Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योगिता, होमिओपथीमधे चाईवर
योगिता, होमिओपथीमधे चाईवर लावायचं रामबाण औषध आहे. माझ्या केसात २ वेळा चाई झाली होती. त्या औषधाने पूर्ण गेली. तेव्हा, एखाद्या चांगल्या होमिओपथी डॉक्टरला दाखवा.
जमालगोटा उगाळून लावण्याचा उपाय मी पण केला होता. मला उपयोग झाला नाही. उलट त्याची रिअॅक्शन येऊन मानेवर एका बाजूला आणि संपूर्ण कानावर बेक्कार पुरळ उठून ३-४ दिवस आग-आग झाली
<<<अस ऐकल आहे पण उकळत्या
<<<अस ऐकल आहे पण उकळत्या पाण्याचा टॉवेल हातात कसा घेणार? >>> मयुरी पाणी अगदिच उकळवायच नाही... साधारण केसाच्या त्वचेला सोसवेल ईतपत गरम करायचे. टॉवेलची दोन्ही टोके हातात धरायची आणि मधला भाग पाण्यात बुडवायचा, कपडे ज्याप्रमाणे पिळतो त्याप्रमाणे थोडा पिळायचा, एकदम घट्टही नाही , किंवा एकदम ओलाही नाही. मग टॉवेल तसाच केसाच्या त्वचेवर ( म्हणजे तेल लावतान ज्याप्रमाणे थोडे थोडे केस बाजुला करतो त्याप्रमाणे )ठेवायचा, किंवा मोकळा करून केसांवर गुंडाळायचा. अस साधारण ५ ते ६ वेळा करायचे. मध्यंतरी पाणी जर कोमट झाले तर परत पाणी गरम करायचे.
thank u juyee अग पण किति वेळ
thank u juyee
अग पण किति वेळ ठेवायच?
कोरफडीला मधे एक चिर देउन ती
कोरफडीला मधे एक चिर देउन ती उघडायची आणि सालाच्या बाजुने हातात पकडुन डोक्यावर घासायची त्याने,
१. हात चिकट होत नाही
२. सगळा गर थेट त्वचेला लागतो
३. डोक्याला मसाज होतो.
पण...... आधी मनःस्विनी सांगितल्या प्रमाणे
पाने असतील तर तुला नेमका तो सफेद transfparent असा गर नीट जमायला पाहिजे काढायला. तो कडेचा दुसरा चिकट चीक नाही चांगला.
confuse.........

मयुरी ... अग साधारण १ ते २
मयुरी ... अग साधारण १ ते २ मिनिटे ठेवायच..
लहानपणी मी असे ऐकले होते का
लहानपणी मी असे ऐकले होते का कुठेतरी वाचले होते की परफ्युम्स, अत्तरे इत्यादींमध्ये सुगंधासाठी जी रसायने वापरली असतात, त्यांचा केसांवार वाईट परीणाम होते. केस सफेद होतात. हीच रसायने सुगंधी तेलांतही वापरली असतात म्हणे. ते मनात इतके फिट्ट बसले आहे की वाटिका, पॅराशूट जस्मिन इ. हल्लीची सुवासिक तेले केसांना लावायला नको वाटते. त्यामुळे घरात नवर्यासाठी वाटिका आणि माझ्यासाठी साधे पॅराशूट खोबरेल तेल आणावे लागते. ह्या माहितीत काही तथ्य आहे का खरेच?
(माझ्या लहानपणी दिवाळीत आई साध्या खोबरेल तेलात थोडे अत्तर स्प्रे करून ते तेल चेहरा, केस व हाता-पायाला चोळून मग आम्हाला अभ्यंग स्नानाला पाठवायची. वरील माहिती कळल्यापासून मी आईकडून ते तेल फक्त चेहरा आणि हाता-पायाला चोळून घ्यायचे. केसांना तिच्या त्या तेलाचा हातही लागू द्यायचे नाही मी! तसेच भुवयांचे केसही सफेद झाले तर, ही ही एक भीती होतीच!)
