आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिली गिली म्हणजे गिलख्रिस्ट नाही तर ते आयपीएल साँग आहे ! गिली गिली या सिर्फ देखने का नहीँ धाँपक धॉँपक! आज मी भयंकर नाराज आहे !

काल मुंबईच शेवटीं पुण्याला वांचवायला धांवली ना; मुद्दाम गचाळ खेळून, 'पुण्याला नको हो,आम्हाला हंसा', असं घसा काढून ओरडत !! Sad

>>मुद्दाम गचाळ खेळून
भाऊ, अश्याने तुम्ही राजस्थानचे श्रेय हिरावून घेताय... मुंबईचा सपोर्टर असूनही या मौसमात पाँटींगमुळे मुंबईला सपोर्ट करावासा वाटत नाही

<< भाऊ, अश्याने तुम्ही राजस्थानचे श्रेय हिरावून घेताय... >> बुमरँगजी, जरा मस्करी केली पुण्याची व मुंबईची ! राजस्थानला गुण मिळाले ना मग जरासं श्रेय [?] मुंबईला दिलं तर काय फरक पडतो ! Wink

टी २० मधे ८७ रन्स ने हारणे म्हणजे वनडे मधे १५० रन्स ने हारणे आणि कसोटी मधे डावाने हारणे Happy

गेल्या दोन तीन दिवसातल्या मॅचेस खूपच इंटरेस्टींग झाल्या.... अनपेक्षित निकाल लागले.... आता खरा आयपीएलला रंग चढू लागलाय
परवाच्या बंगलोअरच्या विजयात रामपॉलचे कौतुक केले पाहिजेल... मला तो नेहमीच आवडत आला आहे... गेल्या विश्वचषकातही तो भारी खेळला होता
हैद्राबादने यंदा सगळ्यांनाच धक्का दिला आहे... सगळ्या जाणकारांचे अंदाज चुकवून मीळवलेल्या विजयांची मजाच काही और!
परेरा, मिश्रा, स्टेन्, इशांत.... लो स्कोअर कसे डेफेंड करता येतात याचे जणू धडेच ही टीम हरेक मॅचगणीक देतीय.... धवन आल्यावर त्यांची ताकद नक्कीच वाढेल
आता कालच्या राजस्थान वि मुंबई मॅच बद्दल.... कालच्या मॅच मध्ये प्रत्येक गोष्टीसाठी राजस्थान कडे प्लॅन A, प्लॅन B होते असे दिसले पण मुंबईची मॅनेजमेंट मात्र खूप रिजीड होती... स्वताला धक्का लागेल अश्या प्रयोगाच्या वाट्यालाच जात नाहीये पाँटींग
कार्तिक, रोहित आणि पोलार्ड नाही चालले तर मुंबईची हालत ख्रराब होतेय... सध्या त्यांचे प्रमुख अस्त्र मलिंगा पण भरात दिसत नाहीये
आता त्यांचा सर्वात महागडा खेळाडू मॅक्सवेल याला संधी देण्याची वेळ आलीय
नॉन परफॉरंमींग कॅप्टन्स आणि त्याचा एकंदर संघावर/मानसिकतेवर होणारा विपरीत परीणाम यावर कालच्या दोन्ही पराभूत टीम्सना विचार करावा लागेल
याउलट द्रवीडने दाखवलेला सेल्फलेस अ‍ॅप्रोच सगळ्यांची मने (आणि मॅचसुद्धा) जिंकून गेला.... चंडीला, चव्हाण, बिन्नी, याग्निक हे नॉन स्टार खेळाडू खूप आत्मविश्वासाने खेळताना दिसत होते.... फॉल्कनर हा फाइंड ऑफ द टुर्नामेंट होण्याची दाट शक्यता दिसतीय

आज दिल्ली हरले तर ते (आणि कदाचित पुणेसुद्धा) इथुन पुढे स्पॉयलर म्हणून खेळतील!

बिन्नी अगदी वडीलांच्या नक्षेकदमवर आहे..

