क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< आधीच्या दोन प्रॅक्टिस मॅचेस तेथेच का दिल्या कळत नाही. >> फारएन्डजी, प्रॅक्टीस मॅचेस ह्या निरर्थक असतात, हा आपल्या बोर्डाचा ठाम विश्वास आहे; आपल्या दौर्‍याच्या वेळी आपण म्हणूनच तसा आग्रह हल्ली धरतच नाही. बाहेरून येणार्‍या संघानी मगितल्याच तर त्या मॅचेस कुठेही ठेवल्या तरी फरक पडत नाही, हेंही आपल्या बोर्डाला माहित आहे ! Wink

प्रविन कुमार चे डोक फिरले
.

.http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18382001.cms

दोन-अडीच वर्षांपूर्वी टीम इंडियाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ राहिलेल्या आणि वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असलेल्या प्रवीणकुमारला पंचांनी मानसिकदृष्ट्या 'अनफिट' ठरवल्यानं क्रिकेटवर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. बीसीसीआयच्या कॉर्पोरेट ट्रॉफी स्पर्धेत प्रवीणनं केलेला 'राडा' त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्यामुळे टीम इंडियाची दारं त्याच्यासाठी कायमचीच बंद होण्याची शक्यता आहे.

४ फेब्रुवारीला ओएनजीसी विरुद्ध इन्कम टॅक्स या संघांमध्ये मुंबईत सामना झाला. या सामन्याच्या ४८व्या ओव्हरमध्ये प्रवीणकुमारची अचानक 'सटकली' आणि त्यानं अजितेश अगरल या इन्कम टॅक्सच्या खेळाडूला विनाकारण शिवीगाळ केली. त्यानंतर, पहिला चेंडू टाकून तो थेट फलंदाजाच्या दिशेनं धावत गेला आणि त्याला मारहाणही केली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन, पंचांनी त्याच्यावर आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवलाय.

अजित दातार आणि कमलेश शर्मा या दोन पंचांकडून सामनाधिकारी धनंजय सिंह यांनी संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात संपूर्ण प्रसंग कथन केला आहे.

इन्कम टॅक्सच्या कुठल्याही खेळाडूनं काहीही खोड काढली नसताना, प्रवीणकुमार क्रिझवर असलेल्या अजितेशवर किंचाळला. 'ए xxxx तू बँटिंग कर, अंपायरिंग मत कर।', अशी दादागिरी त्यानं केली. ही शिवीगाळ ऐकून अंपायरनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं पंचांनाही जुमानलं नाही. 'ओए xxx बँटिंग क्यों नही करता।', असा खुन्नस त्यानं पुन्हा दिला आणि बॉलिंग टाकायला गेला. आता तो शांत राहील, असं वाटत असतानाच, पहिला चेंडू टाकल्यानंतर प्रवीण पुन्हा अजितेशच्या जवळ पोहोचला आणि त्याच्या छातीवर डोकं आपटलं.

प्रॅक्टिस मॅचचं काय सांगता! इंग्लंडला एकही स्पिनर न खेळवता प्रॅक्टिस मॅच दिली. पहिली कसोटी सोडली तर बाकीच्या कसोटीत धुतलेच भारताला.

आणि परवीन कुमारास्नी काय झालं अचानक. गपगुमान गोलंदाजी करावी. बोलंदाजी नको. Uhoh

ऑस्ट्रेलियाच्या संघात प्रवीण कुमारला भरपूर पगार देऊन घेतील. त्याने ऑस्ट्रेलिया चा व्हिसा घेऊन लगेच तिकडे जावे,

मला वाटते ऑस्ट्रेलियात खेळातील कौशल्याबरोबर अशी 'लढाऊ' वृत्ती पण जरूरी असते म्हणे!

Proud

असामी.. पीच वाकासारखे असेल तर आपल्या लोकांना तिथे वाका वाकाच करावे लागेल..

ऑसीज विरुद्ध ४-० हारण्याची तयारी करुन ठेवा...

झाली झाली सेंच्युरी झाली... ऑसीज विरुद्ध खेळायला तयारी चांगली चालू आहे... लवकरच फर्स्ट क्लास मधल्या २५००० धावा पण पूर्ण होणार...

<< ऑसीज विरुद्ध ४-० हारण्याची तयारी करुन ठेवा... >> फुसका आशावाद म्हणून नव्हे तर कोणत्याही बर्‍या- वाईट अंदाजाला सुरूंग लावण्याची भारतीय क्रिकेटची उज्वल परंपरा आहे म्हणून आत्तांच नाही असं भाकीत करणार !

