क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ई. मध्ये ई. वि च्या मालिकेत जी अवस्था आपल्या गोलंदाजांची व फलंदाजांची झाली होती ती ऑसी गोलंदाजीची झाली आहे >> परदेशातल्या खेळपट्ट्यांवर अशी प्रत्येक संघाची होणारी हालत कसोटी क्रिकेटमधली खरी गंमतच घालवून टाकेल , असं नाही वाटत ? प्रत्येक संघ फक्त 'अपने गलीमें शेर' असण्याची परंपरा तशी कसोटी क्रिकेटसाठी घातकच ठरण्याची शक्यता अधिक .

पाँटींगबरोबर ऑसीजचा अनाठायी खडूसपणा पण निघुन गेलेला दिसतोय.... त्यांनी अगदी खुल्या दिलाने पुजाराला दाद दिली. Happy .. (आता तो अनाठायी खडूसपणा पॉन्ट्याबरोबर मुंबई इंडियन्स मध्ये नाही आला म्हणजे मिळवली ;))

प्रत्येक संघ फक्त 'अपने गलीमें शेर' असण्याची परंपरा तशी कसोटी क्रिकेटसाठी घातकच ठरण्याची शक्यता अधिक . .>> हे त्या साऊथ आफ्रिकन टीमला पण सांगा बघू जरा Wink

आता तो अनाठायी खडूसपणा पॉन्ट्याबरोबर मुंबई इंडियन्स मध्ये नाही आला म्हणजे मिळवली>> पाँटिंग नि भज्जी दोघे 'आम्ही दोघे भाऊ भाऊ' म्हणत गळ्यात गळे घालून उभे राहतील असे वाटतय का तुला ? Lol

आयपीएलच काही सांगता येत नाही बाबा..... सायमो आणि भज्जी जिथे दोस्त झाले तिथे पंटरला पण (आणि भज्जीला पण) पाण्यात राहुन माश्याशी वैर परवडणार नाही Wink

>>परदेशातल्या खेळपट्ट्यांवर अशी प्रत्येक संघाची होणारी हालत कसोटी क्रिकेटमधली खरी गंमतच घालवून टाकेल , असं नाही वाटत ?
हो पण... आशिया खंडात त्यातही विशेषतः आपल्याकडे अशा फिरकीच्या खेळपट्ट्या बनवतात अलिकडे तर ३, ४ दिवसातच सामना संपायला हवा या धोणीच्या हुकूमानुसार खेळपट्ट्या बनतात काय असेच चित्र दिसते. बाहेर मात्र व्यवस्थित सर्व दिवस बर्‍यापैकी ईव्हन बाऊंस असतो.. आपल्याकडे मात्र दोन दिवस झाले नाही की चेंडू बसणे, मध्येच उसळणे, सरपटी असले प्रकार बघायला मिळतात.. त्यामूळे खेळाचे नक्की नुकसान होते. मला तरी असल्या खेळपट्ट्यांवरचे सामने बोरींग वाटतात..
ऑसि च्या बर्‍याचश्या विकेट्स या playing for true bounce यामूळे गेल्या असे मला वाटते.. त्यामूळे अगदीच कमकुवत व अननुभवी ऑसी संघाविरुध्द घरी मालिका जिंकली तरी साऊथ आफ्रिकेमध्ये सगळे पितळ पुन्हा ऊघडे पडणारच आहे... च्यामारी या पाट्यांवरती ईं च्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या फलंदाजांना अक्षरशः धूळ चारली... आफ्रिकेत स्टेन आणि मॉर्कल बहुतेक यांना 'आडवेच' करतील.
असो. तूर्तास, "घर की गली मे शेर" यात आनंद मानुयात... Happy

<< हे त्या साऊथ आफ्रिकन टीमला पण सांगा बघू जरा >> असामीजी, मीं फक्त भारताच्या संदर्भात नव्हे,तर सर्वच देशांच्या बाबतीत म्हटलं आहे; जागतिक स्तरावर खेळणार्‍या खेळाडूना सर्व प्रकारच्या खेळपट्ट्यांवर व हवामानात खेळतां आलं पाहिजे ,याबाबत दुमत नाही. पण एका देशाने दुसर्‍या देशात जावून हमखास हरायचं व त्या देशाला आपल्या देशांत आल्यावर झोडपायचं असा पायंडाच पडला तर तें कसोटी क्रिकेटसाठी घातक ठरेल असं मला वाटतं, इतकंच.
असो. भारत एक डाव १३५ धांवानी दणदणीत जिंकला. मनःपूर्वक अभिनंदन.

