केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमलकी म्हणजे आवळ्याचीच पावडर.
पावडरी हवाबंद ठेवल्या तर जास्त टिकू शकतात. थोड्या थोड्याच आणायच्या. वापरायच्या. संपल्या की परत.

अंकु... थॅन्क्स.... बघु आता सेसाचे तेल, हर्बल शांपू आणि अधुन मधुन नीधपने सांगितलेला पॅक अस करुन बघणार आहे... काय होतय ते पोस्टतेच इथे... माझ्या मुळातल्या चांगल्या केसांची मी काळजी न घेउन वाट लावली आहे.. अजिबात तेल न लावता पण बिचारे वर्षाकाठी १०-१२ इंच वाढतात.. फक्त आता गळण्यामुळे पातळ व्हायला लागले आहेत...

नी तै...
मेथ्या भिजवण्यापेक्षा.. मेथी पावडर (मेथ्याची दळुन केलेली) चालेल का???

आमच्याकडे की नै... मेथ्या दळुन ठेवलेल्या असतात. भाकरी करण्यासाठी.. (प्रमाण - १ भापरी साठी : १ चमचा मेथी पीठ + १ वाटी ज्वारी चे पीठ + चवीप्रमाणे हळद, मीठ)

ज्यांना केस वाढिसाठी उपाय हवाय त्यांना:-
१ वाटि खोबरेल तेल+ १ चमचा ते १.५ चमचा एरंडेल तेल(castor oil) एकत्र उकळायचे आणि गार झाल्यावर बाटलीत भरुन ठेवायचे. महिन्यातुन दोन वेळा रात्रभर लावुन सकाळी mild shampoo अगर शिकेकाईने धुवायचे.
ह्या उपायाने माझ्या आजिचेहि केस ऑपरेशन नंतर गळलेले परत वाढले. मी हि हा उपाय करते.
केस सिल्कि, सुन्दर आणि शाईनी होतात.
केस गळायचे थांबतात.
अर्धि वाटी एकावेळी मुरवायची.
तेल उकळताना जास्वंदाची फुले/ मेथी दाणे टाकली तर केस आणखी मऊ होतात.

मयुर कॉलनी पुण्यात जिथे दुर्गा कॅफ आहे तिथेच लाकडी घाण्यातून काढलेले अनेक तेल मिळतात. तिथे शुद्ध खोबरेल तेलही मिळते. त्या तेलात जास्वंदाचे फुले उकळून ते तेल लावावे. केसांची एकूनच कांति, वाढ, रंग ह्यामधे चांगले बदल दिसून येतात.

घाणीतले खोबरेल तेल इतके पारदर्शक असते की जास्वंदाचे ते अगदी लालसर दिसते. तेच तेल जर पॅराशुटचे वापरुन केले तर तो रंग नावालाही दिसत नाही! मी येतेवेळी एक बाटली आणली होती आज ती संपली.

खाली एक यादी देतो आहे. ह्या सर्व वस्तू एकत्रिक करुन त्याची पावडर करुन लावावी. अगदी तेल जरी लावायचे नसले तरी आठवड्यातून एकदा तरी ह्या पावडरीने डोके धुवावे.

१) शिकेकई
२) रिठा
३) आवळाकंठी
४) वाळा
५) नागरमोथा
६) बावची
७) जटामासी
८) जटाशंकर
९) संत्र्याची सुकी साल
१०) अनंतमुळ
११) माका

केसांचे अगदी कुठलेही प्रश्न असोतना... ही पावडर नक्कीच गुणकारी आहे.

के अंजली
जयपाळ बी लावले पण चट्टा चाई सारखा जास्त्च वाधले आहे आता मला वाट्ते आता बहुतेक केस नाहिच उगवनार तिथे, स्किन फार कडक झालि तिथे आनि infection vadhte aahe thithe mathayavar saglikadech tase chote chote चट्टे zale ahe please sanga kahitar upay ?

टक्क्लावर केस येतिल का ?
एंरड तेल लावु का ?

मि amway आवळा तेल वापरते त्याने माझे केस गळणे थाम्बले आहेत. व केसाचि quality पण छान झालि आहे................ज्याना केस गळन्याचा त्रास आहे ते try करु शकतात..........