हिम्या ४-० झाले तरी हरकत नाहि रे, फक्त प्रत्येक मॅच चुरशीची झाली पाहिजे कमीत कमी. नवीन टिम बनतेय म्हटल्यावर हे धरून चालायचेच.

इराणी ट्रॉफीमधे भज्जीने बरी बॉलिंग टाकली आहे त्यामूळे अश्विनच्या ऐवजी आत येउ शकतो बहुधा. हे चांगले कि वाईट हे तुम्हीच ठरवा.

तेंडूलकरच्या सेंचुरीचे काहि धरू नकोस. इंग्लंडच्या दौर्‍यादरम्यान पण एका रणजी मॅचमधे मस्त खेळला होता नि प्रत्यक्ष टेस्ट मधे .... .

फक्त प्रत्येक मॅच चुरशीची झाली पाहिजे कमीत कमी. नवीन टिम बनतेय म्हटल्यावर हे धरून चालायचेच.>> सहमत. खेळाडू लढत देत आहेत असे दिसू दे कमीत कमी.

सेलिब्रेटी क्रिकेट लीग बघताय का कुणी?
महेश मांजरेकर मस्त खेळतोय.

सुनंदन लेलेंचे पूर्ण मराठी समालोचन ऐकायला मजा येतीय..... स्टार प्रवाह!

गंभीर बरोबर सेहवागला पण बसवायला हव होत.
जडेजा परत घुसला आत.... हा माणूस बरोबर बाहेर जायच्या रस्त्यावर असताना एक दोन मॅचेस बर्‍या खेळतो आणि परत आपले पहीले पाढे पंचावन्न!
रहाणे देशांतर्गत स्पर्धात, आयपीलमध्ये चांगला खेळतो... आतंरराष्ट्रीय स्तरावर त्याला काय होते कुणास ठाऊक!
भज्जी आणि श्रीशांत परत संघात Sad
इरफान ला काय झालय?

रहाणे देशांतर्गत स्पर्धात, आयपीलमध्ये चांगला खेळतो... आतंरराष्ट्रीय स्तरावर त्याला काय होते कुणास ठाऊक! >> त्याला एक सध्या तो रोहित शर्मा आहे असे समजून हातळला पाहिजे म्हणजे fix spot in the squad, irrespective of score. आणी मग कमाल बघा. मूळात टेस्टच्या कॅलिबरच्या खेळाडूला आयपील च्या जोरावर आत घेतात नि तसेच खेळावे हि अपेक्षा धरतात ह्याहून शुद्ध मूर्खपणा नाही.

इरफान जखमी आहे.

धवन चालतो तर जडेजा काय वाईट, fielding चांगली आहे. Wink

रहाणेबद्दल सहमत.

धवन ठीक ठीक वाटला पण जाफर कधीही जास्त इफेक्टिव्ह आहे. विशेषतः बिग मॅच टेंपरामेंट.

जडेजाने अजून फारसे काहीही केलेले नाहीत कशातच. त्याला नक्कीच कोणाचेतरी मोठे बॅकिंग आहे.

फक्त तीन फास्ट बोलर (ते ही आपल्या फास्ट बोलर्स चा फिटनेस माहीत असून) आणि मागच्या सिरीजला देशातही काही न करू शकलेला आश्विन व भज्जी - त्यात भज्जी पेटला तरच काहीतरी करेल. ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याला एक दोन मॅच देऊन बघायलाच हव्यात. तो खुन्नसमुळे खेळ उंचावणारा खेळाडू आहे (स्टीव्ह वॉ प्रमाणेच). मैदानावर जितक्या काड्या करेल तितका विकेट्स काढेल. २००८ ची ऑसी सिरीज आठवा. फास्ट मधे तो शामी का नाही ट्राय करत? इशांत, दिंडा व भुवनेश्वर कुमार किती टिकतील काय भरवसा. झहीर-इशांत २००८ ते २०११ एकदम जबरी जोडी होती. पण वर्ल्ड कप नंतर सगळे बिघडले. तसेच सेहवाग-गंभीर ची जोडी.

गंभीरबद्दल वाईट वाटते. पण थोडा वेळ बाहेर राहणे कदाचित त्याच्या फायद्याचे होईल.

मी openers बद्दल उगाचच वेगळा विचार करुन पाहतोय.

