आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
सचिन आहे तोपर्यंत क्रिकेट
सचिन आहे तोपर्यंत क्रिकेट पाहावेसे वाटते.
नंतर सगळा आनंद आहे.
"रे तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही ." हे गाणे ऐका एकदा.
<< IPL च्या कामगिरीवर टेस्ट
<< IPL च्या कामगिरीवर टेस्ट मधे लोकांना घेउ नये. नोंद घेण्यापलीकडे त्याचा उपयोग होउ नये.>> असामीजी, मान्य. मलाही खरं तर नवीन प्रतिभा नजरेत भरावी एवढंच म्हणायचं होतं .
<< सचिन आहे तोपर्यंत क्रिकेट पाहावेसे वाटते.>> क्रिकेटवेड्यांसार्ठी हें वाटणं तात्पुरतं असतं व तें तसंच असावं. सी.के. नायुडू निवृत्त झाले तेंव्हा माझ्या वडिलानाही नक्की असंच वाटलं असणार; पण क्रिकेटवेडामुळे वडिलांच्या निधनापर्यंत ते वॉरेल.. हजारे....... सोबर्स.. गावसकर.. कपिल देव.. सचिन.. शेन वॉर्न .. इ.इ. यांची सबब दाखवत क्रिकेट पहातच असत !!
पुण्यात मॅचेस होणार
पुण्यात मॅचेस होणार फायनली.... हुर्रे

तिकिट्स कधी ओपन होतायत याचीच वाट बघतोय.... २-३ मॅचेस तरी नक्की बघणार यंदा
धोनी, विजय, जडेजा, अश्विन
धोनी, विजय, जडेजा, अश्विन ......सगळेच फॉर्मात.... चेन्नईचे चान्सेस ब्राईट आहेत!
धवनचा हात फ्रॅक्चर झालाय
धवनचा हात फ्रॅक्चर झालाय म्हणे.... आयपीएलात खेळणार की नाही मग तो?
बिच्चारे हैद्राबाद
युवराज पुण्याचा कॅप्टन आहे
युवराज पुण्याचा कॅप्टन आहे तुम्ही पुण्याला सपोर्ट करताल की गिलख्रिस्ट कॅप्टन असणार्या इलेवन ला करणार तर 99% लोकांनी उत्तर दिले की पंजाबलाच! आता बंगाल्यांना विचारले तरी 80% सांगितले की दादाला शुभेच्छा , पण सपोर्ट कोलकात्यालाच! घ्या! त्या संघांना सपोर्ट करणारे भरपूर आहेत, पण पुण्यासारख्या नवीन संघाला याची खरी गरज आहे.>>>>>> असामी म्हणतो ते बरोबर आहे. ह्या संघांमध्ये खरच किती त्या स्टेट/शहराचे खेळाडू आहेत. नाईट रायडर्स जिंकले की खरा मान शहारुख आणि त्या संघाला मिळतो. फक्त नाव कोलकाता किंवा पंजाब आहे म्हणून त्यांना सपोर्ट करणार्या मंडळीना नेमकं काय साधायचं आहे ते कळत नाही. भारताचा संघ खेळत असेल दुसर्या देशांशी किंवा स्टेटच्या मॅचेस मध्ये हे सगळं ठीक आहे.
आय पि एल म्हणजे क्रिकेट खेळ प्रेमींची कर्मणूक! (बॉल्र लोकांची धुलाई सुद्धा.. पण तो वेगळा मुद्दा आहे).
मला सांगा, मुंबईच्या टीममध्ये
मला सांगा,
मुंबईच्या टीममध्ये किती मराठी प्लेअर्स आहेत हो...?
सचिन सोडला तर दुसर्या कोणालाही चान्स मिळणे दुर्गम..
किंवा
पुण्याच्या संघात किती पुणेरी खेळाडू खेळले...?
मुझुमदार-वाघ बस्स...
त्यामूळे या ठिकाणी प्रादेशिकता आणणे साफ चुकीचे...!
मी सांगू इच्छितो की he INDIAN 'PREMIER' LEAGUE aahe
tyamule yaala 1निख्खळ मनोरंजन म्हणून पहावे...!
तमिळनाडूमधल्या मॅचेससाठी
तमिळनाडूमधल्या मॅचेससाठी श्रीलंकन खेळाडूंना सुरक्षा पुरवावी अशी मागणी केलीय श्रीलंका बोर्डाने!
पाठीच्या दुखण्यामुळे फाफ डू
पाठीच्या दुखण्यामुळे फाफ डू प्लेसिस खेळू नाही शकणार.... चेन्नईला आता नवा ओपनर शोधावा लागेल!
<<तामिळनाडूतील... श्रीलंकन
<<तामिळनाडूतील... श्रीलंकन खेळाडूंना सुरक्षा पुरवावी अशी मागणी केलीय श्रीलंका बोर्डाने!>> आणि, श्रीलंकेतील तामिळीना सुरक्षा मिळावी म्हणून करुणानिधीनी केंद्रसरकारला बाऊन्सर टाकायला सुरवात केलीय !!
बाबांनो तुम्ही असेच करा!
बाबांनो तुम्ही असेच करा! राज्यधर्म राहिलाच नाही आजच्या पिढीत ! तुमच्यापेक्षा आम्ही बरे , निदान आपल्या जवळच्या पुण्याला तरी सपोर्ट करतो ! एनी वे ह्या आयपीएल ला पुणे च स्थान मध्यभागी राहणार . जय भवानी , जय शिवाजी , जय पुणे वॉरियर !
