आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला आमच्या सावत्रआवडतं शहराच्या नावाने असलेली टीम जिंकली. Happy
अभिनंदन मुंबई Happy

पोलार्ड जबरी आहे.. Happy
मी पाहिले तेव्हा चेन्नई चे तीन आउट झाले होते.
झोप आवरेना म्हणुन टिव्ही बंद...
मला वाटलेलं अजुन धोनी आहे, ब्रॅव्हो आणि विजय खेळत आहेत म्हणजे धोनी परत जिंकणार...

चला..............
.
.
सेमीफायनल पासुन्चे सगळे अंदाजे एकदम परफेक्ट आले...........
.
.आधीच सांगितल्या प्रमाणे मुंबई जिंकली

जिंकली मुंबई टीम , पण सगळे अवार्ड तर चेन्नई घेऊन गेलि.
फक्त फ़ेअर प्ले अवार्ड नक्की कोणाला भेटला ते काही कळले नाही IPL-Fair-Play-Award.jpg

खुपच वाईट पुण्यासाठी! मी तर खुपच नाराज झालोय . काय हैदराबाद प्रमाणे पुणे नवा लुक घेऊन पुन्हा येईल ? पुढच्या वर्षी सर्व खेळाडुंचा व टीमचा लिलाव होणार आहे का ? क्रुपया मार्गदर्शन करावे .

पुण्याची टीम बहुतेक (बरखास्त नाही झाली तर) व्हीडीओकॉन वाले धूत विकत घेतील
अहमदाबादची नवीन टीम पुढच्या वेळी मैदानात उतरेल.... अनिल अंबानी ती विकत घेण्याचे चान्सेस आहेत
सहाराने इंडीयन टीमचे प्रायोजकीत्व काढून घेतले तर रिलायन्स बहुतेक टीम इंडीयाला स्पॉन्सर करेल Happy

Pages