Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजचा सामना हरूनही वाईट नाही
आजचा सामना हरूनही वाईट नाही वाटलं ! ३२५ वि. ३१६ !!!
आता जडेजाच्या जागेवर पुजारा
आता जडेजाच्या जागेवर पुजारा आणि इशांत च्या जागी शमी अहमद ला खेळवले पाहिजे!
<<....जागी शमी अहमद ला खेळवले
<<....जागी शमी अहमद ला खेळवले पाहिजे! >> आज शमी अहमदला वगळल्याबद्दल रमीज राजाने आश्चर्य व्यक्त केल्यावर गांगुलीने दिलेलं समर्थन पटण्यासारखं होतं; एखाद्या नियमित खेळाडूच्या अडचणीमुळे एखाद्या सामन्यात त्याच्या जागीं नवीन खेळाडूला संघी मिळाली व त्याची कामगिरी चांगली झाली, तरीही केवळ त्यामुळे नियमित खेळाडूला पुढील सामन्यातही वगळणं यापेक्षां हा पायंडा खेळाडूंच्या मनोधैर्यासाठी चांगला आहे !
शमी अहमद चांगलाच उदयोन्मुख गोलंदाज आहे, हें मात्र नक्की.
तरीही केवळ त्यामुळे नियमित
तरीही केवळ त्यामुळे नियमित खेळाडूला पुढील सामन्यातही वगळणं यापेक्षां हा पायंडा खेळाडूंच्या मनोधैर्यासाठी चांगला आहे>>> सही. द्रविड-चॅपेल व गांगुली-राईट च्या कप्तानपदांमधे हाच फरक होता. हे लोक सिस्टीम्स, प्रोसेसेस, रिझल्ट्स वगैरेंबद्दल जास्त लक्ष द्यायचे, तर गांगुली-राईट हे ह्यूमन दृष्टीकोनाकडे. सध्या धोनी व फ्लेचर ते करीत नाहीत असेच दिसते. सेहवाग, गंभीर, युवराज, भज्जी, झहीर ई. लोकांच्या सध्याच्या परफॉर्मन्स वरून तेच जाणवते.
सध्यातरी दादा कोच नसावा असेच मला वाटते, धोनी गँगला राजकीय बूच बसवण्यासाठी ती खेळी असू शकेल. पण संघाचे नुकसानच आहे त्यात. भारताला पडद्यामागे राहणारा कोचच चांगला.
आता जडेजाच्या जागेवर पुजारा
आता जडेजाच्या जागेवर पुजारा >> ण मी धोनीने दिलेले स्पष्टिकरण अधिक अचूक धरतोय. ५ खेळाडू पूर्ण पन्नास ओव्हर ३० यार्ड्स मधे हवेत हा रुल आल्यामूळे दहा ओव्हरस पार्ट टायमर कडून काढणे प्रचंड रिस्की झालेय. युवराज पाचवा बॉलर म्हणून आला तर रैना सहावा बनतो ज्याची गरज ३ फास्ट बॉलर्समधील कोणाचाही एकाचा कोटा संपवायला लागू शकतो. अशा वेळी पुजारा जाडेजाच्या जागी येणे कठीण आहे. त्याला पर्याय म्हणजे इरफान फिट होण्याची वाट बघणे. दहा ओव्हर्स नि सातव्या क्रमांकावर उचलून मारण्याची क्षमता असलेला किंवा तसे करू शकेल ह्याची जास्तीत जास्त probability असलेला एकमेव खेळाडू.
शमी अहमद चांगलाच उदयोन्मुख गोलंदाज आहे, हें मात्र नक्की. >> मी ह्या वेळी पाहिले नाहि पण त्याला दोन तीन वर्षे मुंबई इंडियन्स मधे पाहिले होते तेंव्हा तरी फारसा वेगळा वाटला नव्हता पण अर्थात तो खुप तरुण असल्यामूळे सुधरणा झालेली असु शकते.