आपली कालची तळाची फलंदाजी व आजची ऑसी ची फलंदाजी बघून करमणूक झाली खरी........ पुजारा ची फलंदाजी, जडेजा व अश्विन ची गोलंदाजी या व्यतिरीक्त काही फार 'कसोटी' क्रिकेट बघायला मिळालं नाही याची खंत आहे.. असो. या ऑसी टीम ला व्हाईटवॉश निश्चीत दिसतोय.. पुढील सामन्यात आपण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी वगैरे घेतली तर बघायलाच नको!

(क्लार्क ला जडेजाने टाकलेला चेंडू ई. मालिकेत मॉंटी व स्वान ने सचिन ला टाकलेल्या चेंडूची आठवण देऊन गेला.)

जिंकलोच आहोत तर पुढील सामन्यात सेहवाग, भज्जी, ईशांत ला बसवून ईतरांना संधी द्यायला हरकत नाही असे वाटते. असेही 'बसवल्याने' त्यांच्या पोटावर पाय काय अंगठा देखिल येणार नाहीये!

उदयन.. | 5 March, 2013 - 12:03
उद्या कसोटी संपण्याची दाट शक्यता आहे ज्या पध्दती ने बॉल वळत आहेत ....अश्विन पुन्हा ६ विकेट घेईल
>>>>>>>>>>>

.
.अवघ्या १ विकेट ने अंदाज चुकवला..... Wink
.
.
.हुर्रे हुर्रे र्रे र्रे

सामन्यानंतर शास्त्रीच्या प्रश्नाला उत्तर देताना क्लार्कने प्रांजळपणे कबूल केलं कीं नाणेफेक जिंकूनही ऑसी फलंदाज एका उत्तम खेळपट्टीवर [ "on the best of wickets"] धांवा करूं शकले नाहीत, हे त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण होतं. मला वाटतं भारताच्या विजयाचं श्रेय या कबूलीमुळे दुपटीने वाढलं आहे ! शिवाय, भागिदार्‍यांवर भारतीय फलंदाजानी दिलेला भर ऑसीज फलंदाजानी शिकण्यासारखा आहे, असं म्हणून क्लार्कने मनापासून भारतीय फलंदाजीला दिलेली दादही सुखावून गेली !!

जेवढे रन्स एकट्या "मुरली विजय" सारख्या फलंदाजाने केले.......तेव्हढे रन्स देखील संपुर्ण ऑसी टीम करु शकली नाही ........अरे रे रे रे ........काय दिवस आले ........

हा क्लार्क मला फलंदाज म्हणून तर आवडतोच पण त्याच्या 'अ‍ॅटीट्यूड'मुळे मला तो अधिक वैशिष्ठ्यपूर्ण व आदरणीय वाटतो ! झक्कीसाहेबांची फर्माईश आहेच म्हणून एक खास न जमलेला प्रयत्न -
Death.JPG

भाऊ Rofl

भाऊ ,
व्यंगचित्र झकास .
मला मात्र क्लार्क त्याच्या lack of sportsmanship मुळे अजिबात आवडत नाही .
एकदा त्याच्या बॅटला लागून स्लिप मध्ये सरळ कॅच असताना अंपायरने आउट द्यायची वाट पाहत थांबला होता हा पटठ्या . खालचा व्हिडीओ पहाच
http://www.youtube.com/watch?v=uvsafT5tNJ4
मान्य आहे ऑसी आहे , पण तरी इतक ? मनाची नाही तर जनाची ?

ते जाऊ द्या हे बघा:
'रॉकेट' ड्राईव्ह हाच शब्द योग्य आहे: (स्लो मोशन मध्ये देखिल ब्रेट ली जितक्या फास्ट पळतोय त्यापेक्षा अधिक वेगाने चेंडू सीमारेषेला जातोय..) Happy
http://www.youtube.com/watch?v=hXF3oKfOPkI

[हे असलं आता बघायला मिळत नाही राव... वॉर्न, मुरली, ली, अख्तर, अक्रम कं वि. सचिन ११... आहाहा काय दिवस होते... दक्षिण आफ्रिकेत स्टेन, मॉर्क वि. सचिन ११ बघायला मिळेल असे वाटते.]

