..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

०४/०७४:
चंदू आणि रजनी यांचे नुकतेच लग्न झालेले असते. एकमेकांशिवाय दोघांना जराही करमायचे नाही. तशात लग्नानंतरची पहिलीच होळी येते. चंदूला होळी प्रचंड प्रिय तर रजनीला रंगांची अ‍ॅलर्जी. चंदूचे मित्र आणि मैत्रिणी त्या दोघांनाही होळीसाठी बोलवायला येतात. रजनी तिचे न येण्याचे कारण सगळ्यांना सांगते आणि मग ते तिला आग्रह करत नाहीत. रजनी नाही येत म्हणून चंदूही जायला तयार नसतो. पण सगळे मित्र त्याचे जराही ऐकतच नाहीत. त्याला ओढतच घेऊन जातात. दुपारी रंग खेळून झाल्यावर, भांग पिण्याआधी चंदू रजनीला फोन करतो - ती कशी आहे याची चौकशी करायला! ती काय उत्तर देइल?

(हे खूप सोप्पय)

०४/७२ हे उत्तर नाही आहे, पण तरी...

कल की हसीन मुलाकात के लिये,
आज रात के लिये,
हम तुम जुदा हो जाते है
अच्छा चलो सो जाते है Happy

नाही दिनेशदा Happy

चला मी उत्तर सांगुनच टाकतो. Happy

०४/७२
कि (key) गल (girl) है कोई नही
तेरी आंखोसे लगता है
के तू कल रात से सोई नही

Proud

०४/०७३:
यशोदाबाई दर उन्हाळ्यात चिकवड्या (साबुदाण्याच्या पापड्या) घालायच्या. किशनला, त्यांच्या मुलाला, त्या प्रचंड आवडायच्या. संध्याकाळच्या आत अर्ध्याहून जास्त चिकवड्या फस्त करायचा तो. आपण गट्टम होणार याचे दु:ख पण यशोदाबाईंवरचे अतिव प्रेम यांच्या कात्रीत सापडलेल्या त्या चिकवड्या कोणते गाणे आळवित असतील?

>>>> यशोदा मैया, कन्हैया (किशन / कान्हा), यशोदाकडे तक्रार या संदर्भातलं गाणं असणार

जिप्सी, छान होतं कोडं. Happy

जिप्सी, चिकना / मटणा असे काही नाहीये त्यात. शाकाहारी कोडं आहे. >>> माधव ... Lol

जिप्सी, हे गाणं कोणत्या पिक्चरमधलं आहे?>>>>"जानेमन" चित्रपटातील Happy हेमा मालिनी आणि देव आनंद Happy

०४/०७३:>>>

मैया यशोदा ये तेरा कन्हैय्या
पकडे है मोरी ...... कलैय्या
तंग मुझे करता है....( ही ओळ येत नाही)
रामजीकी कृपासे मै बची

जाम बोर गाणं आहे..... चित्रपट हम साथ साथ है

जिप्सी, मोकीमी, नाही.

०७३ साठी क्लू १: प्लॅस्टीकपूर्व काळात चिकवड्या जून्या साडीवर घातल्या जायच्या

०७३ साठी
क्लू १: प्लॅस्टीकपूर्व काळात चिकवड्या जून्या साडीवर घातल्या जायच्या
क्लू २: जूनी साडी, जूना सिनेमा (कृष्णधवल) - अप्रतिम गाणी असलेला सिनेमा
क्लू ३: फळं, फुलं, पाने, कळ्या, बिया सगळ्यांचा विचार करा

०७३: "मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे ????

क्लू २: जूनी साडी>>>>येथील समस्त स्त्रीवर्गांनी जुन्या साडींच्या नावाची लिस्ट द्या Happy

जिप्सी नाही. पण खूप जवळ आहेस. मधुबालाला वगळून विचार कर. हे जीवन कोणाचे आहे? याचे उत्तर देणारे गाणे पण त्याच सिनेमात आहे.

आता आले पाहिजे.

साडीच्या नावात काय नाय.

उत्तर मीच देतो.

०४/०७३:
यशोदाबाई दर उन्हाळ्यात चिकवड्या (साबुदाण्याच्या पापड्या) घालायच्या. किशनला, त्यांच्या मुलाला, त्या प्रचंड आवडायच्या. संध्याकाळच्या आत अर्ध्याहून जास्त चिकवड्या फस्त करायचा तो. आपण गट्टम होणार याचे दु:ख पण यशोदाबाईंवरचे अतिव प्रेम यांच्या कात्रीत सापडलेल्या त्या चिकवड्या कोणते गाणे आळवित असतील?

उत्तरः वफाओंका मजबूर दामन बिछाकर दुआ कर गम-ए-दिल खुदा से दुआ कर

कोडं ०४/७५:

mi casa, गंगर ऑप्टिशियन्स, su casa

उत्तरः ये तेरा घर ये मेरा घर

माधव Happy

जिप्सी, ऑफिस पिक्चर मॅनेजर मध्ये फक्त बिटमॅप मध्ये सेव्ह करता येतंय आणि इथे तो फॉर्मॅट अपलोड करता येत नाही Sad पेन्टब्रशमधून फॉर्मेट चेन्ज केला तर पुन्हा मो़कळी जागा दिसेल का?

प्सी, ऑफिस पिक्चर मॅनेजर मध्ये फक्त बिटमॅप मध्ये सेव्ह करता येतंय>>> स्वप्ना, कोलाज तु बीट्मॅपमध्येच बनव फक्त क्रॉप करायला पिक्चर मॅनेजर वापर. तो आहे त्याच फॉर्मेट मध्ये सेव्ह करेल Happy

Pages