..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>या चित्रपटाचे नाव- जिप्स्याच्या आवडत्या बीबीचा एक भाग + जिप्स्याचे नाव - एका मायबोलीकराचा आयडी + एका मायबोलीकरणीचा आयडी

हे 'द ट्रेन' मध्ये कसं बसतं? Uhoh

मामीच्या कोड्याबाबत, दोन्ही मीरा आणि स्वप्ना यांनी माझा विश्वास तोडला आहे..( चक्क सिरीयलमधलं वाक्य वाटतय ना ? )
याचाच अर्थ जिप्स्या आणि इतर, यांची डोकी या क्लू बाबत चालणार नाहीत. आता त्यांनी हा विश्वास तोडावा !

०४.०८३-०१ चित्रपटाचे नाव दुर्गेश नंदिनी नायिका बीना राय
पण गाणे कळत नाही >>>> गुगलून पाहिल्यावर हे गाणं मिळाल आहे, अर्थात मला माहिती नाही आहे तरी...
मत मारो श्याम पिचकारी, मोरी भीगी चुनरीया सारी रे

वॉव भरत. हे बाकिच्यांच्या लक्षात कसे आले नाही ?

दूर्ग(भ्रमण) + योगेश - योग + नंदिनी

http://www.youtube.com/watch?v=-wEEX3Ox75o

मत मारो श्याम पिचकारी ( पिच = आडु, कारी = काळे, सडके )

मीरा आणि मामी अगदी योग्य मार्गावर होत्या.

हो हिंदीत तोच शब्द आहे. मामीने लिहिला होता..

आणि आता एकच राहिलेय... व्हॅटिकन वाले. त्याचा क्लू, निळ्या काठाची पांढरी साडी !

क्या बात है भरत Happy तुम्ही एका फटक्यात गाणं ओळखंल Happy

०४/०८५
हे ठंडी हवाओं ने गोरी का घुंघट उठा दिया
हे काले घटाओं ने साजन को नटखट बना दिया

स्वप्ना... नव्या गाण्याबाबत माझे सपशेल लोटांगण असते.

जिप्स्या, कशातलं गाणं हे ? आशाने खुप छान गायलंय ! ( ठंडी हवाओने )

जिप्स्या, कशातलं गाणं हे ? आशाने खुप छान गायलंय ! ( ठंडी हवाओने )>>>>दिनेशदा, "प्रेमनगर" चित्रपटातील गाणं आहे. (राजेश खन्ना, आणि (पुन्हा एक्दा Happy ) हेमा मालिनी)

ओ ! माझा जरा गोंधळ उडाला होता.
राजेश खन्नाच्याच हमशक्ल मधे ( मौशुमी + तनुजा ) असे एक छान गाणे होते. झूमना झूमना असे शब्द होते.

०४/८८

puzzle_1.jpg

०४/८९

puzzle1_0.jpg

सोप्पी कोडी आहेत. अजून ३-४ ठरवली होती. मोबाईलमधे सेव्ह केली होती. आणि नेमका डिसप्ले गायब झालाय Sad

०४/०८८ चांदरात तुम हो साथ, क्या अजि अब ये दिल मचल मचल गया
दिल का ऐतबार क्या? क्या करोगे जि कल हो ये बदल बदल गया

भरत बरोबर. तो फोटो बुद्धदेव भट्टाचार्य ह्यांचा नाही. चित्रातल्या व्यक्तीचा फिल्मी जगताशी संबंध आहे.

हायला बराच वहिलाय की हा बाफ. दोन दिवस जमलेच नाही इकडे यायला.

०४/०८७:
नील गगन पर उडते बादल आ आ आ
धूपमे जलता खेत हमारा कर दे तू छाया

Pages