सध्यातरी दादा कोच नसावा असेच मला वाटते, धोनी गँगला राजकीय बूच बसवण्यासाठी ती खेळी असू शकेल. पण संघाचे नुकसानच आहे त्यात. भारताला पडद्यामागे राहणारा कोचच चांगला. >> +१०००००.
आज शमी अहमदला वगळल्याबद्दल रमीज राजाने आश्चर्य व्यक्त केल्यावर >> रमीज राजाने इशांत, दिंडा, शमी नि कुमार ह्या चारातल्या कोणाही एकाला वगळल्यावर तीच reaction दिली असती ह्याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही
भारताला पडद्यामागे राहणारा
भारताला पडद्यामागे राहणारा कोचच चांगला.
खरे तर पडद्यामागे पण कोणी नको! आणखी जास्त चांगला परिणाम होईल.
जसे रेस्टॉरंटमधल्या वेटर्स ना पगार कमी कारण जर चांगले काम केले तर टिप मधून पैसे मिळतील अशी पद्धत आहे, तसे खेळाडूंना संघात घेतले तर फार कमी पैसे नि चांगली कामगिरी केली तर त्याप्रमाणे पैसे असे असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल अमक्या तमक्याला जसा चेंडू टाकला होता, त्याच्यावर जगातल सर्वश्रेष्ठ फलंदाज सुद्धा बाद झाला असता, मग कमनशिबाबद्दल त्याला शिक्षा का? तर इतर नोकर्यांमधे जसे पगारवाढ, बोनस ऐवजी साहेब नुसतीच तुमची तोंड फाटेस्तवर स्तुति करतो नि त्या तोंडाला पाने पुसतो, तसे करावे.
कारण जग तसेच आहे हो! क्रिकेट संघ असणे म्हणजे लष्कर ठेवण्यासारखे नाही, प्रत्येक देशाकडे संरक्षणासाथी असलेच पाहिजे! अमेरिका, रशिया. चीन, जर्मनी या देशांकडे क्रिकेट संघ नाहीत, त्यांचे काय अडले? नि भारतापेक्षा तर जगातील राजकारणात त्याम्ना कितीतरी पटीने जास्त मान आहे, भारतालाच जगात कुणि काळा कुत्रा सुद्धा विचारत नाही. पाकीस्तानने म्हंटले का, की भारताकडे सचिन, गांगुली, द्रवीड. कुंबळे आहेत तर आपण ताजमाहाल हॉटेलवर हल्ला करू नये!!
वास्तविक मी जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे पण चेंडू माझ्या बॅटवर टाकतच नाहीत, नि चुकून आला तर झेल उडतो नि लोक तो झेलतात. हे माझे केवळ कमनशीब हो, नि त्याबद्दल मला शिक्षा! नाहीतर खरे तर मला पण सचिनसारखी करमाफ फेरारी, नि खासदारकी नि आणखी काही काही द्यायला पाहिजे. पण दिले का?
वाईट्ट, वाईट्ट जग!
परमेश्वरा ते जायंट्स हरले
परमेश्वरा ते जायंट्स हरले नि इथे झक्की इतर खेळांमधे घुसायला मोकळे झाले.
<< सध्यातरी दादा कोच नसावा
<< सध्यातरी दादा कोच नसावा असेच मला वाटते,>> दादाच्या आक्रमक , शैलीदार फलंदाजीचा चाहता व त्याच्या क्रिकेटच्या सखोल ज्ञानाबद्दल आदर असूनही मलाही त्याला प्रशिक्षकाच्या भूमिकेत पहायला नाही आवडणार .
<< इथे झक्की इतर खेळांमधे घुसायला मोकळे झाले. >> आमच्यासारख्यांचं क्रिकेटवेड आटोक्यात रहावं यासाठीच तर नियतिनं झक्कीसाहेबांची नियुक्ती केली असावी ! अधून मधून 'स्ट्राँग डोस' देण्याची गरज त्याना वाटली, तर तें आपल्या भल्यासाठीच आहे हें समजून घेऊन, तोंड वांकडं न करतां तो डोस घेणं उचित !!
