Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आता नाही वापरत. एकदा आणला
मी आता नाही वापरत. एकदा आणला होता डबा. पस्तावले.
स्पा करायचं तर पार्लरमधे जाऊन. घरी उद्योग करायचे तर विविध तेले किंवा मग होममेड हेअर पॅक किंवा मेंदी एवढेच
अरे असे होय.. मी स्पा बद्दल
अरे असे होय.. मी स्पा बद्दल नव्हते म्हणत.. मी पार्लरवालांना कंटाळुन स्वतः मेहंदी लावायला सुरुवात केली वर्षापुर्वी
मी मेंदी मला हवी तशी भिजवून
मी मेंदी मला हवी तशी भिजवून घेते. मैत्रिणीला लावून द्यायला सांगते. तसंही मी वर्षातून एकदोनदाच करते मेंदी.
तसंही मी वर्षातून एकदोनदाच
तसंही मी वर्षातून एकदोनदाच करते मेंदी. >> लक्की आहेस.. आमची चांदी झालीये आधीच
मी ते मेथि कोरफडिमध्ये भिजवुन
मी ते मेथि कोरफडिमध्ये भिजवुन तेलात टाकली,पण आता त्या तेलाला बुरशि येत आहे काय करु
तेलात तशीच नसते टाकायची.
तेलात तशीच नसते टाकायची. मेथीला कोरफडीत मोड आले की मग ती मेथी साध्या तेलात उकळायची असते. त्याचा अर्क तेलात मिसळण्यासाठी.
मुलगी झाल्या पासून केस फार
मुलगी झाल्या पासून केस फार गाळतायत ....जणू गळतीच लागलीये ...पूर्वी एवढे कधीच नव्हते गाळले प्लीज कोणी उपाय सांगाल का........नंतर केस व्यवस्थित होतील का.......calcium tab .सुद्धा चालू आहेत ....प्लीज उपाय सांगा न कोणी तरी ?
तेलात तशीच नसते टाकायची.
तेलात तशीच नसते टाकायची. मेथीला कोरफडीत मोड आले की मग ती मेथी साध्या तेलात उकळायची असते. त्याचा अर्क तेलात मिसळण्यासाठी.>>> अग नीपध मी असेच केल पण
विनया पवार, डिलीव्हरीनंतर
विनया पवार, डिलीव्हरीनंतर गळतातच केस हॉर्मोनल चेन्जेसमुळे. काळजी करू नका. (काळजीने आणखी गळतील!)
इथले वाचुन सेसा तेल आणले आणि
इथले वाचुन सेसा तेल आणले आणि मज्जा म्हणजे अगदी दोनदाच लावलय आतापर्यंत तर केसांचे गळणे अगदी कमी निम्म्यापेक्षा कमी वाटतेय. धन्यवाद मुलींनो
Princess, मी USA मधे आहे. ईथे
Princess, मी USA मधे आहे. ईथे हे तेल मिळेल का?
मस्तानी, युएसए बद्दल सांगता
मस्तानी, युएसए बद्दल सांगता येणार नाही - सॉरी. मी सिंगापूरात असते इथे भारतातल्या सगळ्या वस्तु मिळतात. सेसा तेल बहुदा डॅफोडिल्स ने सुचवले होते. तिला विचारुन बघ.
Thank you, Princess. मी
Thank you, Princess. मी ईथल्या ग्रोसरी स्टोर मधे शोधते. नाहीतर online order करीन.
प्रिंसेस... हो सेसा छान आहे.
प्रिंसेस... हो सेसा छान आहे. एकदम मस्त रिझल्ट आहे त्याचा.
मस्तानी ...नको नको ऑनलाईन नको करु महाग पडेल.

इथल्या इंग्रो मध्ये मिळते सेसा. मी मागच्या वेळी चक्कर मारली तेव्हा होते. पण माझ्याकडे घरी होते म्हणून मी घेतले नाही तेव्हा.
काल गेले तर स्टॉक दिसला नाही.
सेसा तेल म्ह्नजे कुटल? माझे
सेसा तेल म्ह्नजे कुटल? माझे केस आधि फर छन होते आधी म्हन्जे फार वर्ष नाही झाली पण गेल्य २ वर्षन्मधे वाट लगली. बोरवेल च्य पाण्यामुळे. पिन्यचे पाणी वपरून पहिले पण नळ एकच असल्यने पाणि मि़क्स येते. कोणी समदु:खी उपाय सुचवेल क?
