Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
~चांगल्रे दणदणित जिंकले की!
~चांगल्रे दणदणित जिंकले की! इंग्लंडचा संघ म्हणजे जणू प्राथमिक शाळेतल्या मुलांचा संघ असावा इतक्या सहजतेने त्यांच्या फलंदाजीची नि गोलंदाजीची वाट लावली
मला तर संशय येतो की ते सगळे भारतात येऊन आजारी पडले असावेत. मी भारतात आलो की नेहेमीच आजारी पडतो!
<< ते सगळे भारतात येऊन आजारी
<< ते सगळे भारतात येऊन आजारी पडले असावेत >> मलाही असंच वाटतं; आपल्या संघालाही केवळ बाहेरचं हवामान नाही रुचत म्हणूनच त्यांची तिथं वाईट हालत होते !!!
Great win by Black Caps !!
Great win by Black Caps !! That's why I love them even when they never won (and probably never will win) consistently . Their strength has always been the fight they show and their lower order batting (I remember Vettori batting at No 11 once) Only NZ can win from 7/105 to 9/209 !!!
आज पुन्हा विजय, तरीही इथं तीच
आज पुन्हा विजय, तरीही इथं तीच सामसूम !!
>> आज पुन्हा विजय, तरीही इथं
>> आज पुन्हा विजय, तरीही इथं तीच सामसूम !!
भाऊ, कुणी तरी म्हंटलंय ना? हौदसे गई वो बूंदसे नहीं आती
हौदसे गई वो बूंदसे नहीं
हौदसे गई वो बूंदसे नहीं आती
अहो थेंबे थेंबे तळे साचे! हौदाचे काय घेऊन बसला आहात?
आता शेवट्च्या सामन्यात सगळे नवीन खेळाडू घ्या. ज्यांना आत्तापर्यंत घेतले नाहीये असे.
आज सामना बघत असता इंग्लंडच्या न्यू झीलंड दौर्याबद्दल बोलताना असे काही ऐकले की त्यांची काही रोटेशन स्कीम आहे, म्हणजे खेळाडू बदलायचेच, म्हणजे सर्वांना संधी. बीसी सी आय कडे तसा काही प्रोग्राम आहे का?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांसाठी एक नवीन धागा काढा, क्रुपया.
आज सामना बघत असता इंग्लंडच्या
आज सामना बघत असता इंग्लंडच्या न्यू झीलंड दौर्याबद्दल बोलताना असे काही ऐकले की त्यांची काही रोटेशन स्कीम आहे, म्हणजे खेळाडू बदलायचेच, म्हणजे सर्वांना संधी. >> कुठे कधी केंव्हा ? मी वाचले कि बेस्ट टीम घेऊन जाणार असे ?
चिमण -
चिमण -
मुंबईने ४० व्यांदा रणजी करंडक
मुंबईने ४० व्यांदा रणजी करंडक जिंकला! उपांत्यपूर्व फेरीत चाचपडत पोहोचले पण नंतर चांगले खेळले, फायनल मधे तर ३५५ रन्स करून सुद्धा एक डाव व १२५ धावांनी विजय!
वासिम जाफर ने बरीच रेकॉर्ड्स मोडली, त्यात तेंडुलकरला रणजी मधे पहिल्यांदा रन आउट करण्याचेही आहे

मात्र जाफर सध्या जबरदस्त फॉर्म मधे आहे. ऑस्ट्रेलिया सिरीज साठी त्याचा पुन्हा विचार व्हायला हवा. धोनीचा सेहवाग व गंभीर बरोबर असलेला "बहुत याराना" पाहता तसे होईलही
जाफर हा खरंच गुणी खेळाडू आहे,
जाफर हा खरंच गुणी खेळाडू आहे, सलामीला खेळण्यासाठीचं त्याचं तंत्र व टेंपरॅमेंट बिनतोड आहेत पण बिचार्याला नशीबाची साथ नाही ! <<ऑस्ट्रेलिया सिरीज साठी त्याचा पुन्हा विचार व्हायला हवा.>> सहमत.
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या एक दिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजानी आपल्या मानसिकतेचं दुर्दैवी प्रदर्शन घडवलं ! कपिल, वसिम अक्रम, गांगुली इ.इ. प्रत्येक जाणकार समालोचक पहिल्या आठ-दहा षटकांत धांवांचा विचार न करतां 'स्विंग' होणारा चेंडू नीट खेळून काढला/ सोडून दिला, तर नंतर आरामात धांवा काढता येतील हें निक्षून सांगत होता; तरीही पहिल्या चार फलंदाजानी अत्यंत बेशिस्तपणे बाहेर जाणार्या चेंडूला बॅट घालून विकेट फेकल्या ! ' ही संधी मीं दोन्ही हातानी धरून ठेवणार' असं सामन्याआधी सांगत रोहित शर्माने ती संधी उकीरड्यावर फेंकून दिली. स्विंगचा अंदाजही न घेतां, पहिल्याच चेंडूवर कव्हर ड्राईव्ह करायचा आगाऊपणा करून बाद होत कोहलीने ' खबरदार, मला एक परिपक्व फलंदाज म्हणाल तर !', अशी धमकीच दिली . मालिका हरूनही इंग्लंडच 'प्लस' होऊन गेलं. प्रतिभेला शिस्त, डेडिकेशन याची जोड मिळत नसेल तर कामगिरीत सातत्य येणं कठीणच. जाफर सारखे खेळाडू म्हणूनच संघात असणं औचित्यपूर्ण होईल, असं माझ्यासारख्या सामान्य क्रिकेटप्रेमीना वाटणं स्वाभाविक.
