आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
वॉटसन तर वॉटसन, स्टूअर्ट
वॉटसन तर वॉटसन, स्टूअर्ट लिटिल पण भारी. मी ह्या बिन्नीच्या फॅन झालो आहे.
<< मी ह्या बिन्नीच्या फॅन
<< मी ह्या बिन्नीच्या फॅन झालो आहे. >> पण तिथं हसी वार्यावर सुटलाय ,त्याचं काय ! चेन्नई :१५२-२
मस्त झाली मॅच.... राजस्थानने
मस्त झाली मॅच....
राजस्थानने पुरेपुर प्रयन्त केला पण हसी एक जबरदस्त इंनिंग खेळला... हसीच्या रनआउट नंतर मॅचमध्ये जरा जान आली.... पण ब्राव्होच्या सिक्स ने मॅच फिरवली
वॉटसन फॉर्ममध्ये आला हा राजस्थानसाठीचा प्लसपॉइंट!
फॉल्कनरने परत एकदा इंप्रेस केले.... राजस्थानची बॅटींग आणि बॉलिंग अल्टरनेट मॅच चालतीय!
आज कोण जिँकणार RCB की PWI ?
आज कोण जिँकणार RCB की PWI ?
काहीही काय विचारतात...... ?
काहीही काय विचारतात...... ? ससा जिंकणार का कासव ??????

.
.
खर्या जगात ससाच जिंकतो..
..
.
अतिसुंदर !
अतिसुंदर !
आज कोण जिँकणार RCB की PWI ?
आज कोण जिँकणार RCB की PWI ? >> गेलला विचारा
अरे आवरा त्या गेल ला.
अरे आवरा त्या गेल ला. 'अमानवीय' खेळतोय. पुण्याचे बॉलर्स बिचारे..
'पानिपत' शब्दाची व्याख्या
'पानिपत' शब्दाची व्याख्या नव्याने लिहावी लागणार बहुदा.. 'गेलपत'!
एव्हडे करूनही पुणे जिंकले तर मात्र कहर होईल!
गेल आज २०० करेल असे वाटते
गेल आज २०० करेल असे वाटते आहे... विवियन रिचर्ड चा बाप म्हणायची वेळ आली की..
रच्याकने:
Pune Warriors won the toss and elected to field
पायावर कुर्हाड, धोंडा, नव्हे अख्खा सिंहगड मारून घेतला आहे!! (गेल विरुध्द पहिली गोलंदाजी हा अती शहाणपणा पुणेकरच करू जाणेत)
गेल ५३ चेंडूत १५३ नाबाद...
गेल ५३ चेंडूत १५३ नाबाद...
एकच पर्याय आहे सरपटी बॉलींग.
एकच पर्याय आहे सरपटी बॉलींग.
Pune Warriors won the toss and elected to field >> माणूस ओव्हर कॉन्फिडंस मध्ये काहीही करतो. पुण्याचे तसे झाले आहे.
>>एकच पर्याय आहे सरपटी
>>एकच पर्याय आहे सरपटी बॉलींग
सगळे बॉलर्स सरपटत आहेत असे चित्र डोळ्यापूढे आले.. या सर्वात भुवी चे ३ ऑवेर्स ८ रन्स! काय म्हणावे!
सचिन, पाँटींग, तमाम कंपनीने जेव्हा गेल भेटेल तेव्हा त्याला किमान साष्टांग दंडवत घालावा..
पुणेकरांनी थ्री इडीयट स्टाईल 'सलाम' करायला हरकत नाही
पुणेकरांना आजा त्याच्या बॅट च्या जागी लोखंडी मुदगल दिसत असावे..
आता डी विलीयर्स
आता डी विलीयर्स आला...
पुणेकरांना संपूर्ण सहानुभीती.... हाल पहावेनात!
आता भुवी ची पाळी.............
देवा यांना क्षमा कर!!
मला वाटते (आतापर्यंतच्या सर्व
मला वाटते (आतापर्यंतच्या सर्व आयपिल हंगामात) आज सर्वात जास्त फिल्डींग प्रेक्षकांनी केली असावी..
