Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण मी म्हणतो हे तथ्य तेव्हा
पण मी म्हणतो हे तथ्य तेव्हा कुठे होते........जेव्हा आपण ऑस्ट्रेलियात हारत होतो.......??????? तेव्हा नाही बोलले गेले असले काही ?
आज लागोपाठ दोन कसोटी हारल्या बरोबर .....तथ्य वगैरे आठवायला लागले ?
उदयन्....मनुष्यस्वभाव आहे
उदयन्....मनुष्यस्वभाव आहे तो!
आपल्याकडचे वाचाळवीर पण तेच करतात
उद्या टेनिसमध्ये देखील
उद्या टेनिसमध्ये देखील बोलतील, ज्याची सर्विस आहे तोच जिंकतो, कोण्या तरी त्रयस्थ माणसाला सर्विस करायला लावली पाहिजे..
बाकी विधानात तथ्य आहे..
जर कोणाला असे वाटत असेल की मग ईंग्लंड कशी आपल्याला सहज हरवून गेली तर याचे उत्तर इतिहासात आहे. दीडशे वर्षे त्यांचे पूर्वज इथे राहून गेलेत भाई, त्यामुळे ते भारतीय हवापाण्याच्या रग रग से वाकीब आहेत..
रग रग से वाकीब तसे नुसते
रग रग से वाकीब
तसे नुसते 'हवापाण्याशी पूर्ण परिचित आहेत' असे म्हंटले असते तरी कळले असते. अर्थात् इंग्रजांनी इथे दीडशे वर्षे राज्य केले याचा इथे काही संबंध नाही. कारण खेळायला आलेले कुठले इंग्रज
त्या काळात भारतात आले होते?
रग रग से वाकीब
या नावाचा कुठला प्रसिद्ध चित्रपट होता का? हिंदीत किंवा मराठीत? की एखादे आयटेम साँग?, कुठल्या तरी लोकप्रिय सिनेमाची की गाण्याची एकदम आठवण झाली म्हणून असे लिहिले?
राव मला ते मराठी शब्द चटचट
राव मला ते मराठी शब्द चटचट सुचत नाहीत, म्हणून फिल्मी पुड्या सोडत असतो अधूनमधून.
बाकी माझ्या बोलण्याचा मतितार्थ हाच होता की जे ईंग्लंडच्या पांडुरंगांना जमले ते ऑस्ट्रेलियाच्या पांडुरंगांना का जमू नये..
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/41831
.
.आयपीएल फँटसी लीग
स्टार्कचे बिचार्याचे वाईट
स्टार्कचे बिचार्याचे वाईट वाटले.... मस्त खेळला गडी

धवन कसला जबरी खेळतोय.... फिफ्टी झाली.... संधीचे सोने करणार बहुतेक
बघता बघता सेंच्युरी झाली
बघता बघता सेंच्युरी झाली
अभिनंदन धवन.... What a fearless innings!
व्वा! विजय, पुजारा, धावन,
व्वा! विजय, पुजारा, धावन, कसले जबरी फलंदाज सापडले आहेत बीसीसीआय ला. आता जरा कुणि गोलंदाज येऊ देत. म्हणजे पुनः पहिला नंबर येईल जगात.
धवन आज निर्विवाद मस्त खेळला.
धवन आज निर्विवाद मस्त खेळला. He is a clean striker of the ball, plays every ball on merit, mostly with straight bat and is not afraid to step out for hitting even fast deliveries ! आज मुरलीने पण सलामीच्या फलंदाजाचं टेंपरॅमेंट दाखवलं; धवन बेधडक त्याला मागे टाकत दोघांच्या धांवांतला फरक वेगाने वाढवत असतानाही तो धवनशी तशी स्पर्धा करण्याच्या भनगडीत पडला नाही ! [सेहवाग व गंभीर खेळताना अशा स्थितीत गंभीर कांहीसा बिथरायचा व आक्रमक खेळायला जायचा, असं मला जाणवायचं].
आजची खेळपट्टी व गोलंदाजी मात्र धवनची खरी कसोटी घेणारी नव्हती, हेंही लक्षांत घ्यायला हवं. त्याला आतरराष्ट्रीय स्तरावर अजूनही स्वतःला सिद्ध करावं लागणारच आहे, विशेषतः चेंडू स्विंग होत असलेल्या वातावरणात व खेळपट्टीवर.
बिचारा रहाणे !!!!!
रहाणे च नशिब वाईट........
रहाणे च नशिब वाईट........