मला काल (व एकूणातच या आयपिल हंगामातील) सचिन व पाँटींग ची फलंदाजी भयंकर आवडलेली आहे- for all the competition, sehavag must be a worried man! Happy

<< याउलट द्रवीडने दाखवलेला सेल्फलेस अ‍ॅप्रोच सगळ्यांची मने (आणि मॅचसुद्धा) जिंकून गेला.... >> पण त्याहीपेक्षां स्वतः मैदानात उतरूनही इतर बच्चू सहकार्‍यानाच सर्व जबाबदारी उचलूं देणार्‍या सचिन व पाँटींगच्या दिलदारीचं कौतुक अधिक नाही ? Wink
<< sehavag must be a worried man! >> He has been a worried man for quite some time now; Presently, he himself is the main worry of selectors for T-20, one-dayers & Test teams !! Wink

>>याउलट द्रवीडने दाखवलेला सेल्फलेस अ‍ॅप्रोच
अगदी अगदी.... आणि post match presentation मध्ये सुद्धा किती डाऊन टू अर्थ होता तो.... याग्निकला वरती पाठवण्याचे श्रेय त्याने स्वताकडे घेतले नाही तर तो टीम मिटींगमध्ये घेतलेला निर्णय होता असे त्याने स्पष्ट केले!
मला द्रवीड माणूस म्हणून आधी आवडायला लागला आणि नंतर खेळाडू म्हणून Happy
पूर्ण विश्वास आणि आदर दाखवणारी रॉयल्सची मॅनेजमेंट आणि फारसे इगो नसलेले संघ सहकारी यांमध्ये द्रवीडची कप्तानी खुलत चाललीय

आजच्या घडीला गुणतक्त्यात आणि फेअरप्ले तक्त्यात दोन्हीकडे राजस्थान टॉपला Happy
एकूणच राजस्थान हा बहुतेकांना हळूहळू आवडत जाणारा संघ आहे.... जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तसेतसे राजस्थान चे पाठीराखे वाढत जातील

मला द्रवीड माणूस म्हणून आधी आवडायला लागला आणि नंतर खेळाडू म्हणून >>> +१.

पुण्याची मॅच हारल्यावर माझा नवरा कितीतरी वेळ कुठल्यातरी पुणेरी भावाशी "पण असे हरूच कसे शकता तुम्ही लोक?" म्हणत तावातावाने वाद घालत होता Proud

>>त्याहीपेक्षां स्वतः मैदानात उतरूनही इतर बच्चू सहकार्‍यानाच सर्व जबाबदारी उचलूं देणार्‍या सचिन व पाँटींगच्या दिलदारीचं कौतुक अधिक नाही ?
भाऊ,
त्यापेक्षा तुमच्या सचिन भक्तीचे कौतूक अधिक Happy हे म्हणजे जगलो तरी विठ्ठलामूळेच व मेलो तरी विठ्ठालामूळेच असे म्हणण्यासारखे आहे.
[माबो वर 'विठ्ठल' फॉर्मात आहे म्हणून त्याचे नाव घातले बाकी काही नाही!]

I meant sehavag is worried because of 'tough' competition by Sachin and Ponting.. Wink

आयपीएल बुलेटिन....

जुन्या जाणत्यांनी टी२० खेळल्यामुळे/न खेळल्यामुळे किती धावा होऊ शकतात हे द्रवीड, सचिन, पाँटिंग यांनी एकत्रितपणे दाखवलंय.

सचिन ओपनिंगला येऊन खेळाचा टोन सेट करतो म्हणतात. कालही त्याने ते खरं केलं.

उथ्थप्पाने शरीराचा आकाराबरोबर धावांचा आकारही कमी केला आहे.

मैदानात क्रिकेट खेळत असले तरी मॅनेजमेंट कॅप्टन्सबरोबर खो खो खेळतात असं निदर्शनास आलंय.

हातात असलेली मॅच घालवायचं तंत्रज्ञान भारतीय टीमकडून बेकायदेशीरपणे पुण्याकडे कुठल्या मार्गाने गेलं आहे याचा गुप्तहेर खाते शोध घेणार असल्याचं बीसीसीआयने सांगितलं.

सेहवाग 'वाघ' आहे...
(पण चष्म्याचा नंबर चेक करून ये म्हणा. )
आज fifty मारेलच...
धोनीशी खुन्नस आहे..

आज fifty मारेलच...
धोनीशी खुन्नस आहे.. >>>>>>>>>>>>> ५० रन्स की बॉल्स की मिनिटे ? कि सेकंद ? नेमके कशात फिफ्टी मारेल ? Uhoh

धोनीशी खुन्नस घेणार्‍यांची तो अगदी थंड डोक्याने कत्तल करतो.... आणि आता सहवागमध्ये तो जोर उरलाय असे वाटत नाही
पण स्पर्धेतली चुरस जरा वाढण्याच्या दृष्टीने आज दिल्ली जिंकले पाहिजेल Happy

निदान सचिनने गेल्या मॅच मध्ये ४०+ केले पाँटींग चाचपडतोय. विथ ड्यु रिस्पेक्ट वगैरे त्याला बसवा.