पायावर कुर्हाड, धोंडा, नव्हे
पायावर कुर्हाड, धोंडा, नव्हे अख्खा सिंहगड मारून घेतला आहे!! >> काहितरीच, पायावर सिंहगड नाही तर सिंहगडावर पाय मारून घेतला आहे म्हण.
भुवीच्या चार ओव्हरस्मधे तेवीस रन्स. awesome boss.
Freeze this: Current time:
Freeze this:
Current time: 18:15 local, 12:45 GMT Twenty20 career
Batsmen Runs B 4s 6s SR Mat Runs HS SR
Chris Gayle (lhb) 175 66 13 17 265.15 137 5236 175* 155.87
वेल आज त्याचे २०० ही होऊ शकले
वेल आज त्याचे २०० ही होऊ शकले असते. व्हायला पाहिजे होते.
भूवी इ़ज जस्ट ग्रेट फाईंड !
काय आहे
काय आहे हे.................... गेलात्कार झाला रे पुण्याचा
.
.
मी कालच एकाला बोललो की मॅक्युलम चा विक्रम १५८ चा कोणी तोडला तर गेल असेल... परंतु असा ??? अरे रे रे....
भूवी इ़ज जस्ट ग्रेट फाईंड >>
भूवी इ़ज जस्ट ग्रेट फाईंड >> अगदी... आणि लॉर्ड दिंडा इज दि ग्रेटेस्ट एव्हर फाइंड
गेलात्कार झाला रे पुण्याचा >>
गेलात्कार झाला रे पुण्याचा >> गेलच्याच शब्दात सांगायचं तर 'इट वॉज अ चाइल्ड अब्यूज'
सर अशोक दिंडा......इज बेस्ट
सर अशोक दिंडा......इज बेस्ट
काही प्रतिक्रिया gorakshnath
काही प्रतिक्रिया
gorakshnath - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 07:25 PM IST
मानवी अधिकार आयोग - गेल विरुद्ध पोलिस केस दाखल करणार आहे !
उपटसुंभ - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 07:18 PM IST
पुण्याच्या टीम कडून तिकिटाचे पैसे घ्यायला पाहिजेत कारण त्यांनी एक उत्तम खेळी जवळून पाहिली.
अमित - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 07:05 PM IST
पहिल्यांदा मी खरा सुनामी डोळ्यांनी बघितला. वादळ येते तेंवा काय होते ते गेल ने सगळ्यांना दाखवले, त्याची ताकद आणि शांत स्वभाव हे खरोखरीच वाखण्याजोगे आहे
Ballboy - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 07:03 PM IST
ह्याची ड्रग टेस्ट करायला पाहिजे, साला बैलाचे मास खातो का गेंड्याचे ! नाहीतर ह्याचसाठी मैदान दुपटीने वाढवा ...... काहीपण करा पण आवरा ह्याला , गेल फोर्से कुठला .
बिपीन किंजवडेकर, पुणे - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 06:53 PM IST
क्रिस गिल हा एक महाप्रचंड टोरनेडो आहे. ह्याला प्लीज हिंदुस्तानी नागरिकत्व ताबडतोब द्यावे आणि भारतीय संघात सामील करावे. ह्यापुढील सर्व क्रिकेट स्पर्धा भारतच जिंकेल.
dr sap - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 06:48 PM IST
अबबबब !
Tushar suryawanshi - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 06:47 PM IST
Only १ Sentence is sufficient to describe "IPL cha tharar ha tar Gel war"
पुरुषोत्तम काळे - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 06:21 PM IST
जेव्हा गेल ची चेंडूफळी तळपते तेव्हा क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक आणि प्रेक्षकाला क्षेत्ररक्षक व्हावे लागते ...!!!
prashant - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 06:18 PM IST
आता पुण्याने किमान २०० धावा करून अब्रू राखण्याचा प्रयत्न करावा. गेलचा खेळ अप्रतिम. डोळ्यांचे पारणे फेडले. असा डाव वर्षानुवर्षे लक्षात राहील.
