आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< दिल्ली गाळात जाणार बहुतेक >> गेलीच बहुतेक ! सेहवाग नाही, पीटर्सन नाही, रायडर नाही; एकटा कप्तान काय करणार !!

मला हा नरैन मात्र खूपच 'इंटरेस्टींग कॅरेक्टर' वाटतो. 'रिअली अ कूल गाय' !! गेल्या वर्षीं ह्याने सचिनची विकेट घेतली तर सगळे सहकारी नाचत होते; पण हा ? 'हें काय रोजचंच, विशेष तें काय', अशा थाटात होता ! पण त्यांत मग्रूरीचा लवलेश नाही; जबरी आत्मविश्वास व तटस्थता याचं अजब मिश्रण वाटतो तो ! आज डी.डी.चे चार बळी , एक धांवचीत . चेहर्‍यावरून ह्याच्या पत्ताही नाही लागत या कामगिरीचा. त्यांतच यंदा केसाची स्टाईलही करून आलाय. पण त्याचंही अप्रूप नाही ! पण, टॉप क्लास स्पीनर आहे हें मानलं !

खरच भाऊ.... जबरी आहे हा सुनील नारायण

हारले एकदाचे दिल्ली Sad
बोथाला एक ओव्हर आधी आणायला पाहिजे होते बॉलिंगला....पठाण फक्त दोनच ओव्हर्स?

म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण .... खान सोकावतो !!!>>> ह्म्म...

दिल्लीवाल्यांजी कायतरी गडबड झालीये एवढं निश्चित, अधेमधे ते अगदीच क्लूलेस खेळल्यासारखे वाटले.

<< करबो लोरबो जीतबो रे !!! >> मुंबईचा जवाब- ' केल्याने होत आहे रे, आधी केलेंची पाहिजे !' हा सचिनचा मराठी बाणा ! आज मुंबईची भवानी !!! Wink

जिंकलो.................हुर्रे............. ढिंचांग ढिचांग..............
.
.
कालचे स्पर्धेचे काही विशेष
.
पहिला बॉलः ब्रेट ली
पहिली विकेट घेतली: ब्रेट ली
पहिला चौकार लागला : ब्रेट ली
पहिला षटकार लागला: ब्रेट ली
पहिली निर्धाव ओव्हर : इरफान पठाण

<< अधेमधे ते अगदीच क्लूलेस खेळल्यासारखे वाटले.>> मला वाटतं सेहवाग, पीटर्सन व रायडर यांच्यावर मदार असलेल्या दिल्लीचा त्यांच्या गैरहजेरीने सामना सुरूं होण्याआधींच अवसानघात केला होता. त्यांतच ब्रेट लीने घेतलेल्या पहिल्याच अफलातून विकेटने दिल्लीकर धास्तावलेच. नरैन निर्विकार चेहर्‍याने टाकत असलेल्या फिरकीचा तर दिल्लीकराना अंदाजच येत नव्हता. शिवाय, के.के.ने झेल पकडण्यात कुठेच कुचराई केली नाही [बहुतेक झेल 'डाईव्ह' मारून घेतलेले !]. ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम दिल्ली 'क्ल्यूलेस' होण्यात झाला असावा !

नरैन निर्विकार चेहर्‍याने टाकत असलेल्या फिरकीचा तर दिल्लीकराना अंदाजच येत नव्हता<<<< हे मात्र खरे. कसला अचाट आहे तो नरैन. Happy

सेहवागने कसलंतरी डायेट करून मागच्या महिन्याभरामधे सात किलो उतरवलेत म्हणे...