मला कोणी सांगेल का...
मला कोणी सांगेल का... केसांसाठी प्रोटीनयुक्त कंडीशनर वापरायचे असल्यास कोणते वापरावे.
जास्वंद जेल कंडिशनरसाठी उत्तम आहेच , पण एखाद्या चांगल्या कंपनीचा कंडिशनर वापरायचा असल्यास कुठला?
अरे मला सांगा की मुलीसाठी
अरे मला सांगा की मुलीसाठी शाम्पु एखादा
मागे कुणीतरि
मागे कुणीतरि सांगितल्याप्रमाणे कोरफडिच्या पानाला चिर देऊन त्यात मेथिचे दाणे रविवारि पेरले पण आता त्यांना मोड येण्याऐवजि बुरशी येते आहे.
कोणी केसांचा TRESemme
कोणी केसांचा TRESemme Shampoo वापरला आहे का ?
अजून .. माझे केस तसे लांब आहेत, पण टाळूवरचे केस फारच पातळ झाले आहेत, तेल लावले की फारच पातळ दिसतात.
काही उपाय आहे का?
अरे मला सांगा की मुलीसाठी
अरे मला सांगा की मुलीसाठी शाम्पु एखादा> सस्मित माझी ताई मुलासाठी हिमालया बेबी शॅम्पू वापरते कारण त्याला johnson सूट होत नाही. तो शॅम्पू ती एक्दम माईल्ड करून लावते. हिमालया चा लहान मुलांसाठी लिक्विड सोप पण चागंला आहे.
मला कोणी सांगेल का... केसांसाठी प्रोटीनयुक्त कंडीशनर वापरायचे असल्यास कोणते वापरावे.
>> हिमालया चे कंडीशनर मी वापरते. चांगले आहे.
सामी लेक ८ वर्षाची आहे ग.
सामी लेक ८ वर्षाची आहे ग.
केसन्वर खुप चान्ग्ल उपाय आहे.
केसन्वर खुप चान्ग्ल उपाय आहे.
सस्मित माझा एक कलिग पण ६
सस्मित माझा एक कलिग पण ६ वर्षाच्या मुलीसाठी हिमालया बेबी शॅम्पू वापरतो.
इव्हन मी ही माझे केस खूप गळायचे तेव्हा माईल्ड म्हणून बेबी शॅम्पू वापरायला सुरुवात केली खूप फरक पडला.
थॅक्स सामी वापरुन बघते
थॅक्स सामी वापरुन बघते
माझी ६ वर्षाची लेक आठवड्यातुन
माझी ६ वर्षाची लेक आठवड्यातुन ३ दिवस स्विमींगल जाते..पाण्यात उतरण्याआधी कंडिशनर / तेल लावतेच, दर आठवड्याला एकदा बादाम तेल + ऑ ऑ ने मसाज करते. तिच्या केसांचा पोत चांगला आहे पण पुर्वीचा काळाभोर रंग जातोय आणी काहि केस तर चक्क सोनेरी झालेत. थोडे दिवस स्विमींग बंद करावे का? केसांचा रंग पुन्हा नीट होण्यासाठी काय करता येईल..
सोनपरी, नक्की माहिती नाही पण
सोनपरी, नक्की माहिती नाही पण माझ्या मैत्रिणीनी सांगितले की ती पण olive oil वापरायची पण त्यामुळे तिचे केस पांढरे होऊ लागले असे ती म्हणाली व तिने लगेच ते वापरणे बंद केले.
कोणी केसांचा TRESemme Shampoo
कोणी केसांचा TRESemme Shampoo वापरला आहे का ?>>>>> हो मी वापरतेय सध्या. चांगला वाटतोय.
ओह.. olive oil बंद करुन बघते.
ओह.. olive oil बंद करुन बघते. तिचे केस कोरडे आहेत त्यामुळे रोज बोटभर तेल लावावेच लागते. तिला पोहायला खुप आवडते त्यामुळे स्विमींग बंद करायला ती तयार नव्हतीच. धन्यवाद सुनिधी.
