मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Anahita means Goddess of water and purity. असं विकी वर आहे.

शिरीनचा अर्थ sweet.

शिरीन इबादी ही Human Right Activist होती.

आणि हे नाव सु.शि. च्या पुस्तकात आहे - दुनियादारी Happy

मला एक असे नाव हवे आहे ज्याचा अर्थ सुन्दर व हेल्दी (स्वस्थ) असा होइल मला माझ्या मैत्रिनिच्या क्लिनिकसाथि नाव हवे आहे

मला एक असे नाव हवे आहे ज्याचा अर्थ सुन्दर व हेल्दी (स्वस्थ) असा होइल मला माझ्या मैत्रिनिच्या क्लिनिकसाथि नाव हवे आहे

.

prady, अमि,अश्विनी thanks a lot for reply. पन मला एक catchy नाव हव आहे.एक modern general+ cosmetic clinic आहे.

पर्णिका नावाचा अर्थ काय आहे?

माझ्या मुलीचे नाव मला पार्वतीच्या नावावरुन हवे होते. तिचे जन्माक्षर प आले म्हणुन पर्णिका पाळण्यात ठेवले आणि भार्गवी हे नांव आधीच ठरव्ल्याप्रमाणे सध्या आहे.

पर्णिकाचा अर्थ देखील काही साईट्स वर पार्वती दिला आहे. कुणी नक्की सांगु शकाल काय?

सानवी या शब्दाचा अर्थ कोणाला माहिती आहे का?
तसेच हा शब्द लिहिताना सानवी की सान्वी असा लिहायचा?
मला माझ्या मुलिसाठी हे नाव आवडले आहे...

तसेच मधुजा या नावाचा अर्थ काय आहे?

कृपया मदत करा....

माझ्या मुलीचे नाव मला पार्वतीच्या नावावरुन हवे होते. तिचे जन्माक्षर प आले म्हणुन पर्णिका पाळण्यात ठेवले आणि भार्गवी हे नांव आधीच ठरव्ल्याप्रमाणे सध्या आहे
जन्माक्षरावरुनच नाव ठेवाव का ? एकच नाव असाव की दोन असावीत ?
याबद्दल कुणीतरी कृपया थोड मार्गदर्शन करा

.

मधुजा-> मधापासुन जन्मलेली...>>> बापरे हाप्रकार भयंकर आहे ! बापाचे नाव काय लावणार ? Light 1

मुलांच्या नावाच्या बीबी वर मुलींची नावे? असो.
हिडिंबा, कृत्या, कैकेयि, शूर्पणखा अशी आमच्या काळातील सुंदर सुंदर नावे आजकाल फॅशनमधे नाहीत का?
मुलांच्या नावांमधेहि घटोत्कच, धृष्टद्युम्न, रावण, अशी नावे आढळत नाहीत आजकाल!
काळ बदलला हेच खरे.

Light 1

अनिल, जन्माक्षरावरुनच नांव ठेवावे की नाही याबद्दल माहिती नाही. पण माझ्या दोन्ही मुलांची नांव मी जन्माक्षरावरुन ठेवलीत. मुलाचे र अक्षर आलेले म्हणुन राधेय आणि मुलीचे पर्णिका. मुलाचे नांव एकच (पाळण्यातले अन सध्याचे) आहे. मुलीच्या वेळी पार्वतीचेच नांव हवे असा हट्ट होता Happy पर्णिका हे नांव नक्की पार्वतीचे आहे की नाही याबद्दल गोंधळात होतो म्हणुन मग भार्गवी ठेवले. पार्वती , गौतमी, भार्गवी, शांभवी आणि पर्णिका अशी पाचही आवडती नाव आम्ही पाळण्यावर लिहिली होती.

पर्णिका या नांवाने पार्वतीचा कुठे उल्लेख केला आहे याबद्दल मी सध्या शोधते आहे. कुणाला माहिती असल्यास सांगावे.
एक नांव की दोन नावे याबद्दलही मला फारशी माहिती नाही. माझ्याच घरात हे दोन्ही प्रकार आहेत Uhoh जाणकार सांगु शकतील.

पर्णिका हे नांव नक्की पार्वतीचे आहे की नाही याबद्दल गोंधळात होतो म्हणुन मग भार्गवी ठेवले. >>>>>>>>>> भार्गवी म्हणजे गंगा ना? भृगु ॠषींनी गंगा नदीचे पाणी पिउन ती नष्ट केली व नंतर त्यांची प्रार्थना केल्यावर मांडी फोडुन तिला बाहेर काढले म्हणुन गंगेचे नाव भार्गवी पडले अशी कथा ऐकिवात आहे. अजुन कोणाला माहीतेय का? Uhoh

मुलांच्या नावाच्या बीबी वर मुलींची नावे? असो.
हिडिंबा, कृत्या, कैकेयि, शूर्पणखा अशी आमच्या काळातील सुंदर सुंदर नावे आजकाल फॅशनमधे नाहीत का?
मुलांच्या नावांमधेहि घटोत्कच, धृष्टद्युम्न, रावण, अशी नावे आढळत नाहीत आजकाल!
काळ बदलला हेच खरे.

>>>>

झक्की

आपले विचार किती जुळतात नाई !!!

मागे याच धाग्यावर कोणाला तरी ह वरुन नावे हवी होती ...मी सुचवलेली....."हिरण्याक्ष" हिरण्यकश्यपु , हरीणराव ...हत्तीश ....हिडिंबा .....

Proud

|| राम राम ||
मंडळी...

माझ्या भाचीसाठी " प " वरुन नाव हव आहे
तुम्हि सुचवु शकाल तर बर व्हइल..

सानवी या शब्दाचा अर्थ कोणाला माहिती आहे का?
तसेच हा शब्द लिहिताना सानवी की सान्वी असा लिहायचा?
मला माझ्या मुलिसाठी हे नाव आवडले आहे...>>>>
सान्वी हे बरोबर आहे. सान्वी म्हणजे लक्ष्मी Happy

मला एक मदत हवी आहे, मला कोनि मारुतिचि नावे सागु शकेल का? मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

Pages