केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फॅबचे शांपू चांगले आहेत.
मात्र माइल्ड असो वा हार्श... केसांच्या आरोग्यासाठी शक्यतो केसांना तेल लावल्याशिवाय शांपू वापरूच नये. निदान तिशी-पस्तिशीनंतर तर नाहीच नाही.

लॉरीयल चा अ‍ॅब्सोल्युट रिपेअर नावाच शाम्पू मिळतो टोटल रिपेअर नाही . थोडा महाग आहे पण वर्थ बाइंग मला खूपच सूट झालाय हा वापरून बघा .

लेकीचे केस फार कोरडे आहेत. त्यामुळे गुंततातही फार. Sad

कोरड्या केसांकरता काही उपाय आहे का? रोज शाळेत जाताना तेल लावतेच आणि आठवड्यातून एकदा नाहीतर दोनदा धुते मी तिचे केस.

लश आणला की. चांगला २४०० रुपयांचा आणला. (साबूची किंमत वाचून नवर्‍याला चक्कर आली ती वेगळीच). पण तो वापरायला जरा बोअर आहे. आणि इतका काही खासही नाही वाटला.

मामी, माझ्या भावाच्या मुलीचे केसही लाराच्या केसांसारखे आहेत, जरा जास्तच कोरडे. हाताला एकदम रखरखित फिल देणारे. ती माझ्याकडे राहायला आलेली तेव्हा मी आवळा तेलाचा प्रयोग केला तिच्यावर. खुप सॉफ्टनेस आलेला केसांना. आवळा तेल मी घरीच बनवलेले, तु डाबर आवळा वापरुन बघ.

तिचे केस कापायला गेलो होतो तेव्हा कापणारणीने केस धुताना अगदी थोडासा तेलाचा अंश केसातच राहुदे, त्यामुळे फ्रिझिनेस कमी होईल हा सल्ला दिलेला.

मी मुलीच्या डोक्याला तेलाने इतके मालिश करत होते की तिने केस कितीही धुतले तरी जरासा तेलाचा अंश राहातच होता. पण त्यामुळे तिचे केस बरेच मॅनेजबल झाले, तिला तरी आवडला तो प्रकार.

आणि केसात जरी तेलाचा थोडा अंश राहिला तरी केस तेलकट दिसत नाहीत अजिबात.

एकदा प्रयोग करुन बघ.

धन्स साधना. आवळा तेल घरी कसं बनवलंस ते ही सांग. मी ही घरी करून बघेन.

लाराचे डोक्यालगतचे केस तरी बरेच बरे आहेत. पण खाली जास्त जास्त कोरडे होत जातात. कापले तर मॅनेजेबल होतीलही पण आपण रापुन्झेलचा पुनर्जन्म असल्याचा साक्षात्कार तिला झाला असल्यामुळे केस कापून देतच नाही.

लाराच्या डोक्यात अधूनमधून कोंडाही होतो. कोंडा केस कोरडे आहेत म्हणून होतो की कोंडा झाल्याने केस कोरडे होतात?

कोंडा दोन प्रकारचा असतो. एक नुसता स्काल्पच्या कोरडेपणाने येणारा आणि दुसरा काहीतरी इन्फेक्शन टाइप असतो. स्काल्पच्या कोरडेपणाने येणारा कोंडा दोन वेळा व्यवस्थित तेल लावून धुतले की जातो.

पण खाली जास्त जास्त कोरडे होत जातात. >> हा त्रास मलासुद्धा होतो. पार्लर वालीने नियमीत केस कापणे आणि शँपू बदलणे हे उपाय सांगितले. लश किंवा आयुर्वेदिक उपायांमुळे मुळे केस कोरडे होतात असे तीचे म्हणणे आहे. मला तरी केस कापणे आणि अधून मधून हेड मसाज, घरच्या घरी तेल लावणे, कंडिशनींग याचा उपयोग झाला.

