क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनी आहेच निच माणुस.............सगळे क्रेडीट स्वतः कडे हवे होते........म्हणुन सचिन ला मुद्दामुन रन आउट केले

मॅच जिंकली, सलग तीन चौकार Happy
जोपर्यंत मॅच जिंकत नाही, तोपर्यंत मला धोनीवर विश्वास नसतो Lol

Finally!!!

Happy

धोनीने आता बॅट उचलली... :/
दोन चौकार आणि जिंकायला १...>> ब्घा मी म्हणलं नव्हतं सुपरकिन्ग्जना मॅच जिन्कायची हुती.
जडेजाचे दोन आणि धोनीचे दोन..

बा द वे, सिडल आणि स्टार्क लैच टिच्चुन बॉलिन्ग करत होते की.

जडेजा ने मॅच काढली रे . आजपासून त्याच Trolling बंद Happy
On a serious note , he has really improved a lot , especially in bowling . He is outshining regular spinners in ODIs consistently and now in tests too .

पेटणार नाही तर काय......................

साला धोनी.........टोकाशी येउ पर्यंत टीपी करत असतो........:खोखो:
.
.त्या सचिन ला उगाच रनआउट केले........ स्वतःला क्रेडीट घेण्यासाठी

उदयना, कसला पेटलायस >>>
तेच की! Lol अहो तोही माणूसच आहे. त्यालाही टेन्शन येत असेल!!

जिंकली ना! बॉटम लाईन महत्त्वाची!

.टोकाशी येउ पर्यंत टीपी करत असतो..>> होय की राव. ५ बॉलला रन नै आणि शेवटच्या बॉलवर रन काढुन स्ट्राइक त्याच्याकडे/

चला, जिंकले एकदाचे !! सामना रंजक करायला भारताने वेळ काढून व विकेटस देवून आणि ऑसीजच्या सिडल व स्टार्कने अप्रतिम 'रिव्हर्स स्विंग' गोलंदाजीचं प्रदर्शन करून !!

तेच की! अहो तोही माणूसच आहे. त्यालाही टेन्शन येत असेल!!>>नाही तर काय.

चला जिंकले एकदाचे.

आता स्टार स्पोर्ट्सवर सिद्धूची कमेंट्री ऐकणे ही काळ्यापाण्यासारखीच शिक्षा भोगली. मन जीता तो जग जीता, ऑस्ट्रेलिया मनसे हार रही है, मनका हारा कभी जीत नही सकता, और इंडीया मनसे जीत रही है!!!! Lol (त्यानंतरमधेच) एमपी डोंट शूट फ्रॉम हिप्स, दे शूट फ्रॉम लिप्स! और मेरा तो काम है बोलना पॉलिटिक्स हो या क्रीकेट मे ऑल इन वन हू...

<< सिद्धूची कमेंट्री ऐकणे ही काळ्यापाण्यासारखीच शिक्षा भोगली >> नंदिनी, पण मानला आपण सिद्धूला; मागे बायको बसली असतानाही स्वतःचं हंसू करून घ्यायला कचरत नाही हा सरदार !!!!! Wink

धोणि नि बीसीसीआय च्या सर्वच खेळाडूंचे अभिनंदन. ऑस्ट्रेलियन्स पण चांगले खेळले, विशेषतः पहिल्या डावात.

आता द. अफ्रिकेत गेल्यावर जरा बीसीसीआय चे खेळाडू पुनः जमिनीवर येतील. मग बघू.

आता स्टार स्पोर्ट्सवर सिद्धूची कमेंट्री ऐकणे ही काळ्यापाण्यासारखीच शिक्षा भोगली>>>>

प्रचंड सहमत नंदिनी Lol

आता सगळ्या चॅनल वर धोनीचा जयजय्कार........शेवटच्या क्षणी मॅच जिंकुन दिली...... वगैरे वगैरे....पण हे विसरतात की शेवट्च्या क्षणावर मॅच या माणसामुळेच आली...अन्यथा ५ ओव्हर आधीच संपली असती मॅच..