द्रविड! हॅट्स ऑफ. सर म्हणायची लायकी असेलच तर तोच एक आहे. ( पण सर जडेजांनी सर शब्दातली हवाच काढली आहे)

मला वाटतं मुंबईनं केवळ १० दिवसांच्या अंतरात उच्चतम आणि नीचतम धावसंख्या करण्याचं रेकॉर्ड केलं असेल. २०१३ मधे तरी ते रेकॉर्ड मोडेल असं वाटत नाही.

आजच्या दोन्ही मॅचेस अतिशय इंटरेस्टींग आहेत
पहील्यात धोनी वि. गंभीर हा मुकाबला असेल तर दुसर्‍यात द्रवीड त्याच्याच होमटाऊन विरुद्ध खेळत असेल Happy
माइक हसी आणि धोनीला रोखणे हे चेन्नई समोरचे प्रमुख आव्हान असेल तर नेहमी प्रमाणे गंभीर आणि सुनील नारायण यांच्यावर कोलकत्त्याची भिस्त असेल
चेन्नईकडून मोहित शर्मा आणि कोलकत्त्याकडून सचित्र सेनानायके हे देखील कमाल दाखवण्याची शक्यता आहे
खासकरुन त्यांचे गुणतक्त्यातले स्थान बघता कोलकत्याला हा विजय जास्त आवश्यक असेल

राजस्थानच्या दृष्टीने पहील्यांदा फलंदाजी घेउन १७० च्या आसपास धाव करणे मह्त्वाचे असेल... मोठ्या आव्हानाच्या दबावाखाली गेल, कोहली आणि एबी ला रोखणे तुलनेने सोपे जाईल
रामपॉल वगळता बंगलोरची गोलंदाजी तशी बेभरवश्याची आहे वॉटसन, रहाणे, द्रवीड नक्कीच या गोष्टीचा फायदा उचलतील
श्रीशांतला खेळवावे का नाही हा राजस्थानसमोर मोठा प्रश्न असेल... त्याने जर नियंत्रित मारा केला तर तो एखाद दोन वीकेट्स सुरुवातीला नक्की काढून देउ शकतो पण कोहली, गेलच्यासमोर तो जरा जरी स्वैर झाला तर इट कॅन कॉस्ट अ मॅच फॉर राजस्थान!

सामन्याचा निकाल काही लागला तरी निम्मे (किंवा कदाचित त्याहुनही जास्त) चिन्नास्वामी स्टेडीयम द्रवीड-बिन्नी साठी राजस्थान ला सपोर्ट करेल Happy

पठाण ला हकला आधी........तरच कोलकत्ता जिंकणार ..अन्यथा बाहेर आहेच...
.
माईक हसी आणि रैना यांना तंबुत लवकर पाठवले तर धावांवर नियंत्रण करता येते..
गेल ला आउट करायचा असेल तर सुरुवातीचे ५ ओव्हर मधेच करायचे...जो पर्यंत तो स्लो खेळतो तो पर्यंत त्याला आउट करायचे जास्त चांसेस असतात..एकदा तो ६ ओव्हर च्या बाहेर गेला आणि १५ चेंडु खेळला तर तो सुटतो ..;)
तरी बेंगलोर मधे सर्वात जास्त धोकादायक ३ जण आहेत... गेल ...कोहली...डिव्हिलीअर्स...हे ३ पैकी एक जरी शेवट पर्यंत टिकला तर समोर च्या प्रतिस्पर्धी गोलंदाजीचे धिंडवडे निघतात विशेषतः डिविलिअर्स जर शेवटच्या ५ ओव्हर मधे टिकला तर....
.
विनय कुमार आणि रामपॉल हेच दोन चांगले गोलंदाज आहेत...
राजस्थान बहुदा शॉन टेट ला घेणार...कारण श्रीशांत चा भरोसा नाही आणि त्रिवेदी चांगली गोलंदाजी करत आहे..
चेन्नई चा मोहीत शर्मा आणि अश्विन चांगला मारा करत आहेत

Pages