क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< मात्र २००८ च्या सिरीज मधे दोन्ही कप्तानांनी ठरवले होते की इमानदारीत खेळायचे >> खेळात असं ठरवायची पाळी यावी यांतच तसं न वागायची मानसिकता पुरती रुजलेली आहे हें गृहीत धरावं !! Wink

मात्र २००८ च्या सिरीज मधे दोन्ही कप्तानांनी ठरवले होते की इमानदारीत खेळायचे >> दोन्ही कप्तान आपापल्या हाफ पँट्यी खेचत, हाताच्या पालथ्या मूठीने नाक पुसत, दुसर्‍या हाताच्या बोटांवर थुंकी उडवत "चिटींग नाय कर्‍हायची हां" म्हणत शेक हँड करताहेत असे द्रुष्य डोळ्यासमोर आले Lol

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱया आणि चौथ्या कसोटीसाठीचा भारताचा संभाव्य संघः
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, शिखर धवन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंग, आर. अश्विन, प्रग्यान ओझा, अजिंक्य राहाणे, अशोक दिंडा, चेतेश्वर पुजारा.

ईशांत ला देखिल हाकलाला असता तर मी ४ किलो वाटले असते.. सेहवाग ला पहिल्या दोन मध्ये खेळवला हेच खूप झाले. Happy
[आता तो म्हणतोय मी पुन्हा निवडीसाठी स्वतःला सिध्द करेन.. ईतके दिवस काय झोपा काढत होता का?]

मी त्याला ट्विट केले............जे काही सिध्द करायचे आहे ते आधी तुझ्या गल्ली मधे मग शहरामधे त्यानंतर रणजी मधे त्या नंतर हजारे ट्रॉफि मधे ... सिध्द कर ........मगच असले कमेंट्स कर Wink

>>अशोक दिंडा एवढा का आवडतो
धोणी म्हणेल ती पूर्व दिशा मानणारं ते शहाणं बाळ आहे म्हणून Happy
[बाकी ज्यांना स्वता:चा 'अ‍ॅटीट्यूड' आहे त्यांचे स्थान कायम धोक्यात असते!]

११मधे खेळवणार कोणाला हें कुतूहल रहातंच. बहुतेक रहाणे, दिंडा, बाहेर. प्रश्न उरतो, हरभजन कीं प्रग्यान ओझा ? माझं मत ओझाच्या बाजूने; अश्विन असताना गोलंदाजीत ओझाला घेऊन विविधता आणतां येईल.

सेहवागला वगळणं आतां समर्थनीय असलं तरी त्याच्याबद्दल कडवटपणे नाही बोलवत; फलंदाजीची त्याची स्वतःची एक आगळीच, न बदलतां येणारी शैली आहे आणि फॉर्ममधे असताना त्याने विजय मिळवून देणार्‍या मोठ्या व आकर्षक खेळी केल्या आहेत. कदाचित, आधीच त्याला मधल्या फळीत खेळवलं असतं, तर त्याची कारकिर्द लांबलीही असती. भल्या भल्या गोलंदाजांना मैदानावर पाणी पाजणार्‍याला मैदान सोडताना मुजरा नाही केला तरी त्याचा 'कचरा' नाही करवत !!!

फलंदाजीची त्याची स्वतःची एक आगळीच, न बदलतां येणारी शैली आहे आणि फॉर्ममधे असताना त्याने विजय मिळवून देणार्‍या मोठ्या व आकर्षक खेळी केल्या आहेत. कदाचित, आधीच त्याला मधल्या फळीत खेळवलं असतं, तर त्याची कारकिर्द लांबलीही असती. >>>>>>>>>>>>> भाउ यात माझा विरोध आहे....
सेहवाग ला फारच जास्त संधी दिली.....त्याच्या पेक्षा कितीतरी स्फोटक फलंदाज डिव्हिलीअर्स आहे.....
तरी सुध्दा..त्या डिव्हिलीअर्स ने.ऑसी विरुध्दा खेळताना जेव्हा संघाला अत्यंत गरज होती ...त्यावेळेला स्वतःच्या आक्रमक स्वभावाला मुरड घालुन तब्बल ८० बॉल खेळुन ५-१० रन्स बनवल्या..आणि कसोटी अर्णिर्नित राखली..

