Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या ऑफीसमधल्या कलीगच्या
माझ्या ऑफीसमधल्या कलीगच्या भरपुर उवा झाल्या आहेत.तिच्यापासुन बहुतेक मला बाधा झाली आहे.वॉश रुममध्ये सगळीकडे पडलेल्या असतात.काय करावे तिला मी दोन वेळा सांगितले काय करावे?
माझे केस सध्या खूप गळत आहेत
माझे केस सध्या खूप गळत आहेत आणि एक-दीड वर्षात खूप पिकले आहेत. इथे दिलेले खूप उपाय करून बघितले पण फरक नाही पडला. मला आमच्या फॅमीली डॉक्टरांनी follihair या गोळ्या घ्यायला दिल्या आहेत. कुणी येथे घेतल्या आहेत का?
सामी, मलाही केसगळती व पिकणे
सामी,
मलाही केसगळती व पिकणे यावर follihair च्या गोळ्या दिल्या आहेत. आता १ महिना झाला. डॉ म्हणाले ३-४ महिने लागतील रिझल्ट दिसायला.
आभारी आहे गमभन. काही फरक
आभारी आहे गमभन. काही फरक वाटतोय का?
अजुन विशेष फरक नाही जाणवला.
अजुन विशेष फरक नाही जाणवला.
माझे केस सध्या खूप गळत आहेत
माझे केस सध्या खूप गळत आहेत आणि एक-दीड वर्षात खूप पिकले आहेत - सेम प्रॉब्लेम. कोणीतरी चांगला डॉक्टर सुचवा . मी पुण्यात राहते.
माझ्या ऑफीसमधल्या कलीगच्या
माझ्या ऑफीसमधल्या कलीगच्या भरपुर उवा झाल्या आहेत.तिच्यापासुन बहुतेक मला बाधा झाली आहे.वॉश रुममध्ये सगळीकडे पडलेल्या असतात.काय करावे तिला मी दोन वेळा सांगितले काय करावे?
बापरे एवढ्या उवा? तिच्या अंगाखांद्यावरही बागडत असणार मग उवा? ह्या बाईसाहेब कुठल्या देशीच्या आहेत? त्यांच्यात आंघोळ वगैरे करायची पद्धत आहे ना?
नुसते सांगुन भागणार नाही, तिला लायसिलच्या दोन बाटल्या भेट म्हणुन द्या आणि लगेच वापरायला सांगा.
ग्रेनिल वापरुन केस पांढरे व्हायला लागतील असे मला वाटत नाही तरीही कशाची काय रिअॅक्शन होईल ते सांगता येणार नाही.
माझ्या वडलांनी आयुष्यात फक्त एकदाच केस काळे करुन घेतले होते. त्यांचे तेव्हा साधारण ५०% केस पांढरे होते. काळ्या केलेल्या केसांचा रंग काही दिवसात ओसरला आणि त्यानंतर साधारण महिनाभरात त्यांचे सगळे केस पांढरे झाले. आम्ही खुप थट्टा केलेली तेव्हा त्यांची.
साधनाताई तुझ्या पोस्ट मुळे
साधनाताई तुझ्या पोस्ट मुळे मला लायसिल ची जाहिरात आठवली... काय मस्त गाण होत त्याच
आभारी साधना
आभारी साधना
आधिच्या पोस्ट मधे प्राची ने
आधिच्या पोस्ट मधे प्राची ने सांगितलेला पॅक लाऊन पाहिला. चांगला वाटतोय. केसाला मध चांगला नाही असे मी बर्याच जणाकडून एकलेय् त्यामुळे मध नाही घातला.
>> २ चमचे दही,१ चमचा मेंदी, १ चमचा मेथी पावडर, १ चमचा मध, १चमचा आवळापावडर,१ अंडे मिक्स करून लावायचे. अर्धा तास ठेवून मग धुवायचे. असे दर रविवारी(म्हणजे आठवड्यातून एकदा) करायचे. >>
कनमस्कार ......मि नविन आहे
कनमस्कार ......मि नविन आहे माय्बोलिवर केस सिल्कि होन्यसथि कहि उपाय अहे का????मझे केस पहिले खुप सिल्कि,सरल,दात होते.....पन जेव्हा मे हैर सरल करुन व करुन घेत्लेत तेव्हापासुन माझ्या केसन्चि खुप वईत अवस्थ झलि अहे....क्रुप करुन मला केसन्चि चमक परत व कोन्दा घलव्न्यसथि व केसन्च रख्रखित पना घलव्न्यसथि काहि उपय सान्गा....
