आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
>झालं, 'गेलं' गंगेला
>झालं, 'गेलं' गंगेला मिळालं

>>KKR मॅक्ममल्लम ला खेळवणार का आत्ता तरी
कॅलीस, नारायण, मॉर्गन, सेनानायके.... कुणाला बाहेर बसवणार?
त्यातल्या त्यात सेनानायके बाहेर जाऊ शकतो!
इस दुनिया मेँ सब कुछ मुनकिन
इस दुनिया मेँ सब कुछ मुनकिन है ! आम्ही पुणे हारियरला हारल्यावर शिव्या पण देऊ शकतो! खरे तर सर्वाँनी पुण्याला धन्यवाद द्यायला हवेत कारण त्यांनी आगोदर क्षेत्ररक्षण स्विकारल्यामुळे आजचा हा सर्व रेकॉर्डतोड खेळ पहायला मिळाला !
आत्ताच आलेला एक समस: पुढच्या
आत्ताच आलेला एक समस:
पुढच्या मॅचपासून सगळे कॅप्टन्स म्हणतील "आमचे १० गडी, तुमचे १० गडी आणि गेल कॉमन"
मुलगा: बाबा मला मोठेपणी गेलच
मुलगा: बाबा मला मोठेपणी गेलच व्हायचय
बाबा: अरे 'सचिन' चा आदर्श ठेव.
मुलगा: बाबा मला काचा नाही छप्पर तोडायचय..
ह्या संस्मरणिय क्षणी, शीघ्र
ह्या संस्मरणिय क्षणी, शीघ्र कवी सुलु यांना सुचलेली काही काव्य-पुष्पे.. कृष्णाचा कलियुगातील अवतार 'क्रिस' गेल यांच्या चरणी -
बंगळुरुचा चंदनगंधित धूप तुला दाविला,
( उठी उठी गोपाळा धर्तीवर!)
स्विकारावी टोपी आता, कुटी कुटी क्रिस्-गेला!
'गेले', द्यायचे राहून, तुझे षटकारांचे देणे,
माझ्या-पास आता फक्त, खाणे खारे शेंगदाणे - इति पुणे वॉरीअर्स.
पंजाब हाराकिरी करण्याच्या
पंजाब हाराकिरी करण्याच्या मार्गावर!
<< मागच्या वर्षी पण असेच गेल
<< मागच्या वर्षी पण असेच गेल वर depend राहून शेवटी पचका झाला होता. >> असामीजी, मलाही वाटतं कीं गेलसारख्या खेळाडूचा कोणत्याही कारणाने मधेच सूर हरवला तर नकळत त्याच्यावरच नको तेवढा विसंबणारा त्याचा संघच हतबल होऊं शकतो ! अर्थात , हा माझाच कल्पनाविलासही असूं शकतो .
नकळत त्याच्यावरच नको तेवढा
नकळत त्याच्यावरच नको तेवढा विसंबणारा त्याचा संघच हतबल होऊं शकतो ! >> हो म्हणून RCB च्या द्रुष्टिने प्रत्येक सामन्यात गेल नाहि खेळला तर बरेच आहे. दिलशान, कोहली नि अॅबे जेव्हधे खेळत राहतील तेव्हढे चांगलेच होईल.
1डाऊन जर डिव्हीलीअर्स आला...
1डाऊन जर डिव्हीलीअर्स आला... तर स्कोर चांगलाच वाढेल..
(No subject)
उदयन, जबरी आहे..
उदयन,
जबरी आहे..
आत्ताच समजलेली माहिती पुणे
आत्ताच समजलेली माहिती पुणे वॉरियर्स आता दुसरे शहर घेणार आमदाबाद वॉरियर्स किँवा भोपाळ वॉरियर्स होणार ! कारण सुमार कामगिरी , प्रेक्षकांची संख्या यामुळे प्रचंड खाली यामुळे निम्मीच तिकीटविक्री . यामुळे नैराश्य आलेल्या सहाराने आता शहर बदलुन देण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे . ( साभार - दै.प्रभात) वाचुन सुन्न झालो ! माझी पुणे हारियर ....!
अभिनंदन धनंजय..........आता
अभिनंदन धनंजय..........आता पुण्याचे पानिपत होणार नाही

.
.
असोक दिंडा नानासाहेब फडणिसांची भुमिका वठवतोय वाटते
ख्रिस गेलच्या तुफानी
ख्रिस गेलच्या तुफानी फटकेबाजीमुळे आयसीसीने ‘गेल’साठी क्रिकेटच्या नियमात बदल करण्यात आले आहे.
