केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे केस खुप dry आहेत आणि खुप फाटे फुट्लेत. मला केस वाढवायचे आहेत म्हनुन सतत कापत नाही. कोणी उपाय सुचवेल क?

>>>>>>
सेम प्रोब्लेम Sad

thanks sadhana..... हा उपाय माहीत आहे पण कापल्या नन्तर काही दिवसात पुन्हा फाटे फुटतात..... Sad

देवू. सतत केस कापत राहणे, त्याचबरोबर केसांना मुळापासून मजबूती देणे.

योग्य आहार, व्यायाम, विश्रांती, तसेच तणावमुक्त राहणे यामुळे केस चांगले मजबूत होतात व फाटे फुटायचे कमी होतात. केसांना थोडे दिवस माईल्ड शांपू आणि कंडीशनर वापरून पहा. केस धुवायच्या आदल्या रात्री केसांना तेलाने मसाज करा. केस कमकुवत होऊ नयेत म्हणून थोडे दिवस ब्लोड्राय, हेअर जेल तत्सम प्रॉडक्ट्स वापरू नका.

कोंड्यासाठी मेडीकलमधून "मेडीकेटेड शांपू" आणून बघा. मी डँगो नावाचा शांपू वापरते (स्किन सेप्शालिस्टच्या सल्ल्याने) महिन्यातून एकदा वापरला तरी कोंड्याचा त्रास जाणवत नाही. इतर वेळेला नॉर्मल डव्ह शांपू वापरते.

कोंड्यासाठी मेडीकलमधून "मेडीकेटेड शांपू" आणून बघा. मी डँगो नावाचा शांपू वापरते >>>> हा शांपू कोठे मिळेल?

कोंड्यावरची माझी हमखास चालणारी ट्रिकः माझ्या केसांमध्ये फक्त काही भागातच असा पॅची कोंडा होतो. तेव्हा मी त्या सर्व पॅचेसला आणि त्यामुळे आसपासच्या केसांना एरंडेल तेल लावते. २-३ तासांनी असेल त्या शांपूने स्वच्छ धुऊन टाकते. कोंड्याचा नामोनिशान गायब होतो अगदी.
बाकी नंदिनीच्या पोस्टप्रमाणे जर योग्य आहार-विहार-झोप असेल तर कोंडा होत नाही, हाही अनुभव घेतलाय. पण सध्या ते शक्य नाहीये.

भीमसेनी कापुर खोबरेल तेलात कसा मिसळायचा? थंड्/नॉर्मल तेलातच पावडर करुन मिसळुन ठेवायची की तेल गरम करुन त्यातच कापुर उकळवायचा?? अस मिक्स तेल कीती दिवस ठेवता येतं??

सेसाचा वास खूप म्हणजे खूपच तीव्र आहे. मी साध्या खोबरेलतेलात अर्ध्या प्रमाणात मिसळून वापरते आहे.
केस गळतीवर फार काही परिणाम झाला असं नाही पण वाढली तरी नाही. पण बोनस म्हणून झोप मस्त, शांत लागते हे जाणवलं. Happy

>>गुढग्याखाली केस Happy
हो माझ्या मुलीने ते चित्र पाहूनच बाटली उचलली. तिला लांब केसांची भारी हौस आहे.

मला एक सांगा, ऑलिव्ह ऑईल जर डोक्याला लावायचं असेल तर आपलं घरातलं जेवणासाठी जे वापरतो ते एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल चालतं का, की दुसरं असतं?
मला रोजमेरी टाकुन तेल बनवायचं आहे.

रचु, जेवणासाठीचं चालत नसणार बहुतेक... माझ्या मुलासाठी मालीश करायला आणलं होतं फिगारो कंपनीचं होतं, ते चालू शकेल.

हो ना dreamgirl, मला पण असच वाटत आहे. बघु, अजुन माहीती काढते आणि मगच ते रोजमेरीचं तेल बनवते.

इकडे कोणी hair hightlights केले आहेत का? Indian Fair skin la कोणते colors suit होतील? मी US मध्ये असते, त्यामुळे इकडे कोणते colors वापरु या बद्दल शाशन्क आहे. मला hair stylist ने suggest केलेले colors... mahagony, caramel, bronze... any suggestions??

Highlights ची काळजी घेणे कितपत आवघड आहे?

इकडे कोणी hair hightlights केले आहेत का? >> मी पाच वर्षांपूर्वी इथे भारतात केले होते. आत्ता मला शेड आठवत नाहीये. पण लॉरीयल्स मधून केले होते.

हायलाईट्स केल्यानंतर केस खूप कोरडे झाले होते माझे, त्यामुळे लॉरीयल्सचा कल रीपेअर शांपू आणि कंडीशनर वापरत होते, तसंच केस धुण्याआधी त्यांना भरपूर तेलाने मालिश करायचे.

