मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना..वाईट असं नाही म्हणता येणार. टाइमपास म्हणून अन एक वेगळा जॉनर म्हणून वाचू शकतो. पण साहित्यिक व्हॅल्यु झिरो आहे. अपेक्षा आधीच क्लिअर असलेल्या बर्‍या.
हिरो-हिरवीन मंद पेक्षाही मला वाटलं अरे यार काय बोर आहेत.. एकदा बसून काय ते क्लीअर बोलून का टाकत नाहीत. मग लक्षात आलं की त्यांना बोलण्यात वेळ घालवायचाच नाहिये. दे डोन्ट एम टु टॉक, दे एम टु प्लीज यु नो Proud

मेमरीज ऑफ अ गेइशा : साधं, जड तत्वज्ञान नसलेलं, थोडं फार फिल्मी वाटेल (पण खरं असू शकेल) असं वाचायला आवडत असेल तर 'गेइशा' नक्की आवडेल. जुन्या काळच्या एका 'गेइशा' चं एका अमेरिकन माणसानं लिहिलेलं हे आत्मकथन.

गरीब कुटुंबातली लहान मुलगी चियो - परिस्थिती मुळे 'गेइशा' बनवली जाते आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत यशस्वी होते, त्यात तिला कोणाकोणाचा विरोध होतो, कोणाची साथ मिळते त्याची ही गोष्ट.

कादंबरीत रंगवलेलं चियोचं बालपण, तारुण्य, गेइशा बनण्याचा प्रवास खाच खळग्यांनी, योगायोगांनी आणि नशिबाच्या खेळांनी रंजक बनला. जो तितक्याच पद्धतीनी सादर केलय त्यामुळे पुस्तक वाचायला मजा येते. महायुद्धाआधीचं आणि कादंबरीच्या शेवटी युद्धानंतरचं जपानी गेइशांचं जीवन यात येतं. सुरुवातीच आणि मधला बराच भाग वाचतान आपण चियो च्या कथेशी जोडले जातो. तिच्न्या दु:खानी हळहळतो. तिला यश मिळाल्यावर आपल्यालाच समधान मिळतं. एकुणात मस्त मनोरंजन होतं.

ह्या कादंबरीवर ह्याच नावचा हॉलिवूड सिनेमा सुद्धा आहे.

A day of the jackal चा लेखक Fredric Forseith चा No Come Backs हा कथासंग्रह संपवला. अनुवाद विजय देवधर. वाचकाला शेवटी तडाखा बसेल अशा काही कथा आहेत पण मध्यावर काहीशा रेंगाळतात. वाचनीय.

मेमरीज ऑफ अ गेइशा >> नक्की कुठलं पुस्तक आधी आलं होतं माहित नाही. पण उमराव जानची आणि या पुस्तकाची स्टोरीलाईन खूप सिमिलर वाटली मलातरी.

मेमरीज ऑफ अ गेइशा १९९७ मधे प्रकाशित झालं. हे मुख्यत्वे 'मिनेको इवासाकी' हिच्या अनुभवांवर आधारीत आहे. ती १९४९ मधे जन्मली, अतिशय यशस्वी गेइशा झाली आणि कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच २९ व्या वर्षी निव्रुत्त झाली. 'मेमरीज...' मधे लेखकानी अतिरंजीत कहाणी लिहिली असा तिचा आरोप आहे. तिनी स्वतः तिचं आत्मचरीत्र लिहिलंय 'Geisha of Gion' (UK) 'Geisha, a Life' (US)अशा नावांनी जे २००२ मधे प्रकाशित झालं आणि best seller ठरलं.
इती विकि Happy

आता 'Geisha of Gion' वाचायला हवं

ह्या कादंबरीवर ह्याच नावचा हॉलिवूड सिनेमा सुद्धा आहे.>>>

सुंदर आहे सिनेमा. पहा जमल्यास.