शिखर ची खरी कसोटी द आफ्रिकेत लागेल... डेन स्टेन ने ट्विट करुन त्याला वेलकम केलेच आहे
मुरली विजयच्या यशावर खुश होऊ
मुरली विजयच्या यशावर खुश होऊ नका कोणी, त्याला उसळणार्या परदेशी खेळपट्ट्यांवर खेळता येत नाही.. खूप कच्चे आहे त्याचे तंत्र.. त्यामुळे या कामगिरीवर पुढच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर त्याला नेताना हे निवड समितीने डोक्यात ठेवायला हवे...
धवन बाकी जबरद्स्तच खेळला, खेळाडूचा असा फॉर्म कधीतरीच बघायला मिळतो आणि हे त्यानेही जाणून पुरेपूर कॅश केली ही संधी..
अवांतर - वीरूदादा पुन्हा फॉर्मला येणे आवश्यक आहे.. संघाच्या हितासाठीच नव्हे तर क्रिकेटरसिकांसाठी सुद्धा.. त्याची फलंदाजी बघणे नेत्र सुख असते..
धवन आला रे..!!! (विजय - धवन
धवन आला रे..!!!
(विजय - धवन या जोडीला पुढील किमान २ वर्षे तरी खेळवावे, अपयशी ठरले तरी.. आफ्रिका, स्टेन व कं. या खेळाडूंसाठी सर्वात मोठी कसोटी परिक्षा असेल.. पोरांचे 'पुरूष' होण्याची संधी आहे ती.. let them go for it.. sehavag and gambhir can go back to the basics in the meantime. च्यामारी, सेहवाग, गंभीर, ई. लोक ऑसी संघात असते तर एव्हाना शिस्तभंगाबद्दल अंगठे धरून एक वर्षभर कोपर्यात ऊभे केले गेले असते नाही..?)
<< मुरली विजयच्या यशावर खुश
<< मुरली विजयच्या यशावर खुश होऊ नका कोणी, त्याला उसळणार्या परदेशी खेळपट्ट्यांवर खेळता येत नाही.. >> आपल्याकडे अशा खेळपट्ट्याच नाहीत तर नवीन खेळाडू त्यावर खेळायचं तंत्र घोटून घेणार कुठे ? सुरवातीला मोहिंदर अमरनाथ आंखूड टप्प्याच्या चेंडूंवर 'व्हल्नरेबल' आहे याची जगभर जाहिरात झाली होती पण तोच नंतर असे चेंडू खेळण्यातला वाकबगार मानला जाऊं लागला. मुरली विजयला आत्तांच डोक्यावर घेवून नाचूं नये हे जितकं खरं तितकंच त्याच्यावर आत्तांच काट मारणंही अयोग्य, असं नाही वाटत ?
<< मुरली विजयच्या ....
<< मुरली विजयच्या .... कामगिरीवर पुढच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर त्याला नेताना हे निवड समितीने डोक्यात ठेवायला हवे...>> --
धवनचं द्विशतक हुकलं. मुरलीचं
धवनचं द्विशतक हुकलं. मुरलीचं शतक झळकलं. सचिनही आत्तांच बाद. भारतानं जिंकण्याचा[ शक्यता कमी असूनही] कसोशीने प्रयत्न केल्याचं पहायला खूप आवडेल. करतील आजचा रविवार अविस्मरणीय ? बघूंया !!!
लंच नंतर खर तर डाव घोषीत
लंच नंतर खर तर डाव घोषीत करायला हवा......आजच्या दिवसात २५० च्या आत त्यांचे ७-८ विकेट्स गेले तरच कसोटी जिंकायची संधी आहे
द आफ्रिका आणि पाकिस्तान मॅच
द आफ्रिका आणि पाकिस्तान मॅच मधे द आफ्रिकेच्या जर्सीचा रंग गुलाबी केला......:)
असे वाटत होते की मैदानात सगळी कडे "जेलोसिन" च्या बाटल्या फिरत आहेत
<<.... "जेलोसिन" च्या बाटल्या
<<.... "जेलोसिन" च्या बाटल्या फिरत आहेत >> द. आफ्रिका - ३४४ ! पाक - ३०९ !! सामना अटीतटीचा.. अॅसिडिटीचाच !!!
भारत वि. ऑसीज सामना रंजक
भारत वि. ऑसीज सामना रंजक अवस्थेत ! जवळपास १००+चीच आघाडी घेऊन [अजून एक विकेट शिल्लक]ऑसीज सामना वांचवूं शकतील ? कठीण वाटतं !
