आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
अरे कुणाला फँटसी लीग (जुने
अरे कुणाला फँटसी लीग (जुने सुपर सिलेक्टर) खेळण्यात इंटरेस्ट नाहीये का?
मी कधीची मायबोली लीग उघडून ठेवलीय तिकडे:
http://games.espncricinfo.com/fantasy/League.aspx
तुमची टीम तयार करा आणि मग मायबोली लीग जॉइन करा
League: Maayboli
Password: maayboli_13
आप जैसे 'दादा' लोग आयेंगे तभी तो होगी काटें की टक्कर
मी उद्या ओपेन करेन रविवारी
मी उद्या ओपेन करेन रविवारी निवांत पणे
गांगुलीचे नाव घेतले तरी
गांगुलीचे नाव घेतले तरी महागुरू आले नाहीत इथे अजून??
गांगुली माझा फेवरेट खेळाडू आहे.
यंदा काय करणारेय
यंदा काय करणारेय गांगुली?..... काँमेंट्री?
गांगुलीला इतकी नावे ठेवु
गांगुलीला इतकी नावे ठेवु नका... यंदा पण त्याला हैद्राबादकडून विचारणा झाली होती... त्यानेच नकार दिला
गांगुलीने कॉमेंट्री केली तरी तो ती पण एकदम स्टाईलमध्ये करतो, रवि शास्त्रीच्यापेक्षाही भारी!
^^^^^^^^^^^^^^^^^ सहमत आहे...
^^^^^^^^^^^^^^^^^
सहमत आहे... कॉमेंटरी तर कॉमेंट्री.. दादा कसाही दिसत राहावा बस्स... थोडा चीअर गर्ल्सवर कॅमेरा कमी मारला तरी चालेल..
आपला अंदाज: टॉप ३: चेन्नई,
आपला अंदाज:
टॉप ३: चेन्नई, बंगलोर, दिल्ली
मिड ३: राजस्थान, मुंबई, कोलकत्ता
बॉटम ३: पंजाब, पुणे, हैद्राबाद
एकमेकाच्या मानेवर बसणारे
एकमेकाच्या मानेवर बसणारे एकमेकांच्या गळ्यात हात घालून मिरवताना दिसणार उद्यापासून या धाग्यावर -
भाऊ पण पाँटींग कॅप्टन
भाऊ

पण पाँटींग कॅप्टन
१००
१००
<< पण पाँटींग कॅप्टन >>
<< पण पाँटींग कॅप्टन >> सचिनला व्हायचं नव्हतं म्हणूनच !
पंटर कॅप्टन असल्यामुळे
पंटर कॅप्टन असल्यामुळे मुंबईला सपोर्ट करू की नको या द्विधेमधे आहे सध्या. एक दोन गेम्स झाल्यावर मग ठरवू...
पण सचिनला कॅप्टन का व्हायचं नव्हतं भाऊकाका??
पंटर कॅप्टन असल्यामुळे
पंटर कॅप्टन असल्यामुळे मुंबईला सपोर्ट करू की नको या द्विधेमधे आहे सध्या. एक दोन गेम्स झाल्यावर मग ठरवू... >> +१
Quoating a Reverse DON dialogue
मैं सचिन से इतनी मोहब्बत नही करता , जितनी पंटर से नफरत करता हू
<< पण सचिनला कॅप्टन का
<< पण सचिनला कॅप्टन का व्हायचं नव्हतं भाऊकाका?? >> वर्गातल्या सगळ्यात व्रात्य मुलालाच वर्गाचा 'मॉनिटर' करण्याची सचिनची मखलाशी असावी; भज्जीवरही वरताण असणारा पंटरच आला ना आतां वर्गात. काय पर्याय होता सचिनकडे !!!

<< पंटर कॅप्टन असल्यामुळे मुंबईला सपोर्ट करू की नको या द्विधेमधे आहे सध्या. >> आत्तांच एका मुलाखतीत पाँटींग म्हणालाय कीं विरुद्ध संघातला सचिन मैदानावर उतरला म्हणजे त्याच्या नांवाचा
होणारा उदघोष ऐकलाय; आतां आपल्या संघातल्या सचिनचा तसा ऐकायला मीं उत्सुक आहे !! पाँटींगमहाशय, जरा संभलके; तो उदघोष ऐकायचाच असेल तर तुमच्या नांवाचा उद्धार त्याहून अधिक जोरात होणार नाही याची मात्र काळजी घ्या !!