एम्पायर्स ऑफ मुघल्सचे चारही भाग वाचून संपले..पहिल्या दोन भागांनी अपेक्षा वाढवल्यानंतर तिसरा भाग काहीसा सपक झाला होता. पण चौथ्या भागाने पुन्हा एकदा अपेक्षा उंचावल्या आहेत. चौथ्या भागात शहजादा सलीम उर्फ जहांगीर आणि त्याचा मुलगा खुर्रम उर्फ शाहजहान यांच्यातील तेढीचे वर्णन आहे. सगळे काही सुरळीत चाललेल असताना केवळ महत्वाकांक्षेनी झपाटलेली स्त्री कसे होत्याचे नव्हते करू शकते याचे सुरेख चित्रण या पुस्तकात केले आहे. आणि या मेहरुन्नीसाचा उल्लेख तिसर्या भागातही आलेला आहे.
आता चारही भाग संपवल्यामुळे चुटपुट लागली आहे की पुढच्या भागांचे काय. अजूनतरी चारच भाग प्रकाशित झाले आहेत. आणि आत्ता कुठे महाराष्ट्र या मोगलांच्या राजकाराणात डोकावला आहे. मालिक अंबरचा उदय झालेला आहे आणि पुढे त्याच्याच सोबतीने शहाजीराजांचा उदय होणार आहे. तो भाग लेखकू कसा उतरवतात याची जबरदस्त उत्सुकता आहे. रुदरफोर्डच्या ब्लॉगवर पुढचा भाग सर्पंट्स टूथ येत्या दोन महिन्यात प्रकाशिक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

काल कलकत्त्याची पुस्तक जत्रा संपली. गेले ३७ वर्षं अखंड चालत आलेली ही जत्रा लोकांच्या वार्षिक कॅलेन्डरचा अगदी अविभाज्य भाग बनून गेली आहे. गेले काही वर्षं त्याचा व्हेन्यू बदलल्याने जायचीयायची फार गैरसोय होते तरीही आबालवृद्धांसकट लाखो लोक अगदी हौशीने भेट देतात, पुस्तकं खरेदी करतात. रिकाम्या हाताने बाहेर पडणार्‍यांची संख्या तशी कमीच असते. यात अगदी निम्नवर्ग सोडून सर्व आर्थिक गटांतले लोक असतात. नुसतं मजा करायला हिंडायला जाणारं पब्लिक पण असतं पण त्यांच्याही नजरेखालून पुस्तकं जातच असतात की! या वर्षी जत्रेचा कालावधी ४ दिवसांनी वाढवला होता पण प्रतिसाद अखंड वाढताच होता.
मला यावेळेला फक्त शेवटचे दोन दिवस जायला जमलं. एकूणच मनाला प्रसन्न करणारा अनुभव. राज्य सरकारचाही एक मोठा स्टॉल असतो. त्यात सरकारी साहित्य, कला, शिशुकिशोर, नाट्य अशा अकादम्या आणि विविध खात्यांचा समावेश असतो. यावर्षी नवर्‍याच्या ऑफिसनेपण तिथे एक टेबल मिळवून पुरातत्व-इतिहास संबंधित त्यांची स्वतःची १५-२० प्रकाशनं विकायला ठेवली होती. १५ दिवसात चक्क ६८हजाराची विक्री झाली, तीही बहुतांशी सर्वसामान्य वाचकांनी घेतलेली पुस्तकं होती. पुरातत्वासारख्या आडवाटेच्या विषयाला मिळालेला हा प्रतिसाद आमच्या दृष्टीने फार सुखावून गेला. पण मी आणखी आश्चर्यचकित झाले ती सरकारी साहित्य, कला इ, अकादमीच्या पुस्तकविक्रीने. साहित्य अकादमीने जवळ जवळ ५ लाखांची विक्री केली असावी शिवाय जवळ्जवळ ३ लाख रु. चं रवीन्द्र रचनावली या आगामी पुस्तकाचं अ‍ॅडवान्स बुकिंग झालं.
बाकी जत्रेत बंगाली पुस्तकांचे स्टॉल्स बहुसंख्येने होते आणि सगळी महत्वाची इंग्लिश पब्लिकेशन हाउसेसही होती. कुठलाही स्टॉल फार रिकामा पडलाय असं दिसत नव्हतं

महाराष्ट्रातल्या साहित्य संमेलनातल्या पुस्तकविक्रीचे आकडे मला खरंच माहित नाहीत. पण अशी दरवर्षी नियमाने पुस्तकजत्रा या अशा प्रमाणात महाराष्ट्रात का होत नाही बरं? महाराश्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने खूप चांगली पुस्तकं प्रकाशित केली आहेत पण एकतर ती आता मिळत नाहीत किंवा गठ्ठे बांधून गुदामात पडलेत. सरकारी पुस्तकांचं अतिशय सुंदर प्रॉडक्शन आणि हसतमुखाने नव्यानव्या आवृत्त्यांची विक्री असं आपल्याकडे कधी बरं घडेल?

हो मानुषी, मौनराग मलाही खूप आवडलं.

वरदा, परवाच वर्तमानपत्रात ह्या प्रदर्शनाचे बातमी आणि फोटो पाहिला होता, तेह्वाच तुला विचारायचं ठरवलं होतं. आज तूच लिहिलंस. सह्हीये! Happy

Immortals of Meluha & The Secret of Nagas - दोन्ही चांगली. Recommended to read.

