्हणायचे!

हल्ली सगळ्या वाहिन्यांवर चांगल्या कलाकारांच्या आणि प्रेक्षकांची सहनशक्ती संपवणाऱ्या च मालिका का असतात? दुसर तरी काय दाखवणार बर, मी नेहमी बघत नाही पण आजचा भाग बघितला आणि डोक्यातच गेला, मार्कंड दादांशी कस बोलत होता, गप्प बस नाहीतर तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवू… चांगल सुशिक्षित कुटुंब दाखवलाय आणि वडील माणसांशी वागण्याची हि तऱ्हा , वीरेंद्र प्रधान म्हणजे उंच माझा वालाच न? आलेख exponential आहे पण उलटा, भाग डोक्यात गेला, केदार , केसर मिताली , काय पण पात्र आहेत

लहान वयाच्या नवर्याशी लग्न केल्यावर येणारी आव्हान, प्रश्न हे सगळ सोडून भलतीकडेच भरकट झालेय, आपण प्रेक्षक मुर्ख आणि बिनडोक आहोत असाच समाज आहे सगळ्या वाहिन्यांचा

त्यात ती जाडी राधा आता एकापेक्षा एक अप्सरा आली मधे पण उजेड पाडायला येणार आहे बहुतेक.....प्रोमोज मधे ती दिसल्यासारखी वाटली.... Sad

Lol हेच लिहीणार होते आधी. (चावरी, बावळी, हावरी, उतावीळ नवरी, कावरी ,न- आवरी )

आज सकाळला कमेंट्स आल्यात सौरभच्या अश्लिल वागण्याबद्दल.:खोखो:

Pages