स्काल्पच्या कोरडेपणाने येणारा कोंडा दोन वेळा व्यवस्थित तेल लावून धुतले की जातो. >>> हो केस धुतले की जातो तिचा कोंडा. तिची त्वचाही कोरडी आहे. त्यामुळे स्काल्पच कोरडी असणार. म्हणजे यावर उपाय नाही का? Sad

जनरली नाही.
तिच्या जेवणात साजूक तूपाचा समावेश (दिवसाला १ चमचा) करणे उपयोगी पडू शकते. जंक फूड, कार्बोनेटेड ड्रिंक्स शक्यतो देऊ नकोस.
बेसिकली आपल्या लहानपणी अन्नाची जी शिस्त होती त्याच्या आसपास. Happy

जंक फूड, कार्बोनेटेड ड्रिंक्स शक्यतो देऊ नकोस.
>>> ते नशिबानं आवडत नाही. पण त्याचबरोबर दूध न पिणे, बदाम खायला नकार देणे असले प्रकार आहेत. तूप असतं जेवणात.

आवळा तेल घरी कसं बनवलंस ते ही सांग. मी ही घरी करून बघेन.

अगं सोप्पं आहे एकदम.. easyayurveda.com ह्या साईटवर आहे बघ, मी तिथलेच प्रमाण घेऊन आधी पाव लिटर खोबरेल तेलात बनवले आणि नंतर अर्धा लिटर तेलात बनवले.

आपण रापुन्झेलचा पुनर्जन्म असल्याचा साक्षात्कार तिला झाला असल्यामुळे केस कापून देतच नाही.

ह्या पोरी ना.. मला लहानपणी केस कापण्याची इतकी हौस होती, पण माझ्या आईबाबांनी कधी कापु दिले नाहीत. आता मी माझ्या पोरीला सांगते की वेगवेगळ्या स्टाईल्स करुन बघ तुझ्या केसांच्या तर तिला ते वाढवायचेत.. कोकातकोका... Happy

आवळ्याच्या तेलाचा प्रयोग करताना आधी थोड्याश्याच् केसांवर करुन बघ. मागची पाने चाळताना काही जणांचे कोरडे केस आवळ्याच्या तेलाने अजुनच कोरडे झाले हेही वाचनात आले.. Happy कदाचित विकतच्या आवळा तेलामुळे असा अनुभव आला असेल.

मामी, आठवड्यातून दोनदा तिळाच्या/बदामाच्या तेलाने (किंवा जास्वंद तेलाने) केसांना मालिश करुन टर्किश टॉवेलने केसांना वाफ दे. स्काल्पची रंध्र मोकळी होऊन तेल चांगले झिरपेल आतवर. कोंडाही जाईल. कंडिशनर केसांच्या टोकापर्यंत लाव शाम्पू केल्यावर. शाम्पू अगदी माइल्ड असलेला वापर. फॅबचा किंवा ब्यूटीकचा प्रोटीन शाम्पू, बायोटेकचाही चांगला आहे. ब्यूटीकच्या सलोनमधे चांगला हेअर-स्पा देतात. दोन सिटींग्जनंतरही फरक जाणवेल. खाण्यात आक्रोड-बदाम असूदेत. कॉड-लिव्हर ऑईलच्या गोळ्या सुरु कर. यानेही नाही फरक पडला तर ट्रायकॉलॉजिस्टकडे जा चांगल्या (बात्रा अजिबात नको. फॅमिली फिजिशियनच्या सल्ल्याने जा. डायेटमधेही तो फेरफार सांगेल.)

सहज मॉल मधे चांगला वास वाटला म्ह्णुन लश ट्राय करायचे ठरवले. बाकी नेहमी लेकिला त्यांचा साबणाचा प्ले डव आवडतो. यावेळी मात्र त्यांचा मेंदी चा बार मिळतो तो वापरुन पाहिला. मस्त इफेक्ट आला.

मेहेंदी लावायला तसेही २५ ते ३० डॉ घेतातच. त्याच किंमतीचा आहे हा बार. ( खर तर मेहेंदिची पेस्ट आहे सॉलीड रुपात. मग ती वितळवुन डोक्याला लावायची) यामधे कोका बटर पण आहे त्यामुळे केस मला तरी नंतर सेट करायची गरज वाटली नाही.
आता केस गोरे व्हायला सुरवात होतेच आहे , मग आता त्यांचा मेकअप साठी मला तरी चांगले सोल्युशन मिळाले.

रिमझिम मॉलमधे कुठल्या शॉपमधे मिळाला तुला हा सोप ?
नी माझ्या लेकीच्या केसाला प्रचंड व्हॉल्यूम आहे. आता केस वाढवायचं खूळ डोक्यात बसलंय. लेअर्स हॉरीबल
दिसतात. कोणता हेअरकट करुन घ्यावा ? कोणताही माईल्ड शांपू वापरला तरी केस फुलतात.