आता 'The Oath of Vayuputras' ची वाट बघत आहे.

मौनराग निव्वळ अदभुत आणि अप्रतिम आहे.>>+१.

ह्यातल्या एका प्रकरणावर सचिन खेडेकर अभिनय आणि एकावर चंद्रकांत कुलकर्णी अभिवाचन करतात. के व ळ होतो तो प्रयोग. सुदर्शन रंगमंचचा रंगमंच इतका छोटा आहे, तरी सचिन खेडेकर जिवंत उभा करतो तो वाडा आपल्यापुढे. फारच सही. कधी लागला हा प्रयोग तर अजिबात चुकवू नका. 'मौनराग' नावानेच होतो.

एरवी संपूर्णपणे व्यावसायिक असलेले असे लोक जेव्हा प्रायोगिक नाटक वगैरे करतात ना, निव्वळ हौसेपायी किंवा त्यांच्या समाधानासाठी, तेव्हा मला त्यांचं जाम कौतुक वाटतं! Happy

निव्वळ अदभुत आणि अप्रतिम >>>>>>>>>> अगदी अगदी!
अजून संपूर्ण वाचून व्हायचंय! पण मनावर संपूर्णपणे गारुड करणारं! हे पुस्तक वाचताना मला काय म्हणायचंय हे अजून नक्की शब्दच सापडत नाहीयेत!
>>>कधी लागला हा प्रयोग तर अजिबात चुकवू न>>>>>>>> पुण्यात लागला तर नक्कीच बघीन पौर्णिमा.

मित्र-मैत्रिणींनो, मला जरा मदत कराल का? मला ऑफिस मधल्या कलीगसाठी एक चांगलसं पुस्तक घ्यायचय भेटीदाखल. माझी वाचनाची आवड त्याच्याशी अजिबात जुळत नाही. तो सिक्रेट्स ऑफ नागाच्या जॉनर मधली पुस्तकं वाचणारा आहे. त्याला राजकारण, इतिहास, त्यातील व्यक्तीचरीत्र ह्यात खुप इंट्रेस्ट आहे. काही नावं सुचवू शकाल का अशा व्यक्तीला आवडू शकतील अशी?

तो सिक्रेट्स ऑफ नागाच्या जॉनर मधली पुस्तकं वाचणारा आहे. त्याला राजकारण, इतिहास, त्यातील व्यक्तीचरीत्र ह्यात खुप इंट्रेस्ट आहे.>> हे परस्परविरोधी आहे Happy

श्रद्धा, जे कुठलं पुस्तक घेशील ते त्याच्याकडे ऑलरेडी आहे का नाही ते बघ.

आशुचॅंप, (तुझ्या इथल्या पोस्टी वाचून) एम्पायर्स ऑफ मुघल सध्या विशलिस्टमधे घालून ठेवलंय. Happy

राजकारण -
१ इंडिया आफ्टर गांधी - रामचंद्र गुहा - मोस्टली न्युट्रल मला आवडले. इथेही लिहिले होते.

२. जर काँग्रेस पक्ष(च) प्रिय असेल तर त्यासाठी मस्ट रिड India After Independence
by Bipan Chandra मला बोअर झाले. पण इथे मायबोलीवरही अनेकांना आवडेल.

३. शिवरात्र - नरहर कुरूंदकर (स्पेशली अल्पसंख्यांक राजकारणाविषयी भाष्य सर्वांनीच जरूर वाचावे. तीन लेखात ते मुस्लिम राजकारणावर बोलतात, तर त्याच पुस्तकात हिंदू गोळवलकरांवरही पत्रस्वरूपात भाष्य आहे. मस्ट रिड फॉर एनिबडी !

बाकी पोस्ट इंडिंपेंडटवर राजकारणावर अनेक पुस्तक आहेत पण खास नाव घ्यावे असे अजून काही सुचत नाही.

इतिहास अगदी हडप्पा ते २००० - India: A history by John Keay हा केवळ धावता आढावा आहे. कोणा एका भागाबद्दल नाही. त्यामुळे सखोल वाचन म्हणता येणार नाही, पण इतिहासाबद्दल माहिती नक्कीच मिळेल.
इतिहासाबद्दल इतकी ढिगाने पुस्तके आहेत की, कोणता कालखंड हवा ते सांगितले तरच सुचविता येतील.

मौनराग मी अजून वाचले नाही, आता मिळवावे लागेल असे दिसते. त्या प्रयोगाबद्दल ऐकले होते.

Pages