<<मला मात्र क्लार्क त्याच्या lack of sportsmanship मुळे अजिबात आवडत नाही .>>
केदारजी, तिसरा पंच व टेक्नोलोजीचा आधार आल्यापासून मैदानावरच्या पंचानी हात वर केल्याशिवाय जायचं नाही ही प्रथाच पडली आहे व त्याला फारसे अपवाद नसावेत. आज जडेजाने घेतलेला झेल टप्पा घेवून होता का असं पंचाने त्याला विचारलं तर जडेजाने ' माहित नाही' असा अविर्भाव केला. 'तिसर्‍या पंचाला विचार हवं तर ',असंच त्याला म्हणायचं होतं, चेंडू टप्पा घेवून पकडला गेला होता हें माहित असूनही ! फलंदाजांच्या बाबतीत , झेल निर्विवाद असला तरीही तिसर्‍या पंचाला तो चेंडू 'नो बॉल' होता हे रिप्ले वरून कळतं व तो नाबादचा निर्णय देतो, हेंही आतां नवीन नाही; त्यामुळें फलंदाजाने पंचांच्या निर्णयाशिवाय न परत जाणं हें वाटतं तितकं अखिलाडूवृत्तीचं आतां राहिलं नसावं. कालचं सचिनचं बाद होणं तिसरा पंच केवळ टेक्नॉलोजीच्या सहाय्यानेच ठरवूं शकला; टेक्नॉलॉजीचा पर्याय उपलब्ध असताना कां हलावं सचिनने केवळ अपील झालं व त्यालाही पुसटसा बॅटला बॉलचा स्पर्श झाल्याची शक्यता जाणवली असली तरी ! म्हणूनच केवळ तुम्ही उल्लेखिलेल्या 'क्लिप्'वरून क्लार्कबद्दलचं माझं मत बदलावसं नाही वाटत.

>>>उदयन.. | 7 February, 2013 - 16:37
प्रविन कुमार चे डोक फिरले
.
.http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18382001.cms

दोन-अडीच वर्षांपूर्वी टीम इंडियाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ राहिलेल्या आणि वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असलेल्या प्रवीणकुमारला पंचांनी मानसिकदृष्ट्या 'अनफिट' ठरवल्यानं क्रिकेटवर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. बीसीसीआयच्या कॉर्पोरेट ट्रॉफी स्पर्धेत प्रवीणनं केलेला 'राडा' त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्यामुळे टीम इंडियाची दारं त्याच्यासाठी कायमचीच बंद होण्याची शक्यता आहे.

४ फेब्रुवारीला ओएनजीसी विरुद्ध इन्कम टॅक्स या संघांमध्ये मुंबईत सामना झाला. या सामन्याच्या ४८व्या ओव्हरमध्ये प्रवीणकुमारची अचानक 'सटकली' आणि त्यानं अजितेश अगरल या इन्कम टॅक्सच्या खेळाडूला विनाकारण शिवीगाळ केली. त्यानंतर, पहिला चेंडू टाकून तो थेट फलंदाजाच्या दिशेनं धावत गेला आणि त्याला मारहाणही केली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन, पंचांनी त्याच्यावर आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवलाय.

अजित दातार आणि कमलेश शर्मा या दोन पंचांकडून सामनाधिकारी धनंजय सिंह यांनी संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात संपूर्ण प्रसंग कथन केला आहे.