पुण्याला होमिओपथी औषधे मिळतात
पुण्याला होमिओपथी औषधे मिळतात त्या दुकानामधे अर्निकेश म्हणून तेल मिळते. अर्धीच बाटली तेल असते त्यात खोबरेल किंवा तिळाचे तेल आपण घालायचे. खोबरेल तेल बेस्ट.
स्काउट ग्राउंडकडून सरळ बाजीराव रोडकडे यायचे, रोड क्रॉस करून लगेच डाव्या बाजूला बघायचे. व्ही एम जोगचं दुकान आहे होमिओपथी औषधांचं. तिथे नक्की मिळते.
उत्तम तेल आहे. केस धुवायच्या आदल्या रात्री लावायचे. अशी शांत झोप लागते की क्या कहने!
थोडे जास्त चिकट आहे मात्र त्यामुळे बदाम तेल किंवा पॅराशूटचे नो चिपचिप जस्मिन फ्रेग्रंस खो ते यांची सवय असेल तर वेगळे वाटेल.
माजि friend chi sister आहे
माजि friend chi sister आहे २रि ला तिला कोन्ता Shampoo वाप्रावा क्रुपा करुन माला सान्गा?
>> अशी शांत झोप लागते की क्या
>> अशी शांत झोप लागते की क्या कहने! स्मित
नीधप, केस कसे होतात पण? I mean फक्त डोके शांत करण्यासाठी आहे की केस पण चांगले होतात?
होतात की चांगले.
होतात की चांगले.
हेअर स्पा बद्द्ल सांगा
हेअर स्पा बद्द्ल सांगा कोणीतरी.. फायदा होतो का? ़
हेअर स्पा खात्रिच्या सलून मधे
हेअर स्पा खात्रिच्या सलून मधे केला तर परिणाम चांगले दिसुन येतात...घरच्या घरी स्पा करु शकतो का हे मला पण जाणुन घ्याय्ला आवडेल....
हेअर स्पा खात्रिच्या सलून मधे
हेअर स्पा खात्रिच्या सलून मधे केला तर परिणाम चांगले दिसुन येतात...घरच्या घरी स्पा करु शकतो का हे मला पण जाणुन घ्याय्ला आवडेल....
मला पार्लर मध्ये स्पा साठी इतका वेळ मिळत नाही. म्हणून मी Loreal cream bath आणि Ampules
आणल्या आहेत.पार्लरवालीला विचारले की कसे वापरू? आता उद्याची सुट्टी ह्या कामाला लावणार आहे.
बघू काय होतंय
तुम्ही स्वतःची स्वतः मेंदी
तुम्ही स्वतःची स्वतः मेंदी लावलीयेत केसांना? तेव्हा कसे हात मस्त दुखून येतात. मोठे केस असतील तर अजूनच.. तेच होते. खूप वेळ लागतो.
प्लस केस धुवून टाकताना बाथरूमची फरशी इतकी बुळबुळीत होते की त्यानंतर पहिले भरपूर पणी टाकून खराट्याने बाथरूमची फरशी घासून काढायला लागते. अन्यथा कोणीतरी किंवा तुम्ही स्वत:च घसरून पडणार नक्की.
तुम्ही स्वतःची स्वतः मेंदी
तुम्ही स्वतःची स्वतः मेंदी लावलीयेत केसांना? तेव्हा कसे हात मस्त दुखून येतात. >> हो हो.. पहिल्या २-४ वेळेस अगदी रग लागते.. पण सवय झाली की नाही दुखत
मग कर स्वतःचे स्वतः... पण
मग कर स्वतःचे स्वतः...
पण पार्लरमधे जाऊन हेअर स्पा करून घेण्यातला जो कम्फर्ट, रिलॅक्सेशनचा भाग आहे तो इथे झिरो होऊन जातो. कटकटच आहे.
अरे बापरे! आणि धन्यवाद पण आता
अरे बापरे!
आणि धन्यवाद
पण आता आणले आहे हे सगळ. वापरावे तर लागणारच . तू हे products कसे वापरतेस ?
Pages