आक्रमक पणा असावा ........परंतु जेव्हा संघाला तो कामाचाच नाही येत अश्यावेळेला त्याला बाहेरच बसवावे...
परिस्थिती बघुन खेळ खेळावा ... शैली बदलु शकत नाही आणि संघाचा पराभव पण टाळु शकत नाही तर असली शैली काय कामाची.... मग तो निव्वळ स्वतःसाठीच खेळतो असेच म्हणावे लागेल......

रन्स होत नसेल तर आरामात खेळावे ... हे मुरली विजय आणि पुजाराने पहिल्या इनिंग च्या सुरुवातीला दाखवुन दिलेले....त्यावेळेला जर मुरली विजय ने सेहवाग सारखा शैलीच्या मागे लागुन मुर्खपणा केला असता तर त्याच्या नावे शतक लागलेच नसतेल......

एक प्रार्थना: परमेश्वरा, मला पुढच्या जन्मात किडा, मुंगी, चिलट, डास.... अगदी काहिही बनव. पण 'अजिंक्य रहाणे' नको बनवूस. रविंद्र जडेजा सुद्धा माझ्या आधी कसोटी पदार्पण करता झाला. आणि आता कदाचित, शिखर धवन सुद्धा माझ्या आधी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळेल. मी मात्र एक वर्षाहूनही अधिक काळ फक्त पाणी वहातोय.

उदयनजी, मीं सेहवागच्या प्रसंगानुरूप न खेळण्याचं समर्थन वा त्याला वगळण्यांत आलं त्याबद्दल नाराजी नाही व्यक्त केलीय; पण तो आहे तसा त्याला संघात ठेवण्यात आलं तें त्याच्यावर उपकार करायला नसून त्याच्या वैशिष्ठ्यपूर्ण खेळाचं जाणीवपूर्वक cost & benefit analysis करुनच ना ! मग त्याला वगळण्यात आल्यावर तो संघाला किती महागात पडला फक्त यासाठीच त्याला दोष देण्यापेक्षां त्याचा संघाला बरेचदां फायदाही झालाय याची जाणीव ठेवायला काय हरकत आहे ? << सेहवाग सारखा शैलीच्या मागे लागुन मुर्खपणा केला असता तर त्याच्या नावे शतक लागलेच नसतेल......>> अहो, सेहवागच्या तथाकथित ' मूर्खपणाला' असामान्य प्रतिभेची साथ नसती तर कसोटींमधे २३ शतकं [ एक त्रिशतक ],८५८६ धांवा व एकदिवसीय सामन्यांत १५ शतकं [ एक द्विशतक], ८२७३ धांवा, शक्य झालं असतं का ? त्याला वगळल्यावर तरी सेहवागच्या या कामगिरीची व तिचं अधिष्ठान असणार्‍या त्याच्या प्रतिभेची किमान जाणीव तरी ठेवावी, एवढंच मला सुचवायचं होतं.

भाऊ सेहवागबद्दल अनुमोदन. Public memory is short म्हणतात ते किती खरे आहे ह्याचा अनुभव क्रिकेटमधे वरचेवर येत असतो.