आपल्याकडे अगदी आपण क्रिकेट पाहयला सुरूवात केली तेंव्हापासून अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असे तंत्रशुद्ध (यशस्वी म्हणत नाहिये) खेळाडू झाले आहेत - गावस्कर, मांजरेकर, द्रविड, तेंडुलकर, वेंगसरकर (थोडासा), विश्वनाथ नि अमरनाथ (बर्‍यापैकी), पुजारा, आकाश चोप्रा, दास. ह्यातले बहुतेक जण ऑफ स्टंप कुठे आहे हे सांगू शकतील. ह्यातले ओपनर किती आहेत ते बघा ? फक्त तीन जण.

आता ह्याच काळातल्या चांगलेच यशस्वी ठरलेल्या नि दीर्घ काळ खेळलेल्या ओपनर्सची यादी बघा. गावस्कर, सेहवाग (मी चेतन चौहान नि श्रिकांथ) ह्यांना बाजूला ठेवतोय कारण ते फार कमी वेळ खेळले. म्हणजे आपण बरीच वर्षे तंत्रशुद्ध नि यशस्वी ओपनर न घेता खेळत आलो आहोत. थोडक्यात काय कि तंत्रशुद्ध ओपनर हा आपला बेस कधीच नव्हता आणि तसे असेल तर बॉल swing, seam, bounce व्हायला लागला कि तारांबळ उडणे साहजिकच तर आहे.

आता जवळ जवळ आपण आपल्या ५०% पेक्षा अधिक मॅचेस देशात खेळतो. पाकिस्तान, विंडीज नि लंका इथे बर्‍यापैकी आपल्यासारखेच पिच असते (कमीत कमी engand, aus, s. afrika, england ह्यांच्यासारखे नसते). मग अशा वेळी अशा पिचेसवर हमखास खोर्‍याने धावा काढू शकेल असा ओपनर का घेउ नये ? domestic seasons मधे जाफर ह्याच लीगमधला आहे. त्याच्यासारखा अजूनही कोणी तरी पुढे येईलच.

मग राहता रहिला दुसरा ओपनर. तर सेहवाग सारखा मीळणे कठीण आहे पण एकदा तंत्रशुद्धता हा निकषच नाहि नि बाहेरच्या मॅचेस मधे काहि फरक पडत नाहि हे मान्य केल्यावर धवन काय वाईट आहे ? attacking आहे नि डावखुरा पण आहे. रन्स काढून गेला तर impactful असतील.

थोडक्यात काय तर एका बाजूने domestic patches मधले run machine नि दुसर्‍या बाजूने sehawaag च्या blue print मधे बसेल असा अशी जोडि कायम ठेवावी. Happy

असामीजी, तुमच्या विचाराला पर्यायी दुसरा विचार असाही असूं शकतो- अगदीं फारुख इंजिनीयरपासून आपण तंत्रशुद्ध सलामीचा फलंदाज हवाच असा आग्रहच धरला नाही व सलामीच्या जोडीची फक्त धांवा काढण्याची क्षमता व शक्यताच लक्षांत घेतली; पण त्यामुळे मधल्या फळीवर येणारं दडपण व परिणामीं होणारं नुकसान दुर्लक्षिलं गेलं. बहुतेक वेळां मधल्या फळीलाच सलामीची जोडी म्हणून खेळावं लागणं याची धांवसंख्येवर पडणारी मर्यादा 'क्वांटिफाय' करणं अवघड असलं तरी ती नाकारणं अशक्य आहे. नविन चेंडू खेळून काढणं, तेज गोलंदाजाना दमवणं व मधल्या फळीसाठी मार्ग सुकर करणं हा सलामीच्या जोडीचा मुख्य कार्यभाग दृष्टीआडच झाला व त्यामुळेच तंत्रशुद्ध सलामीचे फलंदाज शोधून, त्याना प्रोत्साहन देऊन या महत्वाच्या जबाबदारीसाठी तयार करण्याचे योजनाबद्ध, गंभीर प्रयत्न झाले नसावेत असं मला वाटतं. यापुढेही आपण तसंच धोरण अवलंबणं म्हणजे चांगले मधल्या फळीतील नविन फलंदाज येत असूनही त्याना बहरांत येण्यात अडचण निर्माण करणंच होईल.