<<<<मी मागे सांगीतलेल्या तेलाचा खुप फायदा होतो. त्याच दिलेल्या प्रमाणात दोन्हि तेले एकत्र करून थोड्या प्रमाणात करुन बघा आणि फरक सांगा. एरंडेल तेल छोट्या प्रमाणात असल्याने अपाय होत नाही. आणि केसांचे मुळापासुन पोषण होते कारण केसांचे problems मुळात पोट साफ नसल्याने किंवा चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे होतात.

नमस्कार मायबोलीकरहो

गेल्या 2-3 दिवसांत हा पूर्ण धागा वाचून काढला.
मुळातच तेलकट असणा-या केसांसाठी, अरोमथेरपीद्वारे तैल्ग्रंथींवर उपचार करून त्यांचे उत्तेजन कमी करून तेलकटपणा कमी करण्याचा उर्जिता जैन यांनी एक उपाय सांगितलाय तो पुढीलप्रमाणे.

20 थेंब बरग्यॅमॉट तेल

20 थेंब लॅव्हेंडर तेल

5 मि.लि. जोजोबा तेल

20 मि.लि. खोबरेल तेल

हे सर्व एकत्र करून ठेवणे. केसांना लावून 2 तासांनी धुणे. खोबरेल तेलाऐवजी अलोव्हेरा जेलमधे मिसळून लावले तरी चालते.

त्यांच्या पुस्तकात अजूनही ब-याच समस्यांवर उपाय आहेत. आरोग्यपूर्ण जीवनशैली व योग्य आहारविहार यावर त्यांचा खूपच भर आहे.

आपली नव्यानेच सामील झालेली मायबोलीकरीण

बाकी काही होवो न होवो... या वासांनी एकदम मस्त वाटणार.. Happy
बरगॅमॉटचा वास थोड्यावेळाने फारच भारी येतो. डिफ्युजरमधे दोन थेंब टाकून ठेवले तर इतका मस्त दरवळ पसरतो खोलीभर..

ha ha
mala pan urjita jain mhantlyawar mast mas t vasachi athvan ali.. rosemerry.. lovender.. ahahaa Happy

मी घरीच आवळा तेल बनवलेय. केस मस्त होतात नरम.. माझ्या भावाच्या मुलीचे केस खुपच फरफरीत आहेत. तिलापण खुप फरक वाटला केसाच्या पोतात.

या तेलाने जर माझे गोरे झालेले केस काळे झाले तर मात्र झालेच.. दुधात मस्त दाट मध :).. पण जाऊदे.. उगीच भलती स्वप्ने नकोच... Happy

केसांना बियर लावली तर चालते का?
.. चालते की, या धाग्याच्या सुरूवातीलाच माहिती दिली आहे बघ. केस छान मऊ सिल्की होतात.

या तेलाने जर माझे गोरे झालेले केस काळे झाले तर मात्र झालेच.. दुधात मस्त दाट मध .. पण जाऊदे.. उगीच भलती स्वप्ने नकोच... >> साधना Happy

मेंदीचाच उपाय करतेस अजून की केस रंगवायचा प्रयत्न केलेलास कधी?? मला कधी कधी खूप टेम्प व्हायला होतं बर्‍याचजणींचे कलर केलेले केस बघून पण नंतरच्या रंग उडालेल्या विटक्या भरभरीत रूपाचा विचार करून कच खाते दरवेळी!!! Sad मेंदी प्रकरण खूप किचकट वाटतं पण इलाज नाहीये....

मला कधी कधी खूप टेम्प व्हायला होतं बर्‍याचजणींचे कलर केलेले केस बघून पण नंतरच्या रंग उडालेल्या विटक्या भरभरीत रूपाचा विचार करून कच खाते दरवेळी!!! >>> अगदी!... मला रेचेल बघितली FRIENDS मधली.. की तसा कट करायची आणि केस रंगवायची फ़ार हौस येते... पण रंग उडाल्यावर आणि जरा लेंग्थ वाढल्यावर काय ध्यान दिसेल असा विचार करुन परत येते मी नेहमी...

पुण्यात कोणाला हेड मसाज साठी चांगलं parlour माहितीये का? गेल्या ६ महिन्यात मी ३-४ parlours मध्ये try केलं पण कुठेच समाधान झालं नाही. उगाच वरवर बोट फिरवतात आणि तेलही मोजूनमापून लावतात.
मी बिबवेवाडीत राहते. इथलं किंवा धनकवडी, पुणे-सातारा रोड, पेठेतलं कोणाला चांगलं parlour माहितीये का हेड मसाज साठी ? का बेस्ट way शिरोधारा करावं?

chote chote चट्टे zale ahe please sanga kahitar upay ?