<आपला अंदाज: टॉप ३: चेन्नई,
<आपला अंदाज:
टॉप ३: चेन्नई, बंगलोर, दिल्ली
मिड ३: राजस्थान, मुंबई, कोलकत्ता
बॉटम ३: पंजाब, पुणे, हैद्राबाद >>> यंदा माझा तरी अंदाज आहे की मुंबई जिंकेल कदाचित... पंटरचा कितिहि राग आला, तरी एक चांगला प्लेयर आणि कॅप्टन आहे तो... त्यातच जिंकुन दिल नाही तर अंबानीवहिनी सगळे पैसे घेउन निघुन जायच्या IPL मधुन...त्यामुळे सचिन , पंटर आणि वेळ पाहता मुंबईचे दिवस चांगले वाटत आहेत...
किती का खराब असेना , अंदाज टंकवायला आपलं काय जातय.. !
माझा अंदाज - टॉप ३: चेन्नई,
माझा अंदाज -
टॉप ३: चेन्नई, मुंबई, कोलकत्ता
मिड ३: पुणे, बंगलोर, दिल्ली
बॉटम ३: पंजाब, राजस्थान, हैद्राबाद
पुणे मिड ३ मध्ये घातलेय कारण यावर्षी त्यांनी गांगुलीला हाकलला आहे
ओपनिंग सेरेमनी बघताय का
ओपनिंग सेरेमनी बघताय का कुणी?
कसला बोअर चाललाय प्रॉग्राम ..... Filmafare night वाटतीय
@अतुलनीय, राजस्थान बॉटम३
@अतुलनीय,
राजस्थान बॉटम३ मध्ये?
यंदा ते प्लेऑफ मध्ये जातील असे फार वाटतय (खर म्हणजे तेच जिंकावेत अस वाटतय ;))
त्याला कारणही तसेच आहे.... पूर्ण सीझन अॅव्हेलेबल असलेला वॉटसन, संथ खेळपट्ट्यांवर प्रभावी ठरेल असा केव्व्हॉन कूपर, शेफिल्ड शील्डची फायनल गाजवलेला जेम्स फॉल्कनर, पुनरागमन करायला उत्सुक पूर्ण तंदुरुस्त श्रीसंथ, गुणी युवा हरमितसिंग, श्रीलंकेचा उगवता तारा कुशल परेरा....जोडीला मागच्या सीझनमध्ये प्रभावी कामगिरी केलेले द्रवीड, रहाणे, हॉज, ऑवेस शहा, अजित चंडेला आहेतच!
मागच्या वर्षीपेक्षा नक्कीच खूप जास्त सरस वाटतो यंदाचा संघ
आता फक्त.... हल्ला बोल!
मागच्या वर्षी त्यांच्या
मागच्या वर्षी त्यांच्या बॉलिंगमधे काहि दम नव्हता त्यामूळे शेवटच्या सत्रामधे वाट लागली होती RR ची. यंदा तसे होण्याचे चान्सेस कमी आहेत.
MI balling अतिशय विचित्र स्वरुपात आहे. मलिंगा वगळता भरवशाचा death overs बॉलर नाही. तोही do or die matches मधे पाट्या टाकतोच. धवल कुलकर्णी बॉल स्विंग होताना उपयोगी येतो. मलिंगा नि पाँटींग दोन जागा घेणार हे नक्की झाल्यावर, उरलेल्या दोघांमधे पोलार्ड येणार (all rounder) मग उरलेल्या जागेत peterson ला बसवले तर johnson बाहेर राहणार. peterson खेळला तर ओझाला येउ शकत नाही मग पाचवा बॉलर कोण ? बाकी काहिही असले तरी ponting, pollock, rohit, maxwell, raayadu, karthik, हे fielding combination जबरदस्त आहे.
दिल्लीने मॉर्केलला बसवण्याचा मूर्खपणा गेल्यावर्षी प्रमाणे यंदा केला नाही तर ते शेवटपर्यंत जाऊ शकतील.