नंतर मला हायलाईट्सपेक्षा हेअर एक्स्टेन्शनचा एक भन्नाट प्रकार बांद्र्याला मिळाला होता. फेक हायलाईट्स नावाचा. त्यामधे केसांमधे ती एक रंगवलेली बट लावली की काम झाले. नको असेल तेव्हा काढून टाकायची. हव्या त्या रंगामधे आणी शेडमधे हे हायलाईट्स विकत मिळतात. शिवाय केस खराब व्हायची पण भिती नाही... Happy

नंदिनी, मस्तच आयडीया की..... जरा details सांगशील का, की बांद्र्याला नक्की कुठे मिळाले ते. पुढ्च्या भारत वारीत नक्कीच आणिन.

thank you, Nandini.. Hair Extention मी ही वापरले आहे. आगदी हव्या त्या color मध्ये मिळते. माझ्याकडे florocent color मध्ये हि आहे Happy Highlights केल्यावर वापरण्यासाठी खास conditioner ही मिळतो त्याने केस dry होत नाहीत म्हणे.

खूप ठिकाणी मिळतात या बटा. ट्रेण्डी अ‍ॅक्सेसरीजच्या दुकानांमधे कुठेही. अगदी गुलाबी, निळ्या रंगाच्याही मिळतात.

घरीच जास्वन्दाचे तेल करायचे खोबरेल तेलात ते लगेच लावायचे रात्रभर तर फाटे फुटणे बन्द होऊन केस वाढतात. सन्त्र्याची साल सुकवून ती केसान्ना लावायची. केस गळणे बन्द होतात.

शिकेकई, रिठा, ब्राह्मी, आवळाकण्ठी, जटामासी, जटाशन्कर, वाळा, बावन्ची/बावची, कापडकचुरा, नागरमोथा, बेहडा ह्या वस्तू समप्रमाणात घेऊन त्या भरड कान्डायच्या. रात्रभर एक पळीभर पावडर पाण्यात भिजत ठेवून दुसर्‍या दिवशी ती उकळून नन्तर एक तास गारेगार होऊ द्यायची. मग ते पाणी, ती पावडर केसान्ना हलक्या हातान्नी लावायची. शरिराला लावली तरी चालते.

अकोल्यात तर जडीबुटी दळायची एक मस्त गिरणी आहे. त्यामुळे ती गिरणी इतकी युनिक आहे ना माझ्यासाठी की दर भारतभेटीत मी तिथे जातोच जातो.

वर नन्दीनी म्हणाली ते योग्य आहे की आराम, व्यायाम, झोप ह्या सर्व गोष्टी केसान्नासाठी उपयुक्त असतात. हल्ली आपण उशिरा झोपतो आणि दडपण घेत घेत जीवन जगतो. ते चुकीचे आहे. त्यावर मात करायला हवी. काय योग्य काय अयोग्य हे शिकायला हवे आणि शिकलेले अन्गी बाणायला हवे.

असो.

पुढ्च्या भारत वारीत नक्कीच आणिन.>> अमेरिकेत-युरोपात असशील तर तिथे नक्कीच मिळत असतील. त्यासाठी भारतवारीची वाट पाहू नकोस. Happy

मी एकदम गुलाबी आणि भडक लाल रंगाच्या घेतल्या होत्या. पार्टीसाठी वगैरे झकास दिसायच्या. ऑफिसला जाताना काढून ठेवायच्या. Happy

बांद्र्याला हिलरोडवरती एल्कोच्या आजूबाजूला जी अ‍ॅक्सेसरीजची दुकाने आहेत तिथे मिळतात. शिवाय सांताक्रूझ वेस्टला स्टेशनच्या बाहेर जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथेपण मिळतात. इथे केसांना लावायचे अंबाडे इतके छान आणि वेगवेगळ्या स्टाईलचे मिळतात. मी लग्नामधे हेअरस्टाईल वगैरे करायच्या भानगडीत न पडता सरळ हे अंबाडेच पिनप केले होते. केसांना भरमसाठ पिना लावून आणि कसले कसले जेल स्प्रे मारून तासभर हेअरस्टाईल करण्यापेक्षा हे काम परवडलं. अक्षरश: पाचेक मिनिटात पूर्ण हेअरस्टाईल बदलता येते आणि केसदेखील खराब होत नाहीत.

Highlights केल्यावर वापरण्यासाठी खास conditioner ही मिळतो त्याने केस dry होत नाहीत म्हणे.>> तोच वापरायचे मी, पण तरी थोडेतरी कोरडे वाटायचे केस.

मी सध्या Brihans company - Pure Hibiscus Gel, shampooकेले कि चा वापरते आहे. केस एकदम मऊ होतात आणि मस्त सुगन्ध येतो. Conditioner लावला कि मला केस पचपचीत आनि अस्व्च्छ वाटतात. Khadi shampoo वापरते आहे, चान्गला वाटतोय.

माझ्या केसांत पण खुप कोंडा होत होता बरेच उपाय केले पण काही उपयोग होत नव्हता, सध्या parachute hot oil आणि रामदेव बाबा चा म्हणजे पतंजलीचा anti dandruff shampoo वापरतेय, एकदम जादू केल्यासारखा कोंडा गायब.

Pages