आज ऑसीजनी आपला भारत दौर्याचा
आज ऑसीजनी आपला भारत दौर्याचा संघ जाहीर केला. फिरकीवर दिलेला भर स्पष्ट आहे.
गेल्या अनेक मालिकेत कसोटीत आपण इतका मार खाऊनही आज भज्जीने मुक्ताफळं उधळलीतच ; ' ऑसीजना ४-० मार देऊं !'. अरे, आधी द्या आणि मग बोंबला कीं !!! अशीं अनावश्यक, हास्यास्पद विधानं आपले खेळाडू खरंच कां करतात !!!!
भाऊ नमसकर, >> अशीं अनावश्यक,
भाऊ नमसकर,
>> अशीं अनावश्यक, हास्यास्पद विधानं आपले खेळाडू खरंच कां करतात !!!!
कोणाचेतरी कुठेतरी लागेबांधे असतील. सट्टा लावणार्यांचे फावावे म्हणून अशी विधाने केली जात असावीत. हा आपला माझा अंदाज बरं का!
आ.न.,
-गा.पै.
आज भज्जीने मुक्ताफळं उधळलीतच
आज भज्जीने मुक्ताफळं उधळलीतच >>>>>>>> ते ठीक आहे हो.........पण हरभजन ला घेतला आहे का संघात ?
ऑस्ट्रेलिया संघाबरोबरील
ऑस्ट्रेलिया संघाबरोबरील सामन्यांचे परीक्षण लिहिण्यासाठी एक नवीन धागा उघडावा ही विनंति.
<< सट्टा लावणार्यांचे फावावे
<< सट्टा लावणार्यांचे फावावे म्हणून अशी विधाने केली जात असावीत. >> सट्टावाले जड खिसावाले असतात पण इतक्या हलक्या कानाचे नसावेत !

<<.........पण हरभजन ला घेतला आहे का संघात ? >> घ्यावं म्हणूनच आपली अशी हजेरी लावत असावा !!
>>भज्जीने मुक्ताफळं
>>भज्जीने मुक्ताफळं उधळलीतच
त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार..... उथळ पाण्याला....
महिला विश्वचषकाकडे कुणाचे
महिला विश्वचषकाकडे कुणाचे लक्ष दिसत नाहिये!
स्टेन ची बॉलिंग बघितली का
स्टेन ची बॉलिंग बघितली का कोणी ? नसेल तर गूगल करुन बघा. absolute delight !!!!
अगदी अगदी DW Steyn 8.1
अगदी अगदी
DW Steyn 8.1 ऑव्हर्स 6 मॅडन्स 8 रन्स 6 विकेट्स
येस असामी , अप्रतिम ! कॅलीस
येस असामी ,
अप्रतिम ! कॅलीस ला पण मानल पाहिजे . मॉर्केल उगाचच थकत होता .
पण या मॅचमुळे सगळ्यात खूष असेल BCCI . DRS कशी कशी चुकू शकते हे सिद्ध केलय या मॅचने
आता it was human error not Technology वगैरे खर आहे , पण Result काय , शेवटी चिकिखाऊ अंपायर प्रमाणेच डिसिजन झाले ना ?
<< अशीं अनावश्यक, हास्यास्पद
<< अशीं अनावश्यक, हास्यास्पद विधानं आपले खेळाडू खरंच कां करतात !!!! >> हा सांसर्गिक रोग दिसतोय ! आपल्या महिला संघाची कप्तान मिथीलानेही सामन्याआधी ' इंग्लंडच्या गोलंदाजीत कांहीच दम नाहीय ' असलं विधान करून इंग्लंडच्या गोलंदाजांकडूनच थोबाडीत मारून घेतलीच !!!
आणखी एक मुक्ताफळ - महिला
आणखी एक मुक्ताफळ - महिला विश्वचषकातली काल आपली ' जिंका किंवा मरा ' अशी श्रीलंकेविरुद्धची मॅच; एका मराठी वृत्तपत्रातला मथळा होता - ' आज लंकादहन !'. आपण खरपूस मार खाऊन प्राथमिक फेरीतच स्पर्धेबाहेर !!!
ही असली विधाने करण्याचा एक
ही असली विधाने करण्याचा एक वाईट परिणाम म्हणजे खेळाडूंना उगीचच ते खरे वाटते नि मग ते जादा आत्मविश्वासाने, किंवा तसे झालेच आहे असे समजून, नीट लक्ष न देता खेळतात, चुका जास्त करतात नि शेवटी
हरतात.