प्रश्न उरतो, हरभजन कीं प्रग्यान ओझा ? माझं मत ओझाच्या बाजूने; अश्विन असताना गोलंदाजीत ओझाला घेऊन विविधता आणतां येईल.>> असे होण्याचे चान्सेस मला अखूप कमी वाटतात कारण, धोनीच्या एकंदर सर्व मुलाखतीमधून जडेजा हा दुसरा स्पिनर म्हणून खेळवण्याबद्दल तो खूप आशावादी आहे. जाडेजाची बॉलिंग नक्कीच प्रचंड सुधारली आहे तेंव्हा तो शास्त्रीसारखा त्याच्या लिमिटेड गुणवत्तेचा पूर्ण उपयोग करू शकला तरी भारतात खेळण्यासाठी एक चांगला हँडी ऑप्शन होईल. त्यामूळेच ओझाला जाडेजाऐवजी आणणे कठीण वाटतेय. जर त्याला भज्जीच्या ऐवजी आणायचा म्हटले तर विरुद्ध संघातले डावखुरे फलंदाज बघता दोन orthodox spinner खेळवणे कठीण वाटतेय. शिवाय मोहाली हे भज्जीचे home ground असेही काही टुमणे असेलच म्हणा Happy

राहाणे नि धवन ह्यामधे दोघेही सलामीला फारसे उपयोगी नाहीत असे माझे मत. दोघांनाही ते technique नाही. (राहाणेबद्दल हे गावस्कर बोललाय हे लक्षात घ्या नि तुमच्या शंका कुशंका त्याच्याकडे थेट पोहोचत्या करा) गंभीरला परत आणायला हवे होते कारण साऊथ आफ्रिकेमधे तो जाणार हे नक्की आहे (अनुभवाच्या जोरावर). given a choice gambhir and sehwag should play in middle order once tendulakr quits. पुजारा नि कोहली ह्यांच्यावर सगळा भार थोपवण्यात अर्थ नाही.

इंडिया टीव्हीवर स्पेशल रिपोर्टः साजिश की सजा... जो धोनी को पसंद वोही टीममे.... हाहाहा
आता भारी कॉमेडी करतात हे टीव्हीवाले.... अरे इतके फालतू खेळूनपण त्याला ठेवायचा का टीममध्ये?

भाऊ, भज्जीला बाहेर नाही बसवणार बहुतेक, नाहीतर त्याला आत्ताच काढले असते... संधी दिलीय तर खेळवतील त्याला.... पण आता खेळला नाहीतर मात्र नक्की बसणार आफ्रिकेविरुद्ध

फेरफटका, रहाणेबद्दल अगदी अनुमोदन.... रहाणे खरच अनलकी आणि जडेजा सर्वात नशीबवान Happy

असामीजी, मीं वर म्हटल्याप्रमाणे सेहवागला आधीच मधल्या फळीत आणून स्थिरावायला दिले असते तरच; आतां सेहवागचें पुनरागमन [ यशस्वी पुनरागमन ] जरा कठीणच वाटतं. सेहवाग सलामीचा जोडीदार नसेल तर गंभीर सलामीला योग्य कायमचा पर्याय होऊं शकतो असं मला नेहमीच वाटत आलंय.

चांगल्या 'लेगस्पीनर'च्या अभावीं गोलंदाजीत परिणामकारक विविधता आणणं कठीणच. सचिनला अधुनमधून गोलंदाजी करताना पहायला आवडेल पण तेंही शक्य दिसत नाही. उपखंडाबाहेर गोलंदाजी आपला घातक कमजोर दुवा ठरण्याचीच शक्यता निदान नजीकच्या भविष्यकाळात तरी दिसतेच आहे.

[ मी फारच तज्ञ वगैरे असल्याचा आव आणतोय असं माझं मलाच सतत जाणवतंय आणि हंसू येतंय ! Wink ]

चांगल्या 'लेगस्पीनर'च्या अभावीं गोलंदाजीत परिणामकारक विविधता आणणं कठीणच. सचिनला अधुनमधून गोलंदाजी करताना पहायला आवडेल पण तेंही शक्य दिसत नाही. उपखंडाबाहेर गोलंदाजी आपला घातक कमजोर दुवा ठरण्याचीच शक्यता निदान नजीकच्या भविष्यकाळात तरी दिसतेच आहे. >> लेगस्पीनर तसे सर्वत्रच दुर्मिळ आहेत म्हणा. उपखंडाबाहेर गोलंदाजी करताना स्विंग होणार्‍या वातावरणामधे यादव, इरफान, कुमार नि झहीर बॉलिंग करताना बघायला मजा येईल. Happy

यंदाच्या आयपील मधे कोणी नवे चेहरे दिसतात का बघायचे आहे.

