आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बंगाल्यांचा जळफळाट दादा ला काढले म्हणून जास्त होता
हो पण केदार, दादाला काढले कुणी?.... शहारुखनेच ना?.... मग त्याच्यावर राग असणारच ना?

Which I always believed was right decision
>> I too Happy
(पण गंमत म्हणजे आपल्याकडे स्टारला त्याची जागा दाखवणारे व्हिलन ठरतात.... जसा चॅपेल व्हिलन ठरला तसाच शाहरुख)
(तटी: मी दादा, शारुख किंवा चॅपेल यांच्यापैकी कुणाचाच सपोर्टर नाहीये ;))

>>म्हणून अंड्यालाही बंगाली आवडत नाहीत
गुड वन Rofl

>>आज महाराष्ट्रात राहून तुम्ही इतर संघाला सपोर्ट करताय!
चिल माडी..... हा फक्त खेळ आहे, युध्द् नाही Happy

धनंजय वैद्य, मी महाराष्ट्रात राहत नाही; चेन्नईमधे राहते. मग मी इतर संघांना सपोर्ट करू शकते का? की मी चेन्नईलाच सपोर्ट करायला हवं. Happy

नंदिनी,
तुम्ही मूळच्या महाराष्ट्रीयन ना?.... मग तुम्ही महाराष्ट्रालाच सपोर्ट केला पाहिजे.... उगाच राज्यद्रोहाचे पाप माथी घेउ नका Wink

अहो वैद्यबुवा,
अहो पोटापाण्यासाठी आम्हाला रोज अमेरिकन, ब्रिटीश झालच तर चायनावाल्यांना पण सपोर्ट द्यावा लागतो.... तिथे चेन्नई, बंगाली वगैरे तर आपली भारतीयच माणसे आहेत की.... करु द्या ना जरा त्यांना पण सपोर्ट Happy

तुम्ही मूळच्या महाराष्ट्रीयन ना?.... मग तुम्ही महाराष्ट्रालाच सपोर्ट केला पाहिजे.... उगाच राज्यद्रोहाचे पाप माथी घेउ नका< जन्माने कर्नाटकी आणि पूर्वज सगळे कर्नाटकातले. फक्त शिक्षण आणि नोकरी महाराष्ट्रात. गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्राबाहेर. आयपीएल सपोर्ट मुंबई इंडियन्सला. मुंबई महाराष्ट्रात येत नाही का? Proud

अहो वैद्यबुवा,
अहो पोटापाण्यासाठी आम्हाला रोज अमेरिकन, ब्रिटीश झालच तर चायनावाल्यांना पण सपोर्ट द्यावा लागतो.... तिथे चेन्नई, बंगाली वगैरे तर आपली भारतीयच माणसे आहेत की.... करु द्या ना जरा त्यांना पण सपोर्ट

आयपीएल सपोर्ट मुंबई इंडियन्सला. मुंबई महाराष्ट्रात येत नाही का?

व्वा, एकदम मुद्देसूद उत्तर.

शेवटी चांगल्या खेळाची वाहवा करावी, संघ, माणूस कुठल्याहि देशाचा, प्रांताचा असेना. ते खरे क्रिकेट प्रेम. बाकी फालतूपणा.

धनंजय वैद्य | 12 March, 2013 - 17:40 नवीन
वरील प्रतिक्रिया पाहून खुप वाईट वाटले. आज महाराष्ट्रात राहून तुम्ही इतर संघाला सपोर्ट करताय! यामुळेच मराठी माणूस मागे आहे. खुप वाईट वाटत

>>>>>>>>>>>>>>

ज्वलंत मुद्दा मांडलात राव.

पण अंड्या म्हणतो, नक्की सपोर्ट करावा तर कोणाला करावा..
मराठी माणसांचे दोन गट इथेही पडलेत,
एक मुंबई तर एक पुणे
आता तुम्हीच सांगा धनंजयराव... कोणत्या टीमचा झेंडा घेऊ हाती.. Sad

अवांतर - मायबोलीवर बेटींग बेटींग खेळायला परवानगी मिळते का? कोणी सांगेल का?

कोणत्या टीमचा झेंडा घेऊ हाती..

तुम्ही कुणाचाहि झेंडा हाती घेतला तरी काय फरक पडतो? जो संघ जिंकायचा असे ठरले असेल तेच जिंकतील.
झेंडा हाती घेण्या ऐवजी हात खिशात घाला नि बक्कळ पैसा योग्य व्यक्तीकडे द्या, मग फरक पडेल.

अहो साहेब, मागील खेळाच्या वेळी पंजाब वाल्यांना विचारले होते की, युवराज पुण्याचा कॅप्टन आहे तुम्ही पुण्याला सपोर्ट करताल की गिलख्रिस्ट कॅप्टन असणार्या इलेवन ला करणार तर 99% लोकांनी उत्तर दिले की पंजाबलाच! आता बंगाल्यांना विचारले तरी 80% सांगितले की दादाला शुभेच्छा , पण सपोर्ट कोलकात्यालाच! घ्या! त्या संघांना सपोर्ट करणारे भरपूर आहेत, पण पुण्यासारख्या नवीन संघाला याची खरी गरज आहे.
अवांतर : ज्या दिवशी पुणे हारते त्या रात्री मला झोप येत नाही. मी पुण्याचा नसुन नगरचा आहे. चु भू दे घे .

ज्या दिवशी पुणे हारते त्या रात्री मला झोप येत नाही.>>> अरे रे.
फारच मनाला लावुन घेता. Happy

जरा ह्याच्याकडे एक बिजनेस मॉडेल म्हणून बघा.
भारत हरला की झोप येत नाही इथवरच ठीक आहे.
अर्थात माझं वैयक्तिक मत.