निदान असे तरी म्हणावे की त्यांच्याकडे, अमुक तमुक खेळाडू चांगले आहेत, पण तरी.....
इराणी ट्रॉफीचे पडघम लागू
इराणी ट्रॉफीचे पडघम लागू लागले आहेत. विजय, रैना, भज्जी, युवी, स्रिसंथ वगैरे नेहमीच्या यशस्वी खेळाडूंना पुनरागमन करण्याची जंगी संधी असे मथळे वाचून परत मला माझीच दया आली.
ऑस्ट्रेलियाच्या सर्व सामन्यांसाठी हाच संघ ठेवावा अशी माझी विनंती आहे.
विजय, जाफर, रोहित शर्मा, रैना, युवी, धोनी, भज्जी, नेहरा, स्रिसंथ, जाडेजा. एकदाचा निकाल लागला कि ह्यातले जे कोणी खेळले नसतील (criteria म्हणून अगदी ३५+ चा batting average, सहाच्या आत बॉलिंग average - विकेट्स घ्याव्या अशी माझी अपेक्षाही नाहि) त्यांना सन्मानाने शालजोडी वगैरे देण्यात यावी नि परत कुठल्याच टेस्ट सामन्यांसाठी त्यांचा विचार करू नये.
On serious note, it's high time to move Sehwag move down the order and start looking for new opening pair. For that matter, maybe Dhoni should open. As such he can't be doing worse than that current situation we are in. At least this will open up slot down for accommodating Rahane or Tewary.
विजय आणि जाफर हे दोघेही
विजय आणि जाफर हे दोघेही सलामीसाठी योग्य तंत्र व मानसिकता असलेले खेळाडू आहेत असं मला वाटतं. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने चांगली कामगिरी करण्याची कुवत त्यांच्यात आहे का हें सांगणं कठीण आहे. जाफर हा या दोघांत अधिक अनुभवी व उजवा वाटतो. सेहवागला मधल्या फळीत खेळवून विजय व जाफर याना संधी देवून दीर्घकालीन खरीखुरी सलामीची जोडी तयार करणं याला आतांच महत्व देणं उचित.
विजय आणि जाफर हे दोघेही
विजय आणि जाफर हे दोघेही सलामीसाठी योग्य तंत्र व मानसिकता असलेले खेळाडू आहेत असं मला वाटतं. >> भाऊ विजयकडे हे तंत्र होते, सध्याचा त्याचा खेळ बघता तो कुठे तरी ते विसरून गेलाय असे जाणवतेय. न जाणो कदाचित त्याला जुना विजय गवसेल.
जाफर मला कधीच पुरेसा तंत्र शुद्ध वाटला नाहि (म्हणजे गावस्कर, चोप्रा वगैरे मोल्डमधला) पण त्याच्याकडे स्वतःच्या विकेटवर premium लावायची जाणीव/क्षमता आहे ह्याबाबत कोणालाच अजिबात संशय नसावा.
दीर्घकालीन खरीखुरी सलामीची जोडी तयार करणं याला आतांच महत्व देणं उचित >>+1. फक्त दीर्घकालीन म्हटल्यामूळे जाफर त्यात येउ शकेल कि नाहि ह्याबद्दल शंका आहे. Under 19 मधून खेळलेला बाबा अपराजिथ हा एक अतिशय उच्च temperament नि तंत्र असलेला खेळाडू आहे असे बरेचदा वाचलेले, अर्थात तो खूपच तरुण आहे त्यामूळे ....
<< सध्याचा त्याचा खेळ बघता तो
<< सध्याचा त्याचा खेळ बघता तो कुठे तरी ते विसरून गेलाय असे जाणवतेय >> मर्यादित षटकांच्या सामन्यांत वर्णी लागावी म्हणून...... !!!
चेन्नईला पहिली टेस्ट असताना
चेन्नईला पहिली टेस्ट असताना ऑसीज ना आधीच्या दोन प्रॅक्टिस मॅचेस तेथेच का दिल्या कळत नाही. जरा वेगळ्या पिचवर, व स्विंग वगैरे वेगळे असलेल्या ठिकाणी का नाही दिल्या? ते लोक तसेच करतात. अनेक वर्षे भारतला सराव सामने पाटा पिच वर देऊन पहिली टेस्ट एकदम उलट्या वातावरणात असे.
इथेच तर भारताची उच्च संस्कृति
इथेच तर भारताची उच्च संस्कृति नि परकीयांमधील संस्कृतीचा अभाव दिसून येतो.
अतिथि देवो भव! असे आहे अतिथीला फसवावे असे आपण करत नाही. भारतात गेल्यावर तुम्हाला कधीतरी कुणि फसवले आहे का? भेसळयुक्त माल विकला आहे का?
अतिथी देवो भव अमोल खर तर
अतिथी देवो भव अमोल
खर तर प्रत्यक्षातले पिच अगदी वाका स्टाईल निघाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही:;)
Pages