मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परम

Aahana हे नावं मराठीत कसे लिहायचे ???

http://www.babynology.com

ह्या साईट वर भरपूर ऑप्शन आहेत नावांचे आणि सुट होतात की नाही ते पण कळते (नुमरोलोजी)

केदार ते "आहना" असणार... अर्थ काय आहे? >>>> वेका नावाचा अर्थ सूर्याचे पहिले किरण असा आहे
पण मि जन्म दाखल्यावर अहना अस टाकलंय चालेल काय ????

मुलाचे की मुलीचे ?
तरिहि....
साहिल, स्वानन्द, समय,
स्वरा, सई, सिया, स्लेषा.... Happy

लेखाची सुरुवात........
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे.
.
.
.

पण माझ्या माहिती प्रमाणे राशी-अक्षरावरून व्यवहारातील संबोधण्याचे (उच्चारण्याचे) नाव ठेवत नाहीत..... Uhoh

इब्लिस | 25 August, 2011 - 23:18
ह्म्म्म...
नांव सुचवतांना अर्थ पण लक्षात घेत जा लोक हो...
..>>>>>>>

१०१% अनुमोदन

नमस्कार
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "न " आहे. आणि जन्म १२-१२-२०१२ चा आहे. पाडव्याला बारसे करायचे ठरवले आहे पण अजून नावामध्ये एकमत होत नाही. आम्हाला थोडेसे हटके/ वेगळे/unique नाव हवे आहे.
लिस्ट मध्ये असलेली नावे (रचित, निनाद, विवान, विहान)
मला अ वरुन मुलासाठी नाव हव आहे.
तसेच स आणि क नावामध्ये असलेली नावे पण मी शोधत आहे.(सायक, कलश).
कृपया मदत करा.

माझ्या मैत्रीणीच्या मुलाचे नाव निनांशू आहे अर्थ माहीत नाही.
नितांशू असंही नाव वाचलंय.
कणाद. अन्मय, सात्यकी, सार्थ, यथार्थ

मला अ वरुन मुलासाठी नाव हव आहे.
>> अर्णव, अरिष्मान, अरमान, आयुष, अहम, अनेक (हे एका गुज्जु मित्राचे नाव आहे!!!), अनिर, अनिरूद्ध, अनिकेत.

suchaa | 28 March, 2013 - 14:06 नवीन
मला मल्हार नावाचा अर्थ हवाय...>>>

मल्हार बहुदा राग आहे, मियाँ मल्हार मेघमल्हार

मल्हार
मल्ल दैत्याचे हरण करणारे शंकराचे मार्तंडभैरव रुप म्हण्जेच
खंडोबा

Pages