आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
<< द्रविडचे उदाहरण डोळ्यासमोर
<< द्रविडचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवे. >> सहमत. द्रविड आतां खरंच खेळ 'एंजॉय' करतोय हे स्पष्ट जाणवतं व त्यामुळें पहायलाही मजा येते. सचिन अजूनही जबाबदारीच्या ओझ्याखालीं दबल्यासारखाच वाटतो !
>>द्रविडचे उदाहरण डोळ्यासमोर
>>द्रविडचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवे..
वाह! काय लॉजिक आहे..
मग पहिले रिटायर व्हावे... पुढच्या गोष्टी अपोआप मार्गी लागतील नाही का?
<< मग पहिले रिटायर व्हावे...
<< मग पहिले रिटायर व्हावे... पुढच्या गोष्टी अपोआप मार्गी लागतील नाही का? >> माझ्या निवृत्तिपूर्वी [ अर्थात ,साध्यासुध्या ] मलाही असंच वाटायचं. पण रिटायर होण्यापूर्वीच कांही गोष्टी अंगी रुजवाव्या लागतात तरच नंतर पुढच्या गोष्टी मार्गीं लागतात, हें अनुभवाचं शहाणपण आहे माझं !!!
बरोबर... त्यासाठी मुळात
बरोबर... त्यासाठी मुळात 'रिटायर' व्हायचय हे 'कळावं' लागतं..
द्रविड कडून तेव्हडं नक्कीच शिकण्यासारखे आहे. तुम्हाला देखिल ते कळलं तेव्हा सचिनला लवकरच कळेल अशी आशा ठेवायला हरकत नाही..
असो. काल नरिन ला देखिल 'दंडवत' घातले साहेबांनी.. चालायचेच.. फक्त अलिकडे ही 'पडझड' केवीलवाणी झालीये एव्हडेच.
गेल च्या 'त्या'
गेल च्या 'त्या' खेळीबद्दल..
http://www.espncricinfo.com/indian-premier-league-2013/content/current/s...
आवडलच!!
ती खेळी ज्यांनी प्रत्यक्षात स्टेडीयम मध्ये पाहिली त्यांचा हेवा वाटतो..... http://en.wikipedia.org/wiki/Adrenaline_Rush किंवा रक्त 'ऊसळणे' म्हणजे काय याचा नेमका अनुभव त्यांनी घेतला असेल.
सर विव रिचर्ड नंतर 'निर्वीकारपणे' गोलंदाजांची चामडी लोळवणारा गेल हाच एक क्रिकेटपटू (निदान t२० मध्ये) मला दिसतो. वादळापूर्वी व वादळानंतरची शांतता अनुभवायची असेल तर गेल मैदानावर फलंदाजीला ऊतरताना व बाद झाल्यावर तंबूत परत जाताना स्टेडीयम मध्ये ऊपस्थित रहाणे पुरेसे असावे.
कधी चुकून माकून गेल चा एखादा फटका अंपायर ला लागला तर, या विचारानेही डोके सुन्न होते.. Dhoni was correct in his tweet. I think the best and safest place when Gayle is batting is 'behind' the wickets!
<< तुम्हाला देखिल ते कळलं
<< तुम्हाला देखिल ते कळलं तेव्हा सचिनला..... >> नाही योगजी, मला उगीच श्रेय देऊं नका; मला कळलं न कळलं तरी माझी 'रिटायरमेंट' ही फक्त वयाशीं निगडीत,'कंपलसरी' व अनिवार्य होती. सचिनचं तसं नाहीय.
आज हैद्राबाद जिम्केल बहुदा
आज हैद्राबाद जिम्केल बहुदा
मला नाही वाटत आज हैद्राबाद
मला नाही वाटत आज हैद्राबाद जिंकेल असे... आज धोनीचा दिवस आहे
>>सचिन अजूनही जबाबदारीच्या ओझ्याखालीं दबल्यासारखाच वाटतो !
कसली जबाबदारी आणि कसले ओझे?
