आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< मी fielding चे amazing demonstration दिसणार आहे त्याबद्दल excited आहे.>> ह्या धाग्यावरची ही पहिली कॉमेंट होती असामीजींची. आज रॉयल चॅलेंजर्सनी मुख्यतः क्षेत्ररक्षणाच्या जोरावर १३० धांवांचं माफक लक्ष्य गाठण्यासाठी सनरायझर्सच्या नाकीं नऊ आणले !!

त्याला बिनधास्त सिक्स मारता बघून एक वेगळाच आनंद मिळतो!>>> एकदा वन्डे मध्येच न्युझीलंड विरुद्ध त्याने १८ की २० बॉल मध्ये ५० मारले होते. आणि एकही धोनीसारखा आडवा तिडवा गदा शॉट नाही.
तेव्हा मला अतीव आनंद झालेला. Happy

राजस्थानचा सलग दुसरा विजय Happy
राजस्थान टॉप ऑन द चार्ट
१४४ सारखा सामान्य स्कोअर मस्त डिफेंड केला बॉलर्सनी.... मागच्या वर्षीचा त्यांचा वीकनेस या वर्षी त्यांची स्ट्रेंथ ठरतीय!
कूपरने आज परत एकदा एक मस्त स्पेल टाकला Happy

<< राजस्थानचा सलग दुसरा विजय >> रहाणेही छान खेळला. कठीण परिस्थितीतून सांवरून राजस्थान जिंकला. द्रविड संघासाठी प्रेरणादायी ठरत असावा.

कोलकता वाले मुर्खा सारखे खेळले......विकेट्स तर अश्या फेकत होते जणु फक्त १०० रन्सच करायचे होते...
पठाण ला बसवा आता...अतिलाड झाले त्याचे... शमी अहमद ला घेउन काय दिवे लावले देवच जाणे बालाजी चांगली गोलंदाजी करत असताना उगाचच बसवले...
.
मॉर्गन शेवटी टिकला असता तर रिझल्ट वेगळा लागला असता कदाचीत

दोन पराभवांनंतर आज दिल्लीला विजयासाठी जीवाचं रान करावं लागणार आहे. मुंबईत सामना म्हणून आगरकरला बहुधा खेळवतीलच.[ एका 'अजित'नं मुक्ताफळं उधळलींत, ह्या अजितने दोन-चार त्रिफळे तरी उडवावेत अशी रास्त अपेक्षा ! :डोमा:] सेहवाग खेळणं व फॉर्मात येणं तर अत्यावश्यकच. पाँटींग व सचिनकडून आज तरी अपेक्षाभंग होणार नाही अशी वानखेडेवरचे मुंबैकर प्रार्थना करत असतीलच !

>>पाँटींग व सचिनकडून आज तरी अपेक्षाभंग होणार नाही अशी वानखेडेवरचे मुंबैकर प्रार्थना करत असतीलच !
कदाचित सचिनच्या यशासाठी केलेल्या प्रार्थना आणि पाँटींगच्या अपयशासाठी केलेल्या प्रार्थना नलिफाय झाल्या असतील Wink

कार्तिक मात्र जबरी खेळतोय्..धू धू धुतोय

मुंबई... कमाल फलंदाजी!

कार्तिक माझ्या फँटसी लीग टीम मध्ये आहे त्यामुळे त्याची फटकेबाजी बघताना जरा जास्तच मजा येत होती... रोहित शर्मा पण मस्त खेळला.... रायडूची छोटीशी कॅमिओ पण चांगली होती

वॉर्नर-जयवर्धने जोडीवर सगळी मदार असेल.... ते खेळले तर जरा चान्सेस आहेत अन्यथा हा दिल्लीचा सलग तिसरा पराभव असेल

ऑसम कार्तिक !

रिकीचा कॅच कसला जबरी होता ! हॅट्स ऑफ. पण रिकी जरा जास्तच मार्शलिंग करतोय. अगदी ऑसी वन डे आणि टेस्ट मध्ये इतकं मार्शलिंग करताना बघितलं नाही. टि २० च्या पैशांचा परिणाम असावा.