इन्कम टॅक्सच्या कुठल्याही खेळाडूनं काहीही खोड काढली नसताना, प्रवीणकुमार क्रिझवर असलेल्या अजितेशवर किंचाळला. 'ए xxxx तू बँटिंग कर, अंपायरिंग मत कर।', अशी दादागिरी त्यानं केली. ही शिवीगाळ ऐकून अंपायरनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं पंचांनाही जुमानलं नाही. 'ओए xxx बँटिंग क्यों नही करता।', असा खुन्नस त्यानं पुन्हा दिला आणि बॉलिंग टाकायला गेला. आता तो शांत राहील, असं वाटत असतानाच, पहिला चेंडू टाकल्यानंतर प्रवीण पुन्हा अजितेशच्या जवळ पोहोचला आणि त्याच्या छातीवर डोकं आपटलं.<<<

Rofl Rofl Rofl Rofl

भाऊ , तुम्ही आपल मत बदलाव अस मी म्ह्णूच शकत नाही Happy
फक्त इतकच ,
फलंदाजांच्या बाबतीत , झेल निर्विवाद असला तरीही तिसर्‍या पंचाला तो चेंडू 'नो बॉल' होता हे रिप्ले वरून कळतं व तो नाबादचा निर्णय देतो, हेंही आतां नवीन नाही; त्यामुळें फलंदाजाने पंचांच्या निर्णयाशिवाय न परत जाणं हें वाटतं तितकं अखिलाडूवृत्तीचं आतां राहिलं नसावं. >> ही क्लिप २००८ ची आहे , त्यावेळी असा काही नियम नव्हता .
बाय द वे , वरच्या क्लिप मध्ये क्लार्क नक्की कशामुळे आपण नाबाद दिले जाऊ असा विचार करत होता , हे अनाकलनीय आहे .

भाऊ ,
मला राग यायच आणखी एक कारण म्हणजे हा प्रसंग आपल्या फेमस ऑसी टूर दरम्यान घडला होता . आम्ही जिंकण्यासाठी काहीही (पाँटींग तर लिटरली काहीही करत होता ) करू , ही व्रूत्ती दाखवणारी ती घटना होती अस माझ मत . त्याच सीरीज मध्ये त्याने दादा चा नसलेला कॅचही क्लेम केला होता , कुंबळेसारखा माणूस ही त्यावर भडकला होता .

<< ही क्लिप २००८ ची आहे , >> सॉरी, हे लक्षात नाही आलं. पण त्यामुळे माझीच बाजू बळकट झाली !
अहो, पाँटींगच्या नेतृत्वाखाली खेळताना स्वच्छ बाद असतानाही विकेटवरून हलायचं नाही अशी ताकीदच असेल ना ऑसी फलंदाजाना ! काय करणार बिचारा क्लार्क !! Wink
केदारजी, जोक्स अपार्ट, क्लार्कच्या वृत्तीत व त्यामुळे ऑसी संघाच्या वृत्तीत मला खूपच स्वागतार्ह बदल या दोन सामन्यात जाणवले व म्हणून मी त्याचा खास उल्लेख केला; तसं खरंच नसेल तर तें दिसून येईलच व माझे शब्द सखेद मागे घ्यायला मला जराही संकोच वाटणार नाही. कृपया मीं उगीचच अट्टाहास करतोय असा गैरसमज नका करून घेऊं.

काल सचिनने एक गोष्ट केली ती अनेकांच्या नजरेतुन सुटली...

काल जेव्हा विजय १६७ धावा करुन बाद झाला तेव्हा तो पँव्हेलियन मध्ये येईपर्यँत सचिन फलंदाजीसाठी मैदानावर आला नाही.

जर विजय बाद झाला तेव्हाच सचिन मैदानावर गेला असता तर प्रेक्षकांकडुन सचिन मैदानावर आलेल्या जल्लोषात विजयने केलेल्या १६७ धावांचा जल्लोष झाकला गेला असता.

आपल्याच नव्या सहकार्यावर होणारा कौतुकाचा वर्षाव आपल्या तिथे जाण्यामुळे झाकला जाऊ शकतो अशा या महान विचार असणार्या सचिन तेंडुलकरला देव का म्हणतात त्याचेच आणखी हे एक कारण...

जागतिक स्तरावर खेळणार्‍या खेळाडूना सर्व प्रकारच्या खेळपट्ट्यांवर व हवामानात खेळतां आलं पाहिजे ,याबाबत दुमत नाही. पण एका देशाने दुसर्‍या देशात जावून हमखास हरायचं व त्या देशाला आपल्या देशांत आल्यावर झोडपायचं असा पायंडाच पडला तर तें कसोटी क्रिकेटसाठी घातक ठरेल असं मला वाटतं, इतकंच. >> भाऊ मी RSA चे उदाहरण ह्यासाठी दिले होते कि त्यांचा इतर देशातील record कौतुकास्पद आहे म्हणून. फिरकी विरुद्ध त्यांची दाणादाण उडते हे उघड असूनही अमला आल्यापासून (कलीस आधीच होता) हा कमकुवतपणा पण झाकला गेला आहे.

