आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी fielding चे amazing demonstration दिसणार आहे त्याबद्दल excited आहे.

तू फिल्डींगबद्दल इतका का आशावादी आहेस? >> तु आयपील पाहतोस ना ? in general त्यातले fielding standard कसे वाटते तुला ? Aus, RSA, kiwis वगैरे असल्यामूळे in general fielding standard high असतात त्यामूळे मजा येते. गेल्या वेळी मी steven smith ची एकही मॅच चुकवली नव्हती. he was dynamite. Jadejaa is treat to watch, so is Rohit and Rainaa. pollard, डि-विल्लिअर्स जे काहि प्रकार करतो ते काय अचाट असतात. Deccan chargers मधून Gibbs retire होण्याआधी एका बाजूला तो नि दुसर्‍या बाजूला रोहित शर्मा हे कसले potent combination झाले होते आठवतेय का ? Ponting is back so that will be something to look forward to.

>>तु आयपील पाहतोस ना ?
मी फक्त आयपीएलच पाहतो Wink

लास्ट सीझनचा बोथा-रहाणे कंबाइन कॅच आपला सगळ्यात आवडता आहे Happy

वेळापत्रक वगैरे टाका राव...........:)
.
.आपला संघ या ही वेळी.........कोलकता क्नाईट रायडर्स ............कोरबो लडबो जितबो रे.........

उदयन, मी एकदा सर्वच्या सर्व टीम्सना सपोर्ट केलेला आहे. Happy सध्या तरी मुंबई आणी चेन्नई, हैद्राबादवाले काय रंग दाखवतात बघू....:)

Mala ek samajat nahi ki tumhi lok pune warrior la ka suport karat nahi? Tyanech aaplya punyache nav jagat roshan kele aahe.

असामी, अगदी तसेच माझे राजस्थान रॉयल्सच्या बाबतीत झालय Happy
आपला सपोर्ट यावर्षी पण RR लाच असणार!

धनंजय वैद्य | 8 March, 2013 - 07:40 नवीन
Mala ek samajat nahi ki tumhi lok pune warrior la ka suport karat nahi? Tyanech aaplya punyache nav jagat roshan kele aahe.

खीक! एक पुणेकर दुसर्या पुणेकराला कधी सपोर्ट करतो काय?
नशिब पुणे वारियर्स विरोधी मंड्ळ स्थापन झाले नाही अजुन.
पुणेकरांनो दिवे घ्या!

एक पुणेकर दुसर्या पुणेकराला कधी सपोर्ट करतो काय? >> अहो त्या टिम्स ची नावे फक्त अशी आहेत हो. टिम सहाराची,खेळणारे पन्नास टक्के पुण्याबाहेरचे. ह्यात जगात नाव रोशन करण्याजोगी काय गोष्ट आहे Happy

अरे व्वा!.... निघाला का धागा!
आपला सपोर्ट इतके दिवस मुंबई इंडियन्सला होता... भज्जी कॅप्टन झाल्यावर जरा चिडचिड झाली.... आणि आता तर तो माजोरडा ऑसी कॅप्टन... अगदी सचिन नाही तर दुसरा कुणीतरी मुंबईकरच व्हायला हवा होता कॅप्टन
द्रवीड साठी थोडा सपोर्ट राजस्थानला पण!
ये दिल कहे मुंबई या राजस्थान पर दिमाग कहे चेन्नई Happy

आत्ताच आयपीएलची अ‍ॅड पाहिली.... अजिबात आवडली नाही Angry
ती आगाऊ फराह डोक्यात जाते.... झंपिंग झपँग.... काहीही!

बॉलीवूड का किंग कौन......... शाहरुख खान.

खानो मे खान ................... शाहरुख खान

थ्री चीअर (गर्ल्स) फॉर ...... शाहरुख खान

कोरबो लोरबो जितबो रे... कोरबो लोरबो जितबो शाहरुख खान....

बुमरँग,
अगदी अगदी.... ती फराह कायम दमातच घेत असते लोकांना!

अंड्या, अरे तो शारुख मालक आहे म्हणून खुद्द बंगाली लोक पण सपोर्ट करत नाहीत कोलकत्त्याला!

झकासराव,
पुणेकरांचे टिपीकल शालजोडीतले हा एक प्रकारे पाठिंबाच समजायचा पुणे टीमने Wink

तो वॉटसन गेला परत ऑस्ट्रेलियाला.... यावर्षी पण उशिराच दाखल होणार की काय आयपीएलमध्ये?

अरे तो शारुख मालक आहे म्हणून खुद्द बंगाली लोक पण सपोर्ट करत नाहीत कोलकत्त्याला!

>>> Lol

शाहरूख खानने टीम विकत घेतल्यावर (आणि आपण कलकत्त्यावर किती प्रेम करतो यावर एक प्रेस कॉन्फरन्स झोडल्यावर) एक बंगाली जर्नलिस्ट म्हणालेला "उसको कोलकाताका स्पेलिंग आता क्या पूछो"

माझा संघ
चेन्नई सुपरकिंग्स

या वेळी रैना धोनी आश्विन फार्मात आहे

बंगाली जर्नलिस्ट म्हणालेला "उसको कोलकाताका स्पेलिंग आता क्या पूछो">>> यावरुनच आजकालच्या जर्नलिस्ट लोकांची मानसिकता समजुन येते Biggrin कुणाला काय आणि कधी विचारायचे याचे शिक्षण घ्यायचे विसरलेत

अरे तो शारुख मालक आहे म्हणून खुद्द बंगाली लोक पण सपोर्ट करत नाहीत कोलकत्त्याला! >>
पण शाहरूख मालक आहे म्हणूनच ४ वेळा सपाटून मार खाऊनही it was one of the most supported Teams !! Happy
बाय द वे , बंगाल्यांचा जळफळाट दादा ला काढले म्हणून जास्त होता (Which I always believed was right decision ) Happy दादा टीम मध्ये नसताना इंडियन टीम ची हुर्यो करणारी लोक आहे ती . आता जिंकल्यावर तेही खूश आहेत .

अंड्या, अरे तो शारुख मालक आहे म्हणून खुद्द बंगाली लोक पण सपोर्ट करत नाहीत कोलकत्त्याला!
>>>>>>>>
पण अंड्या कुठे बंगाली आहे.
तसे पण बंगाली लोकांना अंड्यापेक्षा मछली जास्त आवडते म्हणून अंड्यालाही बंगाली आवडत नाहीत. Wink
आपला सपोर्ट बंगाल्यांना नाही तर शाहरुखला आहे.

बाकी केदार जाधव यांच्याशी प्लस वन.

वरील प्रतिक्रिया पाहून खुप वाईट वाटले. आज महाराष्ट्रात राहून तुम्ही इतर संघाला सपोर्ट करताय! यामुळेच मराठी माणूस मागे आहे. खुप वाईट वाटले.

Pages