आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुनाफने दिला पहीला झटका.... मुनाफ आपल्या टीममध्ये आहे Happy

भाऊ,
द्रवीड उच्च माणूस आहे... स्वताला इंप्रूव्ह कसे करावे हे त्याच्याकडून शिकावे
त्याला बिनधास्त सिक्स मारता बघून एक वेगळाच आनंद मिळतो!

केदार,
थोडा धसमुसळा खेळला द्रवीड्...पण ती या फॉरमॅटची गरज आहे
त्याला अजुनही खेळताना बघायला मिळतेय यातच आनंद आहे Happy

<< पण फक्त द्रविड आणी लक्ष्मणला या २०-२० पासून दूरच ठेवलेल बर अस वाटतय .>> मला वाटतं खूपच जबाबदारीनंव संयमानं इतकींवर्षं केलं त्यानी आतांपर्यंत; आतां जरा मजाही करुं देत कीं त्याना. खरं तर सध्यां मुरली विजयला दूर ठेवायला हवं या २०-२० पासून. आज पाहिलंत ना कशी फेकली विकेट तें !

चेन्नईला हरवणे म्हणजे भारताच्या टिमला हारवणे. अर्धी टिम खेळतेय त्यांच्याकडून. Happy
आज भज्जीही चांगली टाकतोय. ओझाने दोन घेतल्या. आता धोणी / जडेजापैकी एक गेला की झाले.

धोनी आज परत एकदा मॅचविनिंग परफॉर्मन्स देणार असे दिसतेय

एक राहिलच..... रहाणेने घेतलेला जयवर्धनेचा अप्रतिम कॅच Happy
कसला जबरी होता तो... ९०च्या दशकातल्या जाँटी र्‍होडसची आठवण करुन दिली

हॅट्स ऑफ टू कॅप्टन कूल Happy
एकहाती सामना ओढतोय पठ्ठ्या.... आणि तेही किती सहज!

<< ९०च्या दशकातल्या जाँटी र्‍होडसची आठवण करुन दिली>> आज शर्माने स्लिपमधे झेल सोडला तेंव्हा मुंबई संघाबरोबर बसलेल्या जाँटीला कॉमेंटरी बॉक्समधून प्रतिक्रिया विचारायचं व टीव्हीवर दाखवायचं औचित्य साधलं गेलं ! अजूनही काय फिट आहे तो जाँटी !!

या सामन्यात मी मुंबईचा सपोर्टर असुनसुद्धा शेवटीशेवटी चेन्नई जिंकेल आणि जिंकावे असेच वाटत होते!
पोलार्डच्या जागी तिथे दुसरे कुणीजरी असते तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

आजच्या दोन्ही मॅचेस अगदी पैसावसूल झाल्या Happy

आज पुणे -पंजाब मॅचला निघालोय.
होप की कालसारखी क्लोज मॅच होईल:)

मुंबई इंडियन्स -
ग्लॅमरच्या फंदात पडत नसल्याने दिनेश कार्तिकच्या यष्टीपुढील व मागील सातत्यपूर्ण व भरीव कामगिरीचं व्हावं तेवढं कौतुक होत नाही.
मिशेल जॉन्सन मुंबईसाठी हुकमी गोलंदाज ठरणार असं वाटतंय;
पोलार्ड 'क्रायसीस सिच्युएशन्स'मधे बहरतो म्हणूनच इतर फलंदाज त्याला तशी 'सिच्युएशन' तयार करून देण्याचंच काम करत असावेत; त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला न पाठवण्यामागे हेंच कारण असावं; Wink
रोहित शर्माची 'ड्रग टेस्ट' घेवूनच त्याला खेळवावा; तो झोपेच्या गोळ्या सकाळच्या नाश्त्याबरोबरही घेत असावा; Wink
सचिन व पाँटींग यांची जोडी म्हणजे एका म्यानात दोन धारदार तलवारी ठेवण्यासारखं झालंय; ऐन लढाईत बाहेर काढायला जावं तर त्या आंतच अडकून बसताहेत ! पण पर्याय नाही; ऑसी अहंकार पाँटींगला खालच्या क्रमांकावर जावूं देणार नाही व सचिनला खालीं पाठवण्याची पाँटींगची काय बिशाद आहे !!! Wink
काल सामना संपल्यावर अंबानीमॅडम धोनीशी कौतुकाने बोलत होत्या. पाँटींगमहाशय, पुढच्या वर्षाचं मुंबईबरोबरचं काँट्रॅक्ट गृहीत धरूं नका !! Wink

सचिन आणि पाँटींग ओपनिंग ला येत आहेत तर ३ र्या नंबर वर रायडु ला पाठवावे ४ थ्यावर दिनेश कार्तिक ५ व्या वर पोलार्ड ला.....रोहित शर्माला काढुन टाकला तरी काहीही फरक पडत नाही

कसले बेक्कार खेळतीय पुणे टीम...
असे खेळल्यावर कसे या टीमला स्टेडियममध्ये जाऊन सपोर्ट करायचे?