त्याच्या डोक्याला कप्तानीचा ताप नको म्हणून भज्जीसारख्यांना पण एक सीझन कॅप्टन करून झाले.... आता खास ऑस्ट्रेलियाहून स्पेशालिस्ट नॉन-प्लेयींग कॅप्टन आणला... कार्तिक, रोहित, पोलार्ड सगळे अगदी जबाबदारीने खेळतायत.... मस्त बिनधास्त "आउट तर आउट" वाला खेळ खेळावा आता त्याने!
बघीतलत उदयन .... धोनीची परत
बघीतलत उदयन .... धोनीची परत एकदा एक मॅचविनींग खेळी
माझ्या टीम चा कॅप्टन आहे
माझ्या टीम चा कॅप्टन आहे तो...
mishra bhartiy team madhe
mishra bhartiy team madhe nakki select honar......
mishra bhartiy team madhe
mishra bhartiy team madhe nakki select honar...... >> चावलापेक्षा नक्कीच चांगला आहे, फक्त त्याने त्याचा नो बॉलचा प्रॉब्लेम सुधारायला हवाय. करन शर्मा कडे दुर्लक्ष होतय पण त्याचा average बघा IPL मधला.
धवन आला रे...आला!!!
धवन आला रे...आला!!!
केकेआरला फास्ट बॉलिंगची
केकेआरला फास्ट बॉलिंगची अॅलर्जी आहे काय??
मनदीपसिंग भारीच खेळतोय....
एक जीवदान मिळालं तरीही
एक जीवदान मिळालं तरीही धोनीच्या कालच्या भन्नाट खेळीचं महत्व जराही कमी होत नाही. Whether you like his style of batting or not, he is undoubtedly a great 'finisher' of the game !!!
कल को तो बाबा मेरेको फिक्सिंग
कल को तो बाबा मेरेको फिक्सिंग लगा

ब्राव्हो मेडन ओव्हर खेळून मॅच रंगतदार करतो काय , सॅमी असताना रेड्डीला (मॅचमधली पहिलीच) ओव्हर दिली जाते काय , कुछ् हजम नही होता
SO unpredictable , that it's predictable !
चावलापेक्षा नक्कीच चांगला
चावलापेक्षा नक्कीच चांगला आहे, फक्त त्याने त्याचा नो बॉलचा प्रॉब्लेम सुधारायला हवाय. करन शर्मा कडे दुर्लक्ष होतय पण त्याचा average बघा IPL मधला.>>> barobar ahe pan karan sharma ni catch rupi match sodali nahi na ajibat chance nahi tyala.....
मला पण हाच प्रश्न पडला की
मला पण हाच प्रश्न पडला की रेड्डीला का ओव्हर दिली ?????? सामी सारखा कसलेला गोलंदाअज असताना ?
आज केकेआर जिंकली नाही तर
आज केकेआर जिंकली नाही तर तळाच्या स्थानासाठी पुण्याला प्रतिस्पर्धी मिळेल...
मॅक्युलमला संधी मिळे ल असं वाटतय...
मॅक्युलम ब्रेट ली आणि शाकिबुल
मॅक्युलम ब्रेट ली आणि शाकिबुल हसन या तिघांपैकी २ जणांना तरी घ्यावेच लागेल.... कॅलिस सुध्दा स्लो झालेला आहे... फक्त सुनिल नरेन आणि मोर्गन हेच फॉर्म मधे आहेत
<< रेड्डीला का ओव्हर दिली
<< रेड्डीला का ओव्हर दिली ?????? >> शेवटच्या षटकांत कोणताही गोलंदाज असता तरीही 'जिंकूं किंवा मरूं' या इर्षेनेच फलंदाजी होणार होती; स्टेनसारख्यावरही धोनी तुटून पडला होता. त्यामुळे, अगदींच नवखा गोलंदाज आणला तर कदाचित गोलंदाजीतल्या 'सरप्राईझ एलिमेंट'चा फायदा मिळूं शकेल, हा रेड्डीला आणण्यात हेतू असेल.
धोनी स्वतःच सर्प्राईस एलिमेंट
धोनी स्वतःच सर्प्राईस एलिमेंट आहे.................. त्याच्या समोर सामी असता तरी तोच रिझल्ट मिळाला असता..