अश्विनबद्दलच्या आशा आतां खूप उंचावताहेत; तो फलंदाज व सामन्याची स्थिती लक्षात घेऊन गोलंदाजीत वेगवेगळे प्रयोग यशस्वीपणे करतोय. मधेच तो बेमालून टाकत असलेला 'लेगस्पीन' खंद्या फलंदाजानाही पेंचात टाकूं शकतो !
काल कुमारने तीन बळी घेवूनही आज त्याला गोलंदाजी न देण्यात धोनीने धोका पत्करून चांगलेच डांवपेंच लढवले म्हणायला हवं; तळाचे फलंदाज - विशेषतः ऑसीज - फिरकीपुढी अधिक बावचळण्याची शक्यता त्याने लक्षात घेतली असावी.
ऑल द बेस्ट, भारत. भारताच्या खेळात 'किलींग इन्स्टींक्ट'च्या अभावाचा प्रभाव कमी होतोय असं दिसतंय !
एवढे करुन जिंकायला प्रयत्न
एवढे करुन जिंकायला प्रयत्न करायला हवा.....दोन सत्रात किमान १५० रन्स करायचे आव्हान स्वीकारायला हवे
ऑसीजची शेवटची जोडी सामना
ऑसीजची शेवटची जोडी सामना अतिरंजित किंवा अनिर्णित ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करते आहे !!!! यातलं नेमकं काय होईल पहायचं !!
भाऊ, तुम्ही वाहिन्यांवरील
भाऊ, तुम्ही वाहिन्यांवरील बातम्या फार बघता का?
तुम्हाला अतिरंजक म्हणायचं होतं बहुतेक. 
आ.न.,
-गा.पै.
१५ ओवर्स मधे ९० रन्स
१५ ओवर्स मधे ९० रन्स बनवायच्या ९ विकेट्स हाती.............. वाटत नाही आता...........
<< तुम्हाला अतिरंजक म्हणायचं
<< तुम्हाला अतिरंजक म्हणायचं होतं बहुतेक>> होय. गा.पै.जी, 'अशा चूका मीं करतों', असं मीं म्हटलं तर त्यांत अतिरंजित कांहीच नसतं !!
<<१५ ओवर्स मधे ९० रन्स बनवायच्या ९ विकेट्स हाती..............>> अहो, फक्त शेवटच्या तासांत 'मॅनडेटरी' १५ ओव्हर्स ! आधीच्या ओव्हर्स आहेतच ना !!! बरोबर आहे ना माझं ?
४.३० नंतर जास्त ओव्हर्स असू
४.३० नंतर जास्त ओव्हर्स असू शकतात काय?
आता फक्त १० ओवर्स
आता फक्त १० ओवर्स होती............ती सुध्दा होतील की नाही ते माहीत नाही.... ऑसी ने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली निगेटिव्ह बॉलिंग बरोबर मुद्दामुन फास्ट बॉलर्स ना ओवर्स दिली जेणे करुन वेळ जास्त लागेल....आणि मधे मधे टीपी सुध्दा चालु केली......
.
.जर ओव्हररेट जर कमी ठेवला तर जास्तीसजास्त कर्णधार ला बाहेर बसेल अथवा ५०% मॅच फी कमी होईल....
(असा ही क्लार्क पुढच्या मॅच मधे खेळण्याची शक्यता कमीच आहे)
पण पराभव होणार नाही सामना अनिर्णित राखला जाईल.............
.
.
आणि धोनीची मानसिकता सुध्दा हाणामारी करुन मॅच खेळण्याची नाहीच आहे... या आधी देखील अवघे १५० हवे असुन सुध्दा आपण प्रयत्न केले नव्हते.........
Nine overs in the last 40
Nine overs in the last 40 minutes. Don't think you can complain about that over-rate. The 15 mandatory overs begin in 20 minutes
.
.
.
घ्या इथे पोस्ट करु पर्यंत तिथे आले सुध्दा
<< ४.३० नंतर जास्त ओव्हर्स
<< ४.३० नंतर जास्त ओव्हर्स असू शकतात काय? >> माझ्या माहितीप्रमाणे ' मॅनडेटरी ओव्हर्स'च्या बाबतीत याचं उत्तर 'होय' असंच आहे .
24 runs, 8.3 overs, RR: 2.82
24 runs, 8.3 overs, RR: 2.82 (Pujara 13, Kohli 11) ह्या..............लोकांना काय बोलायचे आता..??
.
. ९ विकेट्स चे काय लोणचे घालायचे आहे का ?
Pages