आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो तुम्ही कर्णधारपदच चुकीच्या माणसाच्या हातात दिल्यावर बाकीचे काय करणार आणि सपोर्ट तरी कुणासाठी करायचा?
ही इंडीयन प्रिमीयर लीग आहे की श्रीलंकन प्रिमीयर लीग?
भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराला हे डावलूच कसे शकतात... सहारा कडून ही अपेक्षा नव्हती Sad

गंभीर ला झाले काय........आजची महत्वाची मॅच मधे रायन ला घेतला ब्रायन मॅक्युलम ला नाही

ब्रेटली ला बाहेर ठेउन घेतला कुणाला तर प्रदिप सांगवान ला Angry

त्या युसुफ ला संघात ठेउन काय दिवे लावणार आहे देव जाणे ?

बॉलिंग सुध्दा देत नाही त्याला......आणि तो बॅटींग करत नाही

मित्रहो...

All set for first live match this season out of three..... राजस्थान वि पुणे Happy

द्रवीडला प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता आहे Happy

<<गंभीर ला झाले काय........>>कालीस, मॉर्गन, मकलॅरेन व सुनील नरैन.. झाले ना चार फॉरेनर्स !आज बरा खेळलाय युसूफ - १७ चेंडूत २७ [३ चौकार , १ षटकार ].

झाले ना चार फॉरेनर्स >>>>>>>>> तो सांघवान म्हणजे गेल पुढे दिलेली शेळी वाटेल ... किमान ब्रेट ली तरी असायला हवा... युसुफ कुठे खेळला नुसते २७ काढले.. टिकायला हवा ना...

गेल स्टॉर्म पुन्हा एकदा........ कोलकत्ताचे खर नाही... जुनी सवय उफळुन आली... जेव्हा तुम्ही गेल समोर असता तेव्हा तुमच्या कडे सर्वोत्तम बॉलर असावा लागतो... ब्रेट ली... जसे स्टेन ने केले तसे ब्रेट ली सुध्दा करु शकला असता.. सांगवान सारख्या नवख्या बॉलर ला तुम्ही गेल आणि विराट च्या तोंडी दिल्यावर त्याला चोप हा बसणारच होता.. फक्त सुनिल नरेन आणि कॅलिस ने बॉलिंग चांगली केली ... गंभीर ने भाटीया ला सुध्दा कमीच ओव्हर दिल्या... चोप बसतोय हे बघुन स्लो बॉलर्स ना उतरवायचे सोडुन फास्टर का चालु ठेवले..? युसुफ ला काय शो साठी उभा केलेला का ? त्याला एक ओव्हर देउन बघायची होती.......असाही मार बसतच होता.. अजुन एकाला बसला असता...
.

आणि ४८ चेंडूत ५४! कसोटी सामनयात एव्हढ्या चेंडूंत फार तर ४ किंवा ५ झाल्या असत्या.

ही भिंत चालवणारे ज्ञानेश्वर कोण बरे?

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुणे वॉरियर्सने विजयी गुढी उभारली आहे ! सर्व पुणे वॉरियर प्रेमिँना शुभेच्छा !

दिल्ली जिंकावी. बिचार्‍यांना एक तरी सामना जिंकू दे.
आता अगदी पुण्याने पण एक सामना जिंकला .इतकी अवहेलना करू नये दिल्लीची.
दिल्लीतल्या राजकारण्यांवरचा राग बिचार्‍या खेळाडूंवर काढणे योग्य नाही.

फिल्डरकडे जोरजोरात बॉल मारायची द्रवीडची सवय पूर्णपणे गेलेली नाही अजून! त्यामुळे टी२० मधे मला अजूनही त्याची दया येते. काल पण डीप लाँगॉनच्या फिल्डरकडे खूप जोरात मारून एकच रन मिळवत होता. जरा हळू मारला असता तर दोन रनच टेन्शन फिल्डरला देता आलं असतं. Proud

दिल्लीची ससेहोलपट सुरूच ! सेहवागसकट ३ बाद- २६ धांवा !
<< दोन रनच टेन्शन फिल्डरला देता आलं असतं. >>The problem is- Dravid is too good a gentleman to do that !! Wink

काल द्रवीडने फिफ्टी मारुन अगदी तिकिटाचे पैसे वसूल करून दिले.... राजस्थान मॅच जिंकले असते तर अजुन मजा आली असती.... असो.... काल पुणे चांगले खेळले आणि ते जिंकले
पण द्रवीडची लोकप्रियता किती अफाट आहे ते स्टेडीयममध्येच कळते.... आमचा आख्खा स्टँड संपूर्ण मॅचभर द्रवीडलाच चीअर करत होता... एका उत्साही ग्रूपने तर द्रवीडच्या फोटोजचा कोलाज असलेला एक फ्लेक्स बनवून आणलेला आणि अखंड त्याच्या नावाचा जयघोष चालू होता
त्याच्या फिफ्टीनंतर आणि त्याने घेतलेल्या अफलातून कॅचनंतर तर पब्लीक फारच खूष होते.... बर्‍याच जणांच्या हातात पुण्याचा झेंडा होता पण द्रवीडच्या प्रत्येक शॉटवर खूष होत होते

मागे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका सिक्युरिटी गार्डची "द्रवीड आपल्या पुणे वॉरियर्स मध्ये पाहिजेल होता राव" ही प्रतिक्रिया फार मस्त होती

बाकी अचाट महागडे फूड आयटम्स, विकत पाणी, पार्किंगची बोंब वगैरे प्रकार होतेच....
मागच्या वर्षीपेक्षा यंदा ट्रॅफिकमधून बाहेर पडायला वेळ लागला

हैदराबाद- ८९-६ ! ४षटकं शिल्लक. सामना रंजक केल्याबद्दल हैदराबादला खास बक्षिसच द्यायला हवं !!!

एकदाचे? अहो चार पैकी तीन ते जिंकले. आता पुरे की. अश्याने इतर संघांचे खेळ बघायला कुणि येणार नाही.
म्हणजे खेळण्याचा सर्वात महत्वाचा, नव्हे, एकुलता एक उद्देश की पैसे मिळवायचे, तो कसा साध्य करायचा?
प्रत्येक संघात एक तरी द्रवीड, सचिनसारखा कुणितरी पाहिजे म्हणजे कुणिहि हरो, जिंको, लोक येतच रहातील.

माझ्या मते प्रत्येक संघात चार परदेशी खेळाडू, एक सिनेनट, एक सिनेनटी, असायला पाहिजे. नुसत्या चीअर लीडर्स पुरे नाहीत. लोकांना माहिती, प्रसिद्धि असलेली व्यक्ति पहाण्यात जास्त इंटरेस्ट, खेळ, अभिनय वगैरे एकदम दुय्यम.

चला डिंडाला धु धु धुतला..........इतका धुत होते तरी मॅथ्युज ने त्याला शेवटची ओवर दिलीच......
पुणे तिथे सगळेच उणे Biggrin

मी दोनदा त्याला माझ्या फँटसी टीममध्ये घेतले तर खेळला नाही आणि आता त्याला काढला तर खेळायला लागलाय Sad

पुण्याच्या ओपनिंग पार्टनरशिपवर आता बरेच काही अवलंबून आहे!

>>इतका धुत होते तरी मॅथ्युज ने त्याला शेवटची ओवर दिलीच
हो ना यार.... फ्लिंच आणि भुवीचा ऑप्शन होता त्याच्याकडे
तरी बर त्याने स्वताने १९वी ओव्हर जरा बरी टाकली

Pages