इंग्लंडने आपल्याला आपल्याकडे येऊन हरवल्यानंतर आपल्या खेळपट्ट्या फक्त आपल्याला धार्जीण्या आहेत असे म्हणण्याचे धाडस माझ्यात उरलेले नाही Wink

कृपया मीं उगीचच अट्टाहास करतोय असा गैरसमज नका करून घेऊं. >> अहो भाऊ , असा गैरसमज कुणीही करून घेणार नाही . Happy
फक्त हा बदल domination संपल्यावर आल्यामुळे त्याच मला कौतुक वाटत नाही इतकच .
सत्तेत असताना माज करण्यात काहीच वाईट नाही , पण तीच सत्ता गेल्यावर जर तुम्ही नम्रपणे वागायला लागला तर ते ढोंगीपणाच वाटत .

आपल्याच नव्या सहकार्यावर होणारा कौतुकाचा वर्षाव आपल्या तिथे जाण्यामुळे झाकला जाऊ शकतो अशा या महान विचार असणार्या सचिन तेंडुलकरला देव का म्हणतात त्याचेच आणखी हे एक कारण...>>
कॉमेंट्रीमधे याचा उल्लेख करुन, पुन्हा पुन्हा ती क्लिप (सचिन च्या आगमनाची) दाखवत होते.

<< आपल्या खेळपट्ट्या फक्त आपल्याला धार्जीण्या आहेत असे म्हणण्याचे धाडस माझ्यात उरलेले नाही >> असामीजी, क्लार्कने सुद्धां आज हें मान्य केलंय- << क्लार्कने प्रांजळपणे कबूल केलं कीं नाणेफेक जिंकूनही ऑसी फलंदाज एका उत्तम खेळपट्टीवर [ "on the best of wickets"] धांवा करूं शकले नाहीत>> !! तरी पण पांच दिवस उत्तम स्थितीत किंवा बर्‍यापैकी धड राहूं शकतील अशा खेळपट्ट्या आपल्याकडे अपवादात्मक हेंही नाकारतां येत नाही.
त्याचबरोबर ,इंग्लंडने इथं येवून आपल्याला हरवलं , हेंही कांहीसं अपवादात्मकच पण कसोटी क्रिकेटसाठीं मात्र आशादायक असं आपलं मला वाटलं.

त्याचबरोबर ,इंग्लंडने इथं येवून आपल्याला हरवलं , हेंही कांहीसं अपवादात्मकच पण कसोटी क्रिकेटसाठीं मात्र आशादायक असं आपलं मला वाटलं. >> तेच तर मी म्हणतोय. हे अपवाद आधी होते तेव्हढे dominant उरलेले नाहियेत आत्ता. आपण बाहेर जाऊन सणसणीत हरतोय हा अपवाद आहे का हे बघायचेय फक्त Wink

मला पण क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑसीज बरेच सौम्य आणि सभ्य झाल्यासारखे वाटतायत!
सफाइदार विजयाबद्दल अभिनंदन धोनी आणि कंपनी Happy

उदयन, जबरी. हे वाचले नव्हते अजून.

फलंदाजाने अंपायरने बाद दिल्याशिवाय न जाणे हेच योग्य आहे असे खुद्द गावसकर नंतर म्हणायचा (निवृत्त झाल्यावर. तो स्वतः "वॉक" करत असे). कारण कधीकधी बाद नसताना बाद दिले जाऊ शकते, त्यामुळे जोपर्यंत अंपायर बाद देत नाही तोपर्यंत (त्रिफळा वगैरे वगळून) थांबायला काहीच हरकत नाही.

मात्र २००८ च्या सिरीज मधे दोन्ही कप्तानांनी ठरवले होते की इमानदारीत खेळायचे, त्यामुळे हे चुकीचे आहे.

Pages