आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

majalelya khanacha kkr tar harala....good win to punjab now its turn for dd.....

हातातली मॅच कशी हारावी हे पठान कडुन शिकावे
स्वतःला सुपरमॅन समजतो #$%
जिथे १० चा रनरेट हवा होता तिथे मेडन ओवर केली......
समोर असता तर तिथेच तुडवला असता...

<< सुनिल नरेन ने हॅट्रीक.....>> तो चतुराईने पण स्थितप्रज्ञासारखा राहून [ ओरिजीन भारतीयच ना !]गोलंदाजी करतो, ही त्याची खरी ट्रीक आहे !! Wink

पुण्याची टीम आहे म्हणून मराठी माणसाला टीममधे घेतलं पाहीजे
या मागे (एक दु:खद) विचार असा की खुद्द पुण्यात ७ चांगले खेळाडू सापडू नयेत? निआन बाकीच्या महाराष्ट्रात तरी?
की मी म्हणतो तसे - आजकाल पुण्यात जे इतर देशांतून पूर्वी आले, त्यांचे प्रमाण खूप वाढले आहे, नि त्यांच्यापुढे खरे महाराष्ट्रीय निष्प्रभ होतात.

जर पुण्यात इतर प्रांतीय लोक चालतात तर बीसीसीआय ने तरी भारतीय नागरिकच घ्यावे असे कुठे आहे? नाहीतरी ती एक खाजगी संस्था आहे, फायद्यासाठी चालवलेली, मग इतर देशातले लोक विकत घेऊन खेळवले तर खेळाचा दर्जा खालावेल का?

<< बॅटींग च्यावेळेला सुध्दा तसाच राहिला >> प्रेक्षकही [नक्कीच भारतीय ओरिजीनचे !] आपल्यासारखेच स्थितप्रज्ञ राहूं शकतात का, हें तो पडताळून पहात असावा !! Wink
दिल्ली डेअरडेविल्समधून विरू [२५ धांवा] खेळूनही फलंदाजी खास प्रभावी वाटत नाही. अर्थात, टू अर्ली टु प्रेडिक्ट !

<<आज कोण जिँकणार ? पुणे की हैदराबाद ?>> कां, कसं कळत नाही पण वॉरियर्सच्या तलवारीना अचानक धार चढून त्या तळपतायत ! शिवाय, पुणे वि. हैदराबाद ही तर 'ऐतिहासिक' खुन्नस !! मजा यावी अशी अपेक्षा ! Wink

स्मित चालला तर पुणे जिंकणार

आणि स्टेनगन चालली तर..........पानिपत पार्ट १४ नक्की Wink

<< आणि स्टेनगन चालली तर.......... >> अति वेगवान गोलंदाजी हें टी-२० मधें दुधारी हत्यार ठरतंय ! चौकार, षटकार मारायला चेंडूच्याच वेगाचा फायदा घ्यायला हल्लीं फलंदाज सरावले आहेत !!! Wink

कोहली च्या पत्रिकेत 'अंतीमशडाषटक' असा काही दुर्योग दिसतो. ईथल्या जाणकार ज्योतिषांकडून त्याने ऊपाय करवून घ्यावा..

रच्याकने: आयपिल च्या अंतीम सामन्या आधी थोड विरंगुळा, मनोरंजन, ई. म्हणून असा काही सामना ठेवला तरः
जगातील सर्व जुन्या दिग्गज खेळाडूंचा एक २०/२० सामना ठेवायचा: कोण कोण खेळू शकतील बरे-
कपिल, सनी, शास्त्री, होल्डींग, विव, ....