गौरी,
अग लश चे दुकान आहे. तिकडे बहुतेक विलोब्रुक मधे आहे.

आणि मी पण प्रथमच केस वाढवति आहे ( लास्ट हेअर कट करुन साधारण ८ महिने झाले.) नेहमी मानेवर केस आले तरी खुप मोठी लढाई जिंकली असे वाटुन लगेच हारायला तयार असणारी मी, चक्क लांब केस ठेवायचा विचार करतेय.

माझ स्वतःच मत आहे की , केस लांब सडक असले कि सुंदर दिसते ( आता माझे तसे लांबसडक वगैरे व्हायला पुढच्या जन्मीच शक्य होईल Sad ).

जास्वंदाचे तेल करायचे असेल तर लाल रंगाचेच फुल वापरायचे का? .....(मी राहते त्या परिसरात लाल ऐवजी दुसर्या रंगाची जास्वंद आहे)

माझ्या माहिती प्रमाणे तरी लालच फुले ( लाल मधे पण फिका लाल आणि गच्च पाने असलेली चांगली ) तेल बनवायला वापरतात.

बहुतेक नी ने क्रुती लिहिली होती याची.

माझे केस फार गळत आहेत. विकांताला मी केसांना रात्री तेल लावुन दुसर्या दिवशी, मेथ्याची पेस्ट लावुन, shampoee conditioner ने केस धुतले . या प्रकारातही खरे तर फार केस गळाले. केस गळण्याचे प्रमाणही तेवढेच आहे. पुन्हा या विकांताला केलं तर चालेल का की थोडे थांबावे?

सुप्रिया
केसगळती कशामुळे होत आहे ते आधी शोधा.. कोंडा की अजुन दुसर काही कारण आहे ???
मागे पण मी एका पोस्टीत लिहल होत की वर वर केंसाना काहीही लावुन फरक पडत नाही फारसा.. केसगळतीसाठी पोटातुन औषध घेणे हा एकमेव पर्याय लवकर फरक देणारा असतो Happy

घरात सुकवलेले आवळे आहेत... नि आवळ्यामुळे केस काळे राहतात हे ईतक्यांदा वाचले होते... सो आवळा थोडा वेळ भिजवुन त्याची पेस्ट करुन स्काल्प नि केसांना लावली... १० मिनिटांपेक्षा जास्त नाही ठेवु शकले... वॉशनंतर केस बरेच कोरडे वाटले... पण काळपटपणा जाणवत होता... सो रात्री झोपताना केसांना चांगले तेलाने मालिश करुन दुसर्‍या दिवशी केस शांपु केले.... केस मस्त काळे नि चमकदार दिसत होते... तीन-चार आठवडे ईफेक्ट छान होता... कोंडाही गायब झाला... केसही थोडे वाढले... गेल्या सहा महिन्यात हा प्रयोग दोनदा केलाय नि ईफेक्ट सेम होता... पण दोन्ही वेळेस जबरदस्त सर्दी झाली त्यामुळे ईच्छा असुनही नियमितपणे हा ईलाज नाही करु शकतेय... Sad

सध्या अ‍ॅमवेचे आवळा तेल वापरतेय... तेही रात्रभर लावुन नाही ठेवू शकत... पण सकाळी लावुन दोन्-तीन तासांनी केस धुवुन टाकते... सध्या ट्रायचप हा शॅम्पु नि अ‍ॅमवेचे तेल या दोनच गोष्टी वापरतेय केसांसाठी... खुप फायदा होतोय असच काही नाहीये... पण नुकसानही नाही जाणवतेय... आवळा तेलामुळे कदाचित कोंडाही कमी होतोय...

डव शॅम्पू मीही वापरायचे... पण भारतीय डवपेक्षा बाहेरचा डव जास्त चांगला वाटला.... परत फार काही फायदा नाही झाला तरी नुकसानही नाही झाले...

खोबरेल तेलाने(पॅराशुट,कोकोराज,किंवा केरळचे प्योर खोबरेल तेल) मला सुट नाही होत त्यानेही कोंडा होतो... आवळा, कढीपत्ता (करी लिव्हज), तिळाचे तेल वैगैरे टाकलेले खोबरेल तेलही सुट नाही होत...

Pages