>>सेहवाग, गंभीर, युवराज,
>>सेहवाग, गंभीर, युवराज, भज्जी, झहीर ई. लोकांच्या सध्याच्या परफॉर्मन्स वरून तेच जाणवते
आता त्यांच्या करीअर उतरणीला लागल्यात.... फिरुन परत स्वताला सिद्ध करायची ओढ किंवा तयारी (युवराजचा अपवाद वगळता) आता राहिलेली नाहीये असे दिसतेय.... कोच किंवा कप्तान कुणीही आणि कसेही असले तरी त्यांच्या खेळात काही फार फरक पडेल असे वाटत नाही!
कालची इशांतची कामगिरी बघता असला मानवतावादी दृष्टीकोन भारतासाठी संघ म्हणून फारच महागात पडतोय!
रहाणे खेळला एकदाचा..... आता या टुर्नामेंटमध्ये तरी त्याला बिनघोर संधी आहे.... सोने कर बाबा त्याचे!
>>सध्यातरी दादा कोच नसावा असेच मला वाटते
अगदी अगदी... निदान त्याच्या बरोबर खेळलेले चेहरे संघात आहेत तोपर्यंत तरी नको!
खर म्हणजे त्याने भारत 'अ' संघ, किंवा बांग्लादेश्/केनिया वगैरेसारख्या मिनोजना कोच करुन स्वताला सिद्ध करुन मग भारताच्या मुख्य संघाचा कोच बनण्याचा विचार करावा..... म्हणजे त्याला योग्य आदर मिळेल!
Sourav was good captain/good
Sourav was good captain/good leader... but with loads of Ego. Simply will not work with Indian Cricket and with this Team.


The job description for Indian Team coach is something like this:
The coach for Indian Cricket needs to be more Professional, Tactical, Thinker, Strategist.
One who is able to set aside personal ego, issues, and flexible enough.
One who will not compromise on Descipline.
One who will NOT talk to Media
One who knows how to handle Cricketers who consider thmeselves STARS and have plenty of Money, Power, Connections, and vested Interests.
On who can "protect and advise" potential talents to keep away from IPL
One who can work with Each Team member on fitness, commitments, etc. setting by example- meaning including his own fitness
One who above all can handle the POLITICS in every form in this game starting from selection, on/off field, media, management, BCCI et al.
Needless to say, Saurav or for that matter any Greatest ever Indian Cricketer does not fit the bill.... at best they can be in Selection Committee but Coaching Indian Cricket Team- Nope just not in our DNA !!!
Gary Kirsten was the only numero uno and ideal one....
and Fletcher is the worst example. so reality is we don't want Fletchers and Gary has no compulsions to work with our team :). So in the interim, no matter who is selected as coach, they all will probably produce the same results.
For that matter Mr. Zakki may be a better coach with all the 'Love' he has for Indian Cricket! :).
आता नियम बदलले आहे का ??? काल
आता नियम बदलले आहे का ??? काल मी फक्त भारताचाच डाव बघितला...त्यात फक्त पहिले १०च ओवर्स पॉवर प्ले होता नंतर भारताने ३५ व्या ओवर्स ला ५ ओवर्स चा बॅटिंग पॉवरप्ले घेतला........ इंग्लंड चा बॉलिंग पॉवरप्ले गेला कुठे ??????
>>त्यात फक्त पहिले १०च ओवर्स
>>त्यात फक्त पहिले १०च ओवर्स पॉवर प्ले होता नंतर भारताने ३५ व्या ओवर्स ला ५ ओवर्स चा बॅटिंग पॉवरप्ले घेतला........