सचिन, रिकी व पोलार्ड याना बाजूला ठेवूनही मुंबई २००चा पल्ला जर पार करुं शकते तर हवेच कशाला ........पण जाऊंदेच तो विचार.... कार्तिक, रोहित याना बघायला का येणार होते ५०-६०,००० प्रेक्षक वानखेडेवर !!!! Wink

कार्तिक, रोहित याना बघायला का येणार होते ५०-६०,००० प्रेक्षक वानखेडेवर ! >>> हो आले असते भाऊ. सचिनचा डायहार्ड फॅन असूनही उत्तर होच येईल. नाहीतर इतर मॅचेस मध्ये लोकं बघायला आली नसती.

>>पण रिकी जरा जास्तच मार्शलिंग करतोय
अंबानीबाई आणि धोनीमध्ये झालेल हितगुज बघून टेंशन आले असेल बिचार्‍याला Wink

उन्मुक्त चंदला सिनियर्सच्या फ्रीझम्धून पेप्सी घ्यायला अजून बर्‍यापैकी अवकाश आहे असे दिसतेय!

<< हो आले असते भाऊ.>> केदारजी, सचिनचा खेळ बघायला नाही मिळाला या वैतागातूनच आली होती माझी ती कॉमेंट. Sorry, I really did not mean it.

>>हो आले असते भाऊ. .....नाहीतर इतर मॅचेस मध्ये लोकं बघायला आली नसती.
चला इतक्या जवळ मॅच आहे.....स्टेडियमच्या माहौलची मजा घेउया.... अश्या विचारातून लोक कदाचित आले असते (जसे मल्टीप्लेक्सला जातात तसेच) पण एकंदरीत व्हूवरशिपवर नक्कीच परीणाम झाला असता..
अजुनही केवळ सचिनसाठीच मुंबई इंडीयन्सला, द्रवीडसाठीच राजस्थानला, धोनीसाठीच चेन्नईला, (गेल्या सीझनपर्यंत) गांगुलीसाठीच पुण्याला सपोर्ट करणारे बरेच आहेत!
नवीन लोकांना (पक्षी: कोहली, रहाणे, पुजारा, रैना, सर जडेजा, इत्यादी) इतक्यात तो आदर, ते प्रेम मिळू शकेल असे वाटत नाही.... इथे लोक खेळाइतकेच त्या खेळाडूवर, त्याच्या इमेजवर प्रेम करतात Happy

<<इथे लोक खेळाइतकेच त्या खेळाडूवर, त्याच्या इमेजवर प्रेम करतात >>
वक्त वक्त कि बात है...

ब्रेबॉर्न्/वानखेडेवरच्या छोट्या मॅचेस तेव्हढ्याच उत्साहात बघितलेल्या - योगायोगाने अतिशय स्मरणीय ठरलेल्या आठ्वत आहेत. उदा. पांडुरंग साळगावकरने फोडलेला कालिचरणचा कान; गुलाम परकारची - डेरेक रँडोलच्या कानफटात मारेल अशी कव्हर्स मधली फिल्डींग आणि रामनाथ पारकर - जेमेतेम ५' उंचीच्या माणसाने मारलेले उत्तुंग षटकार...

मुंबई २००चा पल्ला जर पार करुं शकते तर हवेच कशाला ........
२०० चा पल्ला नि त्यांना खेळवणे याचा संबंध नाही लोक त्याला बघायला येतात. धावा किती झाल्या, कोण जिंकले ते बघायला नाही. ते असून जर लोक बक्कळ पैसे देऊन आले नाहीत तर तसा विचार करायचा. भारतात कुणाची हिंमत आहे का सचीनला नावे ठेवायची?

>>परवा कोण जिँकेल असे वाटतेय? राजस्थान की पुणे ?