मी राजस्थान, बंगलोर आणि दिल्ली विरुद्धच्या मॅचेसची तिकिटे काढली आहेत्....त्यातल्या पहील्या सामन्यात तर द्रवीडच्या टीमला सपोर्ट करायलाच जाणार आहे.... पण बाकीच्या दोन टीममध्ये पुण्याला सपोर्ट करायचा विचार होता!

४०-४२ वेळा विजेत्या मुंबई रणजी संघातून पुण्याला काही मदत हवी असल्यास कळवावे.. Happy

इतकी भिकार खेळली पुणे वॉरियर की माझी मलाच लाज वाटायला लागली की मी तिचा सपोर्टर आहे . निर्लज्ज कुठचे त्या टी सुमनला कशाला घेतले , हुकूमी एक्का स्टिवन स्मिथला न घेतल्याचा फटका चांगलाच बसला . क्षेत्ररक्षण अत्यंत गचाळ होते . गांगुली व रायडरची आठवण झाली आणि अलगद डोळ्यातुन पाणी आले .

क्षेत्ररक्षण अत्यंत गचाळ होते . गांगुली व रायडरची आठवण झाली आणि अलगद डोळ्यातुन पाणी आले . >> हि दोन्ही वाक्ये एकमेकांशी संबंधित नसतील अशी आशा करूया Wink

आयपीएल संघ व व त्यातले खेळाडू याचा माझ्या डोक्यात खुपच गोंधळ उडतो म्हणून मला टेंशन यायचं. पण आतां नाहीं. संगकाराला आत्तां टॉस झाल्यावर संघात कांहीं बदल आही का विचारलं गेलं तर तो म्हणाला, ' होय एक बदल आहे............. " . पण त्याला आपल्याच संघातल्या खेळाडूचंही नांव सांगता येईना !! मग माझी पामराची काय कथा !!! Wink
गेल, दिलशान व नायर लवकर बाद !! रॉयल चॅलेंजर्स धोक्यात !!!

जाउद्या ते बँगलोर धोक्यात ते ! इथे पुण्याने इज्जत मातीत घातलिए आणि यांना पडलय त्या मल्ल्या च्या टीमच !

२००

<< इथे पुण्याने इज्जत मातीत घातलिए आणि यांना पडलय त्या मल्ल्या च्या टीमच ! >> तशी आयपीएलमधे पुण्याची पत 'पानिपत' हीच आहे !!! Wink

काहीतरी उपाय सांगा की पुणे जिँकेल कारण स्मिथशी माझे जवळचे संबंध आहेत . काही टिप्स असतिल तर जरुर सांगा .

>>आज पुणे -पंजाब मॅचला निघालोय.
होप की कालसारखी क्लोज मॅच होईल:)

पहील्या काही षटकातच मॅच क्लोज झाली ना? Wink

<< RCB - गेल = Any other ordinary team>> = पुणे ?
<<...फक्त, अशा [ गेलसारख्या]एखाद्या भन्नाट खेळाडूच्या लवकर बाद होण्याने संघातल्या इतर फलंदाजांवर नकळत दबाव येत असावा व विरुद्ध संघाला स्फुरण चढत असावें , असंही जाणवतं.>> या माझ्या दि.४ एप्रिलच्या 'एक्स्पर्ट कॉमेंट'चा [ :डोमा:] इतक्या लवकर प्रत्यय येईलसं वाटलं नव्हतं.

या माझ्या दि.४ एप्रिलच्या 'एक्स्पर्ट कॉमेंट'चा [ :डोमा:] इतक्या लवकर प्रत्यय येईलसं वाटलं नव्हतं. >> अ‍ॅबे आला कि टेंशन उतरेल. सध्या ते फारच टॉप हेवी आहेत आणी ते जाणवतेय.

भिककारी आहे पुणे टीम , एक तर कार पार्क पासून २ किमी चालत जा , छत नसलेल्या स्टेडीयम मधे भर उन्हात बसा , आणी हे ३-४ च्या रन रेट ने खेळणार .
पण अगदी भिकारी पिक्चर असला तरी त्याची लायकी काढताना मजा येते तशी आली .
पब्लिकच्या कमेंट आणी त्यावरचे प्रतिसाद अफलातून होते . उदा . पुण्याच्या टीमवेळी ४-६ चे नाही तर १-२ चे पोस्टर द्यावे , समोरच्या टीमला कायम पहिली बॅटींग द्यावी म्हणजे एक तर धड इनिंग बघता येईल , वेल लेफ्ट फक्त ६च ओव्हर खेळून काढायच्या आहेत ड्रॉ साठी इत्यादी ...
अजून ४ सामन्यांची तिकीटे आहेत , नक्की जाणार , कधीतरी ६ चा रनरेट नक्की गाठेल पुणे . आणी आयपीएल १५ तर आपलीच आहे

Pages