<< सेहवागने कसलंतरी डायेट करून मागच्या महिन्याभरामधे सात किलो उतरवलेत म्हणे...>> 'कसलंतरी' कशाला, त्याचं धांवांचं डायेटच त्या बिचार्‍याचं वजन घटवतंय !!! Sad

हो , नो मलिंगा .
कागदावर तरी दोन्ही टीम अगदी ताकदवान वाटताहेत . मुंबईकडे पोलार्ड सोडला तर २०-२० टाईप हिटर नाहीयेत मात्र
आणी गेल फोर्स चालला तर मग everything else is irrelevant

<< मुंबईकडे पोलार्ड सोडला तर २०-२० टाईप हिटर नाहीयेत मात्र >> सचिन कर्णधार असताना तो पोलार्डवर खूपच विश्वास दाखवायचा व पोलार्डचा प्रतिसादही तसाच असायचा. पाँटींग त्याला कसा हाताळतो यावरही खूपसं अवलंबून आहे, असं आपलं मला उगीचच वाटत रहातं.
<< आणी गेल फोर्स चालला तर मग everything else is irrelevant >> अगदीं खरंय. फक्त, अशा एखाद्या भन्नाट खेळाडूच्या लवकर बाद होण्याने संघातल्या इतर फलंदाजांवर नकळत दबाव येत असावा व विरुद्ध संघाला स्फुरण चढत असावें , असंही जाणवतं.
या स्पर्धेतील न चुकवण्याच्या सामन्यांतील आजचा अग्रेसर सामना !

इथे सगळेच खानाच्या विरोधात दिसातायत! >>> सगळे नाही .
करबो लोरबो जीतबो रे !!!

+७८६
आयपीएलमधील आपला फेवरेट खेळाडू बोले तो शारुख .. Wink

गंभीर पुन्हा एकदा आयपीएलचा आपला स्पेशल फॉर्म घेऊन आलाय.
नारायण तर ट्रंप कार्ड आहे आणि पहिल्याच सामन्यात सुरू झालाय.. गंभीर त्याच्या ओवर जसे वापरतो नेहमी ते काबिलेतारीफच..
कलिस सारखे खेळाडू आपले नाव नेहमीच राखतात..
बाकी चुकून तो पठाणांचा युसुफ रंगात आला तर देऊनच टाका कप आम्हाला..

आज मुंबईची मॅच. पंटर कर्णधार. पंटर खेळाडू म्हणून खूपच उच्च असला तरी तो कर्णधार म्हणून मला फारसा आवडला नाही. रडीचा डाव खेळतो (हे माझे मत). तशी बरीच उदाहरणेही आहेत. अभिनय करण्यात पटाईत (आठवा: विश्वचषक २०११, गौतम गंभीरचा झेल घेतल्याचा अभिनय).
मुंबईच्या सामन्यात असले काही न करो ही अपेक्षा.
Best of Luck Mumbai

<< Best of Luck Mumbai >> +१.
आयपीएलच्या गेल्या पर्वात फलंदाजीत मुंबैचे सलामीसाठी म्हणे प्रयोगच चालले होते; आठ जोड्या लावून झाल्या होत्या ! यंदा पाहूं सचिनला कोण जोडीदार येतो कीं सचिनच मधल्या फळीत येतो !! पण सचिन- पाँटींग जोडी रंगली तर जगातले दोन सर्वोत्तम फलंदाज एकत्र फलंदाजी करताना पहाण्याचा दुर्मिळ योग येईल, हें मात्र खरं !!!
<<......युसुफ रंगात आला तर देऊनच टाका कप आम्हाला..>> मग बाकीचे संघ आलेत ते काय दोन महिने बशा चाटायला कीं उठाबशा काढायला !! Wink

>>बुमराह किस चिडीया का नाम है
बुमरँग ला विचारा Proud

बाकी त्याला बघून आफ्रिकेचा पॉल अ‍ॅडम्स आठवला Wink

बुमराह ने मयांक अग्रवाल ला मात्र गुमराह करून परत पाठवले. कसला मठ्ठ शॉट होता तो. गेलच्या जेल ब्रेक ची वेळ आलेली आहे.

काय कमाल माणूस आहे हा गेल?
काल सुनील नारायण, आज गेल.... हे कॅरेबियन अगदी निर्विकार चेहर्‍याने समोरच्या संघाची पार कत्तल करुन टाकतायत!

Pages