1. गेलला फक्त २४ बॉल (४ ओव्हर) खेळण्यासाठी देण्यात येतील. नाहीतर त्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट करण्यात येईल.
२. एका ओव्हरमध्ये त्याला फक्त १ फोर आणि १ सिक्स मारता येईल.
३. २५०च्या वर जर त्याचा स्ट्राईक रेट असेल तर त्याच्या मानधनात कपात करण्यात येईल.
४. प्रत्येक ओव्हरमध्ये त्याने दोन रन धावून काढलेच पाहिजेत.
५. जेव्हा गेल बॅटींग असेल तेव्हा कोणत्याही प्रकारची फिल्डिंगवर बंधने असणार नाहीत.
६. जर कोणत्या प्रेक्षकांने जर कॅच पकडला तर गेल आऊट असेल.
<< आता शहर बदलुन देण्याची
<< आता शहर बदलुन देण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे . >> मला वाटतं पुण्याला 'वॉरिअर्स' जोडल्यामुळे गेलसारखे लढवय्ये त्यांच्या विरुद्ध खेळताना चवताळून उठतात; 'पुणे' तसंच ठेवून 'पुणे स्कॉलर्स' किंवा 'पुणे आयटीयन्स' असं कांहीं औचित्यपूर्ण नांव दिल्यास पुण्याच्या कामगिरीत फरक पडण्याची शक्यता आहे .
<< आता शहर बदलुन देण्याची
<< आता शहर बदलुन देण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे . >> 'पुणे' तसंच ठेवून 'पुणे स्कॉलर्स' किंवा 'पुणे आयटीयन्स' असं कांहीं औचित्यपूर्ण नांव दिल्यास पुण्याच्या कामगिरीत फरक पडण्याची शक्यता आहे .
पुणे लुझर्स असे नाव ठेवले तर
पुणे लुझर्स असे नाव ठेवले तर बहुदा इतर संघ त्यांच्यावर जास्त दया दाखवतील
'पुणे' तसंच ठेवून 'पुणे
'पुणे' तसंच ठेवून 'पुणे स्कॉलर्स' >> नको ! परत मग टॉस जिंकून फलंदाजी घेतली इतर लोकं ,"पुण्यातले दिडशहाणे" म्हणतील.
आता मला वाटतं कोणीही बेंगलोरला टॉस जिंकून फलंदाजी देणार नाही. (अपवाद धोणी - तो जनरली तिरका चालतो त्यामुळे एखादा मुद्दा प्रुव्ह करण्यासाठी तसे करू शकेल)
पुणे टीम मध्ये डिंडा ऐवजी एक चांगला बॉलर आणि मधल्या फळीत आणखी एक चांगला फलंदाज आला तर ती टीम चांगली होईल. (अर्थात अँजलो मॅथ्युजला काढून टाकावे)
फिंच, युवी, ल्युक , नवीन चांगला फलंदाज, स्टिव्ह स्मिथ, तोंडी लावायला अन चाललाच तर उथ्थापा) भुवी, शर्मा, नवीन गोलंदाज ही मुख्य टीम अन बेंच मधील दोघे - तिघे ( वेन पार्नेल, मार्श) इत्यादी. सध्या अभिषेक नायर अजिबात चालत नाहीये, त्यामुळे मधल्या फळीत आले की लोकं घाम गाळत आहेत. अभिषेक ऐवजी तो नवीन फलंदाज असावा. आणि वेन पार्नेलला का संधी देत नाहीत हे कळत नाही. तो खूप प्रतिभाशाली आहे असे नाही, पण संधी दिली पाहिजे. ल्युक राईट असाच बाहेर होता पण एका मॅच मध्ये चांगला खेळला.
आपण आशा करुया की सहारा " पुणे
आपण आशा करुया की सहारा " पुणे " वॉरियर्स असेच राहील व रविवारी दिल्लीविरोधात पुणे जिँकेल . बहुधा कालच्या खेळातुन धडा घेतला असेलच पुण्याने .पाहुया काय होतेय ते ! बाय द वे आज कोण जिँकणार kkr ya mumbai?
