आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रडकी बाहुली.
पॉंट्याने सचिनला मुद्दाम धावचीत केले, त्याने स्वतःहून जास्त धावा काढू नये म्हणून.
वाईट्ट आहे मेला! आम्ही नाही बघत जा त्याची फलंदाजी!
Proud

<< आम्ही नाही बघत जा त्याची फलंदाजी! >> काय हें झक्कीजी, तुम्हीच असा हट्टीपणा केल्यामुळें पाँटींग धांवला ना मागोमाग सचिनची समजूत काढायला ! Wink
<< काय कमाल माणुस आहे हा गेल >> १००% अनुमोदन !

MI continues with muddled thinking. Rayudu ahead of Pollard with 5 overs to go and RRR is above ten.

<< MI continues with muddled thinking >> त्याची किंमत मोजलीच मुंबईने ! विनयकुमारने शेवटचं षटक अप्रतिम टाकलं ! सामना रोमहर्षक.

कागदावर तरी दोन्ही टीम अगदी ताकदवान वाटताहेत . मुंबईकडे पोलार्ड सोडला तर २०-२० टाईप हिटर नाहीयेत मात्र
आणी गेल फोर्स चालला तर मग everything else is irrelevant >> Told you so Sad

बाकी गेल आणी विनय कुमार मुळे मायबोली लीग मध्ये मी पहिला Happy
प्रवाहाविरूद्ध पोहणेची नवी व्याख्या : गेल मॅचमध्ये खेळत असताना त्याला तुमच्या फँटसी टीमचा कॅप्टन न करणे Wink

<< हे कॅरेबियन अगदी निर्विकार चेहर्‍याने समोरच्या संघाची पार कत्तल करुन टाकतायत!>> स्वरुपजी, मला वाटतं ह्याचा संबंध खेळांविषयीच्या कॅरेबियन मानसिकतेतच असावा; आपल्याला ते निर्विकार वाटतात कारण मैदानावरही गंभीर, 'टेन्स' चेहरे बघायची आपल्याला संवयच झाली आहे. काल सामन्याच्या शेवटच्या चार-पांच षटकात कॅमेरा वारंवार पॅड बांधून बसलेल्या पोलार्डकडे वळत होता; बरोबर बसलेले इतर सगळे खेळाडू सिनेमात टाईमबाँबचं घड्याळ पुढे सरकताना दाखवतात तेंव्हासारखे चेहरे करून होते पण पोलार्ड पठ्ठया [ जो एकटाच खरं तर टाईमबाँबवरच बसलेला होता] एकदम रिलॅक्स्ड, हंसत बसला होता!! अशा वृत्तीचे जे निवडक खेळाडू आपल्याकडे झाले त्यांत कपील देवचा क्रमांक वरचा असावा.

भाऊ,
पाँटींगचा चेहरा बघितला का काल मॅच हारल्यावर.... फारच निराश दिसत होता!

एकीकडे विराटचा जल्लोष आणि दुसरीकडे खिन्न बसलेला पाँटींग दाखवत होते

आज आपला सपोर्ट पुण्याला.... गो मॅथ्यूज गो Happy

पुणे वॉरिअर्स 'स्टेन'गनपुढे हतबल ! १२६ धांवांत सनरायझर्सना गुंडाळूनही पराभव !! Sad
<< पाँटींगचा चेहरा बघितला का काल मॅच हारल्यावर.... फारच निराश दिसत होता! >> पराभवाच्या बाबतीत ऑसीजची पचनशक्ती कमकुवतच असते !!! Wink

आजच्या हैद्राबादच्या विजयानंतर सगळ्यात जास्त आठवण कुणाची आली असेल तर ती म्हणजे गायत्री रेड्डीची!
तिच्या बिचारीच्या नशीबात हैद्राबादला असे जिंकताना बघायची वेळ फार कमी वेळा आली Sad

"रोकी दो टकीयोंकी बाऊन्ड्री, मेरा लाखोका आय पी एल जाये"

कसे काळजाला भिडतात हे शब्द. टचकन डोळ्यातून दोन थेंब सांडले!!
Happy

>>आठवण कुणाची आली असेल तर ती म्हणजे गायत्री रेड्डीची!
कुणाचे काय तर कुणाचे काय?

