मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो आगाऊ. Internet वरसुद्धा ह्यावर बरीच चर्चा आहे.

पण पहिल्यांदा वाचल्यावर पुस्तक नक्कीच अफाट वाटते.

पादुकानन्द >>> हिंदीच काय इंग्रजी सिनेमासुद्धा भिकार आहे.

हिंदीच काय इंग्रजी सिनेमासुद्धा भिकार आहे.>>> अनुमोदन!
हिंदी सिनेमाचे नाव 'शक्ती' जो तेलूगू 'अंथापुरम' वरुन ढापला होता.

हो नताशा,
पहिल्यांदा वाचल्यावर पुस्तक नक्कीच अफाट वाटते आणि हिंदीच काय इंग्रजी सिनेमासुद्धा भिकार आहे Happy
पण मी आजपर्यंत सगळ्याना ह्या पुस्तकाचे खुप कौतुक करतानाच ऐकलं आहे.

आणि एक Escape from Taliban असही सिनेमा होता ना. अशाच स्टोरीलाईनवर?

अमेरिकन लोकांच्या मनातील इराण्/मुस्लिम/पौर्वात्य संस्कॄतीबद्दल असलेले सर्व पूर्वग्रह या एकाच पुस्तकात कोंबलेले आहेत. : या पुस्तकाबद्दल नाही, पण अमेरिकन पुस्तकांत साम्यवादी देशातल्या लोकांबद्दलही आणि तिसर्‍या जगातल्या लोकांबद्दल पूर्वग्रह असतात का? माझ्या वाचनात आलेल्या एक-दोन पुस्तकात काही उल्लेख होते जे अगदी विशिष्ट प्रतिक्रिया उमटावी याचसाठी असावेत असे वाटले. अगदी त्यासारखाच किळसवाणा प्रसंग स्ल.मि. चित्रपटात पहायला मिळाला.

'नॉट विदाउट माय डॉटर' अत्यंत एकांगी, रेसिस्ट आणि आक्रस्ताळे पुस्तक आहे. केवळ 'सत्य घटनेवर आधारित' असे शीर्षक दिल्याने इतके आत्यंतिक स्टिरिओटीपिकल लेखन समर्थनीय ठरत नाही.
अमेरिकन लोकांच्या मनातील इराण्/मुस्लिम/पौर्वात्य संस्कॄतीबद्दल असलेले सर्व पूर्वग्रह या एकाच पुस्तकात कोंबलेले आहेत >>
+१

पुस्तक वाचून अंगावर काटा उभा राहतो हे तर खरेच. परंतु बर्‍याच घटना अति रंजितपणे रंगवून सआंगितलेल्या वाटतात. यु ट्युब वर बर्‍याच डॉक्युमेंटरीज अवेलेवल आहेत. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यनंतर बेट्टी व माहताब चे अमेरिकन चॅनेलस नी घेतलेले इंटरव्ह्युज , इतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया इ. सर्व अवश्य बघा. अर्ध्या लोकांनी बेट्टी ने पुस्तक नुसते नरेट केले आहे पण मूळ बोलविता धनी वेगळा आहे अश्या स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तिने इराण मध्ये तिला भेटलेल्या एका महिलेचा उल्लेख पुस्तकात केला आहे. त्या महिलेचे मुलाखतही यु ट्युब वर आहे. तिने त्यात बेट्टी ला डॉ. मेहमूदीने कोणत्याही प्रकारची मारहाण केल्याचे आम्ही पाहिलेले नाही. इ. विधानेच केली आहेत. एकंदरीत ह्या इश्श्यु ला धरून खूप उलट सुलट चर्चा, वादंग सर्व काही झाले. त्यामुळे पुस्तक वाचून बेट्टी च्या बाजुने सहानुभुती ची जी एक पटकन भुमिका झाली होती ती बदलून न्युट्रल ला आले मी की खरे काय आहे हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे घटकाभरचे मनोरंजन म्हणून ह्या कादंबरी कडे पाहिलेले बरे , असे माझे मत बनले.

डॉ. मेहमूदी चे ही इंटरव्युज ५ का ६ भागांत आहेत. २००९ साली डॉ. मेहमूदी ह्यांचे निधन झाले (मला वाटते वयाच्या ७० व्या का ६० व्या वर्षी). बेट्टी माहताब सोबत एकदा अमेरिकेत परत आल्यानंतर डॉ. मेहमूदी ला त्याच्या मुलीला एकदाही भेटायला मिळाले नव्हते.

बेट्टी माहताब सोबत एकदा अमेरिकेत परत आल्यानंतर डॉ. मेहमूदी ला त्याच्या मुलीला एकदाही भेटायला मिळाले नव्हते.>>>

हो आणि त्यावर त्याने Without my daughter म्हणून पुस्तक लिहिले.