पण रेड्डी तर पुर्ण मॅच मधे काहीच गोलंदाजी केली नाही मग त्याला पिच कशी आहे कसे कळणार होते ?
सामी ने केली असती तर किमान पहिल्या ३ बॉल मधे तरी मॅच संपली नसती हे मात्र खरे
फॅंटसी लीगमध्ये पार्टीसिपेट
फॅंटसी लीगमध्ये पार्टीसिपेट कसं करु...??
सांगा राव.. !
Whether you like his style of
Whether you like his style of batting or not, he is undoubtedly a great 'finisher' of the game !!! >> +१, मान्य आहे कि हे तो देशातच अधिक वेळा करतो पण किती ही वेळा त्याने हे केले तरी doubting Thomas असणारच. बेव्हन जेंव्हा हेच करत होता तेंव्हा He is best finisher world has ever seen म्हणून सगळे जण बोलत असत
मुर्खांची टिम म्हणजे
मुर्खांची टिम म्हणजे कोलकत्ता.............
आज फार्मात नसलेल्या गिलक्रिष्ट ला जबरदस्त फार्मात आणण्याचे महान काम या भिक्कार बेअक्कल टिमद्वारे होणार आहे......:राग:
उशीरां कां होईना, पण कालिस
उशीरां कां होईना, पण कालिस फॉर्मात यायला लागलाय असं दिसतं; काल - ३७ धांवा व दोन बळी !
हरभजनच चांगला ऑपशन असेल गेलला
हरभजनच चांगला ऑपशन असेल गेलला रोखायला....
मलिंगा सुरुवातीला लेंग्थ बॉलिंग करतो...
आज टोटली कॅरेबियन ट्रीट आहे...
मुंबई मध्ये पोलार्ड,स्मिथ तर आर.सी. बी.तगे ल आणि रामपाल....
टिमवर्कच मुंबईला जिंकवू शकेल...
जॉन्सन अन.ओझाला चांगला मारा करावा लागेल...
Lets hope 4 d best 4 आपली मुंबई..
एक गंमत: उदयन.. | 8 March,
एक गंमत:
उदयन.. | 8 March, 2013 - 00:10
आपला संघ या ही वेळी.........कोलकता क्नाईट रायडर्स ............कोरबो लडबो जितबो रे.........
उदयन.. | 26 April, 2013 - 10:57 नवीन
मुर्खांची टिम म्हणजे कोलकत्ता.............
धनंजय वैद्य | 20 March, 2013 - 13:40
पुणे जिँकणारच आयपीएल 6 चा करंडक !
धनंजय वैद्य | 23 April, 2013 - 11:11
असाच धडा शिकवला पाहिजे पुण्याला ! ...... तीन सामने हातचे घालवण्यार्या पुण्याला सा. दंडवत ! जय पुणे हारियर!
निम्म्या आयपीएल मध्येच इतके मतपरीवर्तन

हीच तर मजा आहे म्हणा या आयपीएलची... आपल्याच संघाला शिव्या देउनही आपण अगदी देशद्रोही वगैरे ठरत नाही
मला वाटतेय आजचा दिवस राजस्थान
मला वाटतेय आजचा दिवस राजस्थान रॉयल्स आणि मुंबईचा (जर पाँटींग शहाण्यासारखा बाहेर बसला तर) असेल
शिखर धवन आणि सॅमीच्या आगमनामुळे हैद्राबादची ताकद वाढली असली तरी राजस्थान घरच्या मैदानावर वाघ आहेत
आजचा दिवस वॉटसन, फॉकनर, दिनेश कार्तिक आणि मलिंगाचा असेल... असा अंदाज
बुमरंग माझा अजुन ही संघ
बुमरंग माझा अजुन ही संघ कोलकत्ताच आहे...:)
.
.काल त्याच्या ऑफिशल पेज वर मनोसोक्त शिव्या घातल्या.. शाळेतील मुल देखील चांगली टीम निवडतील ..
.
पठाण ला इतके लांगुलचालन का करत आहे देव जाणे (असे ही आपल्यादेशात यांचे जरा जास्तच लाड होतात)
.
Pages