माझ्या डोक्यात पर्यायाने
माझ्या डोक्यात पर्यायाने केसात प्रचंड घाम येतो त्यामुळे कितीही शॅम्पू केले तरी केस ओईली च वाटतात आणि विचित्र वासही येतो. मला अस्थम्याचा, सर्दीचा त्रास असल्याने वारंवार केस धुणे जीवावर येते. हा घाम कमी करण्यासाठी काय करावे?
स्वप्ना तुम्ही जो प्रोब्लेम
स्वप्ना तुम्ही जो प्रोब्लेम लिहीला आहे त्याबद्द्ल असे म्हणावेसे वाटते की केसांचे प्रोब्लेम फक्त डोक्याच्या त्वचेशी संबंधीत नसुन पोट साफ नसल्याने अगर कफ प्रव्रुत्तीमुळे असु शकतो. तुम्ही खोबरेल तेलामध्ये थोडे एरंडेल तेल मिसळुन आद्ल्या दिवशी लावुन दुसर्या दिवशी धुवुन टाका. तसेच केस धुताना रिठा आणि शिकेकाईने अगोदर धुवुन नंतर तेल गेले नसल्यास शांपुचा वापर करुन बघा. रिठ्याने डोक्याच्या त्वचेवरचे अतिरीक्त तेल निघुन जाण्यास मदत होते.
यामध्ये रिठा पावडर + शिकेकाई पावडर एकत्र पाण्यात उकळुन, गाळुन त्यातच शांपु मिसळला तरी चालतो.
सोबत जास्वंद फुले(पराग काढुन) आणि मेथी दाणे त्या पाण्यात उकळले तर केसांची चमक तशीच राहते पण ऑईल राहत नाही. हा उपाय जरुर करुन बघा.
मला वरील टीप्स बर्याच
मला वरील टीप्स बर्याच आवडल्या... पण मला कोणी एखादा सोप्पा उपाय सांगेल का...मी नेह्मी "वाटीका" शाम्पू वापरते.. आणि तेलही तेच... पण माझे केस गळतंच असतात.. बाकी माझे केस चांगले आहेत.. पण गळण्यावर काहीतरी ठोस उपाय आहे का???
प्राची, या धाग्यावर सुचविलेले
प्राची,
या धाग्यावर सुचविलेले पॅक ट्राय कर. तसेच अंड्याचा वापरही करून पहा.(१ अंडे+अर्ध्या लिंबाचा रस विस मिनिटे लावुन धुवुन टाकणे) तसेच खाली एक पॅक देत आहे त्यातील जितके घटक मिळतील त्यांचा एकत्रित पॅक दुधात मिसळुन लाव. सगळेच मिळतिल असे नाही पण जेव्हढे मिळतील ते समप्रमाणात(१/२ किंवा १ चमचा) घे.
१) मुलतानी माती
२) आवळा पावडर
३) ब्राम्ही पावडर
४) नागरमोथा पावडर
५) मेंदी
६)जास्वंद पावडर
७) मेथी पावडर
८)माका पावडर
९)कोरफड (पावडर्/जेल)
१०) मंडुर पावडर(१ चिमुट फक्त)
यापैकी जेव्हढे घटक आयुर्वेदीक दुकानात मिळतील तेव्हढे घरी आणुन प्रमाणात एकत्र दुधात भिजवुन अगर मेंदिमध्ये भिजवुन लावले तर केसांचे टेक्स्चर सुधारण्यास खुप मदत होते. मी स्वतः अनेक वेळा हा पॅक वापरला आहे. आणि त्याने केस सिल्की होतात असा माझा अनुभव आहे.
दुर्गा, केस गळण्याची अनेक
दुर्गा,
केस गळण्याची अनेक कारणे असु शकतात. मानसीक ताण, पुरेशी झोप नसणे, शांत झोप नसणे. केस सतत ओले ठेवणे, ओले केस विंचरणे, केस खुप घट्ट बांधणे, किंवा धुळ आणि प्रदुषणामुळेही केस गळु शकतात. यापैकी एखादे कारण असेल तर मी वरती उल्लेख केलेला आणि या धाग्यात आधी सांगितलेला सोप्पा उपाय म्हणजे एरंडेल तेलाचा वापर( शुद्ध खोबरेल तेल+१ चमचा एरंडेल तेल एकत्र गरम करणे आणि केसांच्या मुळाशी लावणे.) तसेच एकच शांपु वापरल्याने ठरावीकच रसायनांचा सातत्याने वापर होत राहिल्यानेही केस गळतात्.तेव्हा अधुन मधुन दुसरे माईल्ड शांपु वापरुन बघा. त्यानेही केस गळतीचे प्रमाण कमी होइल.