Without my daughter >> वाचायला हवे हे

पुस्तक वाचून अंगावर काटा उभा राहतो हे तर खरेच. >> +१ परंतु बर्‍याच घटना अति रंजितपणे रंगवून सआंगितलेल्या वाटतात.>>परत काही काळाने वाचायला घेतल्यावर हे असे वाटले मलाही

त्यावर त्याने Without my daughter म्हणून पुस्तक लिहिले. >> मला माहितच नव्हतं. मला अगदी वाचायला आवडेल हे पुस्तक. कहाणीची दुसरी बाजुही कळेल.

नॉट विदाउट माय डॉटर कॉलेज डेजमधे वाचलं होतं. तेव्हा दुसरी बाजु असेल हा विचारच नव्हता. सत्यकथा म्हणुन वाचलं आणि वाचुन प्रचंड आवडलं. आता मी डॉ मेहमुदीचं पुस्तक डेस्परेटली शोधणार.
यावरचा सिनेमा मात्र अगदीच बंडु होता. आणि हिंदी सिनेमा 'शक्ती' तर विनोदीच होता. फक्त त्यातला छोटा मुलगा मात्र फार क्युट होता. Happy

Without my daughter हे पुस्तक मी वाचले आहे. सोपे आहे कळायला. शेवट नाही पटत. काहीतरी कमालिचा काल्पनिक वाटतो.

मीपण अजून Without my daughter वाचले नाही. फक्त कामापुरते English वाचते बाकी मराठीच वाचायला आवडते. Happy

'नॉट विदाउट माय डॉटर' अत्यंत एकांगी, रेसिस्ट आणि आक्रस्ताळे पुस्तक आहे>>>
कॉलिन्ग अशोकमामा.
त्यानी ह्या बाबत इतरत्र लिहिलेल वाचलय. Happy

Without my daughter हे पुस्तक मी वाचले आहे. सोपे आहे कळायला. शेवट नाही पटत. काहीतरी कमालिचा काल्पनिक वाटतो. >>> बी , अजून थोडं लिहि त्या पुस्तकाबद्दल. थोडी अजून माहिती. काय म्हणणे डॉ महमुदीचे?

नॉट विदाउट माय डॉटर खूप वर्षापूर्वी वाचलंय , पण मला आवडलं होतं - आवडलं म्हणण्यापेक्षा- रिलेट झालं होतं, दोन संस्कृतीतले टोकाचे फरक पाहता त्या बेटीची परिस्थिती , तिची रिअ‍ॅक्शन तशीच होईल असं वाटतं खरं.

अजून थोडं लिहि त्या पुस्तकाबद्दल. थोडी अजून माहिती. काय म्हणणे डॉ महमुदीचे?>> +१

काय म्हणणे डॉ महमुदीचे >??

यु ट्युब वर लिंक्स शोधा डॉ. मेहमूदी चे नाव टायपून... त्याच्या मुलाखतीत सगळे सांगितले आहे त्याने. अर्थात त्याच्या दृष्टिकोनातून बेट्टीने च स्वतःचे व त्यांच्या मुलीचे अपहरण करवले इराणहून अमेरिकेत जाण्यासाठी!

बी , अजून थोडं लिहि त्या पुस्तकाबद्दल. थोडी अजून माहिती.>> Happy लॉल.. मैत्रेयी वाचले म्हणतेस ना तू ते पुस्तक मग माहिती कशाला देऊ Happy ...

मी नाही वाचली वा पाहिली डॉ. मेहमूदीची मुलाखत. मला ते पुस्तक फक्त अर्धे आवडले नंतर शेवटी तिचा संघर्ष असेल असे समजून आले आणि मी उरलेली पाने झटपट आवरती घेतली. कधीकधी मला वाटत प्रत्येक भाषेतील साहित्य निर्मितीची स्थिती सारखीच असते. असे काहीच नाही की अमुक भाषेत जास्त चांगले साहित्य निर्माण झाले आहे. मी जी काही ईंग्रजी पुस्तके वाचली आहेत ती मला अगदी संग्रही ठेवावी अशी कधीच वाटली नाही. मराठी भाषेतील पुस्तके खूप वाचलीत म्हणून त्यातली वीस तीस पुस्तके मला संग्रही आणि परत परत वाचावीशी वाटतात. उच्च शिक्षित भारतीय लोक ईंग्रजी भाषेवर आपल्या मातृभाषेपेक्षाही जास्त प्रेम करतात म्हणून बरीचशी तद्दन टाकावू ईंग्रजी पुस्तके इतकी प्रसिद्ध होतात.

बी , म्हणजे तू वरची चर्चा नीट वाचलेली दिसत नाहीस. Not without my daughter आणि Without my daughter हे दोन वेगवेगळी पुस्तके आहेत अन त्यातले दुसरे तू वाचलेस असे तू म्हटल्याने मी तुला विचारली ती माहिती. तू नक्की कुठले वाचलेयस मग?