आपण तरी राजस्थानला सपोर्ट करायला स्टेडीयममध्ये जाणार आहे Happy

<<आपण तरी राजस्थानला सपोर्ट करायला स्टेडीयममध्ये जाणार आहे >> द्रविडचं लक्ष नाही असं पाहून जरा पुण्यालाही प्रोत्साहन द्या हो; फारच गरज आहे त्याना त्याची !! Wink

परवा कोण जिँकेल असे वाटतेय? राजस्थान की पुणे >>> अर्थात राजस्थान. द्रविड / रहाणे असताना पुण्याच्या मनीष पांडे किंवा रॉबिनला कोण सपोर्ट देणार. Happy अर्थात युवी आहे पण त्याचे काहीतरी बिनसले आहे.

कोहली, रहाणे, पुजारा, रैना, सर जडेजा, इत्यादी) >>. अरे कोहलीला वनडेत आणि पुजाराला टेस्ट मध्ये तोच मान आहे बाबा. त्यांना बघायला नक्कीच पब्लिक येतं. सर जडेजाचं काय तो सध्या चालतोय, पण कधीही बंद पडू शकतो. कोहली, पुजारा एवढे त्याचे नाणे खणखणीत नाही. अर्थात सचिन / राहूल ह्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही पण हे दोघं त्यांच्या क्षेत्रात क्राऊड पुलर नक्कीच आहेत. तसेही वनडेत आता सचिन नाहीच, पण वनडे ची तिकिंट तेवढीच विकली जातात. गेम मोठा !

सर जडेजा

Sir Jadeja.jpg

God realised RAJNI sir is getting old so he created sir ravindra jadeja
आणि हे
Sir Jadeja once wanted to make a silt mountain to play as a kid, now we all call it Mt Everest."

धोणीचे ट्विट. Happy

स्टेडियमच्या माहौलची मजा घेउया.... अश्या विचारातून लोक कदाचित आले असते (जसे मल्टीप्लेक्सला जातात तसेच) >> अगदी अगदी... ७० ते ८०% यंगिस्तान होता... डिजेवर थिरकायला कोणाला आवडणार नाही. ५०% खेळ आणि ५०% धांगडधिंगाणा होता... असो.

काल मात्र पैसा वसूल झाला... कार्तिकचा १, रोहितचे २ आणि वॉर्नरचा १ असे तब्बत चार षटकार आकाशातून कोसळताना पहाणे ही एक पर्वणीच होती. रिकीने सूर मारुन पकडलेला झेल पाहून जॉन्टीचा उर अभिमानाने भरुन आला असेल.

>>असे तब्बत चार षटकार आकाशातून कोसळताना पहाणे ही एक पर्वणीच होती
आय होप उद्या असे बरेच षटकार वॉटसन, द्रवीड, हॉज, रहाणेच्या बॅटमधून बरसतील....
बाकी पुण्यात राहून पुण्याला सपोर्ट करण्याचा अ-पुणेरीपणा आम्ही करणार नाही Wink

पुण्याला जिंकायचे असेल तर त्यांनी गांगुलीला परत आणायचा विचार करावा
मॅथ्यूज इज वेस्ट
गांगुली कप्तान असताना किमान थोडीतरी जान होती पहील्या काही सामन्यात गेल्या वर्षी नंतर नंतर बाकीच्या खेळाडूंनी गांगुलीला साथ दिली नाही नाहीतर पुण्याचा न.बर जरा वरचा लागला असता Sad

आज पुण्याला आपल्या सपोर्टची खरी गरज आहे . आजचा मंगलमय दिवस पुण्यासाठी शुभ होवो हिच खरी सदिच्छा ! तुमच्यासारखे आम्ही इतके भाग्यवान नाही की समक्ष स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहावा पण घरी टि. व्ही सुध्दा नाही . मोबाईलवर स्कोर पाहातो , पुण्याशी एकनिष्ठ आहे !

<< आज पुण्याला आपल्या सपोर्टची खरी गरज आहे .>> ' केल्याने होत आहे रे, आधीं केलेंची पाहिजे !'; मग सपोर्ट आपोआप मिळेलच !! Wink

Pages