अतिशय स्वार्था आहे धोनी.........सचिन शेवट पर्यंत अस्ता तर सगळ्या चॅनल्स वर त्याच्याच बाबतीत बोलले गेले असते........हेच धोनी ला नकोय ... म्हणुन त्याने सचिन ला रन आउट केला

अतिशय स्वार्था आहे धोनी.........सचिन शेवट पर्यंत अस्ता तर सगळ्या चॅनल्स वर त्याच्याच बाबतीत बोलले गेले असते........हेच धोनी ला नकोय ... म्हणुन त्याने सचिन ला रन आउट केला>> Lol शांत गदाधारी भीम, धोनी लोकांचा टेस्टमधला interest वाढवण्यासाठी हे करतोय असे समज Wink

अतिशय स्वार्था आहे धोनी.........सचिन शेवट पर्यंत अस्ता तर सगळ्या चॅनल्स वर त्याच्याच बाबतीत बोलले गेले असते........हेच धोनी ला नकोय ... म्हणुन त्याने सचिन ला रन आउट केला >>>
आणि सचिन लगेच रन आउट झाला.

लोकांचा टेस्टमधला interest वाढवण्यासाठी हे करतोय असे समज > :d सिद्धू मोड ऑन: हे म्हणजे पंक्चर टायर मधे हवा भरण्या सारख झालं. सिमोऑफ

आयला, लोकांना शिव्या द्यायलाच आवडतात. आता एव्हढे चार दिवसात जिंकले तर जिंकले म्हणा नि आनंद माना! धोनी ला शिव्या, सिद्धूची टिंगल हे कशाला?

हं, बहुतेक तेंडूलकर बाद झाला याचा राग आहे. आता तेंडूलकर असताना त्याचा पार्टनर जर धावबाद झाला तर तेंडूलकरची चूक म्हणून कुणि एव्हढ्या शिव्या देतील का? मग जरी धावा पाहिजे होत्या तरी एव्हढ्या अनुभवी खेळाडू ने बाद होण्याचा धोका ओळखायला नको का? असे दुसर्‍या खेळाडू बद्दलच म्हणाल.

हिंदी सिनेमातल्या सारखे 'मला तूच तू, मेलो तरी चालेल, पण तुझ्यावरच माझे प्रेम आहे, तुझ्यापुढे मला दुसरे कुणि नाही!'

Happy

आता तेंडूलकर असताना त्याचा पार्टनर जर धावबाद झाला तर तेंडूलकरची चूक म्हणून कुणि एव्हढ्या शिव्या देतील >>>>>>>>> झक्की आधी बघा वरचे वाचा जरा.......

सचिन ने १६ बॉल्स मधे १७ रन्स केलेले कारण ओव्हर्स कमी होत्या म्हणुन जलद गती ने रन्स बनवत होता
त्यात ऑसी वाले उगाच टीपी जास्त करत होते
आणि धोनी ने १७ बॉल्स मधे २ रन्स काढलेल्या....
म्हणुन प्रेशर येउन शेवटी तो आउट झाला

हा विजय वादातीत (convincing) आजिबात वाटंत नाही. २५१/७ वरून पाहुणे ४०८ पर्यंत पोहोचलेच कसे? तीच रड दुसर्‍या डावात! १७९/९ वरून चक्क २२३? बीसीसीआयची गोलंदाजी बेभरवशाची आहे.
-गा.पै.