शिवाय मेंदी उत्तम कंडिशनर आहे. तिचाही वापर अधुन मधुन करुन पहा. शेवटी चांगल्या केसांसाठी थोडा वेळ द्यावाच लागतो.
मधुरीताने सांगितलेले घटक
मधुरीताने सांगितलेले घटक मिळण्यासाठी पुण्यात काकडे सिटिजवळ किंवा कोथरुडमधे आयुर्वेदिक दुकान आहे का?... का गावात जाऊन आणायला लागेल?
Heemangi, कर्वेरोड वर गरवारे
Heemangi, कर्वेरोड वर गरवारे कॉलेज शेजारी, ग्रीन फार्मसिचे दुकान आहे. तिथे मिळतील यापैकी बरेच घटक.
सिल्केशाईन नावाची पावडर
सिल्केशाईन नावाची पावडर मिळते... मी हल्ली ती वापरते..शाम्पू इतका ईफेक्ट नाही येत पण रिठा ने जे काम होते ते या पावडर चा वापर करुन होते....नॅचरल आहे....नो केमिकल्स... मला तरी फरक पडला...माझी स्किन खुप सेन्सेटिव अस्ल्याने मला शाम्पू सुट नाही करत आणि खुप केस गळतात...
मेंदिमध्ये भिजवुन लावले तर
मेंदिमध्ये भिजवुन लावले तर केसांचे टेक्स्चर सुधारण्यास खुप मदत होते.>>+१११
मी कालच मेंदी मध्ये, मुलतानी माती, आवळा पावडर, ब्राम्ही पावडर,माका पावडर भिजवुन लावले. मस्त झाले आहेत. मुख्य म्हणजे मेंदी मुळे ड्राय न होता मस्त सिल्की झाले आहेत.
मधुरीता, धन्यवाद... पण मला
मधुरीता, धन्यवाद...
पण मला प्लीझ सांगू शकाल का... माईल्ड शाम्पू म्हणजे कोणते येऊ शकतील...
अॅक्चुअली, शॅम्पु प्रत्येक
अॅक्चुअली, शॅम्पु प्रत्येक व्यक्तीच्या केसांना सुट होणारा असतो. आणि मि पण याच धाग्यात माइल्ड शॅम्पु विषयी चवकशी केली आहे. मलाही चांगला माईल्ड शॅम्पु हवा आहे. कुणाला माहीत असेल तर प्लिज सांगा.
मेंदिमध्ये भिजवुन लावले तर
मेंदिमध्ये भिजवुन लावले तर केसांचे टेक्स्चर सुधारण्यास खुप मदत होते.>>+१११
मी कालच मेंदी मध्ये, मुलतानी माती, आवळा पावडर, ब्राम्ही पावडर,माका पावडर भिजवुन लावले. मस्त झाले आहेत. मुख्य म्हणजे मेंदी मुळे ड्राय न होता मस्त सिल्की झाले आहेत>>>>>>>
कांचन,
तुम्ही दिलेला उपाय करुन पाहिला आणि त्याचा effect चांगला आला हे कळविलेत. त्याबद्द्ल धन्यवाद.
US मधे मिळणारा Dove हा
US मधे मिळणारा Dove हा shampoo बराच mild वाटतो.
पुण्याच्या रामकृष्ण विद्युत
पुण्याच्या रामकृष्ण विद्युत आयुर्वेदिक फार्मसीचे महाभ्रुंगराज तेल चांगले आहे. त्याने कोंडा असेल तर लवकर जातो. परिणामी गळणे कमी होते आणि केस छान दाट होतात.
लॉरीयलचा मला खूपच सूट होतो.
लॉरीयलचा मला खूपच सूट होतो.
dove shampoo atishay changala
dove shampoo atishay changala aahe.karan mi majhya kesana pahila shampoo lavun kes dhuvate.ani nantar kes thode sukhvun dove conditioner use karte.mag kes ekdum silky hotat.
डव शॉम्पु मला तरी काही भारी
डव शॉम्पु मला तरी काही भारी नाही वाटला.. सुरुवातीला केस चांगले वाटतात..नंतर परत तेच केस गळण.. निर्जीव दिसण.. तो वापरण बंद करुन दुसरा सुरु केला तर भराभर केस गळतात.. अर्थात ज्याच्या त्याच्या केसावर डिपेंड आहे ते.. पण मला तरी डव अॅडीक्टेड केटेगिरी मधला वाटला..
mala tar changala vatato dove
mala tar changala vatato dove shampoo.
डव शांप्यु मलाही नाही सुट
डव शांप्यु मलाही नाही सुट झाला. पुण्यात मिळणारा लोकल किंवा दुसरा ब्रंडचा शांपु आहे का?
Pages