टक्क्लावर केस विरळ झाले आहे, उपाय सांगा ?

अहो तुम्ही डॉक्टरकडे जा. डॉक्टर सांगतील तेच करा. एक डॉक्टर पटला नाही तर दुसर्‍याकडे जा. तिसर्‍याकडे जा.
इथे सगळे नॉर्मल असताना अजून प्लससाठी केसांना हे बरे ते बरे इतपतच सांगू शकतात.

अहो तुम्ही डॉक्टरकडे जा. डॉक्टर सांगतील तेच करा. एक डॉक्टर पटला नाही तर दुसर्‍याकडे जा. तिसर्‍याकडे जा.
इथे सगळे नॉर्मल असताना अजून प्लससाठी केसांना हे बरे ते बरे इतपतच सांगू शकतात.

+ १००००००.

अगं ड्रिमगर्ल, मी तरी अजुन मेंदीच वापरते. आता इतर मेंद्या सोडुन ग्रेनिलची कास धरलीय. मुळात माझे केस कोरडे होते आणि मेंदीमुळे ते अजुनच कोरडे झालेले. पण ग्रेनिलने आणि आवळ्याच्या तेलाने बराच फरक पडलाय. फक्त एकच गोष्ट वाईट होतेय आणि ती म्हणजे मला वरचेवर मेंदी लावायला जमत नाही त्यामुळॅ केस परत पांढरे होतात. माझी लेक डोक्यावर भांगाच्या दोन्ही बाजुला पडणा-या पांढ-या केसांच्या पट्ट्याला राजपथ म्हणते. माझा हा राजपथ खुपच वेगात विस्तारतो. Happy

केस रंगवायचा सल्ला देणारे देऊन देऊन थकलेत. पण अशा रंगवलेल्या केसांची नंतर काय दशा होते ते पाहिलेय, त्यामुळे मी अजिबात लक्ष देत नाही अशा सल्लेकरांकडे. तोंडावर हो हो म्हणायचे आणि नंतर सोडुन् द्यायचे. आधी केस रंगवुन घ्या, मग त्यासाठी स्पेशल शांपु, कंडीशनर, सेरम.. ह्या सगळ्या चक्रात पडुन मला आहे त्या केसांची वाट लावुन घ्यायची नाहीय, त्यापेक्षा राजपथ परवडला... Happy

आधी केस रंगवुन घ्या, मग त्यासाठी स्पेशल शांपु, कंडीशनर, सेरम.. ह्या सगळ्या चक्रात पडुन मला आहे त्या केसांची वाट लावुन घ्यायची नाहीय, त्यापेक्षा राजपथ परवडला... १००००

मला ही हेच पटत ............. माझा ही हाच problem आहे but मेहन्दी best. पण महि न्याच्या आत लावावी लागते नाही तर राजपथ आलाच समजायचा .............साधना ताई तुम्ही कुठली मेहन्दी वापरतात.??????......

अगं मी लिहिलंय ना, ग्रेनिल वापरते म्हणुन. ही उर्जिता जैनची मेहंदी आहे. आधी १०० रु ला १०० ग्र,. चे पाकिट मिळायचे, आता ते १२० रु झालेय. (की १२५? आठवत नाहीय). यात मेहंदी ५०% आणि इंडिगो पावडर ५०% असते. काळा आणि डार्क ब्राऊन अशा दोन शेडस मध्ये आहे.

आता या दोन शेड्स त्यांनी फक्त मेंदी आणि इंडिगो पावडर वापरुन कशा काय मिळवल्या मला माहित नाही. पण उर्जिता जैनच्या उत्पादनावर माझा विश्वास आहे, त्यात हानीकारक केमिकल्स नक्कीच नसणार याची खात्री आहे.

आधी नव्या मुंबईत तिची उत्पादने मिळत नसत. गेल्या चार महिन्यापासुन सगळ्या केमिस्टकडे बोर्ड लागलेत ग्रेनिल आणि इतर उत्पादनांचे. काहीतरी डिलर्सचा प्रॉब्लेम होता तो बहुतेक आता मिटला.

Pages