Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथले posts वाचुन सेसा तेल
इथले posts वाचुन सेसा तेल आणले आणि केसांचे गळणे अगदी कमी निम्म्यापेक्षा कमी वाटतेय. झोप पण छान लागतेय अस वाटतय. खाण्यात proteins चे प्रमाण वाढवले आहे. Thank you girls.
फेक हायलाईट्स ना अमेरिकेत
फेक हायलाईट्स ना अमेरिकेत टिनसेल म्हणतात. माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला सर्वांना करून दिले होते. माझ्या लेकीने निळे आणि सिल्व्हर केले होते. मस्त दिसतात. केस वाढले की ते सैल होऊन पडतात किंवा सोडवून काढून टाकता येतात. लहान मुलींना कोणतेतरी अपायकारक रंग लावण्यापेक्षा असे हायलाईट्स मस्त.
Hair Tinsel is tied into the hair, no glue or clips needed. With care, they can last several weeks, even through washing, drying, and flat ironing. Professional sylists and body artists who apply hair tinsel for their clients may charge anwhere from $2 - $4 per strand. Most people like to have anywhere from 6 - 10 strands attached.
छे हे इथे मिळतात ते क्लिपॉन
छे हे इथे मिळतात ते क्लिपॉन आहेत. त्या त्या टक्टक क्लिप्स असतात ना तश्या एकदम छोट्या क्लिपवर बसवलेले. केसाची एक बट घेऊन त्यावर क्लिप बसवायची की झाली ती बट रंगीत. कंटाळा आला की टक!... रंग गायब, चले गयेच्छे, इटस गॉन!
नीधप +१. मी आधी लिहिलं तसं
नीधप +१.
मी आधी लिहिलं तसं संध्याकाळी लावले, रात्री झोपायच्या आधी काढून ठेवले इतकं सोपं प्रकरण आहे.
धनश्री म्हणतेय तसं टिन्सेल (नाव आत्ताच समजलं) कॉलेजातल्या एका मुलीने केलं होतं. तिने जुहूच्या कुठल्याशा पार्लरमधून एक्समेन मधल्या मुलीसारखी एक बट चंदेरी केली होती. वर्गातल्या इतर मुली तिला दादीअम्मा म्हणून चिडवायच्या
माझ्या १० महिन्याच्या मुलाला
माझ्या १० महिन्याच्या मुलाला डोक्यात एकाच ठि़काणी पांढरे खवल्यासारखे काहीतरी दिसते. हाताने चोळले तर कोंडा बाहेर पडतो. इतक्या लहान बाळाला कोंडा होऊ शकतो का? आणि तोही असा एकाच ठिकाणी?
कापूर लावू शकते का त्याला?
अंजली_१२ , प्लीज त्याला
अंजली_१२ , प्लीज त्याला पेडीअॅट्रिशियनच्या सल्ल्याशिवाय काही लावू नका .
स्केली स्काल्प आहे बहुतेक
स्केली स्काल्प आहे बहुतेक तुमच्या मुलाची. माझ्या मुलाची पण होती. आंघोळ घालायच्या १०-१५ मिन आधी केसांमध्ये बेबी मॉइश्चरायझर लावून ठेवत जा. आंघोळीच्या २ मिन. आधी बेबी ब्रशने हलक्या हाताने विंचरले की कोंडा/स्केल्स सुटे होतात. मग त्याचा जो काही साबण/शाम्पु असेल त्याने स्वच्छ धुवून टाकायचे. असे केल्याने हळु हळु कमी होतो तो कोंडा.
स्केली स्काल्प बद्दल खात्री करुन घेण्यासाठी त्याच्या पेडिला विचारालच.
अर्र माझी पोस्ट यायच्या आधी
अर्र माझी पोस्ट यायच्या आधी मेधाने अगदीच ठणकावले की
बरं मग आधी पेडिला विचारा तुमच्या.
बरं बरं पेडीलाच
बरं बरं पेडीलाच विचारते
सिंड्रेला तुझी इथली आधीची पोस्ट वाचली होती. फक्त मी त्याला मॉइश्चरायजर च्या ऐवजी खोबरेल तेल लावून केस विंचरत होते.