<< कोण कोण खेळू शकतील बरे->> क्षेत्ररक्षणासाठी प्रत्येक संघासाठी ११ राखीव उदयोन्मुख खेळाडूंचीही नांव सोबतच सुचवावीं लागतील !! Wink

>> या मागे (एक दु:खद) विचार असा की खुद्द पुण्यात ७ चांगले खेळाडू सापडू नयेत?
अजून ३/४ वर्षात होईल असं वाटतंय. माझ्या दृष्टीने आयपीएलचा सगळ्यात मोठा फायदा नवोदित खेळाडूंना आहे. चांगली स्टेडियम आणि फॅसिलिटीज आल्या आहेत, नामांकित खेळाडूंचा खेळ बघायला मिळतो, त्यांच्या बरोबर खेळायला मिळतं, एकंदरित चांगला अनुभव मिळतो. आयपीएलचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे पैसे! नवोदित खेळाडूंना आयपीएल येईपर्यंत क्रिकेटकडे व्यवसाय म्हणून बघता येत नव्हतं! जसं इंग्लंडच्या कौंटी मॅचेस खेळणारे खेळाडू फक्त क्रिकेट खेळून पोट भरतात तसं भारतात काहीच नव्हतं.

हैदराबाद- ९३-७ !! डोनाल्ड पुण्याच्या गोलंदाजाना बहुतेक कानमंत्राबरोबर कानपिचक्याही देत असावा !!! Wink

पानिपत.............
.
.
काल कोलकत्याने हातातली मॅच घालवली आज पुणे शहराने ....... १२ बॉल मधे १२ हवे होते परंतु मिश्राने हॅट्रिक घेउन एकच ओव्हर मधे ४ विकेट घेतले आणि ६ विकेट ने हैद्राबाद विजय मिळवला Wink

.
.
शेवटच्या १२ रन्स मधे तब्बल ६ विकेट गेल्या

काहीही बोला.....सगळ्यांनाच धक्का दिला पुण्याने...........पुणे तिथे काय उणे.... एका वेळेस अशक्य वाटणारा पराभव अतिशय त्वेषाने खेचुन आणला... विजयाच्या दाढेतुन पराभव खेचुन आणला ...हॅट्स ऑफ पुणे...

टो-डलस मित्रा टोडलस Wink

अहो पुणे हरले. मिश्राची हॅट ट्रिक. ७ धावात ६ बाद. ४ बाद १०१ वर मार्श गेला नि १०८ मधे इनिंग संपली पण. शेवटी ११ धावांनी हरले.

म्हणजे अगदी पानिपतच. बरे तर बरे कुणि महाराष्ट्रीय नव्हतेच त्यात! फारसे वाईट वाटायला नको.
धनंजय वैद्य यांना साहानुभूति.

<< शेवटच्या १२ रन्स मधे तब्बल ६ विकेट गेल्या>> बाहेर गेलो होतो म्हणून चूकलं हें नाट्य --- कीं शोकांतिका ! Sad

आता राजस्थान २०० करणार का? सध्यातरी द्रवीड ऐवजी याद्निक हे बरे आहे असे वाटते. फरच घसरगुंडी झाली तर द्रवीडने येऊन बाजू सावरावी. तोपर्यंत हान ति....

रहाणे, हॉजने १७९पर्यंत स्कोअर नेलाय. मुंबई- सचिनव पाँटींग वर तंबूत परत !२०-२ !

MI बोंबललेत पूर्ण. Foreign captain असणार्‍या टिमला त्रास आहे, तो फेल झाला तरी ठेवावे लागतेय.

पुण्याने स्वत: इज्जत तर घातलिच पण माझी पण घातली! इतके सोपे आव्हान असताना जर तुम्ही सामना इतक्या भयानक पद्धतीने हारत असलात तर तुमच्यासारखे तुम्हीच! मी नेहमी सांगितल्याप्रमाणे त्या मुर्ख डिँडाला ओव्हर देऊन आज देखिल पायावर धोँडा मारुन घेतला! (अवांतर: ज्यावेळी पुण्याच्या विकेट पडत होत्या त्यावेळी युपीवाले भैय्या जोरजोरात आनंदाने नाचत व मला चिडवत गिली गिली करत होते त्यावेळी वाटले की जावे व पुण्याच्या सगळ्या खेळाडुंना जबर चोप द्यावा ! )

मुंबईची सरासरी बोंबलली. +१.१५० या सर्वोच्चावरून थेट ऋणात की काय! ८७ काढले तर सरासरी ० होईल. नाहीतर शून्याखाली!
-गा.पै.

Pages