कपिल देव येण्यापूर्वीं आपण तेज गोलंदाजांबाबतही अशीच भूमिका घेतली व आपल्याकडे तेज गोलंदाज नाहीतच अशी समजूत करून घेऊन फिरकीवरच भागवून नेण्याचं धोरण राबवलं; पण आतां आपल्याकडे नविन व जुना चेंडू समर्थपणे हाताळणारे [ खूप वरच्या दर्जाचे नसले तरीही] तेज व फिरकी गोलंदाज तयार होताहेतच ना ! म्हणूनच, मला वाटतं जाफर, विजय इ. इ. खर्‍याखुर्‍या सलामीच्या खेळाडूनाच सलामीला खेळवणं यातच दूरदर्शीपणा आहे.

जाफरचे वय बहुतेक त्याच्या विरोधात गेले!
भुवनेश्वर कुमार ही सिरीज गाजवेल असे आपले आमचे कुडमुडे भाकीत Happy

सलामीच्या जोडीची फक्त धांवा काढण्याची क्षमता व शक्यताच लक्षांत घेतली; >> पण भारतीय खेळाडू ह्या एकाच तागडीत नेहमीच मोजले जातात. तसे नसते तर आकाश चोप्रासारख्या फलंदाजाला सेहवागशी तुलना करून बाहेर पाठवले गेले नसते. थोडक्यात काय तर मूळात आहे ती विचारसरणी बदलायला हवी पण ते होणे अशक्य दिसतेय.

पण आतां आपल्याकडे नविन व जुना चेंडू समर्थपणे हाताळणारे [ खूप वरच्या दर्जाचे नसले तरीही] तेज व फिरकी गोलंदाज तयार होताहेतच ना ! >> सध्याचे फिरकी गोलंदाज बघता इथे शंकेला वाव आहे हो Wink

जाफरचे वय बहुतेक त्याच्या विरोधात गेले! >> बहुतेक ठिकाणी हेच वाचले खरे. पण १-२ वर्षे तरी नक्की stop gap arrangement करता आली असती नि त्या वेळेचे नीट नियोजन करून चांगली सलामीची जोडी बनवता आली असती.

भाऊ, गंभीरला सेहवागबरोबर मधल्या फळीत आणण्याबद्दल काय वाटतेय ? He plays spin authoritatively and his knack of trying to steer balls to slip will be less of a problem down the order.

तसे नसते तर आकाश चोप्रासारख्या फलंदाजाला सेहवागशी तुलना करून बाहेर पाठवले गेले नसते. >>> तुझा मुद्दा बरोबर आहे असामी, पण चोप्रा सेहवागमुळे बाहेर गेला नाही. उलट २००३-०४ च्या सीझन मधे त्याची व सेहवागची जोडी एकदम यशस्वी होती.
पण २००४ मधल्या पाकमधल्या विजयानंतर काहीतरी गडबड झाली. आपल्या सगळ्यांचाच फॉर्म गेला. २००४ च्या ऑक्टोबर मधे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीज मधे चोप्रा (इतरांप्रमाणेच) अपयशी ठरला. मग गंभीरला चान्स दिला गेला आणि नंतर चोप्राचे नाव मागे पडले. मग जाफरही आला.

चोप्रा टिकला असता तर सेहवागबरोबरच टिकला असता, कारण दुसर्‍या ओपनरची जागा कायम हंगामीच असे तेव्हा.

पण २००४ मधल्या पाकमधल्या विजयानंतर काहीतरी गडबड झाली. >> नाहि रे, काहितरी गडबड हीच होती. सेहवागच्या approach ला सांभाळायला चोप्राला एक बाजू धरून ठेवण्याचे काम देण्यात आले होते (जे गांगुली नि राइट ने सुचवले होते). त्याने ते चोख बजावले खर तर, पण अर्थातच त्याचा strike rate अतिशय कमी होता. time factor मधे पण त्याने अधिक वेळ घेतला होता (जे त्याचे as a opener म्हणून काम होतेच). पण त्याचा ठपका त्याच्यावर येऊन त्याला बाहेर काढले गेले. अर्थत हे सगळे मी त्याच्या मुलाखतीमधे वाचले होते.