<<उपखंडाबाहेर गोलंदाजी करताना स्विंग होणार्‍या वातावरणामधे यादव, इरफान, कुमार नि झहीर बॉलिंग करताना बघायला मजा येईल >> कां कुणास ठाऊक पण गेल्या दोन-तीन वर्षात या रास्त आशेला तडा गेला , हें खरं. आतां तरी तसं न व्हावं ही प्रार्थना.

>><<उपखंडाबाहेर गोलंदाजी करताना स्विंग होणार्‍या वातावरणामधे यादव, इरफान, कुमार नि झहीर बॉलिंग करताना बघायला मजा येईल >>

अरे नको रे झहीर नको... व्यं. प्रसादपेक्षा वाईट अवस्था झालीये त्याची..इरफान (पठाण?) कधीच संपला.. यादव, कुमार यांना पुढील किमान १० वर्षाच्या खेळासाठी काळजीपूर्वक वापरायला हवे.
हरलो तरी चालेल पण नविन रक्त व ज्यांना देशासाठी खेळायची व काहीतरी करून दाखवायची भूक आहे त्यांना घेऊन जा. short term pains long term gains!!

ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या अब्रूची वेशीवर टांगलेली लक्तर बघून मला अत्यानंद होत आहे.
जणू काही ग्रेग चॅप्पलने आपल्या संघात पाडलेल्या फूटीचे आणि कट कारस्थानाचे नियतीने दिलेले प्रायःश्चित्त.
पण ते बिचार्‍या क्लार्कला भोगावे लागतेय हे त्याचे नशिब.

विक्रमसिंहजी , झाल ते वाईट झाल .
पण पहिली गोष्ट म्हणजे क्लार्क बिचारा वगैरे काही नाही . त्याने कॅटीचचे काय केले हे जगजाहीर आहे . दुसरे म्हणजे Phil Hughes हा त्याचा खास माणूस आहे (जसा दिनेश मोण्गिया दादाचा होता , आणी जडेजा धोनिचा) . या सगळ्यामुळे ० फॉर्म मधे असूनही त्याला पुढच्या मॅच खेळायला मिळणारच . आणी निबंध लिहिला नाही म्हणून पुढच्या मॅचला नाही हे Logic आपल्या डोक्याबाहेरच आहे .

डीन जोन्स म्हणतो , कोणत्यातरी तिसर्‍याच देशात भारत- ऑस्ट्रेलिया सामने झाल्याशिवाय खरा सरस संघ कोणता हें ठरवणं कठीण आहे. अगदीं आत्तांच कसं काय बुवा सुचलं हें ह्याना ! बाकी, पराजयाबाबत आपल्या व ऑसी मिडीयाची पचनशक्ती सारखीच क्षीण आहे हें आतां सिद्ध होतंय !! Wink

कोणत्यातरी तिसर्‍याच देशात भारत- ऑस्ट्रेलिया सामने झाल्याशिवाय खरा सरस संघ कोणता हें ठरवणं कठीण आहे. >>>>>>>>>>>>>>> भिक्कार वृत्ती कशाला म्हणतात याचे उदाहरण डिन जोन्स मस्त देतो Happy

>>कोणत्यातरी तिसर्‍याच देशात भारत- ऑस्ट्रेलिया सामने झाल्याशिवाय खरा सरस संघ कोणता हें ठरवणं कठीण आहे
बोलणारा माणूस आणि वेळ चुकीची असली तरी वरील वाक्यात तथ्य नक्कीच आहे!

Pages