गंमत म्हणजे युवी अतीशय सुंदर खेळत असताना साधारण ३४ व्या षटकात आपण बॅटींग पॉ.प्ले का घेतला नाही... हे एक गूढ आहे. ३२५ पाठलाग करताना, युवी सारखा मॅच विनर अतीशय सहज व आक्रमक फलंदाजी करत असताना तेव्हा पॉ. प्ले घेणे आणि सामना आपल्या बाजूने संपूर्णपणे वळवणे अशी स्ट्रॅटेजी लॉजिकल नव्हती का..? फार तर युवी बाद झाला असता.. तो तर असाही झालाच आणि धोणी ने आल्या आल्या लगेच पॉ. प्ले घेतलाच... पण सवतः नविन व रैना तितकासा सहज खेळत नव्हता अशा वेळी पॉ. प्ले घेण्याचा फायदा काहीच झाला नाही.. निव्वळ ७ च्या धावगतीने धावा जमल्या.
I had this feeling that Dhoni wanted to give Raina more advantage than Yuvi... its really illogical why a captain would not take batting powerplay when his best batsman is out batting, just to give him that extra flexibility to go for his shots which would have been game changing at that point?
And keepinig Ashwin in slips... well if someone can explain that logic..
Gambhir and Rahane looked to play for their 50s when they approched near 45.. Gambhir obvisouly had to prove a point and Rahane had to keep his place.
Kohali's batting also was let down in fact slowed things down..
Again Dhoni not coming up the order.. esp with Yuvi to keep left/right batsmen combo was strategic goof up.. esp. when everyone has been recommending him to bat up the order.
There is still this feeling watching Dhoni play these days and his tactics that there is something more than meets the eye... !!
Anyways, lets see if the strategy changes in the next game..
इंग्लंड चा बॉलिंग पॉवरप्ले
इंग्लंड चा बॉलिंग पॉवरप्ले गेला कुठे ?????? >> नवीन रुलप्रमाणे बॉलिंग पॉवर प्ले बंद झालाय. बॅटींग पॉवर प्ले बहुतेक जगातले सगळे कप्तान शक्यतोवर उशिरा घेताहेत. तो बहुधा चाळिसच्या आत घ्यावाच लागतो अजूनहि.
आमच्यासारख्यांचं क्रिकेटवेड आटोक्यात रहावं यासाठीच तर नियतिनं झक्कीसाहेबांची नियुक्ती केली असा >> :D. मागे माबोवर बेफाम वेगामधे धावणारे बाफ नि बेलगाम आयडी ह्यांना आळा घालण्यासाठी त्या सर्वसाक्षी क्रुपाळू भगवंतानेच महोदय झक्कींच्या रुपात माबोवर अवतार घेतला आहे असा लोकापवाद ऐकला होता तो आठवला. कदाचित वाढत्या गझलमारीला आळा घालायला झक्की परत त्यांची 'जायंट' निद्रा मोडुन अवतीर्ण झाले असावेत
झक्की NFL बाफावर भेटा हो. जायंटस नाहियेत तोवर आम्ही जरा आरडा ओरडा करून घेतो
<< कालची इशांतची कामगिरी बघता
<< कालची इशांतची कामगिरी बघता असला मानवतावादी दृष्टीकोन भारतासाठी संघ म्हणून फारच महागात पडतोय! >> स्वरूपजी, इशांतची कामगिरी समाधानकारक नसेल तर त्या कारणाने त्याला बसवणं व केवळ तात्पुरता पर्याय म्हणून घेतलेल्या शमी अहमदची कामगिरी एका सामन्यात चांगली झाली म्हणून इशांतला बसवणं, यांत फरक आहे असं नाही वाटत ? गांगुलीचं मत 'मानवतावादी' दृष्टीकोनावर नसून व्यावहारिक शहाणपणावर आधारित असावं.
असामीजी, अहो झक्कीसाहेबाना फार प्रोत्साहीत नका करूं; आमचं क्रिकेटवेड आटोक्यात ठेवण्याऐवजीं ते आम्हाला त्या वेडातून पूर्णपणे मुक्तच करायचे ! मग आली ना आमची पंचाईत !!!
भाऊ, तुमचे म्हणणे मान्य....