<< भाऊ, गंभीरला सेहवागबरोबर मधल्या फळीत आणण्याबद्दल काय वाटतेय ? >> खरं तर सेहवागने नकळत गंभीरची गोची करून ठेवली आहे, असं मागेही इथंच मीं म्हटलं होतं; गंभीर हा सौरवसारखा आक्रमक वृत्तीचाच फलंदाज आहे व त्यामुळे सेहवाग व त्याच्या धांवगतीत फरक पडायला लागला कीं तो बेचैन व्हायचा [ चोप्रासारख्यांच्यात व त्याच्यात हा 'टेंपरॅमेंट'चा फरक मला तरी जाणवायचा]. त्यामुळे मुळातच गंभीर व सेहवाग ही जोडी सलामीसाठी तरी विजोडच होती. पण गंभीर हा दर्जेदार फलंदाज आहे व मधल्या फळीत तर तो चपखल बसेल, यात शंकाच नाही. कदाचित, सेहवागऐवजीं संथ खेळणार्‍या एखाद्या सलामीच्या फलंदाजाच्या जोडीला तो आला असता तर सलामीचा फलंदाज म्हणून स्थिरावलाही असता .
[ असामीजी, तुमच्यासारख्यानी ' भाऊ, तुम्हाला काय वाटतंय ?' असं मला विचारावं, यामुळे माझ्या बायकोला मला क्रिकेट खरंच कळतं कीं काय, असा आत्तां संशय निर्माण झालाय ! Wink ]

परवेझ रसूल [ जम्मू व काश्मीर]- नवीन उगवता तारा ? ४५ धांवांत ऑसीजच्या ७ विकेटस ! शिवाय फलंदाजीत ३६ धांवा !!

इथं काय माझी 'सिंगल विकेट' स्पर्धाच आहे का ? Wink
ऑसीज आज १५३- ५ वरून ३१६-७ वर पोचले ! ६वी विकेट ३०४ला पडली !! प्रथम कसोटी खेळणार्‍या हेन्रिक्सने ८९ धांवा काढल्या. क्लार्क बिनबाद १०३ धांवा गृहीतच धरल्यासारख्या ! क्लार्कचं 'फूटवर्क' व तंत्र वाखाणण्यासारखं ! आश्विन चे ६ बळी , आजचं वैशिष्ठ्य.
आत्तां टीव्हीवर 'आयबीएन लोकमत' वरील चर्चेत ऑसीजना आपण ४-० मारलं कीं आपला कसोटी क्रमांक ५वरून खूपच वर येईल, ही चर्चा सुरुं आहेच; हंसावं कीं रडावं हेंच कळत नाही ह्या नेहमीच्या आगाऊपणाला !!! Sad

मी विचार करत होतो.......दिवसभर खेळुन एका ऑफस्पिनर ने ६ विकेट हातोहात घेतल्या....आणि एक पार्टटाईम फिरकी गोलंदाजाने १ विकेट काढली..............मग इतका जुना अनुभवी टर्मिनेटर ऑफस्पिनर हरभजन ला एकही विकेट का नाही मिळाली ???????

<< टर्मिनेटर ऑफस्पिनर हरभजन ला एकही विकेट का नाही मिळाली ??????? >> 'ऑसीजना ऑफस्पीन खेळता येत नाही : भज्जी ऑसीजचा फडशा पाडतो ', हें आज कित्येक वर्षं मीं अशा थाटात बोललेलं ऐकतोय जणूं सर्व ऑसीजच्या 'डिएनए'मधलाच हा दोष आहे व भज्जीला जणूं ऑसीजच्या विरुद्ध वरदानच आहे ! शेन वार्नने फिरकीची मक्तेदारी भारतीय उपखंडाचीच नाही हें सिद्ध केलंय व अनेक ऑसी फलंदाज आज फिरकी उत्तम खेळतात. आणि भज्जी जर आतां इतर देशांविरुद्ध नुसतं बुजगावणंच वाटतो [ व म्हणून वगळला जातो] तर तो ऑसीजविरुद्ध मात्र खराखुरा वाघ बनेल, यामागचं तर्कशास्त्र अगम्य आहे !!!

लोक अजून २००१ मधेच आहेत ह्याचे ते लक्षण आहे. पण आता दोन टेस्ट मधे काय ते स्पष्ट होईलच. बहुधा आपण जडेजा आपला तिसरा स्पिनर म्हणून घेऊन खेळणार पुढे हे नक्की केलय असे दिसतय.

जर खेळपट्टी अशी असणार हे माहीत होत तर भुवनेश्वरला का खेळवल ? असेही पहिल्या नव्या चेंडू नंतर ५ ओव्हर आणी दुसर्यानंतर ४ ओव्हर नंतर स्पिनर गोलंदाजी करत होते , त्या ऐवजी एक स्पिनर (ओझा) खेळवता आला असता .

Pages