>>उरलेल्या दोघांमधे पोलॉक
>>उरलेल्या दोघांमधे पोलॉक येणार
पोलार्ड म्हणायचय का तुला?
आणि मग इतक्या महागात घेतलेल्या मॅक्सवेलच काय करणार? फ्रँकलीनला पण बाहेर बसावे लागणार!
मुळात पाँटींगला कॅप्टन बनवून त्यांनी एक फॉरेन स्लॉट फ्रीज करुन टाकलाय... त्यामुळे गोची आहे सगळी
>>मलिंगा वगळता भरवशाचा death overs बॉलर नाही
मुनाफ आहे की
Mumbai Indians are strong
Mumbai Indians are strong contenders - Ganguly
या वर्षी मुंबईच जिंकेल. नाही
या वर्षी मुंबईच जिंकेल. नाही म्हणजे प्रत्येक वेळी अशाच बोंबा मारत असतो
अवांतर : भिकारड्या शाहरुखची टीम सोडून कोणीही जिंकू दे

आणि मग इतक्या महागात
आणि मग इतक्या महागात घेतलेल्या मॅक्सवेलच काय करणार? फ्रँकलीनला पण बाहेर बसावे लागणार! >> हो खूपच muddled thinking वाटते MI चे. पाँटींग, सचिन किंवा रोहित हे सगळे strike rate 6-8 च्या मधे सहज ठेवतील पण सेहवाग, गेल, वॉटसन, मॅकम्मुल्लम जशी सुरुवात करतात तसे करणे शक्य नाही. मग अर्थात शेवटच्या overs मधे हुकुमी बॅट फिरवणारा हवा. पोलॉर्ड जर जम बसला असेल तर करु शकतो, काही अंशी रायुडु नि कार्थिक करु शकतात. मॅक्सवेल ह्या बाबतीमधे उपयोगी आहे पण तो आत कसा येणार तो आत आला तर पाचवा किंवा बेक अप सहावा बॉलर कोण ? सूर्यकुमार यादव उपयोगी आहे तर त्याला खेळवत नाही. बघूया कसे काय् करतात ते.
ओपनिंग सेरेमनी बघताय का
ओपनिंग सेरेमनी बघताय का कुणी?
कसला बोअर चाललाय प्रॉग्राम ..... Filmafare night वाटतीय >>> +१
काल लावला होता ओपनिन्ग सेरेमनी. मग दिपिका नाचायला आली. मग कार्यक्रमाची रुपरेषा लक्षात येवुन चॅनेल बदललाच झटक्यात.
प्रथम ग्रासे..... भवानीच्या
प्रथम ग्रासे..... भवानीच्या सामन्यातच सेहवाग दुखापतीमुळे बाहेर; सदाचंच झालंय हल्ली हें ' घायाळ वीरुसाठी' !
आज माझा सपोर्ट दिल्लीला
आज माझा सपोर्ट दिल्लीला
<< आज माझा सपोर्ट दिल्लीला
<< आज माझा सपोर्ट दिल्लीला >> आपल्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या तोंडचं रोजचं वाक्य ऐकल्यासारखं वाटलं !!
आज माझा सपोर्ट दिल्लीला >>
आज माझा सपोर्ट दिल्लीला
>> +१
फेसबूकावर एका मित्राची कमेंट: आयपीएल ओपनिंग सेरेमनी चालू आहे की बारबालानृत्यस्पर्धा?
मुंबईचे फॉरेन स्लॉट -
मुंबईचे फॉरेन स्लॉट - पाँटींग, पोलार्ड, मलिंगा आणि फिलीप हुघेस. सचिन सोबत त्याला ओपनीग ला आणावे. इतक्या महागात घेतलेल्या मॅक्सवेला बाहेर बसावे लागणार!
बॉलर - मलिंगा, हरभजन, ओझा, पोलार्ड, धवल कुलकर्णी/मुनाफ.
आज आगरकर ला दिल्ली कडून chance मीळेल का?
आयपीएल ओपनिंग सेरेमनी चालू
आयपीएल ओपनिंग सेरेमनी चालू आहे की बारबालानृत्यस्पर्धा?>>>
Pages