बघा गांगुलीशिवाय पण पुणे हारले....ते पण दारुण हारले
म्हणजे मागच्या वर्षी पुणे तळाला होते याला गांगुली जबाबदार होता असे म्हणणार्‍यांना त्याचे उत्तर मिळाले असेल Wink

जयवर्धने काय ४थ्या परदेशी खेळाडुला विसरला आहे का............ १३ ओव्हर झाल्या बोथा ला गोलंदाजी का नाही दिली .............येडाच आहे

हुर्रे.... जिंकले राजस्थान रॉयल्स Happy

ब्रेड हॉजच्या अप्रतिम थ्रो ने वॉर्नरला केलेले रनआउट आणि कूपरने टाकलेली अप्रतिम लास्ट ओव्हर... जियो आर आर Happy

दिल्ली हारली हुर्रे..............शेवटच्या ऑव्हर्स मधे अवघे ९ रन्स पाहिजे असताना कुपर अप्रतिम गोलंदाजी केली अवघे ३ रन्स देत २ विकेट्स घेतल्या Happy

तेंडल्या गेला . मुंबईचे पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या ...
दु:खात सुख एवढेच् की पोलार्ड १० ओव्हरच्या आत आलाय खेळायला

पोलार्ड आलाय खेळायला पण बाकीचा निम्मा संघ परतला ना अरेरे >> हं
पण किमान आज पोलार्ड थोडा चांगला खेळला तर इतर मॅचेस मध्ये तरी त्याला वर पाठवतील रे.

मुंबईला सपोर्ट करण हे लिव्हरपूल ला सपोर्ट करण्यासारख आहे .
ते काही सुधरत नाहीत आणी आपण सपोर्ट करायच काही सोडत नाही Sad

मुंबईचे काही कळत नाही,एका प्लेयर भोवती रॅलि करून बाकीच्यांनी रोटेट करत राहायचे वगैरे असे काही सुचत नाही का ह्यांना ?

राजस्थानने मॅच जिंकली तरी त्यांना अजुन बॉलिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे
वॉटसन आल्यानंतर चार फॉरेन प्लेयर निवडणे त्यांच्यासाठी अवघड होणार आहे
श्रीशांतने आज एकदम अचूक बॉलिंग केली..... त्याला सलग चार ओव्हर द्यायला नको होते, त्याची एखादी तरी ओव्हर शेवटी ठेवायला हवी होती!

आयपीएलमध्ये रॉयल्सकडून खेळताना बहुतेक पहील्यांदाच द्रवीडला मॅन ऑफ द मॅच मिळाले

पोलार्ड मस्त धुतोय.... अजुनही १४० शक्य वाटतायत Happy

मुंबईचे काही कळत नाही,एका प्लेयर भोवती रॅलि करून बाकीच्यांनी रोटेट करत राहायचे वगैरे असे काही सुचत नाही का ह्यांना ? > काय तरीच काय राव असामी . Stratergy वगैरे फालतू गोष्टी नका सांगू आम्हाला . १० इंटरनॅशनल प्लेअर घेऊन खेळतोय आम्ही . आपोआपच जिंकायला पाहिजे

अरेच्चा, आजच्या द्रविडच्या खेळीबद्दल कुणीच बोललं नाही ! खरंच चांगला खेळला व मुख्य म्हणजे खेळाचा मनसोक्त आनंद घेतोय असं जाणवलं [ जो बिचार्‍याला कधीच घेऊं दिला गेला नाही त्याच्या दीर्घ कारकिर्दीत ] !!!
मुंबईच्या संघात बडी धेंड असूनही तो धडाडीचा संघ आहे असं मला तरी कां कुणास ठाउक वाटतच नाही. कदाचित टी-२० साठी जो बिनधास्तपणाही असावाच लागतो तो संघात बडी धेंड असल्यामुळेच निषिद्ध मानला जात असावा. पोलार्ड याला जन्मजातच अपवाद आहे हें अर्थात आलंच !!

भाऊ , द्रविड चांगला खेळला . पण अनेक मिसटाईम शॉट्स आणी गावठी फटकेही खेळला .
का कुणास ठाऊक पण फक्त द्रविड आणी लक्ष्मणला या २०-२० पासून दूरच ठेवलेल बर अस वाटतय .
हे म्हणजे भीमसेनजीना हम्मा हम्मा गायला लावल्यासारख वाटतय Happy

१४८....आता जरा होप आहेत मुंबईला
चेन्नईची सखोल फलंदाजी पाहता २-३ विकेटस लवकर पडल्याच पाहिजेत.... मिसिंग मलिंगा

भाऊ,
द्रवीडबद्द्ल काय बोलायचे? सगळ्या टिकाकारांची तोंडे बंद केलीत त्याने Happy

Pages