उदयन, तुझा राग समजण्यासारखा आहे पण असे लक्षात घे कि धोनी नेहमी असाच खेळतो, आल्या आल्या पट्टा फिरवणे त्याने फार पूर्वी बंद केले आहे. त्याला कदाचित पिचचा नि बॉलिंगचा अंदाज यायला थोड वेळ लागत असेल. शंभरातल्या ८० वेळा तरी तो नंतर हा बॅकलॉग पटकन भरून काढतो. That's his style and it has worked for him. He probably confident enough that he can pull out RRR of 4 in last few overs, especially he can see that either starc or some spinner will 2 overs at least. शेवटी तो तिथे मैदानात आहे, त्यामूळे त्याला जे जमेल असे वाटतय तेच तो करू शकणार. समज मारायला गेला असता नी आऊट झाला असता तर काय म्हणाला असतास ? Wink

इंद्रा Lol

आल्या आल्या पट्टा फिरवणे त्याने फार पूर्वी बंद केले आहे. त्याला कदाचित पिचचा नि बॉलिंगचा अंदाज यायला थोड वेळ लागत असेल. >>>>>> मान्य आहे........पण समजा आज तो १७ बॉल्स मधे ४ रन्स काढुन आउट झाला असता आणि ओव्हर्स संपल्या आणि आपण रन्स बनवता आले नाही तेव्हा सुध्दा तुम्ही हेच बोलले असते का ?

पण मागच्या काही मॅचेस बघ....याने बॉल खाल्ले आणि नंतर आउट झाला त्या मुळे इतरांवर प्रेशर आले...हे सुध्दा कितीतरी वेळा झाले.. Happy

गा.पै.जी, तो स्टार्क दोन्ही डांवात [ ९९ व ३५] कसा खेळत होता तें पाहिलं असतत तर कदाचित असं म्हणाला नसतात, असं मला वाटतं. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील खंद्या फलंदाजांपेक्षां त्याचं तंत्र व 'टेंपरॅमेंट' सरस वाटत होतं. आपली गोलंदाजी हल्लीं भेदक नाही हें खरं असलं तरीही निदान ह्या सामन्याला तरी तें लागू होत नसावं. म्हणूनच, आपली 'गोलंदाजी बेभरवशाची' म्हणण्यापेक्षां स्टार्क व त्याला साथ देणार्‍या तळाच्या ऑसी फलंदाजांचं कौतुक करणं मला तरी अधिक औचित्य्पूर्ण वाटतं.

सचिनच्या धांवबाद होण्याचा दोष धोनीला देणं मला तरी योग्य वाटत नाही. << म्हणुन प्रेशर येउन शेवटी तो आउट झाला >> हें तर सचिनच्या प्रगाढ अनुभवाचं व प्रगल्भतेचं अवमूल्यन करण्यासारखं आहे ! पहिल्या डावात सचिनही संथ खेळला होता व तें निश्चितच समयोचित नव्हतं असा रास्त समज सगळ्यांचाच होता. पण म्हणून त्याच्यावर हेत्वारोप करणं अन्यायकारक आहे. तेंच दुसर्‍या डावात धोनीबद्दल. धोनी आला तेंव्हा स्टार्क व सिडल अप्रतिम 'रिव्हर्स स्विंग' करत होते व धोनीला चेंडूंचा अंदाजच येत नव्हता हें स्पष्ट दिसत होतं. सचिन मात्र स्थिरावला होता व त्या परिस्थितीत त्याने धांवगती वाढवणं क्रमप्राप्तच होतं.

धोनी आला तेंव्हा स्टार्क व सिडल अप्रतिम 'रिव्हर्स स्विंग' करत होते व धोनीला चेंडूंचा अंदाजच येत नव्हता हें स्पष्ट दिसत होतं>>>>>> सचिन आउट झाल्या बरोबर जाडेजा आला आणि लागोपाठ २ चौकार ठोकले हे बघुन धोनी ला वाटले की आता मॅच विनर रन सुध्दा हाच मारेल म्हणुन लगेच लागोपाठ ३ चौकार मारुन श्रेय आपल्या बाजुने घेतले

या वेळेला त्याला अंदाज कसा आला चेंडु चा ?

Pages