Prafull - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 06:11 PM IST
Innocent dangerous cricketer....
आनंद सोनसळे - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 06:06 PM IST
खरा धडाकेबाज !
nikhil - मंगळवार, 23 एप्रिल 2013 - 05:39 PM IST
हा माणूस आहे कि अवतार, great गेल u r great, कत्तल केलीस तू आज, काही तरी दया माया दाखव कि रे
पानशेतचं धरण फुटल्यासारखं
पानशेतचं धरण फुटल्यासारखं वाटलं आज [पुण्याला
असाच धडा शिकवला पाहिजे
असाच धडा शिकवला पाहिजे पुण्याला ! खेळाडू निवडण्यात पहिली चुक - अली मुर्तझा , मन्हास , पांडे अजिबात नको होते. चांगले झाले पुण्याला धडा शिकवला RCB ने ! आता आपण आशा करु की इथुन पुढे पुणे चांगले खेळेल! तीन सामने हातचे घालवण्यार्या पुण्याला सा. दंडवत ! जय पुणे हारियर!
अहो धनंजय वैद्य, तुमच्यासारखे
अहो धनंजय वैद्य, तुमच्यासारखे खंदे समर्थक पुण्याला शिव्या कसे देउ शकतात?
बाकी मैदानावरच्या अंपायर्सनी त्यांच्या शाळेच्या दिवसानंतर आज पहील्यांदाच इतकी कवायत केली असेल

बंगलोरच्या चीअरलीडर्सना पण आज डबल पैसे द्यायला पाहिजेत... दमल्या असतील बिचार्या
>>खेळाडू निवडण्यात पहिली
>>खेळाडू निवडण्यात पहिली चुक
अहो आज पुण्याच्या टीममधले कुणीही समोर असते तरी गेलच्या खेळात काही फरक पडला असता असे वाटतेय का?
राहुल शर्माला आज बाहेर बसल्याचा अत्यानंद झाला असेल
आज पावसाच्या शक्यतेमुळे धडाकेबाज सुरुवात करायची असे ठरवूनच बंगलोरची टीम मैदानात उतरली असेल.... गेलच्या कृपेने नुसती सुरवातच नाही तर आख्खा डाव धडाकेबाज झाला
बाहेर कामाला गेलो होतो; घरीं
बाहेर कामाला गेलो होतो; घरीं येतों तर बायको म्हणाली," केबलवाल्यानी मेसेज फ्लॅश केला होता; संध्याकाळीं सगळी सिस्टीम खूपच गरम झालीय म्हणून दोन तास बंद ठेवतोय ! मेल्या त्या गेलमुळें 'उंच माझा झोका'वर गदा आलीय आज !!''

<< पानशेतचं धरण फुटल्यासारखं वाटलं आज [पुण्याला >> अशा भयानक वादळाने हादरलेले असतानाही पॅड बांधून खेळायला यायचं भान ठेवलं ह्याचंच कौतुक करायला हवं पुण्याचं !
<< गेल विरुध्द पहिली गोलंदाजी हा अती शहाणपणा पुणेकरच करू जाणेत) >> काय फरक पडतो ? गेलच तो ! वाघोबा म्हटलं तरी खातो, वाघ्या म्हटलं तरीही ..... !!! पुण्याने प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्याने निदान प्रेक्षकाना अफलातून असं कांही बघायला तर मिळालं !!
राहुल शर्माला आज बाहेर
राहुल शर्माला आज बाहेर बसल्याचा अत्यानंद झाला असेल > >
RCB आत्ता home ground वरून बाहेर पडून पुढच्या ५-६ मॅचेस away खेळणार आहे, तेंव्हा काय होते ते बघूया. मागच्या वर्षी पण असेच गेल वर depend राहून शेवटी पचका झाला होता. KKR मॅक्ममल्लम ला खेळवणार का आत्ता तरी ...
पुण्याचा आज २०/२० मधे RCB
पुण्याचा आज २०/२० मधे RCB कडून डावाने पराभव झाला. जाऊ द्या... झालं, 'गेलं' गंगेला मिळालं.
Pages