माझे केसमध्ये चाइ झलि अहे
माझे केसमध्ये चाइ झलि अहे क्रुपय उअपय सन्ग
माझे केस फार गळत आहे,
माझे केस फार गळत आहे, माथ्यावर चाई झालि आहे, केस नाहि येत आहे त्याभागावर
निल८५, एकदम सोपा उपाय आहे. या
निल८५,
एकदम सोपा उपाय आहे.
या धाग्यावरील सर्व प्रतिसाद, अगदी पहिल्या पानापासून व्यवस्थित वाचा. केस गळतीवर जे उपाय लिहीलेत त्यांची यादी करा. त्यातील कोणत्या उपायाबद्दल तुमच्या काय शंका आहेत ते सविस्तर लिहा, जसे - उपाय १ - अमुक तमुक
शंका - अशी तशी
- उपाय २ - अमके तमके
शंका - असे तसे
यामुळे तुमच्या नेमक्या शंकांना उत्तर देण्याचा इथल्या वाचकांना प्रयत्न करता येईल व एखादा नवीन उपाय असेल तर तो लिहिता येईल.
टाळूवरचे केस फारच पातळ झाले
टाळूवरचे केस फारच पातळ झाले आहेत, तेल लावले की फारच पातळ दिसतात.
काही उपाय आहे का?
सेसा तेल लावुन पाहिले एक वर्श काहिच फरक नाहि पडत आहे
२) होमेओपथि पन २ वर्श घेत्ल्या पन कहि फरक नाहि
Please tell me about pathcy
Please tell me about pathcy hair loss
i had taken treatment of homeopathic 1 year
after that with consulatation of dermitalogist i had taken vitamin tablet & minioxydyl gromo 10 % & 2 % treatment & ketozone shampoo for treatment for to avoid infection of patchy hair loss where skin is dead & itching too much is get control but loss of permanant hair in that region
Please suggest me the valuable guidance
I had read all pages but please suggest me what to do or else suggest which treatment i should follow or suggest me a good dermatologist from nasik
I had nearabout taken tratment of dermatologist of vitamin as well as lotion treatment of seboria
but after discontinue on patchy area skin is get hard & flakes are came in that area like dead skin & itching on that area after scratching there red skin is occured & dead skin is get removed out but hairs are not coming on that area
Please consult me to avoid this problem of scalp skin
कुपया सांगा
कुपया सांगा
नील, नाशिक मधे सुनिल वर्तक
नील, नाशिक मधे सुनिल वर्तक म्हणून आहेत. उत्तम आहेत.
Address, Skin Clinic, 18 Dehabanu Complex, Near Bytco Point, Nasik ...
Dr Suneel Vartak, Yash Society's – Sujata Birla Hospital & Medical Research Centre, Opposite Bytco College, Nashik – Pune Road, Nashik
असे दोन पत्ते नेटवर सापडले.
मि त्याच्याकडेच Treatment घेत
मि त्याच्याकडेच Treatment घेत आहे from last one year not any good response
निल ८५ चाई वरती एक हमखास
निल ८५
चाई वरती एक हमखास खात्रीचा आणि बहुगुणी उपाय आहे..
आयुर्वेदिक दुकानात जयपाळ बी नावाचे एक बी मिळते छोटीशी,साधारण एरंडाची बी असते ना तशी दिसते ती.
ती आणून सहाण किंवा दगडावर ते बी दोन तीन चमचे पाण्यात उगाळावे, उगाळून चांगले चमचाभर गंध होईल एवढे असावे, आणि तो लेप चाईच्या भागावर लावावा, पूर्ण सुकू द्यावा.सुकून घट्ट होईल, त्या भागास पाणी लावू नये.
कदाचित तिथे आग होण्याची शक्यता आहे..सहन करावे लागेल. थोडक्यात तिथे थोडे जखमेसारखे होईल पण नंतर त्यावर खपली धरेल मग जखम सुकली की पंधरा दिवसात केस उगवायला सुरुवात होईल.
मात्र बी उगाळताना काळजी घ्या..ते हात इतर कुठेही लागू नयेत...
इतकं सविस्तर लिहितेय कारण हे पाहिलेले आहे. आणि आयुर्वेदिक डॉ नेच सांगितले होते.
हा माझा हेअर पॅक. रेग्युलर
हा माझा हेअर पॅक. रेग्युलर केला गेला तर खूप उपयोग होईल.
हाताशी वेळ असेल तेव्हा करून बघा.
एक चमचा मेथ्या रात्री भिजत घालायची.