<< तोंडी लावायला अन चाललाच तर
<< तोंडी लावायला अन चाललाच तर उथ्थापा)>> पूर्वी उथाप्पाबद्दल मला खूप आशा वाटायची; तसा तो चांगला फलंदाज व क्रिकेट खूप सिरीयसली घेणारा खेळाडू वाटतो. [त्याची एक मुलाखत ऐकली होती त्यावरूनही बरं मत झालं होतं त्याच्याबद्दल].कुठं तरी माशी शिंकली, हें निश्चित.
<< आपण आशा करुया की सहारा " पुणे " वॉरियर्स ..... पुणे जिँकेल >> धनंजयजी, टी-२० मधे कधीही चित्र पालटूं शकते; वर नांवावरून चाललेला कल्पनाविलास, ही केवळ गंमत ! ऑल द बेस्ट !!
<< बाय द वे आज कोण जिँकणार>> आतां मीं जरा घाईंत आहे; रात्रीं १० वा. नक्की सांगतों !
पाँटींगने आज स्वतः बाहेर
पाँटींगने आज स्वतः बाहेर राहून रोहीत शर्माला कप्तानपदाची धुरा सांभाळायला दिलीय ! तीन फिरकी गोलंदाज घेवुन खेळतेय मुंबई आज. पहिल्याच षटकात [ भज्जीच्या] २६ धांवा घेवून केकेआरने हलचल मचाई. पण... सरड्याची धांव कुंपणापर्यंत !!! आज सचिन वाढदिवसाची आतषबाजी करेल ? निदान चाळीस तरी !!!
>>आज सचिन वाढदिवसाची आतषबाजी
>>आज सचिन वाढदिवसाची आतषबाजी करेल ? निदान चाळीस तरी
अवघे ३८ रन्स कमी पडले भाऊ
>>रात्रीं १० वा. नक्की
>>रात्रीं १० वा. नक्की सांगतों !
दहा वाजून गेले.... आता सांगा बरे कोण जिंकेल?
<< आता सांगा बरे कोण
<< आता सांगा बरे कोण जिंकेल?>> मुंबई !
येस !!!!! एक चेंडू राखून
येस !!!!!
एक चेंडू राखून ...... सचिनच्या वाढदिवसासाठी !!!
मुंबई इंडियन्स प्रेमिँना
मुंबई इंडियन्स प्रेमिँना शुभेच्छा !
भज्जीने योग्य वेळेला सिक्स
भज्जीने योग्य वेळेला सिक्स मारली
काल माझा सपोर्ट तरी मुम्बईलाच होता.
सचिन रिटायर होइल लवकरच बहुतेक .
<< सचिन रिटायर होइल लवकरच
<< सचिन रिटायर होइल लवकरच बहुतेक .>> सध्यां तरी प्रार्थना एवढीच कीं आतां सचिनला बसवून पाँटींगने सलामीला येवून शतक ठोकूं नये; आमच्या जखमेवर मीठ चोळत !!
काल पाँटींग लाजे नी
काल पाँटींग लाजे नी बसला...आधीच्या मॅच मधे जॉन्सन ला न घेउन त्याने मोठी चुक केलेली...लवकर त्याला चुक उमजली
नाहीतर गंभीर.....भिक्कार वृत्तीच्या पठाण ला घेउन काय उपयोग ..तो बॅटींग देखील करत नाही आणि बोलींग देखील शो पीस म्हणुन जावाई सारखा प्रत्येक मॅच मधे घेतात....काल सुध्दा मॅकल्युम ला घेतले नाही ....इतके मॅच निव्वळ बॅटींग मुळे हारतोय तरी देखील बॅट्स्मन ला घेत नाहीत... कॅलिस ला आता बसवुन ब्रेट ली ला आणावा..
.
.
सध्यां तरी प्रार्थना एवढीच
सध्यां तरी प्रार्थना एवढीच कीं आतां सचिनला बसवून पाँटींगने सलामीला येवून शतक ठोकूं नये >>
सचिनला बसवायचे तर रिकीला स्वतःला बसावे लागेल आधी. ते त्याने करून दाखविले. काल रिकी खेळला नाही, पण सचिनही चालत नाही, त्यामुळे आता सचिन वर प्रेशर आहे हे नक्की. हे असे चाचपडताना बघायला खूप वेदना होतात. त्यापेक्षा एखाद दोन मॅच विश्रांतीच्या नावाखाली बसावे. (त्यातल्यात्यात एक ४० अन ५० असल्यामुळे रिकी पेक्षा तो बराच बरा आहे
)
सचिनने सचिन न राहता फ्रि खेळावे. तसे करताना तो आउट झाला तरी चालेल. द्रविडचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवे.
Pages