भाऊ, तुमचे म्हणणे मान्य.... पण कोणत्याही कारणाने का होईना, संघातली आपली जागा गृहीत धरणार्या नॉन परफोर्मिंग खेळाडूंना बसवा आणि काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द असणार्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी द्या... असे माझे म्हणणे!
पुजारा पूर्ण भरात असताना त्याला सामावुन घ्यायला आपल्या संघात ओपन स्लॉट नाहीये आणि गोलंदाजीतले सगळे स्लॉट ओपन असताना त्यावर दावा सांगू शकतील असे अतिरिक्त खेळाडू आपल्याकडे नाहीयेत
<< काहीतरी करुन दाखवण्याची
<< काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द असणार्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी द्या... असे माझे म्हणणे!>> याबद्दल दुमत नसावे !
पुजारा पूर्ण भरात असताना
पुजारा पूर्ण भरात असताना त्याला सामावुन घ्यायला आपल्या संघात ओपन स्लॉट नाहीये .> गंभीरच्या ऐवजी पुजाराला आणायला अजिबात हरकत नसावी असे मला वाटते. गंभीर नक्कीच चाचपडत खेळतोय. त्याची नेहमीची fluidity गायब आहे.
मी तर म्हणतो की गंभीर, कोहली,
मी तर म्हणतो की गंभीर, कोहली, रोहित शर्मा, जडेजा सगळ्यांना बसवा
सध्या एकही नीट खेळत नाहिये
गंभीर तर कधी कधी धोनीला लेट डाऊन करण्यासाठी खेळतो असे वाटतेय
जडेजा, दिंडा तर वशिल्याचा तट्टू आहेत
योग, तुम्ही माझ्यावर
योग, तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद.
पण त्या कोचला अधून मधून भारतात जावे लागेल का? का मी अमेरिकेतच (शक्यतो घरीच) बसलो तरी चालेल? कारण मला लाचलुचपत करणे, पैसे खाणे, राजकारण या गोष्टी जमत नाही. जमल्या असत्या तर मी तिथेच नसतो का राहिलो?
असामी, आरडा ओरडा करण्याची वेळ संपत आलेली आहे! अगदी घसा बसेस्तवर आरडा ओरडा करा. कारण आज दुपारी सोक्षमोक्ष लागेल. मग आरडा ओरडा करायची वेळ कशाला येईल?
पण त्या कोचला अधून मधून
पण त्या कोचला अधून मधून भारतात जावे लागेल का? का मी अमेरिकेतच (शक्यतो घरीच) बसलो तरी चालेल? >>> झक्की त्यावरही तोडगा आहे. बंगलोरला एक 'Sports Coaching Outsourcing Services International Private Limited" अशी कंपनी स्थापन करून त्यातील एक जण तुमचा भारतीय काउंटरपार्ट म्हणून तुमचे काम बघेल जेव्हा तुम्ही नसाल तेथे तेव्हा. मग रात्री एखादी स्टेटस मीटिंग वगैरे घेऊन सुद्धा काम होईल
तुमच्या पोस्टमधल्या बाकी मुद्द्यांकरिता कोणीतरी नुकताच एक नवीन बीबी ओपन करून दिलेला आहे
झक्कीसाहेब, आपल्या फलंदाजाना
झक्कीसाहेब, आपल्या फलंदाजाना फास्ट, उसळते व स्विंग होणारे चेंडू खेळता येत नाहीत हें सर्वसाधारणपणे खरं असलं तरीही आपल्याकडे गावसकर, मोहिंदर, द्रविड, लक्ष्मण व सचिनसारखे जागतिक दर्जाचे याला अपवाद आहेतच; तसंच,<< लाचलुचपत करणे, पैसे खाणे, राजकारण या गोष्टी जमत नाही. जमल्या असत्या तर मी तिथेच नसतो का राहिलो? >> या बाबतीतही इथेच राहिलेल्या आमच्यासारख्यांमधेही तसेच अपवाद असूं शकतील अशी शंका आपल्याला कधी आली नाही का ? आमचीही इथल्या खेळपट्टीवर खेळताना तारांबळ उडतेच पण विकेट टीकवून रहातोच ना आम्ही उभे इथं. कधीं तरी एखादी टाळी वाजवा ना आमच्यासाठीही !