नम गा पै
गुगलबाबाना शरण जा. तो सर्व दाखवेलच की.

जो संघ भारतासाठी एक नवोदित, प्रतिभावान असा सलामीचा फलंदाज किंवा यष्टीरक्षक/फलंदाज किंवा लेग-स्पीनर मिळवून देईल, त्या संघाला माझा मोसमासाठी कायमचा पाठींबा. बाकी प्रत्येक सामना [अर्थात, जो पाहीन तोच] ठरवेल माझा सपोर्ट कोणाला तें, त्या सामन्यापुरता !! Wink

मागील खेळाच्या वेळी पंजाब वाल्यांना विचारले होते की, युवराज पुण्याचा कॅप्टन आहे तुम्ही पुण्याला सपोर्ट करताल की गिलख्रिस्ट कॅप्टन असणार्या इलेवन ला करणार तर 99% लोकांनी उत्तर दिले की पंजाबलाच! आता बंगाल्यांना विचारले तरी 80% सांगितले की दादाला शुभेच्छा , पण सपोर्ट कोलकात्यालाच!>> कुठे आहे हा सर्व्हे.

बाकी, माझ्या मेंदूमधे असा काही डेटा फीड झालाय की पुणे टीम आहे हेच माझ्या कधी लक्षात राहत नाही. बाकी ८ टीम्सची नावं लोगो=किंमर्-खेळाडू-मा॑लक हे सगळं लक्षात आहे. Happy

जो संघ भारतासाठी एक नवोदित, प्रतिभावान असा सलामीचा फलंदाज किंवा यष्टीरक्षक/फलंदाज किंवा लेग-स्पीनर मिळवून देईल, त्या संघाला माझा मोसमासाठी कायमचा पाठींबा. >> भाऊ , तुम्ही तर पूर्ण रिकामा ग्लास (हवेने ) भरलेला आहे असे मानण्याएवढे Optimistic दिसता . It's just a circus . Enjoy it till it lasts Happy

जो संघ भारतासाठी एक नवोदित, प्रतिभावान असा सलामीचा फलंदाज किंवा यष्टीरक्षक/फलंदाज किंवा लेग-स्पीनर मिळवून देईल, त्या संघाला माझा मोसमासाठी कायमचा पाठींबा.>>>>>>>>>>>>>

.
थोडक्यात """"चेन्नई सुपर किंग्स"""" ला पाठिंबा तुमचा Happy

जरा ह्याच्याकडे एक बिजनेस मॉडेल म्हणून बघा.
भारत हरला की झोप येत नाही इथवरच ठीक आहे.
>>>>>>>>
हे बरंय राव, हे म्हणजे असे झाले की आपली ती श्रद्धा अन दुसर्‍याची ती अंधश्रद्धा. Wink

मला देखील कलकत्ता हरली की शाहरुखचा उदास चेहरा बघवत नाही. Sad

बाकी जिंकली की तो मस्त नाचून वगैरे दाखवतो, चार घटकांचे मनोरंजन होते. Happy

<< It's just a circus . Enjoy it till it lasts >> केदारजी, हें तर मी म्हटलंच आहे. बाय द वे, सुपरस्टार्स स्टार्स कुठूनही मिळूं शकतात - शाहरुखचं सुरवातीचं लोकप्रिय सिरीयल 'सर्कस'च होतं ना !!! Wink
<< थोडक्यात """"चेन्नई सुपर किंग्स"""" ला पाठिंबा तुमचा >> उदयनजी, ' नवोदित' म्हटलंय मी !!! Wink

<< आजचा भारतीय संघ बघा. ४ जण तर चेन्नई वालेच आहे...भविष्यात पण असेच असेल ना...>> राष्ट्रीय संघात पूर्वी ७-८ खेळाडू मुंबईचेच असत; याबाबतचं वर्तमान आणि भविष्य फार बोलकं आहे !!! Wink

भविष्य कोणी पाहिलेय,
भविष्यात भारत-पाक- एक झाले तर राष्ट्रीय संघात ४-५ खेळाडू लाहोरचेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मी पुण्याचा नसुन नगरचा आहे.

म्हणूनच. काही वर्षे पुण्यात राहून पहा. एकदम धीरोदत्तपणा अंगी येईल. काय वाट्टेल ते झाले तरी दुपारी १२ ते ४ नि रात्री ८ ते दुसर्‍या दिवशी सकाळी १०, ११ पर्यंत व्यवस्थित झोप लागेल. गिर्‍हाईकांना बसू दे बोंबलत.
Wink Light 1

थोडक्यात """"चेन्नई सुपर किंग्स"""" ला पाठिंबा तुमचा >> Lol

जो संघ भारतासाठी एक नवोदित, प्रतिभावान असा सलामीचा फलंदाज किंवा यष्टीरक्षक/फलंदाज किंवा लेग-स्पीनर मिळवून देईल, त्या संघाला माझा मोसमासाठी कायमचा पाठींबा >> भाऊ practically तसे होणे बरोबर नाही. IPL च्या कामगिरीवर टेस्ट मधे लोकांना घेउ नये. नोंद घेण्यापलीकडे त्याचा उपयोग होउ नये. बाबा अपराजिथवर घोडे लावा.

पंजाब, दिल्ली आणि नव्या हैद्राबादचे कुणी नाहीत का सपोर्टर?
>>>>>>>>>>>
सध्यातरी नाही....
पण त्यांच्या चीअर गर्ल्स तश्याच निघाल्या तर हा अंड्या पार्टी बदलू शकतो.. Wink

Pages