त्या भिजलेल्या मेथ्या (भिजवलेल्या पाण्यासहित), एक ते दीड वाटी नारळाचे दूध, नागरमोथा, जटामांसी, गवलाकचरा, ब्राह्मी, आमलकी, मंजिष्ठ, माका आणि मेंदी सर्व एकेक चमचा
असं सगळं चांगलं घोटून मिक्स करायचं. गरजेप्रमाणे पाणी/ नारळाचे सेकंडरी दूध (एकदा चोथा पिळून झाल्यावर परत तो पाणी घालून मिक्सरमधून काढले की जे पातळ ना दू मिळते ते) घालायचे.
केसाला मेंदी लावताना जी कन्सिस्टन्सी तयार करतो तीच करायची.
एकेका बटेला डोक्यापासून केसाच्या टोकापर्यंत लावायचे. अर्धा-पाऊण तास ठेवायचे आणि नुसत्या पाण्याने धुवून टाकायचे.
रात्री डोक्याला तेल. दुसर्या दिवशी सकाळी माइल्ड शांपू.
मस्त होतात केस.
मेथ्या वाटायच्या नाहीत का?
मेथ्या वाटायच्या नाहीत का?
वाटल्या तरी चालतील. मी
वाटल्या तरी चालतील. मी शॉर्टकट मारला.
बाकी सगळे जे मिसळायचे आहेत
बाकी सगळे जे मिसळायचे आहेत त्या गोष्टी पावडरीच्या स्वरुपात बाहेर विकत मिळतात की त्या घरीच त्याची पुड केली?
.
.
सुनिधी, पावडरी मिळतात
सुनिधी, पावडरी मिळतात आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात.
तुळशीबागेत मागच्या बाजूला काष्ठौषधीची दुकानं आहेत तिथे किंवा मुंबईत दादरला रानडे रोडवर एक दुकान आहे तिथे नाहीतर पार्ल्यात हनुमान रोडवर अतुल मेडिकल.
या ठिकाणी खात्रीशीर वस्तू मिळतील.
नी दी.....मला गवलाकचरा,आमलकी
नी दी.....मला गवलाकचरा,आमलकी मिळाले नाही...ते न वापरता केलं तरी चालेल का??
न चालायला काय झालं!
न चालायला काय झालं!
ओके....थॅंक्यु... सन्डे टू
ओके....थॅंक्यु...
सन्डे टू सन्डे करता येइल.....
माझे केस लांब आहेत आणि वाढ पण
माझे केस लांब आहेत आणि वाढ पण बर्यापैकी आहे... पण खूप कोरडे आहेत आणि गळत पण आहेत... वरती कुणीतरी सेसाचे तेल सांगितले आहे. ते पुण्यात कुठे मिळेल? का कुठल्याही मेडिकल शॉपमधे मिळू शकेल?
तसेच हर्बल शांपू कुठला चांगला आहे? मला बरेच दिवस फ्रुक्टीस चालायचा.. पण आता त्याने केस गळतात...
मस्तच नीधप मी नक्की करुन
मस्तच नीधप
मी नक्की करुन पाहेन..सगळ घरी पडिक आहे..फक्त वापराय्चा उत्साह आनि वेळेच गणित जमत नाही.....
उन्हाळ्यात तर हा लेप मस्त्च राहिन...
आमलकी म्हण्जे आवळ्याच काही असत का ???? की वनस्पती च पुर्ण वेगळी आहे ?????
मला सांगा कोणीतरी... ह्या तयार पावडरी ६ महिन्यापर्यंत टिकु शकतात न... म्हण्जे त्या वापरायला काही हरकत नसावी... नाहीतरी मग नविन आणाव्या लागतील
हेमांगी सेसा तेल कुठल्याही
हेमांगी
सेसा तेल कुठल्याही मेडिकल शॉप मधे मिळेल... माझा स्वतःचा सेसा चा अनुभव फारसा चांगला नाही पण... सुरुवातीला केस गळणे बंद झाले... वाढल्यासारखे वाटले... थोड्या दिवसांनी परत जैसे थे.. आनि पावसाळ्या मधे तर केसगळती थांबवण्यासाठी पोटातुन औषध घेण मस्ट
हर्बल शॉम्पु >>>>> अयुर चा आमला + शिकेकाई वाला चांगला आहे
Pages