उच्च शिक्षित भारतीय लोक ईंग्रजी भाषेवर आपल्या मातृभाषेपेक्षाही जास्त प्रेम करतात म्हणून बरीचशी तद्दन टाकावू ईंग्रजी पुस्तके इतकी प्रसिद्ध होतात. >> याचा इथे काय संबंध ?

'नॉट विदाऊट' वाचलं आहे आवडीने. मला जर बेटी महमूदीसारखं सुट्टीवर जायचं म्हणून अजिबात ओळख नसलेल्या नव्या देशात नेलं असतं आणि आता अमेरिकेत (किंवा आहेत त्यापेक्शा कितीतरी पटींनी प्रगत देशात) परतच जायचं नाही म्हटलं, आणि माझ्याकडून त्यावर पुस्तक लिहिलं गेलं तर त्या टाईपचंच लिहिलं जाईल.
बी, इथे पुस्तकं बेस्ट सेलर होण्याआधी फक्त उच्च शिक्षित भारतीय लोकांचे रिव्ह्यु विचारात घेतात असं वाटतंय का?

'नॉट विदाउट माय डॉटर' अत्यंत एकांगी, रेसिस्ट आणि आक्रस्ताळे पुस्तक आहे. केवळ 'सत्य घटनेवर आधारित' असे शीर्षक दिल्याने इतके आत्यंतिक स्टिरिओटीपिकल लेखन समर्थनीय ठरत नाही.
अमेरिकन लोकांच्या मनातील इराण्/मुस्लिम/पौर्वात्य संस्कॄतीबद्दल असलेले सर्व पूर्वग्रह या एकाच पुस्तकात कोंबलेले आहेत >>
Angry
आजच ऑर्डर केलं मी हे पुस्तक
आधी नाही का लिहिता आलं हे Sad

सायो हम्म ये सही बात बोली तुमने
बघते वाचून!
आता या पुस्तकाविषयी एकही पोस्ट मी वाचणार नाही... Happy

मला चित्रपट आवडला होता. त्यात दाखवल्याप्रमाणेच तशीच्या तशी कथा घडली असेल असे समजायचे कारण नाही.

'शक्ती द पॉवर' मधे मात्र नाना पाटेकर होता. ऑर्डिनरी खडूस सासर्‍याविरूद्ध त्याची सून मुलीला/मुलाला घेऊन पळून जाऊ शकेल, पण नाना पाटेकर समोर? चान्सच नाही. म्हणून मग शेवटी तो त्यांना कॅच करतो, अचानक 'खाप पंचायत' मोडमधून 'सहृदय म्हातारा' होतो आणि उदार ई.ई. अंतःकरणाने त्यांना जाऊ देतो. त्याच्याबरोबर धावपळ करणार्‍या गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर राष्ट्रकार्यात भाग घेतल्याचे समाधान झळकते ('बेगानी शादी मे' गाणे कट केले असावे). मग करिश्माला ही भरून येते व ती नातवाला त्याच्या पाया वगैरे पडाय्ला सांगते. आधी 'इश्क कमीना' गाण्यावर शिट्ट्या वगैरे झालेल्या असतात. अधूनमधून कुठेतरी 'नॉट विदाउट माय डॉटर' चा भास होतो Happy

सायो+१.
झकास, अशोक यांनी छानच विवेचन केले आहे. पण मला ते तिथेही फारसे पटले नाहीच. जळ्ळं मला तिकडे आयफोनावरून टाईप करता येत नाही म्हणून राहून गेलं. Happy

बी ने नेमकं कुठलं पुस्तक वाचलंय?

बी , म्हणजे तू वरची चर्चा नीट वाचलेली दिसत नाहीस. Not without my daughter आणि Without my daughter हे दोन वेगवेगळी पुस्तके आहेत अन त्यातले दुसरे तू वाचलेस असे तू म्हटल्याने मी तुला विचारली ती माहिती. तू नक्की कुठले वाचलेयस मग?>>> मैत्रेयी, तो माझा शुद्ध टायपो होता. माझ्या लक्षातच आले नाही Happy मी Not without my daugther हे पुस्तक वाचले आहे. दुसरे without my daugther पुस्तक आहे की नाही माहिती नाही.

उच्च शिक्षित भारतीय लोक ईंग्रजी भाषेवर आपल्या मातृभाषेपेक्षाही जास्त प्रेम करतात म्हणून बरीचशी तद्दन टाकावू ईंग्रजी पुस्तके इतकी प्रसिद्ध होतात. >> याचा इथे काय संबंध ?
मेधा अगदी रहावल नाही आजूबाजूचे वातावरण पाहून म्हणून मी लिहिले ते वाक्य इथे. हरेक बीबींवर अवांतर होतच असते ना!

बी ने 'नॉट विदाऊट' वाचलंय आईने लिहिलेलं. >> सायो माझी आई कधीच शाळेत गेली नाही.

बी ने नेमकं कुठलं पुस्तक वाचलंय?>> साति -- Not without my daugther

Pages