एनी वे ह्या आयपीएल ला पुणे च
एनी वे ह्या आयपीएल ला पुणे च स्थान मध्यभागी राहणार << म्हणजे निकालामधे पाचव्या स्थानावर येणार हे ठरवून घेतलंय का आधीच? पैसे लावायला हवेत मग या टीमवर.
अहो असले कसले सपोर्टर
अहो असले कसले सपोर्टर तुम्ही?..... सपोर्ट करताय आणि म्हणताय की पुणे च स्थान मध्यभागी राहणार?
अरे म्हणा की पुणे जिंकणार.... म्हणायला काय जातय?
पुणे जिँकणारच आयपीएल 6 चा
पुणे जिँकणारच आयपीएल 6 चा करंडक !
>>पुणे जिँकणारच आयपीएल 6 चा
>>पुणे जिँकणारच आयपीएल 6 चा करंडक
गांगुलीच्या जाण्याने चान्सेस वाढलेत म्हणा पुण्याचे
बाबांनो तुम्ही असेच करा!
बाबांनो तुम्ही असेच करा! राज्यधर्म राहिलाच नाही आजच्या पिढीत ! >> अहो पुण्याचा नि राज्याचा संबंध १८०० मधेच संपला.
पुण्याचे नेतृत्व युवी करणार
पुण्याचे नेतृत्व युवी करणार नाही म्हणे....सहाराने आता कारकूनाला गळ घातलीय!
म्हणजे आता ९ पैकी पाचच संघांचे कर्णधार भारतीय असतील!
मुंबईच्या मुंबईत होणारया
मुंबईच्या मुंबईत होणारया मॅचेसची ७५०/- ची सगळी तिकीटे सोल्ड आऊट का दाखवतायेत?? की अजुन विक्री सुरु नाही झालीये??
पुण्याची तिकिटे तरी अजुन
पुण्याची तिकिटे तरी अजुन आलेली नाहियेत बुक माय शो वर.... मुंबईचे काही माहित नाही!
ESPN वर Fantasy League
ESPN वर Fantasy League डिक्लेअर झालीय:
http://games.espncricinfo.com/fantasy/homepage.aspx
कोणीतरी मायबोली लीग चालू करा तिकडे
बुक माय शो वर आली पुण्याची
बुक माय शो वर आली पुण्याची तिकिटे
अस्मादिकांनी पुणे वि राजस्थानची काढली तिकिटे
चेन्नईच्या मॅचेसमधे
चेन्नईच्या मॅचेसमधे श्रीलंकेचे खेळाडू खेळणार नाहीत.
नंदिनी, फक्त चेन्नईत
नंदिनी,
फक्त चेन्नईत होणार्या सामन्यात बॅन असल्यामुळे फारसा फरक नाही पडणार बहुतांश संघांना... तसे फॉरेन प्लेयर्सच्या बाबतीत बर्यापैकी ऑप्शन असतात संघांकडे!
कुलसेकरा आणि धनंजयाला जरा फरक पडेल कारण त्यांच्या निम्म्या मॅचेस चेन्नईतच असतील!
चेन्नई संघाने देखील त्यांच्या चेन्नईतल्या मॅचेस मध्ये एका स्टार फॉरेनर्/लोकल खेळाडूला आधीच सांगून (टूर्नामेंट सुरु व्हायच्या आधी) बाहेर बसवावे हे नैतिकदृष्टया योग्य होईल.... पण असे होण्याची शक्यता फारच कमी आहे
आता कारकून नाही म्हणजे परत
आता कारकून नाही म्हणजे परत एकदा युवीला गळ घालणार बहुतेक सहारावाले कर्णधारपदासाठी!
किंवा मग रॉस टेलर नाहीतर स्टीव्ह स्मिथला लागेल लॉटरी!
एक वाईट बातमी; न्यूझीलंडच्या
एक वाईट बातमी; न्यूझीलंडच्या जेस्सी रायडरवर रस्त्यावरच्या भांडणातून झालेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन 'कोमा'त गेला आहे. आयपीएलचा तो एक स्टार खेळाडू व माझ्या आवडीचा. दिल्ली डेअरडेव्हील्ससाठी तो भारतात येण्याच्या तयारीतच होता. त्याच्या प्रकृतित सुधारणेसाठी प्रार्थना !
भाऊकाका जेस्सी रायडरला लवकर
भाऊकाका
जेस्सी रायडरला लवकर बरं वाटो.
भाऊ, आताच वाचली ती बातमी...
भाऊ, आताच वाचली ती बातमी... जेस्सी रायडर लवकर बरा होवो!
पुण्याकडुन रायडर चांगला खेळला
पुण्याकडुन रायडर चांगला खेळला . दोन सामने तर त्याच्यामुळेच जिँकले गेले. लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा . जय पुणे वॉरियर !
अरे त्या मॅथ्यूजला काय केलय
अरे त्या मॅथ्यूजला काय केलय पुण्याचा कॅप्टन?
गांगुलीला परत बोलवायची हीच वेळ आहे, युवी, क्लार्क नाही म्हंटल्यावर तर सहाराने गांगुलीचा विचार करायला पाहिजेल होता
दादा नाही म्हणजे पुण्याचा सपोर्ट निम्म्याने कमी होणार..... कमॉन दादा, वी मिस यु..... तेरे बिना आयपीएल सुनी सुनी है
लोकप्रिय, तुम्ही आयपीएल टू
लोकप्रिय,
तुम्ही आयपीएल टू आयपीएलच उगवता का?.... इतर वेळी कुठे असता?
खरय यार.... गांगुली हवा होता!.... माझी हक्काची पंचिंग बॅग गेली
Pages