मी सिडनीत राहते मला सेसा तेल
मी सिडनीत राहते मला सेसा तेल कुठे मिळेल किंवा कुठे ऑनलाईन घेता येईल का ???
सेसा बद्दल अधिक माहिती लिहाल
सेसा बद्दल अधिक माहिती लिहाल का ज्यांनी वापरलंय त्यांनी? पेपरात नेहमी जाहीरात वाचनात येते. पण वापरायचं धाडस अजून कधी केलेलं नाहिये.
Dafo, Thank you. मी Bay area
Dafo, Thank you. मी Bay area त आहे. ईकडच्या ग्रोसरी स्टोर मधे बघते.
सेसा तेल म्ह्नजे कुटल? माझे
सेसा तेल म्ह्नजे कुटल? माझे केस आधि फर छन होते आधी म्हन्जे फार वर्ष नाही झाली पण गेल्य २ वर्षन्मधे वाट लगली. बोरवेल च्य पाण्यामुळे. पिन्यचे पाणी वपरून पहिले पण नळ एकच असल्यने पाणि मि़क्स येते. कोणी समदु:खी उपाय सुचवेल क?>>>>+१
मी पण सेसा तेल मधे वापरले.
मी पण सेसा तेल मधे वापरले. खरच गुणकारी आहे. केस गळायचे लगेच थांबले. पण वास फार तीव्र आहे.
मी सेसा वापरलं आहे.
मी सेसा वापरलं आहे. त्याच्यावर गुडघ्याखाली दाट केस असलेल्या बाईचं चित्र आहे, त्याला भुलूनच घेतलं होतं
मला काहीच फरक जाणवला नाही. पण अपाय तरी नाही झाला. माझ्या दृष्टीने हेही खूपच आहे.
पौर्णिमा मी हि वापरल सेसा सेम
पौर्णिमा मी हि वापरल सेसा सेम अनुभव
मिळाले रे मिळाले..... सेसा
मिळाले रे मिळाले..... सेसा मिळाले. आता वापरुन सान्गते कसे वाटले ते.
पूर्वी अनुप तेलाचं फार नाव
पूर्वी अनुप तेलाचं फार नाव होतं. तळहाताखेरीज कुठे तेल लागलं तर तिथेही केस येतात असा समज होता
त्याच्यावर गुडघ्याखाली दाट
त्याच्यावर गुडघ्याखाली दाट केस असलेल्या बाईचं चित्र आहे, >>> मी जाम दचकले हे वाचून. ' गुडघ्याच्या खालपर्यंत' हा सोपा अर्थ नंतर लक्षात आला
अविगा>>>>> बोरवेल च्य
अविगा>>>>> बोरवेल च्य पाण्यामुळे. पिन्यचे पाणी वपरून पहिले पण नळ एकच असल्यने पाणि मि़क्स येते. कोणी समदु:खी उपाय सुचवेल क?>>>>
बोरवेलच पाणी वापरण्या आधी रात्रभर बादलीत तसच स्थिर ठेवुन द्यायच सकळी वरच पाणी घ्यायच.
मी होस्टेलला असताना असच करत होते. Minerals तळाशी जाउन पाण्याचे जड्त्व कमी होते.
अश्वे तु एकटी नाहीस. गैरसमज
अश्वे तु एकटी नाहीस. गैरसमज माझाही झालाच.
असो..
माझे केस खुप dry आहेत आणि खुप
माझे केस खुप dry आहेत आणि खुप फाटे फुट्लेत. मला केस वाढवायचे आहेत म्हनुन सतत कापत नाही. कोणी उपाय सुचवेल क?
माझे केस खुप dry आहेत आणि खुप
माझे केस खुप dry आहेत आणि खुप फाटे फुट्लेत. मला केस वाढवायचे आहेत म्हनुन सतत कापत नाही. कोणी उपाय सुचवेल क?
>>>>>>
सेम प्रोब्लेम
१२-१३ वर्षाच्या मुलीला मेंदी
१२-१३ वर्षाच्या मुलीला मेंदी लावली तर चालते का?
Pages