(No subject)
या दोघांत मिळून आयपीएल
या दोघांत मिळून आयपीएल वाल्यांनी ४-४.५ मिलीयन डॉ घालवले आहेत ना?
इथेच राहिलेल्या
इथेच राहिलेल्या आमच्यासारख्यांमधेही तसेच अपवाद असूं शकतील
मला पक्के माहित आहे तुमच्या सारखे लोक भारतात खरे तर जास्तच आहेत, त्यामुळेच देशाची प्रगति होत आहे.
फक्त क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, संघाची निवडसमिती, आमदार, निदान नगर 'सेवक' म्हणून सुद्धा तुमच्यासारखे लोक होऊ शकत नाहीत, नि मला तर चक्क कोच करू पाहता आहात. जमणार नाही हो!! त्यातून खेळाडूंना मिळणार्या पैशाबद्दलचे माझे मत पहाता मी तर एक मिनिटभर देखील टिकू शकणार नाही!
चालले आहे, तसेच चालू द्या. चांगले लोक देशात जास्त आहेत म्हणूनच देशाची प्रगति होते आहे.
आणि एव्हढ्या गंभीरपणे माझी मते घेऊ नका हो! मला सवय नाही. केवळ लाचलुचपत जमत नाही या पेक्षा खरे कारण इथे पळून यायचे असे आहे की मला अक्कल फारशी नाही, नि इमानदारीने काम करण्याची पण फारशी सवय नाही. मग भारतात माझा कसा टिकाव लागावा?
इथे बरे जरा बेताचीच अक्कल असलेली बरी, नाहीतर त्रासच होतो इतरांशी जमवून घ्यायला.
झक्कीसाहेब, सॉरी, अगदीं
झक्कीसाहेब, सॉरी, अगदीं मनापासून ! सहसा माझ्या हातून असा'वाईड' होणारा चेंडू निसटत नाही !!! आणि, तुमच्या बाबतीत बोलायचं तर आडव्या बॅटने फटके मारले, तरी ब्रॅडमन तो ब्रॅडमनच!
असो, आज बघूं कोचीला काय होते गोची !
चला, गंगेत घोडं न्हालं एकदाचं
चला, गंगेत घोडं न्हालं एकदाचं ! भारत इंग्लंड विरुद्ध दुसरी 'एक दिवसीय' मॅच जिंकला !!
गंगेत घोडं न्हालं एकदाचं
गंगेत घोडं न्हालं एकदाचं
दणदणीत जिंकले की!! काय पण गोलंदाजी! इंग्लंडचे खंदे फलंदाजसुद्धा अगदी नवशिके वाटत होते!
जडेजा नि धोणीची शेवटच्या षटकांमधली फलंदाजी!! वा, वा.
फक्त सर्व पंचांना एक ते सहा आकडे मोजायला शिकवा. पुढच्या सामन्यापर्यंत निदान दररोज आठ तास म्हणून घ्या त्यांच्याकडून! अगदी बरोब्बर जमले पाहिजे. नि गोलंदाजांना पण!!
<<फक्त सर्व पंचांना एक ते सहा
<<फक्त सर्व पंचांना एक ते सहा आकडे मोजायला शिकवा.>> नेव्हर चेंज विनींग काँबिनेशन ! चूकतच रहा म्हणावं चेंडू मोजायला, आम्ही जिंकतोय तोंवर !!!
अरे, भारत ७ विकेटने जिंकला
अरे, भारत ७ विकेटने जिंकला तरी इथं सामसूम !!!!
अभिनंदन.
भारत ७ विकेटने जिंकला तरी इथं
भारत ७ विकेटने जिंकला तरी इथं सामसूम !!!! > म्हणूनच असेल, शिव्या तरी कोणाला घालायच्या
धोनीचे ऐका, Take losses in strides, take wins also in strides
Pages